Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३२८ ]
श्री शके १६७६ माघ वद्य १२.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसीः---
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. क्षेत्र गया व क्षेत्र कुरुक्षेत्र ही दोन्हीं क्षेत्रें पातशहापासून सरकारांत घेतली आहेत. त्यांची कमावीस तुह्मांस सांगितली आहे. तर हरदू ठिकाणी आपले तर्फेनें कमावीसदार पाठवून इमानेंइतबारें अंमल करून ऐवज सरकारांत पावता करणें. दोहीं क्षेत्री करून घेणें. तीर्थे मोकळी करणें. जाणिजे. रा। छ २६ रबिलासर, सु॥ खमस समसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३२७ ]
श्रीशंकर शके १६७६ माघ वद्य १०.
राजेश्री दामोधर माहादेव गोसावी यांसीः--
उपरि. जयाप्पाकडील व जयनगरचा वगैरे मजकूर तुह्मी धोंडोबा नाईकाजवळ सांगावयास सांगितला तो सर्व कळला. ऐसियास रामसिंगास टिका व सुरजमल व मधोसिंग यांस हसबुलहुकूम व जयाप्पास खिलत वगैरे पाठवणे. जयाप्पाचे खिलत व रामसिंगाचा टिका हा आह्माकडे पाठवणें. येविसीं पूर्वी एकदा वजीरास विचारलेंच होतें. तेव्हांही मजकूर ठहरला होता. मधील अडथळा सरल्यावरी टिका पाठवूं. त्यास, सांप्रत पाठवून देणें. जाणिजे. छ २४ रा।खर. बहुत काय लिहिणें ? हरगोविंदाचे लेकाचें सुत्र मात्र राखणें. प्रयोजन पड़लें तरी करूं. नाहीं तरी, नाहीं. छ. मजकूर. सविस्तर धोंडोबा नाईक येथील मजकूर सांगतील. छ मजकूर.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३२६ ]
श्री शके १६७६ माघ शुद्ध ५.
राजश्री चिमणाजी दलपतराव संस्थान पेठ गो। यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाळाजी बाजीराव प्रधान आशिर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. राजश्री दामोदर महादेव याची लाकडें सुमार ७५ पाउणसे ननासी व माहाजे माहाठाणी नासिकास येतील. त्यास जकातीचा तगादा न करणें. जाणिजे. छ ४ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
श्री
राजा शाहू नरपति
हर्षनिधान बाळा-
जी बाजीराव प्रधान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३२५ ]
श्री शके १६७६ मार्गशीर्ष वद्य ११.
राजश्री दामोदर माहादेव गोसांवी यांसीः--
उपरि. तुमचें प्रयोजन अगत्य आहे. व खासा स्वारी लष्करसुद्धा गंगास्नानास जाणार, याजकरितां तुह्मीं बराबरी असावें. व त्यास डेरादांडा सरंजामसुद्धा येणें. येथें येऊन माघारे तुह्मास जाणें असेल. तरी राजश्री मल्हारबा अलीकडे आले नाहीत. याजकरितां उदैक येथें मुक्काम आहे. त्यास, तुह्मी उदैक जरूर येणें. माघारें जावयाचे असल्यास पुन्हा माघारे जाऊन, डेंरादांडा वगैरे सरंजामसुद्धां येणें. परंतु उदैक लौकर प्रातःकालींच येणें. दिरंग न लावणें. जाणिजे. छ २५ सफर. बहुत काय लिहिणें.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३२४ ]
(पैवस्ती) शके १६७३ मार्गशीर्ष वद्य ११
पौ छ २४ सफर.
भगवान सुरखरू करील तोच सुदिन जाणावा. वरकड राजीक वर्तमान तरः— दिवान हरि गोविंदजी व पेमसिंगजी दहा पंधरा हजार फौजेनसी रेवाडीपावेतों पावले आहेत. वजिराचे पुत्राचे जागिरीचे गांव या प्रांतांतील कुली एक दोनी जबातींत आणिले. तेव्हां त्याणी श्रीमंत बापू यांसी जाबसाल लावून मामिलत इछून माणिकराम यांसी हरि गोविंदजीसमीप पाठविलें. येथून लक्षा एकाची हुंडीहि जापेदरायाची दिल्लीस गेली आहे. पुढे पाहूं तर इंतजामुद्दौलानीं अंमल उठवून घेतला. हरि गोविंदजीसहि तेथील लोक बोलावितात. परंतु जातां दिसत नाहींत. इतकियावर, पहावें, काय घडून येतें. हंकुमतराय वगैरे जागीरदारांचे गुमास्ते मामिलतेस्तव येथें येऊन पावले आहेत. परंतु कांहीं मामिलत त्यांची तूर्त फैसल होते तो अर्थ दिसत नाहीं. मोठा भरणा सरदारांकडील यांच्या र्हद्रोगापुढें कांहीं भासत नाहीं. श्रीमंत बापू यांनी तर महाराजा रामसिंगजीनिमित्य बहुत कांहीं जोर मारिला. परंतु बख्तसिंगासी टिका त्यांनी पाठविलाच. सारांश, सरदार ज्यासी टिका देतील तोच टिकेल. आजिचे समयांत सरदार जे चाहातील तेंच होऊन येईल. जगू पुरोहित तेथें सरदारांसमीप पावले. त्यांनी सन्मान केला. याजवरूनच बख्तसिंगजीचे रजपूत तुहिले जाहाले. जरी सरदारांचा इकडील ह्मणजे मारवाडाकडील रुख जालिया, तमाम रजपूत उठोन रामसिंगजीचे शामील जाहाल्याविरहित राहणार नाहींत. ऐसा रंग दिसतो. शहराहून वर्तमान आले कीं:- श्रीमंत पंस प्रधान यांसी व निजामपुत्रांसी सख्य जाहालें. आतां मार्गहि सुपथ जाहाला. पशमी न्यावयास्तव स्वामीनी आज्ञा केली. त्यासी, यंदा तर हंगामसर जाऊन पावणें तरी कठिणसेंच दिसतें. दस्तक व जोडी श्रीमंत स्वामीस विनंति लिहून गडबडेकरितां आणविली होती. जरी येऊन पावते तरी पशमीना मार्गस्त केला जाईल. वरकड सर्व कुशल असे. स्वामींनी राजश्री त्रिंबकपंताचे घरीं दोनी हजार रुपयांची हुंडी पाठवायानियित्य आज्ञा केली. तदनुरूप हुंडी मातबर शहरची करून पाठविली. रसीद आल्यानें विनंति केली जाईल. वरकड वसईचा सी साल यांचा वसूल आणविला. त्यास, जमाखर्च तर देवाजी त्रिमळ आल्यानंतर पाठवितो. परंतु हाल आडसट्टा मात्र श्रुत व्हावयानिमित्य निराळे फर्दावरी लिहून पाठविला असे, त्याजवरून अवगत होईल. बहुत काय लिहिणें ? कृपा असो दिधली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३२३ ]
श्री शके १६७६ मार्गशीर्ष वद्य ९.
राजश्री दामोदर माहादेव गोसांसी यांसीः--
उपरि. लालांस राळेचें प्रयोजन आहे. तरी राळ कैली दोन पायली लौकर देखत पत्र पाठवून देणें. जाणिजे. छ. ३३ मोहरम, सु॥ खमस खमसैन यया व अलफ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७८
१५९० ज्येष्ठ शुद्ध १०
महजरातील उद्धार
राजश्री थोरले कैलासवाणी याणी चिमणाची बाजूची यास पत्र सन समान सितैन अलफ छ ८ जिल्हेजचे दिल्हे त्यामध्ये मकसुद लिहिला आहे की मो। सखोजी भिकाजी यामध्ये व तुह्मी व बाळाजी बापूजी यामध्ये कस(बे) ++++++++ कुलकर्णाचा मिरासीचा कथला आहे याबदल सखोली भिकाजी तुह्मास निवाडा करावयाबदल एका स्थलास बोलावितात तो तुह्मी जात नाही तेव्हा असे दिसते की तुमच्या बापाने व भावाने साहीबीच्या बले त्यापासून कुलकर्ण झो कुलकर्ण नव्हे असे दिसते तरी हाली सखोपत व तुह्मी एका थळास जाऊन कुलकर्णाचा निवाडा करणे तुमचे जाले तरी तुह्मी खाणे सखोपताचे जाले तरी सखोपत खातील इतकिया उपरी निवाडा करावयास थळास नव जा तर मग साहेबहुकमी च कलकर्ण +++++++ ल असे समजोन थळास जाऊन हरएक निवा(डा) +++++++++ (कुल) कर्ण तुमचे नसोन उगे झोड गला पडत असेल तर दाटून कथला करावयाची गरज नाही त्याचे कुलकर्ण त्याचे आधीन करून तुह्मी निसूर राहाणे ऐसे असल पत्र सिकियानसी मोरो बलाह याजवळ होते ते त्याणी दाखविले त्यास ते समई माहालीच्या ++++++ व मोकदम बलुते ता। खेडेबारे याणी +++++++++ तेथे सिके दौलतराव कोडे देशमुख याचा एक व कानजी नाईक कोडे देशमुख याचा सिका एक असे दोन सिके आहेत व मोकदमाचे बिजागर आहेत व बलुत्याची निशाणे आहेत त्याचा निवाडा करावयाची चोडोजी बलाळ हुजराने सी +++++++++ कैलासवासी स्वामीनी पाठविले
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३२२ ]
श्री शके १९७६ मार्गशीर्ष वद्य ९.
राजश्री दामोदर माहादेव गोंसावी यांसीः--
उपरि. तुह्मीं पत्र पाठविले, पावलें. भात मुदपाख कोठीकडे कैलीमापें *१, फरासखान्याकडे बांस काट्या सुमारे १००, एक मण भात व शंभर बांस पावले. जाणिजे. छ. २६ सफर, सु॥ खमस खमसैन मया व अलफ.
लेखनसीमा.
पौ छ २३ सफर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३२१ ]
श्री शके १६७६ मार्गशीर्ष वद्य ७.
राजश्री दामोधर माहादेव गोसावी यांसीः-
उपरि. तुह्मी चिटी व समसमाद्दौलाचीं तीन पत्रे पाठविली ते पावलीं. लिहिलें कीं समसामद्दौला मात्र च्यारबागानजीक येतील. व समसामास तर बरेंच वाटत नाहीं ह्मणून विस्तारें लिहिलें. ऐशास, मुख्य आधीं हें उभयता येऊन, यांची खातरजमा एकांती लोकांतीं केलिया वाचून नीट होणेंच नाहीं. याचि अन्वयें प्राथःकालींच तुह्मांस चिटी लिहिली आहे त्यावरून कळलेच असेल. सारांश, दोघे येऊन एकांती याची खातरजमा करतील तेव्हां हा येईल. याचा विचार तरः-- तुह्मी जाहिराना पत्रें समसामदौलाची पाठविली त्यांत निशेचा मजकूर कळतच आहे. परमारें खानखाना व समसामद्दौला यास पत्र पाठवून अगर कोणी मायेचा असेल तो पाठवून अंतस्त निशा करून जातील. तदौत्तर त्यांणी येऊन लष्करांतून घेऊन जावें. हा प्रकार जाल्यावाचून याची निशा कसी पडेल ? आह्मी त्याजवरी जुलूम कसा करावा ? हे गोष्टी होत नाही तरी मग लाहोरास जावयाची तजवीज. खिलत पाठवून द्यावा. कांहीं फौज देऊन कुरुक्षेत्रीं पावते करूं ह्मणजे आमचा जिमा पुरला जाला. हेंहि न होये तरी सहजेंच सर्व गोष्टी राहीलियानें ईश्वरें नेमिलें असेल तें होईल ! आमच्या तो चित्तापासून हर प्रकारीं तोड जोड व्हावी. याचप्रमाणे गंगोबा, सुभेदार,
आदिकरून सर्वांचें मानस आहे कीं अतःपर निकाल पडेल तर उत्तम आहे, नाहीं तर शेवटीं जें होणार तें होईल. ऐसें आहे. तुह्मी वरचेवरी लिहतां. परंतु ज्यांत गोष्ट पसंदीस पडे, शाहाण्याची निशा होये, ऐसें करण्यांत येत नाही. याउपरि उत्तम असेल तो विचार करणें. कदाचित् येथून दौलतरायासही पाठवावेंसें तुमचे विचारें आलें तरी ह्याच गोष्टी पष्ट पुसोन घेईल. याचा विचार करून उत्तर नित्याप्रा। पाठवणें. त्याप्रमाणें केलें जाईल. जाणिजे. छ. २१ सफर. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३२० ]
श्री शके १६७६ मार्गशीर्ष वद्य ७.
राजश्री दामोदर महादेव गोसांवी यांसी :--
उपरि. तुमची चिठी पावली. वजीरांचे मानस कीं :– खानरवाना समागमें आह्मीं आपली फौज कुरुक्षेत्रपर्यंतही न द्यावी. व त्याचा अंमल लाहोरांत न व्हावा. तेव्हां लाहोर धातुपोषण मात्र द्यावें. ती गोष्ट आह्मीं उघडी न करितां येथेंच वजिरांनी खानखानास समजावून न्यावा ह्मणजे मग पुढें सहज चालेल. प्रस्तुतपुर्ता विश्वास पुरून शहरांत गेला ह्मणजे गुंता उरकला. आह्मी वजीराचा सलुख चित्तापासूनच चाहातों. अकस्मात् तर ही गोष्ट प्राप्त झाली ! मातबर मातबराचा लेंक घरी येऊन बसला. तेव्हां कांहीं तो त्याची सोय केली पाहिजे. ह्मणून हे दोन पर्याय आह्मीं ह्मणतों. वजीर, फौजही आमची, तिकडे कुरुक्षेत्रपर्यंत जावयास राजी नाहींत व निखालस समजावीस खानखान याची करीत नाहीत. तेव्हां तिसरी गोष्ट खान खानसमागमें आमचे राहील. वजिराचा आमचा स्नेह करारमदार ठरला आहे तो आहेच. त्यांत त्यांनी अंतराय न करावा. खानखानास घेऊन आह्मीं गंगास्नान करून जयनगरावरून देशास जाऊं. वजीरांनीं एतद्विषयीं चित्तांत वसवास न घरावा. आह्मीं त्याचा स्नेहच हा काळवर राखिला व पुढें चित्तापासून राखणार. खानखाना आह्मासमागमें राहिल्यास वजीरांनीं वसवसा किमपि न धरावा. आह्मीं स्नेह धरितों त्याप्रमाणेंच त्यांनीं धरावा. मामलत केली आहे त्याप्रमाणें रुपया आमचा द्यावा हें विहित आहे. राजश्री दौलतराव मुरार हाच मजकूर शेवटची गोष्ट पुसावयासी पाठविले आहेत. तरी सालजाब करून मानिल्हेस माघारें लवकर पाठविणें. रुपया पहिले मामलतीप्रमाणें देतात किंवा कांहीं संशय धरितात हें साफ लिहिणें. त्याप्रमाणें पुढें जें कर्तव्य तें करूं. बहुत काय लिहिणें ! रा। छ २१ सफर. प्रातःकाल. लेखनसीमा.