Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३५५ ]
श्रीवरद शके १६७७ माघ शुद्ध ४.
राजश्री बाळकृष्ण बापूजी गोसावी यांसिः--
उपरि. राऊ. रामचंद्र याचे तलबेंत अवल हिशोब रु॥ २५ पंचवीस तुह्माकडून देविले आसेत. तर सदरहू रुपयांपैकी दोन रु॥ दाहा आणे कसूर वजा करून रु॥ देऊन कबज घेणें. जाणिजे. छ. ३ माहे जावल, सु॥ सित खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
मोर्तबसूद.
§ बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३५४ ]
श्रीवरद शके १६७७ माघ शुद्ध ४
राजश्री बालकृष्ण बापूजी गोसावी यांसिः--
उपरि. मुरादखां शिलेदार यास रोजमरीपैकी रुपये १० दहा तुह्मा कडून देविले आहेत. तरी सदरहू रुपये हरसने देऊन कबज घेणें. माहाली मुजरा असेत. जाणिजे. रा। छ ३ माहे जमादिलावल, सु। सित खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३५३ ]
श्री शके १६७७ पौष वद्य ३०,
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोपाळ महादेव गोसांवी यांसिः--
सेवक पुरुषोत्तम महादेव व देवराऊ महादेव नमस्कार उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. तुमचे तैनातीस पेशजी साहेबखां चाळिसा स्वारानसीं ठेविला आहे. +++ पंचवीस स्वार ठेऊन पंधरा स्वार +++ देऊन तसिया घ्यावयासी पाठवणें. तीर्थरु॥ दादासाहेबीं महमद वासल वगैरे तुमचे तैनातीस ठेविले. त्यांसहि बरतरफ आजचे तारिखेपासून केले. हाजरी वसूल देऊन पाठविलें पाहिजे. तुह्मांस जे फौज व लोक लागतील तरी रा। भाऊ फौजसहर्वतमान त्या प्रांतास फौ + + + वर ठेविलेंच आहे. काम पडलिया बोलावून + + + मलिदा शंभरी मणांचा कबूल केला आहे. त्यांत आह्मी दाह मणा मलिदा करविला होता. बाकी नवदी मणांचा राहिला आहे. ते रोज दररोज करून हिशेब लिहिणें. माहाली मुजरा पडतील. जाणिजे. छ २८ माहे रा।खर, सु॥ सित खमसैन मया अलफ. बहुत * काय लिहिणें !
मोर्तब
सुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८२
श्री १६१२ चैत्र वद्य ८
(सिका) राजाराम छत्रपति याचा नकल
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १६ प्रमोदनाम संवत्सरे चैत्र बहुल अष्टमी मदवासरे राजमान्य राजश्री बाजी सर्जाराऊ जेधे देशमुख यास राजाज्ञा अभय दिल्हे ऐसा जे तुह्मी मो। रतनोजी सिंदे व शंकराजी ढगा याजबरोबर कितेक निष्टपणाच्या गोष्टी सांगोन पाठविल्या सांगितले प्रो। विदित जाला ऐसियास हे मराष्टराज्य आहे तुह्मी या राज्याची पोटतिडिक धरता तरी ते प्रांते कितेक राजकारणे आहेत च्यालणा करुन आपण जमाव करून सावधपणे राहून स्वामीकार्य हे दृष्टीस पडले ते मनास आणून हस्तगत करून ठेवणे हुजूर लेहून पाठवणे तेणेप्रमाणे हुजुरुन विल्हे केले जाईल या प्रांतीचे वर्तमान तरी राजश्री छत्रपति स्वामी स्वारी करून कर्नाटक प्रांती गेलियावरी तिकडे जमाव लस्कर चालीस हजार व हाषम एक लाक पचविस हाजार जमाव जाला आहे दुसरे हि आणखी जमाव होत च आहे प्रतिकूल पुड पालेकर तमाम येऊन भेटले आहेती जमेती पोख्त जाली आहे तूर्त स्वार पंधरा हाजार व हाषम पंचवीस हाजार देऊन रवाना केले आहेती ते हि साखल प्रात तुंगभद्रेचा तिरास आले आहे खजाना हि एक लाख होण्याबरोबर आहे यास आणावयास राजश्री धनाजी जाधव व राजश्री संताजी घोरपडे सेना पच्यसहश्री पाठविले आहेती ते हि आठा पंधरा दिवसी येतील ते आलियावरी तो जमाव व हुजूरचा जमाव ऐसे करून त्यास पाठऊन प्राते स्वारी होईल तरी हे पत्र तुह्मास सादर केले असे तेणेप्रमाणे जमावानिसी सावध असणे त्या प्राते आलियावरी तुमची हि सरजामी मो। रतनोजी सिंदे व शंकराजी ढगे ये हि रदबदल केली त्याप्रमाणे चालऊ बि॥
तैनात सालिना होण्या गाव
५०० खासा ४ इजाती
५०० मताजी जेधे २ वेतनात गाव
-----------
१०००
सदरहूप्रो हाजार होनु तैनाती व इजाती व मुकासा मिळून साहा गाव यभाग जाली देऊ तरी तुह्मी आपली खातरनिशा राखने स्वामीच्या पायासी एकनिष्ठता धरून स्वामिकार्य साध्य होय ते गोस्ट करणे गनिमाचा हिसाब काय आहे तुह्मी लोक जेव्हा मनावरी धरिता तेव्हा गनीम तो काय आहे गनीमसा तुह्मी लोकी केला आहे ते तुह्मी च लोक या राज्याची पोटतिडिक धरता तेव्हा आवरंगजेबाचा हिसाब धरीत नाही असे बरे समजोन लिहिण्याप्रमाणे वर्तणूक करणे अवरंगजेबाने ह्मराष्टलोक आहेती त्यास मुसलमान करावे असे केले आहे त्या पो। मुसलमान केले मो। नेतोजी राजे व साबाजी घाटगे व जानोजी राजे व कितेक ब्राह्मण हि या प्रातीचे बाटविले दुसरे मतलब गेले आहेती तिकडून तमाम बाटले लोक होते ते आपले जमावानसी आह्माकडे येताती हाली हणमतराऊ निंबालकर व सटवोजी निंबालकर व बाजे सरदार आले आहेती दुसरे हि कितेक येताती ऐसे गनिमाचे लस्कर आटोन हुजूर जमाव होत आहे ईश्वर करीतो तरी फत्ते च आहे लिहिलेप्रमाणे हिमती धरणे जाणिजे छ २० जमादिलाखर सु। तिसैन अलफ आज्ञाप्रमाण मोर्तब (मर्यादेय विराजते)
सदरहू मोर्तब सिका चौकटी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३५१ ]
श्रीवरद शके १६७७ पौष शुद्ध १५.
राजश्री बाळकृष्ण बापूजी गोसांवी यांसिः--
उपरि. हसनुल्ला हरकारा याचे तलबेंत रु॥ २० वीस तुह्मांकडून देविले असते तर सदरहू रुपयापैकी दोन रु॥ दहा आणे कसूर वजा करून रु॥ देऊन कबज घेणें. जाणिजे. रा॥ छ. १४ माहे रा।खर,
पु॥ सित खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
मोर्तबसूद.
* बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३५० ]
श्रीवरद. शके १६७७ पौष शुद्ध १४.
राजश्री बाळकृष्ण बापूजी गोसावी यांसिः--
उपरि. गुलाम हुसेन ढलयत हरतरफीयाचे हिशोबाचे रु॥ १०॥ दाहा रु॥ सा आणे तुह्मांकडून देविले असेत. तर सदरहू रुपयापैकी दोन रुपये दाहा आणे कसूर वजा करून रु॥ देऊन कबज घेणें. जाणिजे. रा॥ छ. १३ माहे रबिलाखर, सु॥ सित समसैन मया अलफ. बहुत काय लिहिणें !
मोर्तब सूद.
* बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३४९ ]
श्री शके १६७७ पौष शु॥ १२ संक्रांत.
याद तिळगुळाचे डाल्या व पत्रें, रवाना छ. ११ रविलाखर. ता। जासूद नाईक सरकार, सु॥ सीत खमसैन मया व अलफ :---
अज् बादली मंदली तापता
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३४८ ]
श्रीवरद शके १९७७ पौष शुद्ध ११.
राजश्री बाळकृष्ण बापूजी गोसावी यांसीः--
उपरि. हसनुल्ला वगैरे हारकारे यांस बहाली व बर्तर्फी अखेर रबिलोवल अव्वल हिसेब रुपये १० दाहा तुह्माकडून देविले असेत. तरी सदरहू दरसेकडा कसूर रु॥ २॥= वजा करून, बाकी रु॥ देऊन, कबज घेणें. जाणिजे. छ. १० माहे साखर सु॥ सित खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें !
मोर्तब
सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८१
श्री १६०८ माघ वद्य १४
(सिका) नकल
कौलनामा अज स्वारी राजमान्य राजश्री निलकंठ मोरेश्वर ता। सरज्याराऊ जेधा सु॥ सबा समानैन अलफ तुह्मी गनीमाकडे जाऊन सेवा करिता कोण्या भरास भरून गेलेत बरे जे जाले ते फिरोन न ये परंतु मुसलमानाची सेवा करिता तुमास कष्ट होतात सांप्रत स्वामीचे सेवेसी येऊन कार्यभाग करावा कष्टाची मुजरा होईल सरफराजी करून घ्यावी ह्मणून कलो आले तरी तुह्मी कदीम लोक तुमचा भरवसा राजश्री स्वामीचे बहुत अन्न भक्षिले आहेत क्रिया धरनु आणि यावयाचे केले तरी बहुत उत्तम केले कदाचित गनिमाकडे गेले होतेस त्या गोष्टीकरिता यावयाचा अनमान कराल तर सरवश्वी न धरने बेशक येणे तुमचे बरे करणे सुभे होऊन सर्फराजी करून बहुत चालऊन अतर न पडे समाधान असो देणे आणि येणे दरी बाब कबूल असे छ २७ रा।वल आज्ञाप्रमाण मोर्तब
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३४७ ]
श्रीवरद शके १६७७ पौष शुद्ध १०.
राजश्री बाळकृष्ण बापूजी गोसांवी यांसिः--
उपरि. गुलाम नबीखां यांची तलब माहे रबिलोवल व बर्तर्फी लोकांच्या हिसोबापैकीं रु॥ २०० दोनसें तुह्माकडून देविले असेत. तर सदर रुपयांपैकीं दोन रु॥ दाहा आणे कसूर वजा करून देणें. जाणिजे. रा। छ. ९ माहे रा।खर, सु॥ सित समसैन मया अलफ. बहुत काय लिहिणें ?
मोर्तब
सूद.
* बार.