[ २९४ ]
श्री १६७५ फाल्गुन शुद्ध १२.
राजश्री बाजीराउ रखमांगद गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
मल्हारजी होळकर दंडवत सुहुरसन अर्बा खमसैन मया अलफ. आगरियाच्या किल्यांतील तोफा काहाडावयास अजबसिंग व महमद मुरीदखान यांजला येथून पाठविले आहेत. तर, किल्लेदारास सांगून तोफा जलद तयार करून पाठवणें. आगरियाच्या मुतसद्दियांस खर्चामुळें रु॥ १४०० चौदासे सामळांत देविले आहेत. त्याप्रमाणें दोन तोफा तयार करून जलद पाठवणें. येविषयीं श्रीमंतांनीं राजश्री रामाजी सखाजी व केशव गोविंद यांजला लिहिलें आहे, त्याजवरून कळेल. जाणिजे. छ. ११ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सुद.
श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर
खंडोजीसुत मल्हार-
जी होळकर.