Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ४२८ ]

श्री शके १६८८ मार्गशीर्ष शुद्ध ८.
९ डिसेंबर १७६६.

राजश्री बाळोबा दि॥ राजश्री पुरुषोत्तम माहादेव
गोसावी यांसिः--

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। माहादजी सिंदे दंडवत सु॥ सबासितैन मया व अलफ. तुह्मी दोन पत्रें पाठविली ती पावलीं. लिहिला मजकूर सविस्तर विदित जाहला. तिकडील वर्तमान वरचेवर लेहून पाठवीत जाणें. जुरे, बाज व कुही तयार करविलीं आहेत. मागाहून पाठऊन देऊं ह्मणोन लिहिलें. त्यास बाज, जुरे व कुही जलद येऊन पोहोंचेत तें करणें. जाणिजे. छ ६ रजब. *  बहुत काय लिहिणें हे विनंति.

मोर्तब
सुद

चंद्र १४ रजब

श्रीजोतिस्व-
रुप चरणीं तत्पर
जयाजीसुत जनको-
जी सिंदे निरंतर.

[ ४२७ ]

श्री पौ छ ७ जमादिलोखर.

शके १६८८ कार्तिक शुद्ध ६.

विनंति उपरि. आपलें पत्रच सांप्रत येत नाहीं. वर्तमान कळत नाही. शरीरप्रकृत कशी आहे ? काय आहे ? ते सर्व ल्याहावी. दाजी लिंबाळकर याचे मार्फतीनें बोली लागली आहे. त्याचा सिद्धांतःयांणीं देऊं नये; त्यांणी मागूं नये; आणि जाधवराव यास दादांनी समजावावें ; मीर मोगल यास निजामआलीनें समजावावें. याप्रों। घडल्यास परस्परें तह हवा. नवें इतकें निघालें आहे कीं, मोगलानें जाधवराव याची ज्यागीर जाधवराव यासच बहाल करावी, त्याचे मोबदला सरकारांतून दुसरी ज्यागीर लावून द्यावी. ही गोष्ट बनेल न बनेल, पाहावें. मोगलहि दाणिया दुणियामुळें हैरान ! हेहि खर्चाविसीं पूर्ण जळलेले; व मेहनत होईना ! पुढें कसें होईल ? यास्तव तह करणार !! एक नाईक मात्र या गोष्टीस वोढीत होते. पाहावें तेंहि ऐकावेसेंच आहे. एका दो दिवशीं काय तें निर्गमांत येईल. सर्वांचें मत निकाल पडावा हेंच आहे. दादांचा व सखारामपंताचा तो विचार निकाल पाडावा हेंच असें. पुढें होईल तें लेहून. सखारामपंत कारभार टाकून पोटाची बेगमी असे ते चालवावी, हें आठाचहू दिसांत करणार असे. जिजाबाईकडील राजकारण ठीक जाहालें. हेकी करितात. भरवसा पुरत नाहीं. पुरेल तेव्हां खरें ! परंतु आह्मी तंतु टाकिला असे. आपला प्रकार कसा ? हें कसें करावें ? ते तें कळावें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. रा॥ छ ५ जमादिलाखर मंदवार दोन प्रहर.

[ ४२६ ]

श्री शके १६८८ आश्विन वद्य १३.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री पुरुषोत्तम माहादेव यांसः--

सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मी विनंतिपत्र छ १६ जमादिलावलचें पाठविलें तें पावलें. अहमदखान कुंजपुरास गेले ते छ १९ रोजी येणार, आल्यानंतर आपल्या पुत्रास फौजसुद्धां हुजूर रवाना करतो ऐसा त्यानीं करार केला आहे, ह्मणून लिहिलें तें कळलें. उत्तम आहे. त्याणीं आपले लेंकास अद्याप पाठविलें नसेल तरी त्यांचे लेकास व हाफीज रहिमतखा यांचे लेकास फौजसुद्धां सत्वर घेऊन येणें. तोफा व जंगी सामानाची तरतूद त्यास सांगून तुह्मी करवीतच आहा. त्यास, तेंहि जलद करवणें. अनुपगीर गोसावी याजकडील राजकारणाचा मजकूर लिहिला. पैशास तुह्मी तूर्त त्यासी करारमदार न करणें अथवा नाहीं असेंहि न बोलणें. दाबूनच ठेवणें. राजकारण न तोडणें. वरकड कितेक मजकूर विस्तारपूर्वक लिहिला तो कळला. जाणिजे. छ २६ जमादिलोवल, सु॥ सबा सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?

लेखना
वधि.

[ ४२५ ]

श्री शके १६८८ वैशाख.

पु॥ श्रीमंत राजश्री केदारजी सिंदे सुभेदार गोसावी यासीः--

विनंति ऐसीजे तीर्थस्वरूप राजश्री बापूजी महादेव व आह्मी इंद्रप्रस्थी होतों, याजवरून श्रीमंतांनी आज्ञापत्र पाठविलें कीं, शाहा अबदालीकडे जाणें. याजकरितां लाहोरास शाहापाशीं उभयतां गेलों. जाबसाल समक्ष होणेयाचा तो जाला. विस्तार साहेबापाशीं पोहोंचून सविस्तर हकीकत करूं. सरकारच्या बोलण्यांत थोर वजन येऊन शाहावलीखान वजीर आपल्या मायेंत घेतला. यास्तव शाहानशाहांनीं मेहेरबानगी करून श्रीमंत राजश्री पंत प्रधानांस राज्याचा टिका, व केशरी पंजा, वस्त्रें, जवाहीर, घोडे, हस्ती, गुजरान केलें. मातबर माणूस आह्मांसमागमें देऊन रवाना तेलें. तो सरंजाम घेऊन येथपर्यंत सुखरूप पोहोंचलों. येथें पाहातों तों, आपली पत्रें, शाहास व दिल्लीचे उमरावांस हरएकाच्या मारफात येतात. त्यास, आह्मी आपली पूर्वापार सेवा करीत आलों. श्रीमंत कैलासवासी आपासाहेब व श्रीमंत राजश्री बाबासाहेब यांणी ( सुभेदारसाहेबीं व तदोत्तर श्रीमंत कैलासवासी नानासाहेबीं व हाली श्रीमंती ) इकडील वकालतचें काम आमचें हातें घेतलें. सरकारचे चाकर असों. आणि आह्मीही त्यासच खाविंद जाणतों. इतकें श्रीमंत राजश्री बाबासाहेबांचे शोखासाठीं येथें राहाणें जालें. इतके श्रम सोसले ते श्री जाणे ! असेंही असतां आपण आमचे हातें सेवा घेणार नाहीं, तेव्हां आमचे इतके श्रमाचा परिहार कोण करणार ? परस्परें पत्रें काय मजकूरचीं येत्यात ? तें न कळे. यास्तव साहेबास विनंति लिहिली आहे. दया करणार आपण समर्थ आहेत. दुसरें वेगळे वेगळे जाबसालांत सरकारचे कामांत अंतर होईल. आपले पूर्वापर चाकरास अविस्मरण आहे. सविस्तर भेटीनंतर. आह्मी तों आपले आहोंच.

[ ४२४ ]

श्री शके १६८८ चैत्र वद्य ११.

चिरंजीव राजश्री बज्याबास प्रति त्रिंबक सदाशिव आर्शीर्वाद उपर येथील कुशल ता। चैत्र वद्य एकादशी कुशल असो. विशेष. तुमची पत्रे कासी वाघ याजबा। आली ती प्रविष्ट होऊन सविस्तर अक्षरशः अवगत होऊन संतोष जाहला. सर्व दरबारचें भावरीत करणें हें समजोन त्याप्रमाणें आपलें स्वरूप रक्षून वर्ततां येविशीचें विविक्तपणें लिहिलें तें पाहून बहुत संतोष जाहला. याउपरी आमचे चित्ताची निशां जाहली. जे प्रकार आमचे मनांत होते ते तुह्मी समजला. व सर्व दृष्टीस पडलें. याचे बारीक मोठे पर्याय वारंवार आतां लिहिणें तुह्मास नलगे. हत्ती आला. चांगला सरस आहे. दुसरें पत्र तुमचें चैत्र शुद्ध त्रितीयेचें राजश्री तात्याकडे आलें होतें. त्यांनी पाठविलें तें पावले. हैदर नाईकाचा तह लौकरच होऊन माघारे फिरतील. व श्रीवेंकोबा बारा गांवें आहे, श्रीमंत जाणार आहेत, ह्मणून लिहिलें ते कळलें. श्रीचें दर्शन जाहालिया बहुत उत्तम आहे. लौकरच माघारे फिरला ह्मणजे बहुत संतोष आहे. वरच्यावर होईल वर्तमान लिहित जाणें. पोतनिशीचे वाटणीची निकड दादा वेंकाजी माणकेश्वर यांनी श्रीमंतास सांगोन शामरावास केली आहे. खंडोपंत पानशी, बाबावैद्य मध्यस्तींत आहेत, ह्मणोन तीन चार पत्रें शामरावाची आली. तुह्मी तो कांहीं लिहिलें नाही. त्यास तेथें मजकूर कस कसा होत आहे. तुह्मास कांहीं पुसतात किंवा रावसाहेब खावंदपणें मर्जीस येईल तें करवितात, याचें कसें तें लिहिणें. तुह्मास पुसिलें तरी पुण्यांत याद लिहविली त्याप्रमाणें विनंती करणें. नच पुसत तर कांहीं न बोलणें. खातरेस येईल ते करोत. चाकरीची वतनें गेली मग याची क्षिति किमर्थ होणार. का, जें होणें ते होऊं ! येविषीं शामरावाचे माणसाहातें दोन पत्रें तुह्मास पाठविली आहेत. पावतील. राजश्री तात्या श्रीमंत दादासाहेबाचे दर्शनास नर्मदेवर श्रीमंत आलियावर जाणार आहेत. हे आशिर्वाद.

[ ४२३ ]

श्री शके १६८८ चैत्र शुद्ध ८.

श्रीमंत राजश्री दादा साहेब स्वामीचे सेवेसीः--

विनंति. सेवक बापुजी माहादेव कृतानेक सा। नमस्कार. विनंति. येथील क्षेम ता। छ २२ जिल्काद मु॥ दारुस्सलतनत लाहोर दस्लष्कर शाहानशाहा व अश्रफुलउजरा येथें स्वामीच्या कृपावलोकनेंकरून यथास्थित असे. विशेषः स्वामीनी आज्ञापत्र छ २८ शाबानचें पाठविलें, तें छ ११ जिल्कादी सादर जालें. आज्ञा जे, पेशजी तीर्थरूप रा॥ भाऊसाहेबापासीं शाहावलीखान काय बोलत होते ? व तीर्थरूप दर जाबसाल काय करीत होते ? यास, येथें कोणी वाकफ नाहीं. तैसेच, तीर्थरूप रा॥ + + + + +

वजिरास अर्ज केला. आज्ञा झाली, ते पुर्वणी पत्रीं लिहिली आहे. त्याजवरून श्रुत होईल. से.  *

[ ४२२ ]

श्री शके १६८६ माघ शुद्ध १४.

राजश्री मकाजी गिते दिमत पागा गोसावी यांसीः--

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर राम राम सु॥ खमस सितैन मया व अलफ. जगन्नाथवाणी कसबे मरठें येथें राहतो, त्यासी तुह्मी उपसर्ग देतां, ह्मणून येथें चेतरामानें हुजूर विनंति केली. त्यावरून हाली पत्र सादर केलें असें. तरी इतःपर चेतरामाकडील जगन्नाथ वाणी मरेठेंत राहतो त्यास तुह्मी मुजाहिम न होणें. जाणिजे. छ १३ साबान बहुत काय लिहिणें ?

मोर्तब
सुद.

श्री
ह्माळसाकांत चर-
णी तत्पर खंडोजी
सुत मल्हारजी
होळकर.

[ ४२१ ]

श्रीवरद शक १६८६ कार्तिक.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री आबा स्वामीचे सेवेसी :-

पोष्य पुरुषोत्तम माहादेव साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ माहे जमादिलावल मुकाम दिल्ली जाणोन स्वानंदकुशल लिहित असावें. विशेष. राजश्री गणपतराव गोपाळ श्रीमंतांपासी यावयास सिद्ध आहेत. हे वडिलापासोन कदीम सरकारचे चाकर. मशारनिलेनीं श्रीमंतांस सविस्तर विनंति लिहिली आहे. ते आपण एकांतीं यजमानास ध्यानारूढ करून, उत्तर समर्पक घेऊन पाठवावे; ह्मणिजे हे तेथें येतील. तुर्त नजबखानापासीं. नगदीची सोय भक्षावयासी मात्र आहे. वरकड फौजेची सोय राऊमजकुराची अझूण जाली नाही. यास्तव श्रीमंतांपासी. येणार अभय जाल्यास, व आपण अभिमान धरून याची खातरजमा करून लिहाल तर, साहेबांपासीं येतील. आमचे खर्चाचे तंगीमुळें तेथें येणें न होय. तेथें सविस्तर पूर्वी श्रीमंतास लिहिलें आहे, त्याप्रमाणें बाळाजी गोविंद, गंगाधर गोविंद व झांशीकर रघुनाथ हरी, यांसी ताकीद करून, दरसालचे पांच हजार रुपये - दुसाला दाहा हजार - त्यांजकडे बाकी आहे ते घेऊन पाठविले पाहिजेत. व बाळाजी गोविंद यासी ताकीद करून, सरकारांतून तूर्त नेमणुकीपैकीं दहा हजार देविले आहेत, ते अझूण पाठवित नाहीत. तर, त्यांस ताकीद करून रुपये घेऊन पाठवाल, तर देणें लोकांचें थोडें बहुतवारून श्रीमतांपासीं येऊं, व येथील सविस्तर श्रुत करूं. पुढे आज्ञा करतील तैशी वर्तणुक करूं. येथल्याचा प्रकार : आजपावेतों आह्मांकडून श्रीमंतास लिहविलें, व त्यांनींहि लिहिलें, तें अझूण अमलांत येत नाहीं. इंग्रजांस अत्यंत भितातसें दिसतें. पूर्व पत्रीं यांचे लक्षणाचा विस्तार श्रीमंतास लिहिला तो तेथें प्रगट न करावा. येथें येथील वृत्त सविस्तर डाकेंत अजिगिरा बगैरे लावून वरचेवर येत आहे. यास्तव आमचे पत्राचा उल्लेख तेथें न करावा. पूर्वी यांचे जबानी वर्तमान लिहिलें, त्यांत संदेह असला तर, तो मजकूर यांचे जबानीचा आह्मी लिहिला असे. नजबखानास सविस्तर लिहून परस्पर उत्तर आणवून घ्यावें. लटिके वाद आह्मांकडे श्रीमंताचे मनांत घालवील तर न मानावे. श्रीमंतांचे मर्जी प्रसन्न होय तो प्रकार करून, यांची फौज देतील ते घेऊन येतों. नाहीं देतसे पाहून उठोन दर्शनास यावयास्तव खर्चास घेऊं. हे विनंति.

                                                                                 लेखांक २९०

                                                                                                      श्री                                                            १६३१ श्रावण वद्य १
                                                                                                                                                                     

साक्षपत्र हजीरमजालसी मुकाम मौजे आंबडे ता। उत्रोली ता। रोहिडखोरे बि हुजूर

                                          राजमुद्रा
रोजश्री शामजी हरी नामजाद                    विष्णु रुद्र सभासद
सुभा प्रांत मावळ                                    बराबरी स्वारी राजश्री
                                                          पंतसचिव

 

                  290 1                                                      

भिकाजी कृष्ण चिटनीस                           देवजी लिगोजी खटपनीस
सुभा मावळ                                            सुभा मावळ
सकराजी ढगे मोकदम                              गोविंद नरसिह हरकारा बा।
बा। स्वारी रा। पतसचिव                           स्वारी रा। पतसचिव

                                           गोत

सु॥ अशर मया अलफ कारणे जाले साक्षपत्र ऐसे जे मौजे माडरदेव प्रा। वाई व मौजे आबडे व बललु व नेरे ता। उत्रोली या गावात सिवेचा गरगशा होता ह्मणौन खोपडे देशमुख व माडरे मोकदम हुजूर राजश्री पतसचिवस्वामीजवळी जाऊन राजश्री सुभेदारास व समस्त गोतास आज्ञापत्रे घेऊन आले की सिवेवरी जाऊन सीव नजर गुजार करून हरहक निवाडा हुजूर लिहिणे त्यावरून रा। सुभेदार व समस्त गोत सिवेवरी येऊन श्रावणमासी खोपडियाने दिव्य करावे ऐसा निर्वाह करून हुजूर लिहिले त्याउपर श्रावणमास निघता च हुजुरून सकराजी ढगे यास हा। आज्ञापत्र आले की सिवेवरी जाऊन दिव्य घेणे खरा कोण खोटा कोण हे वर्तमान लिहिणे ह्मणौन पत्र आले त्यावरून राजश्री सुभेदार व समस्त गोत मौजे आबडे येथे येऊन खोपउे व माडरे आणून खोपडियापासून दिव्य घ्यावे त्यास अनसोजी व बयाजी माडरे याणी रदबदल करून दिव्य आपण करितो ह्मणौन मागोन घेऊन राजिनामा लेहोन दिल्हा त्यावरून श्रावण शुध द्वादसी सणवारी गोदनाक बिन भाननाक माहार मौजे माडरदेव याच्या हातास साबण लाऊन दोन्ही हात धुतले कृष्ण न्हावी मौजे खेडी बु॥ प्रा। सिरवळ याजकडून नखे काढून हाताची निशाणे लिहिली मग दोही हाती पिसव्या घालून लाखाटा केला कैदेत राखिला दुसरे दिवसी आदितवासी त्रयोदसी पहिला प्रहरी धोडउडाणाखाले बोरपेढा आहे तेथे आपली सीव आहे आहद कलकदरा तहद चोरधोडीनजिक पालाणा ऐसे बोलोन बोरपेडा माडरे जाऊन उभे राहिले तेथे राजश्री शामजी हरी सुभेदार पहिल्या प्रहरात सिवेवरी जेथे माडरे जाऊन उभे राहिले तेथे रा। सुभेदार व समस्त गोत बैसोन का। सिरवळचा लोहार जाणून त्याजकडून ऐरण ताविली माहार उभा करून हातीच्या पिसव्या काढून सात मडळे काढिली पहिल्या मडलात उभा करून हातावरी सेवल घालून त्यावरी सात पाने पिंपळाची ठेऊन त्यावरी लोणी घातले लोहाराने साडसे ऐरण धरून माहाराच्या हातावरी ठेविली सात मडले चालोन सिवेवरी बोल्या गवताचा भारा ठेविला होता त्यावरी टाकिली डोब जाला माहाराचे हाती पिसव्या घालून लाखाटा केला कैदेत ठेविला तीन रात्री होऊन चौथे दिवसी बुधवारी राजश्री सुभेदार व समस्त गोत बैसोन हातीच्या पिसव्या काढिल्या हात पाहाता माहार दिव्यास लागला

उजव्या हातास आगठ्यापासी                                        डाव्या हातास मधल्या बोटा
मधले रेघेवरी फोड पावट्या                                           पासी एक फोड व त्याचे सेजारी
प्रमाणे १ एक व त्या च                                                 संधीस एक फोड आला
बोटास पुढे लाहान फोड
२ दोन जाले

सदरहूप्रमाणे दिव्यास लागला खोटा जाला हे साक्षपत्र सही छ १४ माहे जमादिलाखर

                  

                                                            290 2

[ ४२० ]

श्री ° श्रीज्योतिस्वरूपचरणीं तत्पर ँ
जयाजीसुत जनकोजी सिंदे
निरंतर.
शक १६८६ चैत्र वद्य ११
राजश्री मल्हारजीबावा होळकर गोसावी यासीः--

छ सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य

स्नो केदारजी सिंदे व माधव राऊ * सिंदे रामराम विनंति उपरि येथील कुशल ता। छ २४ शवाल जाणोन स्वकीय कुशललेखन करीत गेलें पाहिजे. तदनंतर सटवाजी गावडे शिलेदार नालबंदी रुपये ९८१६॥ नवहजार आठशे साडेसोवळा आपणांकडून देविले आहेत. तर, उसणवारी ऐवज देऊं केला आहे त्यापैकी नवहजार आठशे साडेसोवळा रुपये पावते करावे. याची रसिद घ्यावी. मिति, चैत्र वा। ११ शके १६८६ तारण नाम संवत्सरे. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.

मोर्तब सुद.