लेखांक २८१
श्री १६०८ माघ वद्य १४
(सिका) नकल
कौलनामा अज स्वारी राजमान्य राजश्री निलकंठ मोरेश्वर ता। सरज्याराऊ जेधा सु॥ सबा समानैन अलफ तुह्मी गनीमाकडे जाऊन सेवा करिता कोण्या भरास भरून गेलेत बरे जे जाले ते फिरोन न ये परंतु मुसलमानाची सेवा करिता तुमास कष्ट होतात सांप्रत स्वामीचे सेवेसी येऊन कार्यभाग करावा कष्टाची मुजरा होईल सरफराजी करून घ्यावी ह्मणून कलो आले तरी तुह्मी कदीम लोक तुमचा भरवसा राजश्री स्वामीचे बहुत अन्न भक्षिले आहेत क्रिया धरनु आणि यावयाचे केले तरी बहुत उत्तम केले कदाचित गनिमाकडे गेले होतेस त्या गोष्टीकरिता यावयाचा अनमान कराल तर सरवश्वी न धरने बेशक येणे तुमचे बरे करणे सुभे होऊन सर्फराजी करून बहुत चालऊन अतर न पडे समाधान असो देणे आणि येणे दरी बाब कबूल असे छ २७ रा।वल आज्ञाप्रमाण मोर्तब