[ २९६ ]
श्रीमोरया शके १६७६ वैशाख वद्य ९.
छ २१ रजब.
पु॥ राजश्री दामोदर महादेव गोसावी यासीः--
विनंति उपरि. जातेसमयीं बोलिले होतेस कीं, तुर्त ग्वालेरीस जातांच नवाब सफदरजंगाच्या बाणांपैकी दोनसे बाण पाठवितों. ह्मणून कबूल केले होते; त्याचा जाबसाल कांहीं लिहिला नाहीं. तरी, याउपरि आइते बाण व कारखाना ग्वालेरीस घालून बाण सत्वर पोचेत, तें करणें. दुसरेः-गुजरातची सनद पाठवून देतों, ह्मणून बोलिलां. तरी गुजरातचे सनदेचें स्मरण घरून पाठवून द्यावी. वरकड वर्तमान अलाहिदा पत्रावरून कळेल. सारांष गोष्ट सफदरजंगास सांगोन सांगितल्याप्रमाणें तरतूद केलियानें, त्याचे कार्याची गोष्टी आहे. विस्तारें काय लिहिणें ? हे विनंति.