[ ४२८ ]
श्री शके १६८८ मार्गशीर्ष शुद्ध ८.
९ डिसेंबर १७६६.
राजश्री बाळोबा दि॥ राजश्री पुरुषोत्तम माहादेव
गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। माहादजी सिंदे दंडवत सु॥ सबासितैन मया व अलफ. तुह्मी दोन पत्रें पाठविली ती पावलीं. लिहिला मजकूर सविस्तर विदित जाहला. तिकडील वर्तमान वरचेवर लेहून पाठवीत जाणें. जुरे, बाज व कुही तयार करविलीं आहेत. मागाहून पाठऊन देऊं ह्मणोन लिहिलें. त्यास बाज, जुरे व कुही जलद येऊन पोहोंचेत तें करणें. जाणिजे. छ ६ रजब. * बहुत काय लिहिणें हे विनंति.
मोर्तब
सुद
चंद्र १४ रजब
श्रीजोतिस्व-
रुप चरणीं तत्पर
जयाजीसुत जनको-
जी सिंदे निरंतर.