Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ३७३ ]

श्री शके १६७९ अधिक आश्विन वद्य ९.

+ + + + + + साकल्य अर्थ. महाराजा रामसिंग व बखतसिंग या उभयतांचे सौरस्य करून दिलियाचें वृत्त तुमच्या कासिदासमागमें अलाहिदा पत्रें पाठविली असेत, त्यांवरून कळूं येईल. मेवा डाली पाठविली ते पोहोचली असे. तुह्मी आपणाकडील दिनचर्येचें वर्तमान पातशाहा व अमीर यांचा मनसबा कर्तव्य तो लिहीत जाणें. छ २१ मोहरम. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति. *

मोर्तब
सुद.

श्री ह्माळसाकांत
चरणीं तत्पर खंडोजी-
सुत मल्हारजी
होळकर.

[ ३७२ ]

श्री शके १६७९ अधिक आश्विन.

श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे सेवेसीः--

विनंति सेवक पुरषोत्तम माहादेव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञाप्ती येथील कुशल तागाइत छ माहे मोहरम मुकाम फरुकाबाद श्रीभागिरथी तीर स्वामीचे कृपावलोकनेंकरून यथास्थित असे. विशेष. वजिरानी सांगितलें कीं यांनी मजला वारंवार पत्रें लिहून श्रीमंतासमीप शरमिंदे केले त्यास, यांचा विचार इत्काच. स्वामीचे सेवेसी लिहीणें जें या दिवसांत तमाम फौज तोफखाना हाफिजरहमतखानाचा श्रीगंगापार गेला. फरुकाबादेंतही फौज तादृश नाहीं. दहा पंधरा हजार फौजेने सर्व मुलूख तूर्त हस्तगत होईल व एका करोडीची मालमत्ता या स्थली हस्तगत होईल. जर हे गोष्ट या समयीं कराल तर आह्मांस सत्वर आज्ञा करणें. यांचे भाऊ

[ ३७१ ]

श्री शके १६७९ भाद्रपद वद्य ६.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासी:--

सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मी अजुरदार कासिदाबराबर पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर कळला. उत्तर सरकारच्या कासिदाबा। या पाठविलें असे. त्याजवरून कळेल. जाणिजे. छ १८ जिल्हेज.

(लेखनसीमा )

पौ। छ २४ जिल्हेज.

[ ३७० ]

श्री.

शके १६७९ आषाढ.

श्रीमंत राजश्री बापू स्वामीचे सेवेसीः--
पो। पुरुषोत्तम महादेव कृतानेक सा। नमस्कार विनंति उपरि येथील कुशळ ता। छ माहे सवाल मुकाम लस्कर नजिक दिल्ली, श्रीयमुनादक्षिणतीर, नाणून स्वकीयें लेखन करीत असिलें पा।. विशेष. इकडील सविस्तर वृत्त चिरंजीव देवराऊ निवेदन करतील. निराश्रित चाकर स्वामीचे आहों. कृपा करून परामर्श घेतला पाहिजे. दर्शनलाभ होय, तो सुदीन. विशेष लिहावें, तर आपण सर्वज्ञ आहेत. हे विनंति.

                                                                                 लेखांक २८४

                                                                                                     श्री                                                               १६१२ ज्येष्ट वद्य ८
                                                                                                                                                                        नकल

राजश्री माहादजी सामराज देशाधिकारी वर्दन लेखक प्रांत मावल गोसावी यांसि

5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक रामचंद्र निलकंठ नमस्कार सु॥ इहिदे तिसैन अलफ राजश्री सर्जाराऊ जेधे देशमुख ता। भोर तर्फ रोहिडखोरे हे हुजूर भेटीस आले याणी विनती केली की इदलशाहचे वेलेसी इसाफतीचे गाव इनाम चालत होते बितपसिल एणेप्रमाणे इसाफतीचे गाव च्यारी व इनाम ठिकाण

इसाफतीचे गाव                                                मौजे इन्हवडीस इनाम
१ मौजे चिखलगाऊ                                            टके ६ साहा एकूण टके
१ मौजे आबोडा
१ मौजे नाटिबी
१ मौजे कारी
-------

एक आहे याप्रा। चालत हेते तेणेप्रमाणे च राजश्री कैलासवासी छत्रपति स्वामीचे वेलेसी चालत होते त्याउपरी आपला भाऊ सिवाजी जेधा यात व आपणात वडिलधाकटेपणाचा कथला मौजे कारी निमित्य लागला या निमित्य उभयता राजश्री पावेतो भाडत गेलो याकरिता राजश्री कैलासवासी स्वामीने निवाडा होये तोवरी आदिकरून देशमुखी अमानत करून देशमुखीस मुतालिक ठेऊन त्याच्या हाते स्वामीकार्य घेत होते ऐसियासि साप्रत सिवाजी जेधा मृत्यु पावलियावरी आपले बाप भाऊ व आपण समजलो आपला वडिलपणाचा मानास कारी गाव आपणास दिल्हा आहे तरी कृपाळु होऊन आपले इसाफतीचे गाव ठिकाण पहिले राजश्री कैलासवासी स्वामीचे वेलेसी चालत होते तेणेप्रमाणे चालविले पाहिजेत ह्मणून तपसील विदित केला त्यावरून मनास आणून सर्जाराऊ जेधे ह्मणजे कदीम विस्वासू बहुत दिवस कस्ट मशाखती केल्या आहेत व राजश्री कैलासवासीचे वेलेसी हि थोर थोरी काम करून दिल्हहे आहेत हाली हि गनीमान कितेक किले कोट घेतले आहेत ते हस्तगत करून घ्यावे स्वामीकार्ये करावी यास्तव कृपाळु होऊन राजश्री कैलासवासी छत्रपतिस्वामीचे वेलेसी देविले इसाफतीचे गाव ठिकाण चालिले असतील तेणेप्रमाणे चालवावे ऐसा तह करून हे आज्ञापत्र तुह्मास सादर केले असे तरी राजश्री कैलासवासी स्वामीच्या सनदा असतील त्या मनास आणणे सनदाप्रमाणे भोगवठा जाता आहे किंवा नाही हे मनास आणून सनदा रुजू घालून जेणेप्रमाणे कैलासवासी स्वामीचे वेलेसी यास गाव व ठिकाण याचे चालिले असेल तेणेप्रमाणे बिलाकसूर याच्या दुमाला करणे तालिक घेऊन मुख्यपत्र परतून देणे जाणिजे छ २१ रमजान पा। हुजूर मोर्तब

जोडगिरीस मोर्तब २

बार सुरुसूद बार

[ ३६९ ]

श्री शके १६७९ वैशाख वद्य ११.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नारायणजीबावा चिटनिवीस स्वामी गोसावी यासी, व राजश्री कारखानवीसबावा स्वामीचे सेवेसीः--

पोष्य मुकुंद श्रीपत कृतानेक दंडवत प्रा। विनंति उपरि येथील कुशल ता। वैशाख बहुल एकादशी मंदवार, मुक्काम सिरें, नजिक श्रीरंगपट्टण जाणून स्वकीय कुशल लेखन करित गेलें पाहिजे. यानंतर : आह्मांकडील वर्तमान तर तपशिलें ल्याहावयास अवकाश नव्हता. श्रीमंतानी आह्मांस सिरहाचे मुकामीं छावणीस ठेविलें. श्रीमंतांचे आज्ञाप्रों। राहावें लागलें. त्यास, आपणांजवळ जिरंजीव बाबा आहेत, त्यांचा परामर्ष वरचेवर घेत जाणें. जे काय घरी लागेल त्याचा समाचार वरचेवर घेऊन, त्याप्रों। पावीत जाणें. तुह्मांवर बेफिकीर असों ! कागदपत्र पाठवून वरचेवर समाचार आणावा तर छावणी दूरदेशीं जाहाली; यास्तव आमचा सर्व मजकूर आपणांवरच आहे. बहुत तपशिलवारें ल्यावें तर आपण कांहीं परकी नाहीं. आमची तारंबळच जाहली आहे. * सारांश आपण उभयतां तेथें आहेत. चिंता करीत नाहीं. घर नीट करून देवावें. आपणांकडील सविस्तर लिहित जावें. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.

[ ३६८ ]

श्री शके १६७८ फाल्गुन वद्य ११.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदर माहादेव व पुरुषोत्तम माहादेव गोसावी यासीः--

सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्र मथुरेच्या मुकामींहून पाठविलें, तें प्रविष्ट जाहालें. अबदालीनी दिल्ली घेतली; पातशाहा, वजीर कैद केले; स्वामींनी इकडें लौकर यावें; ह्मणोन विस्तारें लिहीलें, तें कळलें. याउपरि तेथील वर्तमान वरच्यावरी लिहीत जाणें. दिल्लीस राजश्री बापूजी माहादेव आहेतच. त्याजकडून वर्तमान आणऊन लिहीत जाणें. बिजेसिंग, माधोसिंग, बाजे उमदे अमीर यांचेही बारीक मोठें वर्तमान लिहीत जाणें. चिरंजीवास वरचेवर वर्तमान लिहीत जाणें. ज्याप्रों। सांगतील, तैसें रोज करणें. अंतरबाह्य करीत जाणें; व तें मान वरचेवर लिहीत जाणें. छ २५ जमादिलाखर. हे विनंति.

( लेखनसीमा. )

[ ३६७ ]

श्री शके १६७८ फाल्गुन वद्य ११.

पु॥ राजश्री दामोदर महादेव व पुरुषोत्तम महादेव गोसावी यासीः--

उपरि. तुह्मीं लिहिलें कीं, थोरल्या फौजा येत तों, राजश्री समशेरबाहादर, व नारो शंकर, व अंताजी माणकेश्वर, व जाठ, व बहादूरखान पठाण, वगैरे. एक करून अबदालीस ठासून राखावा, ऐसा आह्मीं, व नागरमल्ल, व जुगुलकिशोर, व वरकड उमदियांनी विचार केला आहे; आह्मीं समशेरबहादर याजकडे जातो; ह्मणोन लिहिलें, तें कळलें. उत्तम आहे. तुह्मी चिरंजीव राजश्री समशेरबहादर याजकडे गेलांच असाल. नारो शंकर, समशेर बहादर, अंताजी माणकेश्वर, व जाठ वगैरे एक केलेच असाल. करणें. चिरंजीव राजश्री दादा व मल्हारबा मातबर फौजेनें तिकडे येतच आहे. तूर्त तुह्मीं अबदालीस ठासून राखावयाचें केलें आहे. त्याप्रों। करणें. त्यास पैस घेऊं न देणें. एतद्विषयीं चिरंजीव लिहितील, तसा मनसुबा करणें. छ २५ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें ?

( लेखनसीमा. )

[ ३६६ ]

श्री शके १६७८ माघ शुद्ध १.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोधरपंत दादा स्वामीचे सेवेसीः--
पो। गोपाळराव त्र्यंबक सां। नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम ता। छ ३० रा।खर मा। रणोद जाणून स्वकीय कुशळ लेखन करीत जावें. विशेष. राजश्री गोविंदरावजी यांचा वृतबंध माघ शुद्ध २ स नेमस्त केला आहे, तरी येऊन मंडपशोभा करावी, ह्मणोन लि॥. ऐशास, आह्मीं पछारेस होतो. तेथील गुंता उरकोन सरदारांचे आज्ञाअन्वयें लस्करास जावयासि निघोन मुकाम मजकुरास. येथून दरकूच जावयाचा उद्योग. एक दोन रोजां कूच करोन जाऊं. आपण नेमले तिथीस व्रंतबंधाची कार्यसिद्धि संपादावी. व रविसंक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पा। ते पावोन स्वीकारिले. येथून आपल्याकारणें संक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पा। आहेत. आदरें स्वीकारिले पाहिजेत. वरकड आपण मोरवरीस कांहीं दिवस राहाल किंवा लखनउकडे जाणार तैसें लिहावें. सदैव पत्रप्रेषणीं संतोषवीत जावें. * बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंती.

[ ३६५ ]

श्री शके १६७८ पौष वद्य ३०.

राजश्री मल्हारजी होळकर सुभेदार गोसावी यासीः--
छ श्रीसकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य

स्नो। बापूजी माहादेव, व दामोदर माहादेव, व पुरुषोत्तम माहादेव, व देवराऊ महादेव अनेक आशीर्वाद विनंति उपरि येथील कुशल ता। छ माहे रा।खर मुक्काम इंद्रप्रस्थ जाणून स्वकीय निजानदंवैभव लेखन करीत असिलें पा।. विशेष. येथील वर्तमान पूर्वी वरचेवर गोसावियांसी लिहीत गेलों; परंतु एकाही पत्राचें उत्तर न आलें. सांप्रतचें वृत्त तर, छ २७ माहे रा।वलीं अबदाली मातबर फौजेसहित लाहोरास दाखल होऊन, जलूस बहुतसा करून, जागजागां आपले नायब रवाना केले, व करीत जातो : व जमीदारही जाऊन भेटतात. अदिनाबेग, सदिलाबेग, व जमीबुद्दीखां हे, त्रिवर्ग त्याची अमद अमद ऐकान आधीच सरकोन लाखीजंगकडे गेले. सन्मुख देखील न आले. व सिरहंदेस बहादुरखां बलेचांचा नायब, राजश्री लक्ष्मीनरायण होता तोही माघारें फिरला. जंबूच्या राज्यानें झुंजाची तयारी केली आहे, हे पठाणांनी ऐकोन त्याजकडे फौज दाहा हजार रा। केली. झुंज होतें. बहुधा राज्यानें कमबेश मामलत करून मुलूख रक्षिला असेल. जाबसाल लागून राहिला होता. प्रो। जलालाबाद, व अदिनानगर, व नूरमाहाल, व जालंधर, यांत हरस्थळीं अमल दाखल आबदालियाचा जाला, व करून घेतला. जागजागां सरदारांच्या नेमणुकी होत जातात. लाहोराअलीकडे बेहानदी व शतद्रू ह्मणून दोन नद्या आहेत. दोही नद्यांचा मध्यदेश, खोजे अबदुल्ला नामें सरदार यास दिधला. त्यास, दिवसेंदिवस त्याचे फौजेची पेशकदमी आहे. त्याहीवर येथें कोण्ही मर्द माणूस नाहीं, हेंही अबदाली यास. कळून चुकलें. पिसोर सोडून आजी तीन महिने जाले. दिल्लींत फौज नाहीं. सर्व मनुष्यमात्र आपलाले स्थळीं चिंताक्रांत ! तजविजा मात्र होतात, व करितात ! हे वार्ता पैदरपै त्याजकडे जाते. परंतु एक वसवास आपल्याकडील कीं, मातबर फौजेनसी रा॥ सुभेदार या प्रांतीं आलियाखेरीज राहणार नाहीत. व, आलियानंतर मनसबा व लढाई थोर आहे, व होईल. ये गोष्टीचा अवकाश फारसा जाणोन दिलेरीवर गोष्ट फर्मावून हळूहळू या प्रांती येत जातो. दिल्लीवालेही कितेक सरदार त्यासी भेदले आहेत. पाहावें काय निदर्शनास येतें तें !! राजश्री अंताजी माणकेश्वर याजकडे अमात्यांनी-आजी तीन महिने जाले, गुलाबराय मुनशी, व महघूबसिंगास पाठविलें होतें. त्यास, छ ८ माहे मजकुरी पंत मशारनिल्हे येथें येऊन फौजेसहित दाखल जाले. यमुनापार पटपटगंजासमीप उतरले आहेत. छ ११ तारखेस मुलाजमत त्यांची जाली. विना आपली स्वारी या प्रांती येत नाहीं, तो काळपर्यंत हिंदुस्थानचा बंदोबस्त व अबरू व सलतनत राहत नाही. पूर्वी अबदाली यानें कलंदरखां नामें यलची पाठविला होता त्याजला आमात्यांनी एकमास आपल्या समीप ठेऊन घेऊन सांप्रत तोफा चीजबस्त देऊन रुकसत केले. व तिकडले सरदारांसही साम, दाम, दंड, भेद, करावयीसी कांहीं वस्त्रे भूषणें पाठविलीं आहेत. अशा गोष्टीनें ते ममतेंत येतात तो पदार्थ नाहीं; परंतु हे आपल्याकडून सिष्टाचार करितात. शाहावल्ली, अबदाली याचा वजीर, त्याचा बंधू + + अल्लीखां, व शाहाफना नामें फकीर, त्यांचे ठायीं अबदाली याची परम निष्ठा जाणोन, अमात्यांनी उभयतांस आपल्या समीप बहुता दिवसांपासोन ठेवून घेतलें होतें. सांप्रत त्यांजलाही अबदालियाकडे रा॥ केलें, की, तुह्मी तेथें जाऊन शाहास उत्तम प्रकारें बोध करणें. हिंदुस्थानची सलतनत थोर आहे. फौजेची कांहीं कमी नाहीं. त्याजवर नवाब बहादुराचे समयीं करारमदार जाले आहेत की, हिंदुस्थानावर फिरोन न यावें. ऐसे असतां, बदमामली करून हिंदुस्थानची मोहीम करूं इच्छितां, हे तुह्मांस विहित नाहीं. अतःपर माघारें फिरोन जावें. तथापि थोडाबहुत खर्चवेंचही कबूल करावा. या गोष्टीवर ठहराव होता न देखाल, महमदशाहाची कन्या अबदाली याचे पुत्रास देवूं करा, ह्मणून बोलून ठाव गाठावयासी पाठविलें आहे. व फौजबंदीही करितात. व फाबेग व बाकर बेग यांची तकसीर माफ करून, चौ हजारा स्वारांचा रिसाला देऊन नोकर ठेविलें. व नजीबखानास दीड लक्ष रुपये दरमहा मुकरर करून आपला रफीक केला. त्यानेंही आपले बहिर बुनगे देशी रा॥ करून जरिदा होऊन राहिला आहे. राजश्री अंताजीपंतासमागमें पाचसा हजार स्वार प्यादा असे. व समशेरबहादर यांसही पाचारिलें आहे. दक्षणी फौज मातबर जालियानंतर बाहेर निघणार. पुढें जो मनसबा निदर्शनास येईल, तो मागाहून लिहिला जाईल. संक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले आहेत, ते स्वीकारून उत्तरीं गौरविलें पाहिजे.