[ २९८ ]
शके १६७६ वैशाख.
पांच चार लाख रुपये आमच्या तहबरीत तरी, अगर खर्चायांत तर तनखा हर कोणी महालावर देऊन रवाना करील, तरी नाना येथें राहून आह्मी मुकाबिलियासी जाऊं. नाहींतरी आह्मी आपल्या सिपाहीचा गवगवा तोंडाने चौ चौ तटांनशी राखूं. तुह्मांबराबर आह्मी आपला जिगरच दिल्हा आहे. तेथें पहिले आह्मी आहोंच. तुमचें होणार असेल तें हो ! अगर आमचें होणार असेल तें हो ! तुह्मी वजिराचे रफिक आहां ; ह्मणून तुह्मांस सांगतो. आह्मीहि तुह्माबरोबरच आहों. जीवच लावला तेथें मालाचा विचार काय ? तुह्मास इतल्ला द्यावी यास्तव एक मुकाम केला. उद्या आमचा कूच आहे. त्याप्रों। सांगून त्रिंबकपंतांबराबर अगर चिरंजीवांबरोबर सांगून पाठवा. तो ह्मणेल कीं, वजिरास भेटा तरी तुह्मीं जाऊन त्याचे सांगितलियाप्रयाणें वजिरास भेटा. कांहीं सरंजामाची तजवीज करीत असिला तरी, एक दोन दिवस राहावें. चतोर्थीचे दिवशीं प्रहर रात्र मागील राहतां मुहूर्त चांगला
आहे. जर तनखा करूस देत असिले तरी, माहालाच्या सनदा करून देऊन इकडे पांच पांच हजार फौज दाखवित असिले, त्याजकडे पारचे वरचे दोन जिल्हे दोन आहेत, तैसे आपलियासी एक जिल्हा जरी दाखवून रवाना करीत असले, तरी दोन्ही जिल्ह्याचा इरादा आहे. व पारचे जिल्हियाचा इरादा याचें मय तरी याजला प्राप्त होईल. आपलियासी दोन कामें जरूरः- एक आपली हद कायम राखणें, आणि वजिराची निगेबंदी करणें. त्यानंतर पुढें मेळवायाची गोष्ट ! याचा विचार आह्मां देखतां जो कर्तव्याचा तो करून, रवाना कराल, तरी एक दिवस आणखीहिं राहूं. नाहींतरी फौजेच्या गवगव्याकरितां आमच्यानें क्षणभर थांबवत नाही. याप्रों। बोलोन स्वकार्य साधेल तेथवर साधावयाचा तरजमाहि करून पाठवा. आणि पत्रहि पाठवा. हे आशीर्वाद.
रा॥ त्रिंबकपंतास नमस्कार विनंति उपरि. लिहितार्थ परिसोन कर्तव्य तें करणें. हे विनंति.
रा॥ धोंडाजी नाईकास नमस्कार.