Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८७
श्री १६२९ भाद्रपद वद्य २
राजश्री येस प्रभु कुलकर्णी मो। करजिये
पानवहल व वावेघर ता। भोर गोसावी यासि
श्रीा यादव नारायण नामजाद किलेहाय आसिर्वाद सु॥ समान मया अलफ चार गावीचे कुलकर्ण तुह्मी घेतले त्यास तुह्मी दिवाणची सेरणी दिल्ही नाही याउपरी देखतपत्र किले विचित्रगडास येणे या कामास लोक हा। स्वामी पाद्यठविले आहेत यासी रुपये २ दोन देविले असेत आदा करणे छ १५ जमादिलावल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४०० ]
श्री शके १६८१ माघ वद्य १०
तीर्थस्वरूप राजेश्री बापूसाहेब वडिलाचे सेवेसीः-
बालकें दिवाकराने कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल तागाईत छ २३ जमादिलासर मुकाम श्री सिध्धटेंक भीमातीर लष्कर श्रीमंतराजश्री पंत प्रधान वडिलांचे आशीर्वादें यथास्थित असे. यानंतर, बहुत दिवस जाले, वडिलांकडील हस्ताक्षर आशीर्वादपत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तर ऐसें न करावें. सदोदित हस्ताक्षर पत्र पाठविलें पाहिजे की समाधान होये. यानंतर इकडील वर्तमान साकल्य तीर्थस्वरूप राजश्री नानासाहेबांस लिहिलें आहे त्याजवरून कळेल. श्रीमंतस्वामीचा व निजामअल्लीखानाचा सलुख जाला. श्रीकृपेनें श्रीमंतस्वामीचा ज्यय जाला. मोगल ज्या तमानें व सरंजामाने आला होता तो सर्व एकीकडे राहून फजीत बहुत जाला. याचा तपसील तीर्थस्वरूप नानाच्या पत्रावरून कळेल. वर्तमान यथास्थित असे. आह्मी राजश्री नारो शंकर याजसमागमें आठा दहा रोजांनी श्रीमंत स्वामीचा निरोप घेऊन हिंदुस्थान प्रांतीं येतों. वडिलाचे चरणदर्शनाचें ध्यान अहर्निशीं लागलें आहे. सत्वरच येऊन चरणदर्शनलाभ घेतो. आपल्या भेटीस्तव मातुश्री आक्का बहुत श्रमी होत्यात. तें पत्रीं कोठवर लिहावें ? मातुश्रीची आपली भेट सत्वर होये तो अर्थ केला पाहिजे. संक्रमणाचे तील शर्करायुक्त सेवेसी पाठविले आहेत. कृपा करून स्वीकारून उत्तर पाठविण्या वडिल समर्थ आहेत. विशेष काय लिहिणें ? चरणदर्शनलाभ होये तो सुदिन. कृपा केली पाहिजे. हे विज्ञापना.
वेदमूर्ति राजमान्य राजश्री धोंड दीक्षित पटवर्धन स्वामीस साष्टांग नमस्कार विनंति उपर. सदोदित आशीर्वाद पत्र पाठऊन अविस्मर असावें. आक्रमणाचे तील शर्करायुक्त सो। पाठविले, कृपा करून स्वीकारावे व तर पाठविलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ! भेट होईल तो सुदिन. पा लोभ असो दीजे. हे विनंति.
सर्व मंडळीस सां। नमस्कार. तील शर्करा घेऊन उत्तर पाठवणें. हे विनंति.
सो। विनंति सेवक गिरमाजी मुकुंद कृतानेक सां। नमस्कार विनंति ....हिली परिसीजे. कृपा केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३९९ ]
श्री शके १६८१ कार्तिक शुद्ध १०.
स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि. तुह्मी येथून हत्ती घेऊन गेला. तेव्हां बोलोन गेलेस कीं र॥ सेटवाजी खराडे याजकडील घोडी पाठऊन देतों. त्यास अद्यापि घोडीं आलीं नाहींत. तर तिर्हासी घोडी गेली आहेत ते आणून मग हत्ती वजीरास देणें. घोडीं आलियासिवाय हत्ती न देणें. घोडीं तुह्मांपासीं आली ह्मणजे हत्ती देणें. छ ९ रबिलावल. हे विनंति.
मोर्तब
सुद.
पौ। छ १० रबिलावल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३९८ ]
श्री शके १६८१ आश्विन वद्य ७.
राजाश्रयाविराजित राजमान्य राजश्री त्रिंबकराव विश्वनाथ स्वामी गोसावी यासीः--
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित गेले पाहिजे. विशेष. रा। साबाजी शिंदे याजकडील शिलेदार छावणीची बोली करून, नालबंदी घेऊन, चाकरी न करितां कोण्ही औरंगाबाजेहून पळाले, व कोण्ही कोट्याच्या रानांतून पळाले. त्यास, मशारनिलेकडील कारकून शिलेदार मजकुराची नावनिशी लेहून देतील; त्यास असामीवार मसाला करून, नालबंदीचा पैका वगैरे जे काय पावलें असेल, तें त्याजपासून उगवून मशारनिलेस पावते करणे. जाणिजे. छ २० सफर सु॥ सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
पौ। छ २४ रबिलावल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८६
श्री १६१९ भाद्रपद वद्य ४
नकलेची नकल
राजमान्य राजश्री शंकराजी नारायण पंडित यासि आज्ञा जे राजश्री दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी व गावकुलकर्णी देहाये तर्फ रोहिडखोरे व वेलवडखोरे याचे वतन तुह्मी जप्त केले त्यानी नजराण्याचा ऐवज रायगडी हुजूर कैलासवासी स्वामीपासी जामदारखान्याकडे दिल्हा त्याजवर वतनाची मोकळिक सर्वा जमेदाराबरोबर मावळप्रांताची मोकळिक जाली तेव्हा याची हि केली पुढे तुह्मी सर्जेराऊ जेधे देशमुख याचे तर्फेने आकसामुळे याचे वतन आपल्यास जेधे याजपासून करून घेतले येविसी खबर प्रभु देशपांडे याणी पनाल्याचे मुकामी जाऊन राजश्री रामचंद्रपंत अमात्य यास सर्व वाका समजाऊन त्यानी त्याची तकरीद घेऊन हुजूर चदीचे मुकामी तेव्हा रा। केली नतर याचे वृत्तीचा बदोबस्त करावा तरी तुह्मी च अफलादीचा विशेष वतन बेवारसी आपल्यास द्यावे ह्मणोन विनतीपत्र सक्राजी ढग्याबरोबर लिहिले तेव्हा स्वामीनी राजकारणावर नजर देऊन बेवारसी वतन असल्यास तुह्मास देसी आल्यावर चौकसी करून देता येईल असे लिहिले असता त्याचे पत्रावर तुह्मी प्रभूवर बलात्कार करून घरातून कागद नेले त्यास हाली दादाजी प्रभु हुजूर किले रागण्याचे मुकामी चदीस येण्याबद्दल आले तो स्वामी देसी येता भेट घेतली सर्व कैफियत कळविली त्यास ते च वेळी तुह्मास पत्र लिहिले की हे वतन घ्यावयाचे नाही व मावळप्रातात पेशजी अभयपत्र पाठविले त्यात लिहिले की आदलशाई व निजामशाई कारकिर्दीस वतने ज्याची चालत आली त्याप्रमाणे चालवावी असा लेख जामदारास तेथून पाठविला असता तुह्मी गैरवाका हुजूर विनती लिहिली ती चौकसी ध्यानी आणून पाहता गैरवाजवी तुह्मी केली आहे त्याचे वतन त्यास देवावे असे ठरून हे आज्ञापत्र तुह्मास सादर केले असे तरी देशकुलकर्णे व गावकुलकर्णे हर दु खोरी प्रा। मजकूरची तुह्मी व जेधे व लोहकर वगैरे मिळोन हे वतन नाहक घेतले याचे चिरजीव कृष्णाजी प्रभु अशा अडचणीचे प्रसगी स्वामीस सकटसमई बादशाहानी चिरजीव व कबिले नेले त्यापासी चाकरीवर हजर असता मागे त्याचे वतन दरोबस्त घेता हे तुह्मास उचित एकदर नाही तरी याउपरी याचे वतनाचे कागदपत्र नेले त्यासुधा परत देऊन याचे वतन याजकडे चालत असल्याप्रो। चालवणे आणि खासा स्वारी तिकडे येता च येऊन भेटणे यानी कैलासवासी थोरले राजश्री स्वामीपासी फार शर्तीची चाकरी हरवक्त हुजूर राहून धारकरीयात मर्दुची मोठे धाडसे जिवाची परवा न धरिता केली व स्वामी एहि विजापुरी बद सोसिले त्या काली सर्जेराव व खडोजी खोपडे व बादल देशमुख याणी तुरुक लोकासी मिळून फिसात केली आणि अडचण स्वामीस फार केली तेवेळी खडु खोपडे व बादल धरून मारिले सर्जाराव कैद केला त्या निमिती आकस धरून तुह्मास गैरकावा मजकूर समजाऊन त्याचा व याचा अकस असता ही वृत्ती तुह्मी जबरदस्त ह्मणोन करून देता आणि तुह्मी पत्रे करून घेऊन घेता त्यास याचे वतन तुह्मास देण्यास जेधे यास अधिकार नाही व तुह्मी करून घेण्यास अधिकार च नाही पेशजी व हाली व जातीने फार मर्दुम्या करून राज्य मेळविले स्वामीकरिता खराब जाले व मारले गेले असे यत्नेकरून हे दिवस पुर्वीपासून काढले असता तुह्मी सरकारची चार माणसे हाती घेऊन भलाई केली व करिता यानी चाकरी जमाव करून व जातीने हि प्रथमपासून केली करीत आहेती एकीकडे जाऊन आपले मनी मोठेपणा वागविता व पाहिजे (ते) करिता परतु तुह्मी याचे वृत्तीस लायनी गला पडण्याचा समध एकंदर नाही सबब हे वतन परत देणे मावळमजकुरी स्वामी येण्याचे पुर्वी वतन दिल्याचा मजकूर लिहिणे याउपरी वतन न दिल्या हा बोभाट आल्यास तुमचे अबरूस व पदास धका येईल असे स्वामीस भासत आहे व पुढे नाना प्रकारच्या अडचणी तुह्मास अशा करणीच्या येतील कारण चिरंजीव कालेकरून तरी श्री देसी आणील तेव्हा सकटी जी माणेस उपयोगी पडली त्याच्या तसनसी आह्मी करविल्या हे इकडे यावे त्याचे चित्ती द्वेश यावा व राज्यकर्त्यास इनसाफ पाहणे जरूर त्यात हे तरी अविचाराचे कमल भलाई जाली ती सारी आमची एकीकडे जाऊन असी करणी तुह्मी केली यात स्वामीद्रोहाचे च करणे ते मुख्य सर्व राज्यास अधिकारी आह्मी करितो तरी त्याचे साठी च आहे प्रसगास सर्व लोकास तिकडे च पाहणे येईल व वागतील हे कारण इश्वरी च नेमिले आहे उगी च भलते भरी न भरणे पुढे उर्जित होय ते करणे हे न केलिया केले कामाची फळे ज्याचे ते भरतील असी श्रीची इच्छा च असली तरी तुह्मीतरी का समजाल तरी नीट चालीने वागणे ह्मणजे पुढे सर्वोपरी उर्जीताचे च करत जाणजे जाणिजे निदेश समक्ष मो। असे
तेरीख १७ सफर सु॥ समान रुजु सुरनीस बार बार
तिसैन अलफ बार सूद
(असल पत्र सचिवपंतास दिल्हे याची नकल ठेविली त्याची नकल)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३९७ ]
श्रीवरद शके १६८० फाल्गुन वद्य ५.
श्रियासह चिरंजीव राजश्री तात्यासाहेब याप्रतिः--
पुरुषोत्तम माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथीच कुशल त॥ छ १९ रजब मुकाम लष्कर राजश्री जनकोजी शिंदे जाणोन स्वकुशल लिहीत जाणें. विशेष. बहुत दिवस जाले की तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाही. त्यास्तव सचिंत असों. तर कुशलवृत्त सविस्तर वर्तमान लिहून पाठवित जाणें. येथील सविस्तर वृत्त तीर्थरूप राजश्री बापूस लिहिलें आहे; त्याजवरून कळों येईल. वरचेवर कुशलार्थ लिहिणें कीं समाधान होय. निश्चितमनें चाकरीचा उद्योग करूं. श्रीकृपा फार समर्थ आहे. चिंता न करणें. चिरंजीव विश्वासरायास अनेक आशीर्वाद. हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३९६ ]
श्री शके १६८० फाल्गुन शु॥ १५.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यासी प्रति बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील ता। छ १३ रजब जाणून स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष. रोषनद्दौला याच्या लेकाची मामलत केली असेल तरी त्याला रुपये द्यावे. नाहीं तरी, त्याचा कागद तुह्मांपाशी आहे तो माघारा द्यावा. सांप्रत त्यांजला ऐवजाची निकड आहे. जर तुह्मांस त्याची मामलत करणें असेल, तरी थोडाबहुत ऐवज तूर्त द्यावा. राहिलासाहिला ऐवज मुदतीप्रमाणें पाववावा. कदाचित् मामलत करणें नसेल तरी त्याचा कागद अविलंबें पाठवून द्यावयाची तजवीज करावी. जरूर जाणून लिहिलें आहे. * यांचा ऐवज लौकर पाठवावयास अनमान कराल. तरी माझी शपथ असे. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३९५ ]
श्री शके १६८० फाल्गुन शु॥ १५.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यासी
प्रति बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील क्षेम ता। छ ११ रजब जाणून स्वकीय कुशललेखन करीत असले पाहिजे. यानंतरः राजे नागर. मल्ल यांनी मिश्र सुजान येथून सुरजमल्लाकडे पाठविला होता. त्याजवरून मिश्र. मजकूराबराबर सुरजमल्ल जाटानें रूपराम कटारा याच्या लेकासमागमें दिल्हे; आणि दोन लाख रुपयांची हुंडी, शर्ती, शिकंदरियाच्या सनदेस्तव पाठविली आहे; आणि मशारनिलेंसमक्ष ताकीद केली आहे की, प्रा। शिकंदरियाची सनद घेऊन लाख रुपये राजेमजकूर ज्यास देवील त्यास देणें. याप्रमाणें जाबसाल करून येथें आले आहेत. उदईक लष्करास येणार. सूचनार्थ लिहिलें आहे. दुसरें :– इनायत पातशाई झालरदार पालखी व खिलत व जवाहीर वगैरे फत्तेसिंग मुनशीस व हिरानदास वरचेवर लेहून पाठवितो की, लौकर घेऊन येणें. त्यास, तेथें त्याची तजवीज करून पाठविजे. नाहीं तरी, ज्याप्रमाणे प्रतिउत्तर येईल त्याप्रमाणे करूं. शिकंदरियाचे सनदेचा मजकूर बहुत सावधपणें येथें ताकीद करून हें काम शिरां न चढे ते केलें पाहिजे. मार्गाचें दुर्घट, यास्तव तीर्थरूप मातुश्रीचे व सौ। रेणुकेचे पाठवावयाची तजवीज न केली. * सुरजमल्लांनी हे तजवीज केली आहे जे, शिकंदरा घेऊन कांहीं फौज मर्हाटी
असली.
पौ। छ १३ रजब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३९४ ]
श्री शके १६८० फाल्गुन शुद्ध १.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री त्रिंबकराव विश्वनाथ स्वामी गोसावी यासीः--
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपार येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मीं सातारियाचे सिकेकटारेविसी लिहिलें होतें; त्याजवरून सासवडास राजश्री नाना पुरंधरे यांचे घरीं सिकेकटार आहे, ती नावजी अवारी व गुणाजी भोता खिजमतगार याजबा। पाठविली आहे, ती घेऊन पावलियाचें उत्तर पाठविणें. सिकेकटार तुह्मीं तेथें राहाल तोंपर्यंत तुह्मांजवळ ठेवणें. तुह्मी येऊं लागाल, तेसमयीं सासवडास नाना पुरंधरे याजकडे पावती करणें. रा। छ २९ जमादिलाखर सु॥ तिसा खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहीणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३९३ ]
श्री शके १६८० पौष वद्य. २
राजश्री रघुनाथराव पंडित गोसावी यांसिः--
छ सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मालोजी भोसले रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहित असावें. विशेष. आपणांकारणें मकरसंक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले आहेत. स्वीकार होऊन उत्तर पाठवावें. रा।. छ १५ जमादिलोवाल. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति.
लेखना
वधिमुद्रा.
श्रीशिवशंभु
स्वामिनिशाहूभूपेश
पार्थितोत्तसेपरिण-
तचेतावृत्तेःफते
सिंहस्यमुद्रेयं.