[ ३५१ ]
श्रीवरद शके १६७७ पौष शुद्ध १५.
राजश्री बाळकृष्ण बापूजी गोसांवी यांसिः--
उपरि. हसनुल्ला हरकारा याचे तलबेंत रु॥ २० वीस तुह्मांकडून देविले असते तर सदरहू रुपयापैकी दोन रु॥ दहा आणे कसूर वजा करून रु॥ देऊन कबज घेणें. जाणिजे. रा॥ छ. १४ माहे रा।खर,
पु॥ सित खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
मोर्तबसूद.
* बार.