[ २९९ ]
श्री शके १६७६ ज्येष्ठ शुद्ध ९.
राजेश्रियाविराजितराजमान्य राजश्री दामोदर महादेव गोसांवी यांसिः--
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. तुह्मीं पत्रें अजुरदाराबरोबर पाठविलीं. त्यांस मार्गी दोन दिवस लागले. अजी गुरुवारी तीन प्रहरा दिवसी पत्रें पावली. त्यांत अर्थ. पातशाहाचे बुणगें लुटले. सार्वभौम व वजीर दुसरा करावा, हा भाव सर्वाचा आहे. ह्मणून लिहिलें. ऐशास, न कळे ! हा प्रकार ईश्वराधीन आहे ! आमचा मुकाम आज जेवर दोन कोस मागे टाकून जाला आहे. उदईक येथून कूच होऊन दाहा कोसावरी मुक्काम करितों. मल्हारबासही येणें ह्मणोन लिहिलें आहे. ऐशास, तुह्मी लौकर येणें. भेटीनंतर जो विचार करणें तो केला जाईल. शुक्रवारी अस्तमानपर्यंत येऊन पोहोचणें. जाणिजे. छ. ७ साबान. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.