[ २९७ ]
श्री शके १६७६ वैशाख.
आतां तो चाळीस लाख रुपये आह्मांस देईन, ह्मणून टीप लिहून दिधली हें पाहा. ऐस्या कितीक गोष्टी सांगून सलूखच करावा हें मुराद ठैराविली. तेव्हां आह्मीं ह्मटलें कीं, आपण सलुख समस्तांचे ह्मटल्यावर आमचे खाविंद येऊन रुपये मागतील ह्मणून ह्मणतां; तर हाहि अंदेशा ठेवणें लागेल कीं, तुह्मी सफदरजंगास एक सुभा द्याल तर ते येऊन विजारत देवितील. व जर तुह्मी सख्य न करितां युद्धच कराल, व त्याची तकशीर माफ न कराल, तर आमचे खाविंद त्यास मारून त्या उभयतांचे मस्तकच आणून किल्याखालें टाकतील. ते आह्मांपासून शपथपूर्वक लिहिलें घेणें. तेव्हां ह्मणूं लागले कीं, तस्मात् खर्च मागतील; हें वोझें आमच्यानें न उचले; जें होणें तें हो ! आतां तुह्मीं याल ते रुपये मागाल; आह्मांस कोठून रुपये मिळणार नाहींत. तेव्हां तुह्मीं सफदरजंगासारिखे होऊन दुसराच पातशा करूं ह्मटल्यास याजलाच युद्धास प्रवर्तावें लागेल. यास्तव लिहिलें द्या कीं खर्चास न मागूं. याप्रों। भयाभीत होऊन सफदरजंगाचेच गळां हात घालावयासी तयार जाले. हें निश्चयरूप दिसून आलें. तेव्हां लाचार होऊन, लिहून दिघलें कीं, श्रीमंत दादासो। येऊन त्या उभयतांसी सलुक करणार नाहींत, व बेसनद पैसाहि मागणार नाहींत ; येविसीं ईश्वर साक्ष असे कीं, त्यांजला निश्चयात्मक मारतील. याप्रों। लिहिलें देऊन श्रीमंतांकडून भयाभीत जाली होती व सफदरजंगाचे गळां हात घालून आपणांपासून दूर राहावेयाचा निश्चय केला होता, तो मोडून, लडाई श्रीमंताचे प्रतापें, आज्ञेप्रों। ठैराविली. उदईक रुपये अकबत महमुदास देऊन महिनियाचे वायदियानें सा लक्ष रु॥ करून द्यावेसे करून वाटें लावितील. लडाई शुरू होईल तेव्हां सो। लिहूं. कृपा करून आमचे नेमणुकेची सनद, व थोडेसे फौजेनिशीं सत्वर सत्वर वडिलीं आलें पाहिजे. सत्वर येणें. जरूर पुढें येणें. खाविंदास विनंति करून सनद फौजेचे नेमणुकेची पाठविणार स्वामी समर्थ आहेत. अझुनहि कमरदानी करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. सत्वर यावें. भेट होईल तो सुदिन ! हे विनंति. चिरंजीव तात्यास आशीर्वाद. रा॥ त्रिंबकपंतास नमस्कार. समस्त मंडळीस नमस्कार अनुक्रमें आशीर्वाद सांगणें.