[ ३४८ ]
श्रीवरद शके १९७७ पौष शुद्ध ११.
राजश्री बाळकृष्ण बापूजी गोसावी यांसीः--
उपरि. हसनुल्ला वगैरे हारकारे यांस बहाली व बर्तर्फी अखेर रबिलोवल अव्वल हिसेब रुपये १० दाहा तुह्माकडून देविले असेत. तरी सदरहू दरसेकडा कसूर रु॥ २॥= वजा करून, बाकी रु॥ देऊन, कबज घेणें. जाणिजे. छ. १० माहे साखर सु॥ सित खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें !
मोर्तब
सूद.