[ ३५५ ]
श्रीवरद शके १६७७ माघ शुद्ध ४.
राजश्री बाळकृष्ण बापूजी गोसावी यांसिः--
उपरि. राऊ. रामचंद्र याचे तलबेंत अवल हिशोब रु॥ २५ पंचवीस तुह्माकडून देविले आसेत. तर सदरहू रुपयांपैकी दोन रु॥ दाहा आणे कसूर वजा करून रु॥ देऊन कबज घेणें. जाणिजे. छ. ३ माहे जावल, सु॥ सित खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
मोर्तबसूद.
§ बार