[ २९२ ]
श्री शके १६७५ माघ वद्य १.
पौ। छ. १७ रबिलासर
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो
जयाजी शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें. नवाबास घेऊन सत्वर येतों ह्मणून लि॥ तर उत्तम असे. अंगुरेंकुती १ एक तुह्मी पाठविली ती प्रविष्ट जाहाली. जाणिजे. छ १५ माहे रबिलावर. रूपराम गांवांतून आला. त्याच्या चित्तांत बोलावयाचे आहे. परंतु श्रीमंत त्यांसी कांहीं बोलत नाहीं. कांकीं तुह्मासी बोललें आहे. याजकरितां यांसी बोलत नाहीं. तुह्मी नवाबास घेऊन आलियावरी जे बोलणें तें नवाबाच्याच विचारें जें होणें तें होईल. नवाबास घेऊन लौकर येणें. दिवसगत न लावणें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सुद.
श्रीज्योति-
लिंग चरणीं तत्प-
र राणोजी सुत ज-
याजी शिंदे नि-
रंतर.