[ २८४ ]
श्री शके १६७५ ज्येष्ठ वद्य ७.
राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासीः-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
खंडेराव होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणें. विशेष. राजश्री बिजेसिंग खेत्री यांसी श्रीकाशीस राजश्री बळवंतसिंग राजे याजकडे पैक्याच्या तहसिले निमित्या पाठविले आहेत. त्यास, तुह्मांपासी येतील. तरी, नवाब मनसुरअल्ली याजकडील राजीन्याचें दस्तक यांसी करवून देविणें ; आणि खाबंदचाकरी जलदीनें करून येत तो अर्थ करणें. अनमान न करणें. जाणिजे. रा। छ. २१ माहे साबान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
( मोर्तब सुद )
( खंडेराव होळकरस्य मुद्रेयं )