[ ३४७ ]
श्रीवरद शके १६७७ पौष शुद्ध १०.
राजश्री बाळकृष्ण बापूजी गोसांवी यांसिः--
उपरि. गुलाम नबीखां यांची तलब माहे रबिलोवल व बर्तर्फी लोकांच्या हिसोबापैकीं रु॥ २०० दोनसें तुह्माकडून देविले असेत. तर सदर रुपयांपैकीं दोन रु॥ दाहा आणे कसूर वजा करून देणें. जाणिजे. रा। छ. ९ माहे रा।खर, सु॥ सित समसैन मया अलफ. बहुत काय लिहिणें ?
मोर्तब
सूद.
* बार.