लेखांक २७४
१५८४ श्रावण वद्य ७
मसूरल अनाम राजश्री बाजी सर्जाराऊ जेधे देशमुख ता। भोर प्रति राजश्री सिवाजी राजे सु॥ सलास सितैन अलफ तुह्मी बखैर पाठवली लिहिले जे आपण माणसे जाउलीकडे नेईन तरी निंबाजीस कागद दिधला पाहिजे ह्मणउनु लि॥ तरी दाटून जाउलीकडे माणसे काशास नेऊ पाहता जैसी आहेत तैसी असो देणे व दताजी ककास कौल पाठवणे ह्मणउनु लि॥ तरी कौल पाठविला असे तरी त्यास देणे आणि त्यासी हुजूर पाठवणे मोर्तब सुद
मर्या
देयं विरा
जते
तेरीख २० माहे जिल्हेज
जिल्हेज सुरुसूद