Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ३३४ ]

श्री शके १६७४ पौष वा। ३
पै॥ छ २९ रबिलाखर,
सन सबा खमसैन.

श्रीमंत महाराज मातुश्री आईसाहेबाचे सेवेसीः--

विनंति सेवक बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना. येथील वर्तमान ता। छ २१ रबिलाखरपर्यंत साहेबाचे कृपावलोकनेकरून यथास्थित असे. विशेष. साहेबी आज्ञापत्र सादर केलें. तेथें आज्ञा की, बहुत दिवस वर्तमान कळत नाहीं, तरी सविस्तर विनंतिपत्रीं लेहून संतोषवीत गेलें पाहिजे. ह्मणोन आज्ञा. ऐसियास, सेवकाचें वर्तमान सर्व साहेबांस विदित आहे. जे समयीं वर्धमानकृपा सेवकाचे मनोदयानुरूप करतील ते वेळेस सेवेसीं अंतर होणार नाहीं. श्रुत होय. हे विज्ञापना. +

[ ३६३ ]

श्री शके १६७८ पौष शु॥ ५.

यादी तिलशर्करा रवाना, सु॥ सबा खमसेन मया अलफ. धाता संवतसरे पौश शु. ५ इंदुवासरे मुकाम शाहुनगर.
छ आज, बादली, मंदील, तापता.
टेबल लिंक

[ ३६२ ]

श्री शके १६७८ कार्तिक वद्य ९.

श्रीमंत राजश्री दामोदरपंत यांप्रतिः--
श्रीवाराणसीहून बाळकृष्ण दीक्षित अनेक आशीर्वाद उपरी येथील क्षेम जाणून स्वकीयें कुशल लिहावयासी आज्ञा केली पाहीजे. विशेष. आपणांकडील कांहीं वर्तमान कळत नाहीं, तर सविस्तर लिहीलें पाहीजे. विशेष. नवाब प्रतापगडास आले ह्मणऊन आयकिलें. त्यास कोणीकडे जाणार ? येथें तर सावकारांहीं सुभिता केला. सर्व गेले. लोक भयाभीत आहेत. त्यास, तुह्मीं असतां आपणास चिंता वाटत नाही. सर्व भरवसा आपला आहे. यात्राही जाणार आहे. कृष्णाजीपंतांहीं व आपा जोसी यांहीं पत्रें लीहीलीं आहेत, वरून कळेल. सुज्ञांप्रति बहुत काय लीहीणें ? लोभ असो देणें. पत्राचें उत्तर सत्वर पाठवून देणें. हे आशीर्वाद. मिति का० वदी ९ बुधवार.

राजश्री त्रींबकपंत याप्रतिः--

बाळकृष्ण दीक्षित अनेक आशिर्वाद. उपरि. हरीदास कृपारामाबाबद जोडी पाठविली आहे; त्याचा जाबसाल होत असला, तरि जोडी ठेवावी; नाहिंतरि, जोडी फिरोन पाठवावी. आणि या प्रांतास नवाब वजिराची अवाई आहे ऐसें आयकतों. तरि त्याचे ये प्रांतास येणार असला तरि, एक चोबदार आमचा देवडीवर धाडून द्यावा. ह्मणजे येथें ब्राह्मणांस उपद्रव होणार नाहीं. तरि हें अगत्य असें. बहूत काय लिहिणे ? लोभ असो दीजे. हे आशिर्वाद. यवनांचे सैन्य अणिवार, यास्तव श्रीमंतास विनंति करून त्वरें उत्तर पाठवावें. हे आशिर्वाद.  *

[ ३६१ ]

श्री शके १६७८ आषाढ वद्य १.

झडती, स्वारी राजश्री गिरमाजी मकुंद, सु॥ सबा खमसैन मया व अलफ. इ॥ छ. ४ माहे रमजान ता। छ. १३ माहे शवाल. ---------------------------------------------- मो। जमा रुपये १५० प्रा। सिरधणा गु॥ भगवंतराव अनंत. 
टेबल  लिंक

                                                                                 लेखांक २८३

                                                                                                     श्री                                                               १६१२ वैशाख शुध्द ९
                                                                                           सिका राजाराम साहेब                                               नकल

(सिका प्रधान)                                           (सिका प्रतिनिधी)

स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १६ प्रमोद संवत्सर वैशाख शु॥ ९ नवमी इंदुवासर मा। बाजी सर्जाराव जेधे देशमुख व देशकुलकर्णी ता। भोर तपे रोहिडखोरे यासि राजाज्ञा केली ऐसिजे तुमचेविसी नाइकजी जेधे दि॥ देसाई हुजूर येऊन विनती केली की आपला वतनाचा हकलाजिमा इनाम व इसाफति आपले गाव कारकीर्द आलिशाईपावेतो चालत होते त्यावर काही साहेबाचे कारकिर्दीस बटाईचा तह जाला त्यामुळे आपले इसाफतीचे गावचा राजभाग गला दिवाणात पाउनु हाकाची मोईन दिवाणातून करून दिधली तेणेकरून आपली हैरानगी जाली अन्नवस्त्राची ते हि विप्‍ती जाली औरंगजेब स्वामीच्या राज्यावरी चाल केली राजश्री छत्रपति स्वामी रायगडीहून कर्नाटक प्राती गेले रायगड व वरकड हि किले कोट गनिमाने घेतले मुलकाची अवकात चालले नाहीत येगोष्टीनी गनिमासी सामील होऊन फिसाती केल्या त्याबरोबरी आपणासी हि दिल्हे वरतावे ऐसे जाले परतु आपण स्वामीच्या पायासी एकनिष्ठेने वरतावे हा चि निश्चय करून होतो स्वामी कर्नाटक प्रा। गेलियावरी तिकडे विजयी लोक आपण वतनदार लोक एकनिष्ठ सेवा करून दाखवावी ह्मणून किले विचित्रगड गनिमापासून घेतला व देश हि सोडविला पुढे हि जमाव करून गड कोट व देस गनिमापासून घेतो परतु स्वामीनी कृपाळू होऊन पेशजी आपला हक चालत होता तेणेप्रमाणे देखील इसाफतीचे गाव चालविले पाहिजे तर्फमजकूरची लावणीसचणी करून स्वामिसेवा एकनिष्ठपणे करू ह्मणऊन विदित केले त्यावरून आमचा हक व इनाम व इसाफतीचे गाव तुह्मास देविले आहेत पेशजी कारकीर्द प्रो। घेत जाणे तर्फमजकूरची लावणीसचणी करून दस्त आकारून सदरहूप्रमाणे घेत जाणे तर्फमजकूरचे गाव लावणी करून दस्त आकार होत जाईल त्याप्रमाणे लागल्या दस्तावरी हकाची मोईन बैसउनु घेत जाणे छ ५ साबान सु॥ तिसैन अलफ आज्ञा प्रमाण मोर्तब असे

(सदरहू आज्ञापत्र किले विचित्रगडचे मु॥ आषाढ वा। १३ स पावले असल पत्र देशमुख याजपासी देऊन नकल दाखल्यास घेऊन ठेविली आहे देसाई कारीस गेले ह्मणउनु काट्या व मानकर व नाइकजी जेधे याचे हाते पाठविले)*

[ ३६० ]

श्री शके १६७८ वैशाख शुद्ध ८.

श्री शिवचरणीं
तत्पर माहाराव पुरुषो-
त्तम माहादेव
दस्तक अज् सरकार राजश्री महाराव

पुरुषोत्तम माहादेव दि॥ श्रीमंत राजश्री पंतप्रधान ता। कमाविसदारान् व चवकीदारान् व गुजरदारान् सु॥ सित समसैन मया आलफ. राजश्री गोपाल माहादेव याचे पुत्र नरसिंव्ह गोपाल याजला झांसीस रवाना केलें आहे. तर मार्गी कोण्ही मुजाहिम होईल त्यास ताकीद करणें, जेथें मुक्काम करतील तेथें चवकी पाहरा करीत जाणें. समागमें माणसें देऊन आपले हद्देपार पोहचावीत जाणें. ताकीद. जाणिजे. छ. ७ माहे शाबान.

मोर्तब
मुदा.

[ ३५९ ]

श्री शके १६७७.

राजश्रियविराजित राजमान्य राजश्री महादोबा बाबा स्वामी गोसावी यांसी :-

पोष्य विश्वासराव बल्लाळ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित गेलें पाहिजे. विशेष. तुह्मांस, व राजश्री धोंडोबा आपांस, व राजश्री नानांस तीर्थरूपांची पत्रें आली तीं पाठविली आहेत. त्याजवरून कळों येईल. बहुत काय लिहिणें ! हे विनंति.

[ ३५८ ]

श्री
१६७७.

सेवेसी विज्ञापना ऐसीजे. आपल्या वकालतीचा रोखा कांहींच नाहीं. कधी आपले मार्फत बादशहास पत्रें नाहींत. आपला वकर नाहीं सांप्रत सरदार फौज जवळ असतां बाळारायाची हवेली बसंतखोज्यानें हिरावून घेतली, व होळकरांचे वकील चोरमहालांत राहात होते, तेथून त्यांस काढून दिल्हे. ऐशास, फौजा देशीस गेल्यावर आह्मांसहि या हवेलींत राहूं देणें कठीण ! असें जाणून, सर्वांचे वकील हाजीर हजारा कोसांवरील व अवघे उमराव हाजीर नजर देतांच बनतें जें सर्व वकायनिगार चहूंकडे खबरा लिहितात. याजकरितां, हे गोष्ट हिसामुदीखानाच्या सांगितल्यावरून श्रीमत् दादासाहेबांच्या तर्फेनें केलें. श्रुत होय. हे विज्ञाप्ति.

[ ३५७ ]

श्री
शके १६७७.

पु॥ चिरंजीव राजश्री दादा यासि.
आसीर्वाद उपरी. तुह्मी पत्र पाठविलें, तें पावलें. वजिराचा शुका नागरमलाचे नावें पाठविला तोहि पावला. त्यास, काल शुकुरवारीं नवाब बहादुरासी आमची अवग्र दोन प्रहरपर्यंत रदबदल जाहाली. तात्पर्यार्थ हाच जेः सतर लाख रुपये आह्मां घेऊं द्यावे. व सलाबतजंगास न्याबत देऊं द्यावी. आह्मी विनंति केली जेः हाजरत फिरदोस आरामगाहाचे वेळेस सवाई जेसिंग कैलासवासी जालियावर राणानीं पातशाहास पैगाम केला जे, क्रोड रुपये आह्मी देतों. माधोसिंगास राज्य अमरेंच होय. त्यावरून पातशाहांणीं कबूल करून इतमाहादौला दोहीद यासी मसलहत पुसिली. त्यास इतमाहुद्दौलांहीं हाच अर्ज केला. दोन हाजरतचा मी एक + + + हें काम बहुत उमदें. वगैरे. त्यास जितके + + + चे उमदे असतील तितक्यांसहि हाजूर बोलावून मसलहत पुसावयाची आहे. + + + आसफज्याहा तो दूर आहे. त्यास लिहून पाठवावें. व सफदरजंगबहादूर, व उमदुनमुलुख यांसीं हाजूर बोलवावें. त्यावरून उभयतांस हाजूर बो + + + डेरे निघावयाची देखील तयारी जाहाली. इत्कियांत पंतप्रधानांहीं ईस्वरसिंगासच राज्य द्यावें, ह्मणोन तजवीज लिहिली. तेव्हां सफदरजंगबहादुरांहीं व उमदुनमुलुकांहीं व वजीरुनमुलुकांहीं व यतमाहुदौलांहीं हेच मसलहत दिली जेः क्रोड रु॥ न घेऊन माधोसिंगास राज्य न द्यावें ; व ईश्वरसिंगासच द्यावें; हे विनंति पातशाहास केली. त्याचप्रमाणें पातशाहांणीं मंजूर केलें. व दुसरी तकसीर हे जे : कमरुदीखानास लाहोरमुलतानची सुबेदारी सरफराज केली. यावरी, येहेंयाखां व फखेरी यांणी क्रोड रुपये देऊं करून सुबेदारीची दरखास केली असतां, सफदरजंगबहादुरांहीं व उमदुनमुलुकांहीं रु॥ घ्यावयाची सलहा न दिधली. तुह्मी ह्मणाल, हे कमरुदीखानाची ल्यायेकत राखीत नाहीत; तर निजामनमुलुक, इतनादौले, मोहीमुलुक, इत्की मिळून कमरुदीखानाची ल्यायेकत राखितात. हेही एकीकडे. जर तुह्मांस करणें होतें, तरी तुह्मी पंतप्रधानाच्या इजायातची तसलीमात त्यांकडून कां करविली ? व आह्मांस दक्षनचे मुख्तारीचा फर्मान कां दिधला ? व आह्मांकडून दक्षिणेची तसलीमात कां करविली ? हागोयाजामा पंतप्रधानाचा काढूं ह्मणता; असो. चित्तास येईल तें करा. निजामनमुलुकांहीं आह्मांस सुबेदारी घेतली, तेवेळेस क्रोड रुपये कबूल करून मोहरीफर्द पंतप्रधानानाजवळ पाठविला. त्यांसही क्रोड रु॥ निजाममुलुकाकडून देववावे; अथवा आपन द्यावे; अथवा, आह्मी तुमचेही क्रोड रुपये कबूल करितों. त्यावरून + + + न होऊन + + + + ने गुजरातची सुबेदारी तुह्मी घ्या, आणि तेव्हली भर्द काढून आणा. आह्मी ह्मटलें जें: गुजरात तो आमची आहेच. तुह्मी आह्मांस आजि का + + + + + याचाही देसीं तुमचा वसूल करा. आह्मीही मुबलक मेळवूं. त्यावरून ज + + रुपयांसाठी लोळण घालितात, व वजिरासही लिहितात. त्यास ईश्वरइच्छेनें लौकरच खबर येते जेः परिमारें भाऊ भाऊ सलाबतजंग बिसालतजंग झगडून मरतात. जो कोणी सुबेदारी पंतप्रधानाचे अखताराची काढू ह्मणेल त्याचें पाठीवाटें काळीज निघेल. जुगलकिसोरामाकूल करणें : जे कां बंगालियावर कंबख्ती आणिता, बजिनस त्याच्या मोहरीरी नकला पातशहांनीं आमचे हवालां केल्या. ते पंतप्रधानाकडे पाठवितों. तुह्मांकडे, नकल पाठविली असे. त्याजवरून कळेल. हें त्यास बनिनस दाखऊन या गोष्टीपासून हात उचला ह्मणोन सांगणें.

[ ३५६ ]

श्री शके १६७७ फाल्गुन शुद्ध ६.

याददास्त मु॥ सरावां राजश्री बाबूराव गोपाळ यांजली येणेंप्रा।. सु॥ सित खमसैन मया अलफ, छ ५ जमादिलाखर.

१               मीरीमलवाला हत्ती.
१०००         पालखी दरसाल रुपये.
२०००        जालीस रुपये.
१०००        चौकडां.

येणेंप्रा। घेणें.