Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४१९ ]
श्री
शके १६८५.
विनंति उपरि. आपण गेले. आह्मी येथें आलों, तों येथील प्रकार कांहींच ठीक न दिसला. याजबराबर मलकापूरा पावलों. मोगलहि तेथें पुढें बाळापुराकडे आला. हे तेथून फिरले ते फरदापुरचा घाट चढून, शहरास येऊन, पैठणावरून माहुरास आलों. मोगल जाफराबादेहून शलाऊ सांगवीस आले. शहरास जाणार. आमचे मागें शेर होऊन येणार. आमचेंहि माणूस जिकजिक जाहालें. ते हाव भरी जाले आहेत येथें कशांत कांहीं नाहीं. आपण स्वस्थ असावें. कोण्हेविसी चिंता न करावी. थोडकेच दिवसांत आपलें चित्त संतोष राहील. कोठें आहां ? काय वर्तमान ? तें ल्याहावें. बहुत काय लिहिणें ? बाबूजी यांणीं फत्तेसिंगबावाकडील गावाविसी फारच उत्पात केला होता. आह्मीं बळे राहविलें. सर्व चढले. कोणांत कांहीं राहिलें नाहीं. आह्मी धाकटे श्रीमंत यांची मर्जी राखावी हाच विचार केला असे. एका दो दिवशीं ते गाठ घालणार. लोक फार हैरान आहेत. कोण्हासी कोण्ही धरीलसें नाहीं. पाणिपताहून झुंजून पळाला ! येथें आबाईनेंच पळतो !! आपले लष्करांत आपणच लढतात ! बंद नाहीं ! हिंमत नाहीं ! विचार नाहीं ! ईश्वरीच्छा !!! होणें तसें होईल ! सर्व कळावें. आपलेकडे चित्त लागले आहे. भेट होईल तेव्हां सर्व कळेल. आपास यावयाची तातड होऊं न द्यावी. पत्र फाडावें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४१८ ]
श्री शके १६८४ फाल्गुन शु॥ २.
राजमान्य राजश्री नारायणराव बलाल यांसी आज्ञा केली ऐसीजेः--
चिरंजीव राणूबाई यासी वर राजश्री माहादाजी नाईक निंबाळकर याचे पुत्र राजश्री मालोजी नाईक निंबालकर याचा निश्चय करून, लग्न फालगुण शुद्ध अष्टमीस योजिलें असे. तरी तुह्मी लग्नास येणें. जाणिजे. छ. १ साबान. सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४१७ ]
श्री
शके १६८३ आषाढ वद्य ५.
हिसेब खासगत राजश्री त्रिंबकराव सदाशिव सु॥ इसने सितैन मया व अलफ, श्वारी सातारा, श्रीमत् राजश्री माधवराव बल्लाळ यांसी पेशबाईपणाची वस्त्रें जाहालीं, ते समयीं बरोबर श्वारी इ॥ छ १२ जिलेज ता। छ १९ मीनहु
जमा -------------------------- रुपये
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८९
१६३० ज्येष्ट वद्य ४
सलाम राजे शाहु यास की तुह्मी कृष्णाजी दादाजी प्रभु देशपांडिया यासमागमे आपली अर्जदास्त पा। त्यातील मजमून आमची चुलती व सर्व नौकर लोक मिळोन फिसात करून आह्मावर फउजा रवाना केल्या आह्मा बुडवावे आपण राज्य करावे असी चिती द्वेशबुधी धरून असे केले त्यास बादशाही हुकमाने देसी राज्यावर आलो तो हा प्रसग पडला त्यास श्रीवरे व शूरत्वेकरून लढाई केली तो बादशाईकृपेकरून फते पावलो व नौकरलोकास धरून नसेती केल्या बदोबस्ती करण्याचा क्रम चालला आहे हुकूम की मनुश जरबेत राखावे व रयतलोक याचे संरक्षण करावे व इनसाफ बराई खुद जातीने पाहावी बडे बुडवावी ह्मणजे धका नाही त्याप्रमाणे हुकूम चिती दृढतर धरून राज्यपध्दतीने हिंदुशास्त्राप्रमाणे चालत आहो ही खबर कळावी सबब मुदाम कृष्णाजी अर्जी देऊन वकिलाकडे पा। त्यास वकील मजकूर याणी हुजूर अर्जदास्त रसिद करून तुह्माकडिल नौकराचे मुखे साकल्य मजकूर शृत केला त्यास पेशजी फर्मान तुह्मास जमेदारीबदल मिळाला आहे त्याप्रमाणे मुलकाचा वगैरे बदोबस्त ठेऊन कायम जाला हा बहुत तुह्मास बादशाही कृपेने फायदा जाला हा संतोष मानीत आहो व मावळप्रांती शक्राजीनारायण पडत याणी जबरीने दादाजी नरस प्रभु देशपांडिया कुलकर्णी रोहिडखोरे व वेलवडखोरे प्रा। मावळ कृष्णाजी प्रभूचा बाप हा कदीम जमेदार असता त्याचे वतन घेतले व आणखी हि बहुत जमेदार व रयत लोकाच्या तसनसि केल्या ये बाबे पडत यास तुह्मी आणविले आसता न आले हिरकणी खाऊन मेले त्याचे नारबोपडत नोकरीस ज्यारी त्यास तुह्मी तो इनसाफीत नजर व दोबस्तीविसी इरादा ठेविला आहे येविसी प्रभूनी अर्ज केल्यावरून त्यास ज्याची जमेदारी कदीबमबपासून असेल ती अवलाद अफलाद चालवावी व राज्यात जुलूम जाहाला तो न्याय करून रयतेस सुख द्यावे व प्रभूचे वतन प्रभूकडे चालवावे प्रभु आपणापासी जोत्याजी केशरकर याचे दिमतीने हुजूर तुह्मासाठी तुमचे समक्ष नोकरी केली आहे तुह्मी नेक चालीने चालून बादशाहीकृपेने दौलतीची बडती करून घ्यावी येविसी रायभान वकील याजवळ हुकूम पेशजी जाला तो एकदर मजकूर लिहिला बादशाई लोभ विशेष जाणावा छ १७ रबिलावल सन ३ मुताबीक सन ११२०
(असल फरमान माहाराजापासी दिल्हा मराठी नकल बादशाहा मुनसीपासी केली ती हुजूर सातारमुकामी दाखऊन आपल्याजवळ नकल राहावी ह्मणून विनंती करून घेतली)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४१६ ]
श्री शके १६८३ ज्येष्ठ वद्य ५.
स्मरण. राजश्री बाळाजी बाजीराउ प्रधान स्वारीस गेले होते ते खेचिवाड्यापासून माघारे फिरोन टोंक्यास आले. तेथें आठ चार दिवस मुक्काम होता. तेथून कूच करून जेष्ट सुध २ सके १६८३ गुरुवारी तिसरा प्रहरा अमदाबादेहून सत्रा अठरा कोस लांब मजल करून येर्हवडियावर येऊन धर्मशाळेपासीं येऊन मुकाम केला. दुसरे दिवशीं शुक्रवार घातवार ह्मणून तथेंच राहिले. मंदवारी प्रहरीं रात्री हत्तीवर बैसून गांवांत आले. त्यावर दोन चार दिवस बाहेर पालखीत बैसून जात असेत. सुध दसमी सुक्रवार पर्वतीस गेले होते. तेथें एक ढाळ जाला. त्यानें हैराण होऊन घरास
आले ते निजले. दोन चार दिवस ढाळच होत होते. त्यानें शरीर क्षीण पडत पडत फारच वेग आले. मग जेष्ट वद्य पंचमी सोमवारी जागा पालट करावयास पर्वतीस गेले. वद्य शष्टी मंगळवारी साता घटका रात्री देहअवसान जालें. शततारका नक्षत्र, विष्कंवयोग, छ १८ जिलकाद. दहन पुलाचे दक्षणेस केलें. सन ११७१. सुहुरसन इसन्ने सितैन मया अलफ. शके १६८३, वृषानाम संवत्सरे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४१५ ]
श्री शके १६८३ ज्येष्ठ शुद्ध १५.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री पुरुषोत्तमपंत नाना स्वामीचे शेवेसीः---
पो। बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ १३ जिल्कापावेतों मु॥ श्रीटोंकें, गंगा दक्षिणतीर, येथें असो. विशेष. तुह्मांपासून निघालों ते ग्वालेरीसच आलों. त्यावर तुमचीं आमचीं पत्रें जात येत असतच. त्यानंतर तेथून निघालों ते शिरोजेपावेतों आलो. तेथून राजश्री आयुध्याप्रसाद मिसरजी यांची रवानगी तुह्माकडे केली, कांहीं संशय होता ह्मणून. परंतु तो संशय गणेश वेदांती यांची पत्रें आलियावरून दूरही जाहला. त्यानंतर मिसरजीस पत्र पाठविलें की, संशय गेला, तुह्मीं पन्नदर्शनी यावें. तों ते लांब गेले. मग जाब पाठविला. मागून येतों, ह्मणून लिहिलें. हें वर्तमान सविस्तर त्यांणी सांगितलें असेल, त्यावरून कळलेंच असेल. शिरोंजेहून दरमजल आलों ते बर्हाणपूरचे मुक्कामीं श्रीमंताची भेट जाहली. मर्जीचा प्रकार ह्मणावा तर, अस्ती चर्म मात्र राहिलें आहे. शरीर फारच कृश झालें. घटकेच्या गोष्टीचें स्मरण राहत नाहीं. ज्याजवर रागें न भरावयाचें त्याजवर भरावें, मनास येईल तें करावें, ही प्रकृत पाहून फारच श्रम जाहले. उपाय काय ? ईश्वरें कसें तरी त्यांस सलामत राखावें, हेंच ईश्वराजवळ मागणे आहे. तमाम मुत्सदी निरोप मागून देवास वगैरे जागा जागा गेले. ठिकाव होता कठीण. वगैरे कितेक बारीक बारीक मर्जी फारच बिघडली आहे. ती लिहितां येत नाही. औरंगाबादेजवळ आल्यावर राजश्री देवराव यांचे बंधू तेथें होते ते आले. त्यांची भेट जाहाली. मग मिसरजीकडील वगैरे सर्व वर्तमान त्याजपाशींच मात्र सांगितले. त्यांचे आमचे विचारें ठराव जाहला कीं, श्रीमंताजवळ बोलावयाचें नाहीं. श्रीमंत राजश्री दादासाहेबासच विनंती करून मग काय ठराव होईल तो करावा. असा निश्चय करून ती गोष्ट तशीच ठेविली. याची कारणें फार आहेत. कोणाजवळ काय बोलतील हा भरंवसा नाहीं. भलत्याच जवळ बोललें तर तेथें वर्तमान प्रकटून विकोपास गोष्ट जाईल हे एक; व एके घटकेस एक बोलणें अशानें परिणाम कसा लागतो ? अशा बहुत गोष्टी चित्तांत आणून ठेविलें. श्रीमंत, चार दिवस झाले, पुण्यास गेले. आह्मी मातोश्रीचें कार्य करावयास्तव टोंके येथें राहिलों. राजश्री देवरावतात्याही आह्माजवळच आहेत. श्रीमंताबरोबर फिरोन खर्चखालीं मात्र यावें ते गंगातीरींच कां न राहिले ? यास्तव राहिले. त्यांनी तुह्मास पत्र लिहिलें आहे त्यावरून कळेल. श्रीमंतांचा यख्तियार प्रस्तुत हिंदुस्तानचा मल्हारबावरच आहे. याप्रों। वर्तमान आहे. तुह्मास कळावें यास्तव लिहिले आहे. आमचे महादेवाचे ध्यानाची तसबीर लाला बाळ गोविंद याजपाशी आहे. ती जरूर आणून राजश्री त्रिंबकराव शिवदेव याजपाशीं देवावी. ह्मणजे आह्मास पावेल. ही गोष्ट जरूर जाणोन करावी. व आपल्यासही फार दिवस तिकडे जाऊन झाले, एकदां घरीं यावें. आणि मातोश्रीस भेटून मग काय कर्तव्य तें करावें. तुह्मीं पत्रे छ ३० रमजानची पाठविली ती पावलीं. मातोश्रीचे शोधास माणसें पाठविली ह्मणून लिहिलें. तो शोध कळल्यावर लिहून पाठवावा. व याबूक अल्लीखानाचा मजकूर व अल्लीगोहर यास श्रीमंताचे पत्र पाठवावयाचा प्रकार व सदासिव पाळंदे याजकडील पत्र, वगैरे सर्व कळलें. श्रीमंतांची पत्रें व कृष्णराव पारसनिसाचे पत्र, ऐशीं पुण्यास रवाना केली आहेत. प्रतिउत्तर आलियावर पाठवूं , तेव्हां सविस्तर मजकूर लिहून पाठवू. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असो दीजे. हे विनंति. मातोश्रीचे कार्य संपादावयाचें होतें, परंतु तुमचे पत्र थोडेसें संशयात्मक आलें कीं, खरखोंदी याकडे आहेत अशी खबर येत्ये, तिकडे माणसें पाठविली आहेत. तीं आलियावर जें कर्तव्य तें करूं, सर्व वर्तमान मिसरजीस सांगावें. हे विनंति. बाळ गोविंद यास व राजश्री त्रिंबकराव शिवदेव व मिसरजी यास पत्रें पाठविली आहेत. ही ज्याची त्यास पावती करावी आणि महादेवाचें चित्र आधीं पाठवावें. अनमान सहसा न करावा... हे विनंति. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४१४ ]
श्री शके १६८३ वैशाख शुद्ध १०.
पैवस्तगी छ २२
जिल्काद, बा। जोडी
हुजूरची.
पु॥ राजश्री पुरुषोत्तम महादेव गो। यांसिः--
उपरि. अलीकडे तुह्माकडील पत्रें येऊन वर्तमान कळत नाहीं. अपूर्व आहे ! यानंतर सविस्तर वृत लिहिणें.
राजश्री जनकोजी सिंदे यांस राजश्री गंगाधर यशवंत, जाट,
आणावयास मनुष्यें तुमचीं व गाजिपीखानाकडे मथुरेस गेले.
राजश्री मल्हारबाचीं गेली होती. त्यांणी काय काय केलें, जाटाचें
त्याचें कार्य जाहालें, कोठे आले, त्याचें भाषण होऊन काय ठहरलें,
कधीं येणार, हें सर्व लिहिणें. सविस्तर लिहिणें.
जाटाचे तर्फेनें दिल्लीस रुपराम अबदाली तो श्रीकृपेनें माघारा
कटारे जाऊन वजिराविसीं जिन्नत- गेला. जिन्नतमहल जवांबख्त
महल जवांबख्त शाहाजादा यांची यांनीं नजीबखानाचे विद्यमानें
निशा करावी, गाजुदीखानास वजिरी अलीगोहर यास बोलावूं पाठविलें
द्यावी, नजीबखानास तोफखा- होतें. ते कधीं येणार, येतात
न्याची दारोगी सांगावी, बक्षीगरी किंवा नाहीं, त्यांचा मनोदय काय,
तों भाऊसाहेबांनी सरकारची हें विस्तारयुक्त लिहिणें.
करून घेतली, हें अगदी कसकसें तुह्मी दिल्लीस जाणें, व राजश्री
जाहालें, जाटानीं पक्की निशा बापूजी महादेव यांस राजश्री
दिल्लीकराची कसकसी केली न मल्हारजी होळकर याजवळ पाठ-
केली, हें सविस्तर वरचेवर वणें, ह्मणून पेशजी लिहिलें
लिहून पाठवणें. त्याप्रा। करणें.
या दिवसांत तुह्मांकडील पत्रें वारंवार यावीं तें येत नाहीं हे कार्याचें नाहीं. याउपरि जलदीनें वर्तमान लिहीत जाणें. जाणिजे. छ ७ शवाल मु॥ नजीक दौलताबाद.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४१३ ]
शके १६८२ फाल्गुन वद्य.
पुरवणी राजश्री सुमानजी जाधवराव बाबा गोसावी यांसः---
॥ छ विनंति उपरि श्रीमत् सौ। पार्वतीबाई, व नाना पुरंधरे, व दमानी गा।, नारो शंकर, मिळोन व मल्हाररायाकडील जमाव सदरहू लिहिलेप्रों।, चाळीस हजार जमा जाला होता. गिलजियांवर व नजीबखानावर सलावत पडली होती. वकील सलुखास येत होते. श्रीमंत राजश्री नानासाहेब शिरोंजेवरतीं होते. खिचिवाडियांत राजश्री जानोजी भोंसले, व गोपाळ गोविंद, पंधरा हजार फौज होती. मागें श्रीमंत दादासाहेब देशीहून येतात. सलाबत पडिली होती. परंतु लोकांस रोजमुरा न मिळला. ऐवज श्रीमंतानीं न पटविला. याजस्तव, श्रीमत् सौ। पार्वतीबाई, व नाना पुरंधरे, व नारो शंकर गालियेरीकडून उभेरस्तां सिपरी कोलारसाहूनच आले. कबिले त्या प्रांताकडील लोकांचे आले. एणेकरून दुंडी जाली. आपले महाल रहलचा सिवार गहूं, हरभरे, सपरी कोल्हारस ठिकाणीं लागले. तहसील बंद जाली. पूर्वी दक्षणेहून बाबोजी नाईक, सदाशिव रामचंद्र, व त्रिंबक शिवदेव पंधरा हजार फौज गालियेरीकडे गेली. त्याणीं बखरवा, समडी, दांडोगर, कोल्हरस, सिपरी, प्रांत सिवार चारीत गेले. कोणास कोणी ताकीद करीना. आह्मी बहुत रदबदल केली. ते साफ ह्मणतात कीं, तुह्मांस आशा अद्याप या प्रांती आहे की काय ? अगदीं मुलुख खराब केला आहे. रुपयेस ठिकाण नाहीं. खासा याजला मागोन राजश्री त्रिंबकजी हंडे, धोंडोबा तात्या येथें आणिले आहेत. सर्व वर्तमान कचे पायमल्लीचें खराबीचें त्यास विदित केलें आहे. आपण तो अठीचे रुपये विष्णोपंत गजरियास देविला, एकोत्रा व्याज त्याचें. तुमचें आमचें दीडोत्र्याप्रों। व्याज पडलें. पैका न मिळे तेव्हां व्याजकसर रु॥ ६०० पडले. हजार रुपये अठीच्या भरंवसियास पडला. पंचमेल रु॥ घ्यावेयाचा तह आमचा तुमचा असोन, अठीचा भरणा करविला. लाख रु॥स हजार रुपये बट्टा पडला. सोळाशें रुपये जातीवरी पडले. गालिइरीस आह्मीं पंधरा हजार रुपये खाशीयास रोखा केली. तरी दिल्हे. विठ्ठलराव शिवदेव यांचा हवाला, अकरा हजारांचा, घेतला. खाशियांनी खत लेहून त्यास दिल्हें. सवा लक्ष रुपये रोख पुणियांत चिरंजीव रंगोबानें भरणा करून दिल्हे. हफ्त, फितूर, सुलता, जनगी सर्व प्राप्त जाले ! सावकारास रुपया पावला नाहीं. एकंदर पस्तीस हजार वसूल जाला तो दगा प्राप्त जाला. मातबर लोक, सरदार चरणाखालीं आले. अगदीं घर सुटका होता. परंतु तेसमंई हिंमत धरून शीपरीचें ठाणें साडेतीनसे बरकंदाज ठेवून रक्षिलें. झरी, सेसै, बुढ्ढे डोंगरी, बराइ, गाजीगड, जागा, आपल्या रक्षिल्या. हा काळवर जागे रक्षिले. सुपारेकर कमाविसदार यांचे हाल, व रणोदकर याचे, आणखी मामलेदाराचे, झांसीकर राजश्री बाबूराव कोनेर यांचे हाल काय जाले, त्याचा विस्तार कोठवर ल्याहावा ? राजश्री बाबूराव कोनेर यांचे भाऊ शेवडियावर पडले. याच काळांत धीर धरून आपले जागे रक्षिले. नरवरकरांनी खासियांच्या खबरीं लटक्या कंड्या उठोन दगा केला होता. ठीक ! कुवरपूर घेतलें होतें, तेंही सोडविलें. परंतु ठिळियांत यादवराव होता, त्याचे कबिले धरिले. नरवरकर यांजकडील मदनसिंग यानें साडेआठ हजार रु॥चीं मेवासी घोडी, बाब, गल्ला, वस्त, भाव मिळोन लुटिली. त्याचे ठिकाण लागों देत नाहीत. याप्रों। घोरांत असो. आपण तो पत्र पाठवून आमचा परामृष करणें सोडिला, हे उचित नाहीं. याउपरि ऐसें न करावें. चिरंजीव रंगोबाचे जातीवरी सोळाशे रुपये व्याजबट्टा पडला. त्याची निरगत हिशेबीकितेबी करणार आपण समर्थच आहेत. आपले शेवेसी अंतर किमपि केलें नाहीं. गुदस्तांच मात्र पेंच घालोन सोळाशे रुपये नख्त जातीवरी पडिली. त्याचें निराकारण करणार आपल्याखेरीज कोण असे ? सर्व आश्रा भरवंसा आहे. काशीहून येतेसमईं येथें कार्यभाग विस्कलित जाणोंन, राहेल तो रु॥ घोरांत पडला. असो. सर्व आमची चिंता साहेबास असावी. पूर्वीपासून पदरचे असो. कृपा असो दिल्ही पा।. पत्राचें उत्तर पाठविलें पाहिजे. खासियासी आमचेविशीं बहुत प्रकारें ल्याहावें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८८
श्री १६२९ मार्गशीर्ष शुध्द ७
नकल
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक ३४ सर्वजीत संवत्सरे मार्गशीर्ष शु॥ ७ सप्तमी गुरुवासर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती याणी राजश्री शामजी हरी देशाधिकारी व कारकून वर्तमान भावी सुभा प्रात मावल ता। राजगड यासि आज्ञा केली ऐसि जे प्रतापजी सिलीमकर याचे बाप सताजी सिलीमकर हे किले राजगडी नामजाद होते त्यास ताम्राचा वेढा राजगडास पडला ते समई हे स्वामिकार्यप्रसगी जखम लागून भाडणी पडला त्याचे लेक प्रतापजी हाली स्वामीची सेवा करावी ऐसी उमेद धरून सेवा करीत आहे परतु मुलामाणसाचे चाले ऐसा एक गाव इनाम करून दिल्हा पाहिजे ह्मणोन राजश्री शंकराजी पंडित सचिव मदारुलमाहाम याणी हुजूर विनतीपत्र पाठविले त्यावरून स्वामी प्रतापजी सिलीमकर यावरी कृपाळु होऊन यासी नुतन इनाम मौजे ताभाड तर्फ गुजनमावल हा गाव कुलबाब कुलकानु देखील हालीपटी व पेस्तरपटी खेरीज हकदार व इनामदार करून देहे इनाम अजरामर्हामत करून दिल्हा असे तरी तुह्मी मौजे मजकूर पुर्वमर्यादेप्रमाणे याचे दुमाला करून इनाम यासी व याचे पुत्रपौत्रादिक वशपरपरेने चालवणे साल दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे या सनदेची तालिक लेहून घेऊन असल सनद भोगवटियासी परतोन देणे जाणिजे लेखनालंकार
असल पत्रावरी सिके दोन व मोर्तब आहे
रुजु सुरनिवीस सुरुसुद बार
तेरीख ५ रमजान सु॥ समान मया व अलफ बार
बार पा। छ १४ मिनहू
सदरहू असल पत्र बमोजिब नकल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४१२ ]
श्री शके १६८२ फाल्गुन वद्य ६.
राजश्री सुभानजी जाधवराव बाबा गोसावी यासीः-
-॥ छ श्रीसकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ रामचंद्र शामराज सुभेदार, प्रा। नरवर, आशिर्वाद विनंति येथील क्षेम, ता॥ छ १९ माहे साबान, मु॥ शिऊपुर, प्रों। मजकूर, येथें स्वस्तिक्षेम असो. विशेष. आपण कृपा करून पत्र अजूरदार काशीद याजबरोबर पाठविलें तें छ १८ साबानीं पावलें. वर्तमान कळों आलें. इलडील वर्तमान तरी सविस्तर खांसी यांनी व धोंडोपंत यांनी लिहिले आहे त्याजवरून कळों येईल. खासे राजश्री मल्हारराव होळकर याजपाशीं पछोरावर, नजीक गालीएर, येथें सुखरूप आहेत. ईश्वरें प्राण वांचवून स्वस्तिक्षेम आणिलें. बा। रा॥ बाबुजी नाईक व सदाशिव रामचंद्र व त्रिंबक शिवदेव व गोपाळराव बापोजी ऐसे वे रा॥ विठ्ठलराव शिवदेव पंचवीस तीस हजार फौज सडी आहेत. गोहद प्रांते संचारितात. दिल्लीकडील वर्तमान तरीः गिलचियाचे मुलकांत नादीरशाहा लाख फौज आली. पातशाहात गिलचियाची घेतली. याजमुळें तो दिल्लीहून छ ११ साबानी जातो. सुज्यातदवला यमुनापार होऊन आयुध्येस चालिला. लबाडी करावयास नजीबखान रोहिले व माधवसिंग आहेत. परंतु त्यांच्यानें चमेली अलीकडे येवत नाहीं. सलुख करावयाबा। वकील रा॥ मल्हारराव याजकडे आले आहेत. यांच्या मुद्दियाप्रमाणें तह झाला तरी करतील. श्रीमंत रा॥ भाऊसाहेब पाणिपता अलीकडे अल्लाजाटाच्या मुलकांत व जनकोजी सिंदे पांच हजार फौजेनसी सुखरूप आहे. कुंभेरीहून पत्रें जाटाची मल्हारबास आली. वकील बापोजीपंताचीं आलीं. त्यास आणावयास सुरजमल्ल जाट जाऊन घेऊन येतात. याजउपरि ईश्वरें दिवस उत्तम आणिले आहेत. नष्टचर्यास कांहीं बाकी राहिली नव्हती. परंतु उगवते दिवस आलेसें दिसतें. ईश्वर काय करील तें पाहावें.