Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४३६ ]
श्री शके १७०४ माघ वद्य ५
श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसीः--
पोष्य माधवराव अनंत वेदांती कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील वर्तमान ता। माघ वद्य ५ पर्यंत यथास्थित जाणोन स्वानंदवैभवपत्रीं लेखनाज्ञा करीत असलें पाहिजे. विशेष. प्राचीन हिंदुधर्माचा लोप होऊन अपसव्याचें प्राबल्य जाहलें. त्यांणीं सर्व धर्मभ्रष्ट करून स्वधर्माचरणीं जनास लावून वेदवेदांग प्रवृत्तीपासून परावृत्त होण्यामुळे ब्राह्मण्याचा लोप, स्वधर्माचार राहिला. यास्तव, भगवंतजीस संकट पडून तदाश्रयीं हिंदुराजे कित्येक होते जाले. त्यासही हितोपदेशकर्ते लोक निर्माण जाले. त्यांणीं नाना प्रकारें सांगून घर्मवांछा घरविली. परंतु जनाची प्रवृत्ति लावणें जाहलें नाहीं. जैपुरवाले याणी अश्वमेध केला. कोण्ही कांहीं कोण्ही कांहीं, अशा प्रकारें चालले. ते श्रीचे मनास न आले. त्यावरून स्वतां अवतीर्ण जाल्याखेरीज दुर्मताचा नाश होणार नाहीं जाणून बाबाजी भोंसले यांचे वंशीं मालोजी विठोजी राजे जाले. त्याचे वंशीं साक्षात् भगवान विश्वेश्वर स्वयंमेव आपण शिवशिवाजी राजे अवतीर्ण होऊन, तुरुकाचा निःपात करून, हिंदुपति सिंहासनस्थ गागाभटप्रसादें जाहाले. त्यांणीं एक ग्रंथ ब्राह्मणांनी ह्मटला ह्मणजे मणभर धान्य व पांच रुपये रोख द्यावे. याप्रमाणें उत्तरोत्तर विशेषात्कारें दक्षणा व धान्य देऊन विप्रकुलाचें संरक्षण केलें, धर्मवृद्धि पावविली. त्याअन्वयें दाभाडे सेनापति यांणीं पुण्यक्षेत्राचे ठायीं श्रावणमासी धर्मदक्षणा देऊन दिवसेदिवस लौकिक संपादिला. त्याचा पराभव करून श्रीमंती वास्तव्य केल्यापासून सर्व गुणाचे, ग्राहीक होऊन, दिगंतकीर्ति मेळवून, आसमुद्रांत ध्वजारोपण केलें. धर्म कलाकुशलता वीर्य शौर्य गीतनृत्यादि नाना प्रकारचे तर्क साधून स्वामिसेवा करून कुलोद्धारकता आपलाले वंशीं सर्वजनांनी अवर्णनीय स्तुतिप्रद केल्यांनी राज्याम्यंतरी सर्वांस मान्य असेच पुरुष होऊन प्रपंची इहपर उत्कृष्ट जाले. त्यास, वडिलोपार्जित वागण्याच्या चाली कशा, त्यांणीं राज्य संपादिलें कसें, ह्मणाल, तरी:- कोणत्याही कर्मास प्रवृत्त होऊं नये. जालें असतां, त्यांत हानी होवो किंवा कांहीं घडो, परंतु ती मसलत शेवटास जाई तोंपर्यंत पिच्छा सोडूं नये. अशीं कर्मे कोणती केली ह्मणाल तरीः-- पो। वसई घेण्याविशीं श्रीमंत थोरले चिमणाजी बलाळ आपासाहेब यांणीं साहास केला तो काय लिहूं ? तत्रापि ऐशीं हजार मनुष्यें लहान थोर सरकारकामीं आलीं. ऐसी जघन्य कीर्ति वागती. ती वसई घेऊन फिरंगियास गोंवें एक ठाणें ठेवून, संपूर्ण राज्यांतून काढून दिलें. तैसेंच, सदाशिव चिमणाजी भाऊसाहेब पेशवे यांणीं दिल्लीपतीस स्पर्धा करून दिल्ली घेऊन, आपण सिंहासनस्थ होऊन, पुढें गिलच्यावरी जाऊन, मोठे जवांमर्दिनी लढाई दिली. त्या युद्धांत लक्ष्यावधी मनुष्यें गारत जालीं.
वरकड जीवजंतूंची संख्या कोणी धरली ? परंतु पराभव जाल्यामुळें, हिंदुधर्माचा लोप व्हावा असा प्रसंग प्राप्त जाला असतां, बाळाजी बल्लाळ नानासाहेब पेशवे यांणीं अभिमान धरून सरकारकामीं आले. त्यांचे घरीं लघु लघु लेकरें राहिली ! ती गौरवें सत्कारयुक्त आणोन त्यांची मर्यादा ठेवून, अपरतारतम्य चित्तवित्तानिशीं अंतःकरण पुरवून वाढविली. हिंदुस्थानांत राणोजी शिंदे व महादजी शिंदे यांस पाठवोन, विदुरापासून सुयोधनाचा मानभंग जाला, तद्वत् उभयतां शिंदे यांणीं दिल्लीपतीसहित पादाक्रांत सर्व राजे लहान थोर करून पुण्यास राजधानी इंद्रभुवनवत् केली ! ऐसे अभिमानी पुरुष ! त्यांचे वंशी आपण कीर्तिमान् आहात. त्यास, मागील इतिहासाचें कारण नसतां किंचित् लिहिणें बालबोधार्थ लागलें. आताः- केलें तेंचि करावें. त्याकरितां मरोनि उरावें. उरले त्यांणीं मोडलें तेंच घडावें ; हा धर्म मुख्यत्वें राजाचा. त्या राजांनी स्वहित साधून परलोकीं योग्य व्हावें. त्या योग्यतेस श्री हरिस्मरण अहर्निशीं असावे. दुसरे:- राजकारण करावें. तिसरें:-सावधान राहावें. चौथैः- साक्षेपी असावें. तो साक्षेप कोणता ह्मणाल तरि :- नाना युक्तिप्रयुक्ती बोलणें ; वादवेवाद जिंतणें ; समयीं समर्पक उत्तर देणें ; कलाकुशलता, हावभाव, नटनाट्य, कौतुक, गीत, नृत्य, वीर्य, शौर्य, विवेक, शुचिष्मतता, लिहिणें, बेरीजतेरीज, शब्दशब्दांग, देशपरत्वें भाषा, विनोद, साहित्य जाणावें. बोलोन करून दाखवावें. ऐसेप्रकारें साक्षेपी राहावें. व सेवकजनापासून लहानथोर अपराध जाला तरि, स्वामीनींच क्षमा केला पाहिजे; कारण, पदरची सर्व मनुष्यें जाणती असली तरि मुर्खत्व नाहीसें होईल; त्यास, मुळींच तो अज्ञान; त्यास नानाप्रकारें श्रम करून सज्ञानता आणली; तो कामाचें धोरण न जाणून चुकला; तेव्हां ज्या मनुष्यास या योग्यतेस सहस्रावधि द्रव्य खर्च केलें, तेव्हां ते मनुष्यसे जाले. ते मनुष्य तोडून आपलेकीरतां प्राण देणारे. त्याजला अपराध सोडला नाहीं तरिः-- लक्षावधि मनुष्यांत सूज्ञ उत्पन्न होणार. तें मनुष्य दैववश प्राप्त जालें तरि, इतबारी वागणार क्वचित् !!! तेव्हां पृथ्वीपति जो त्यांणीं सर्वांचा संग्रह केला पाहिजे. त्यांणी त्याग केला तरि त्या मनुष्याचा निर्वाह कसा होईल आणि चाकरीचे सूज्ञ मनुष्ये कोठून मिळणार ? याकरितां परंपरेचे कुलाशिलाचे मनुष्य अज्ञान असले तरि स्वामिसेवा जीवादारम्य करील. सज्ञानी मनुष्य नाना प्रकारें आपला मतलब साधून सर्वस्वाचा पराचा नाश जाला तरि करील. याची प्रचिति हल्ली सर्व राज्याराज्यांतरी वागती. तिचा विस्तार कशास ? सारांश, राजांनी आधी अंतः करण जाणावें, ही कला त्यास असली पाहिजे. जो पराचें अंतःकरण जाणील तोच राजा, राज्याधिकारास योग्य. असा जो राजा त्यांणीं न्यायनीतीनें वर्तावे. आपपर तेथें मनांत न आणावें. वास्तविक असेल तेंच करावें. अन्यथामार्गी लोकवार्तेवरी न जावें. समक्ष पाहिल्यावाचून न राहावें. अथवा निश्चयात्मकें शोधून पाहावें. मग जें सांगणे तें सांगावें. ज्या राज्यांत नीति बुडाली तें राज्य भ्रष्ट जालें, ऐसें जाणावें. परंतु काळ वेळ पाहावा. समय वोळखून चालावें. अधीरपणें नसावें. दुर्मदासी दूर ठेवावें. अपरिचितासी ओळखावें. दुरूनच बोलावें. उपाधीपासोन दूर असावें, उपाधीत न सांपडावें. लीनत्व पहिलेच घ्यावे. मूर्खत्व सोडून द्यावें. दोष अवगुणातें झांकावे. दुर्जन दंडून सोडावे. दरिद्रियावरि उपकार करावे. अमित भाषण बोलावें. कोणतेहि तर्हेतर्हेसि न जावें. कार्य करणें तेंचि करावें—अकार्यी मन न घालावें. होईल तेंचि करावें. न होण्याचे तें करण्याचा अभिमान धरूं नये. धरिल्या होय, ऐसें साधन पाहावें. साधनी फार न झटावें. दीर्घ प्रयत्न जाल्यास करावें. केलें कर्म न सोडावें. दुसरेयाचें अभीष्ट जाणावें. बहुत यत्नें करावें. न होय तरी नम्र असावें. दुःख कोणासहि न द्यावें. अपार पाठांतर करावें. सदासर्वदां तत्पर ईश्वरचरणारविंदवत् स्वामिसेवेंत राहावें. शांती मनीं ठेवून वर्तावें. सत्क्रियेनी चालावें. रानदंड उगाच न करावा. अपराधियास दंडोनी सोडावें. लोक पारखोनी सोडावे. पुन्हा मेळवून घ्यावे. ऐशा नानाप्रकारच्या युक्ती बैसोन कोण्ही बोलती; परंतु, प्रसंग नाना माघाड घेती ; ऐसे पुरुषीं न चालावें. सदासर्वदां स्वामिसेवा एकनिष्ठेनें करून कार्यकरितां श्रम करावे. श्रम करून कार्य करून घ्यावें. श्रम करितात त्यांस श्री अभयपूर्वक येश देतो, हा निश्चय मनीं सदृढ घरूनी चालावें. इहलोकीं भलेपणा मेळवून घेतला तर परलोकी मुक्तीस गेला; हें निश्चयत्वें मनीं धरून वर्तत जावें. यांत श्रेयस्कर सर्वोपरी जाणावें. * बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा. हे विनंति.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २९१
श्री १६३१ कार्तिक शुध्द १४
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३६ विरोधी संवत्सरे कार्तिक शुध चतुर्दसी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहु छत्रपतिस्वामी याणी मोकदमानी + + + + + + + + + + +
आज्ञा केली ऐसि जे मौजे मजकूर पेसजीच्या मुकासियाकडून दूर करून हाली किले व्याघ्रगडचे बेगमीस तनखियास मुकासा दिल्हा आहे तरी तुह्मी किलेमजकुरासी रुजू होऊन मौजेमजकूरचा मुकासबाब देखील बाबतीचा ऐवज किलेमजकुराकडे वसूल देणे मौजे मजकूरी किले सज्जनगडकरी याची खासगत सेते असतील त्याचा ऐवज सालमजकूरनतर सज्जनगडकरी याकडे देणे वरकड ऐवज किले व्याघ्रगडाकडे देत जाणे जाणिजे लेखनालंकार
तेरीख १२ रजमान
सु॥ अशर व मया अलफ
रुजू
बार सूद बार रुजु सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४३५ ]
श्री शके १७०४ अधिक ज्येष्ठ वद्य ३०
पौ छ १२ माहे मोहरम ऊर्फ मार्गेश्वर शुद्ध १४
मातुश्री बाईसाहेब व मातुश्री काकीसाहेबास सां। नमस्कार. श्रीमंत सौसंपन्न वज्रचुडेमंडित मातुश्री काकूबाईसाहेबाचे सेवेसी सां। नमस्कार.
श्रीमंत राजश्री दादा साहेब स्वामीचे सेवेसीः-
आज्ञांकित सेवक भवानीशंकर माहादेव कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ २९ मा। जमादिलाखर मु॥ दिल्ली यथास्थित जाणोन स्वानंदलेखनीं संतोषविलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाले. पत्रीं सेवकाचा सांभाळ न जाला. तेणेंकरून चिंता लागली आहे. ते श्री जाणें ! त्यास, हमेशा श्रीमंत तात्यासाहेबास पत्र येतच आहे. त्या सदैव सेवकाची विस्मृत्य न पडतां सांभाळ करावा. वरकड, इकडील वर्तमान श्रीमंत यजमान स्वामीचे पत्रावरून साकल्य ध्यानास येईल. देशी येण्याचा प्रकार प्रस्तुत चातुर्माश्य दिल्लींतच राहणें जालें. कारण श्रीमंत अन्यासाहेब केवल लहान. विजयादशमी जालियानंतर निघणें होईल. सेवेसी श्रृत होय. जे समयीं काल्पीहून दिल्लीस आलों ते समयीं हा निश्चय होता कीं जेष्ट मासीं घरास जाऊं. अन्नोदक या स्थलींचा तो कैसा सुटतो ? ऋणानुबंध प्रमाण. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४३४ ]
श्री शके १७०४ वैशाख वद्य ३.
श्री
राजा शाहु नरपती
हर्षनिधान माधव-
राव नारायण
मुख्य प्रधान
दस्तक सरकार राजश्री पंत प्रधान ता। कमाविसदारान् व चौकीदारान् व बाजेलोकान् व मोकदमान् व नावाडे व ठोकरेकरी, सु॥ इसन्ने समानीन मया व अलफ. सरकारचे वकील पुरुषोत्तम महादेव हिंगणे याजकडील वस्तभाव, बैलगाड्या, व उंटें तटें, व डोल्या, व कुणबिणी, व घोडी माणसें, वगैरे सरंजाम भार बरदारी वगैरे दिल्लीहून पुण्यास येत असे. तरी मार्गी कोणेविसीं मुजाहिम न होणें. रात्रीस चौकी पाहारा करीत जाणें. नदीनालेपार करणें. जाणिजे. छ १६ जमादिलावल.
आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४३३ ]
श्रीगणराज. शके १७०० आश्विन वद्य ७
नकल
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री वासुदेव गंगाधर कमाविसदार उरई वगैरे गांव प्रा। कालपी स्वामीचे सेवेसीः--
सेवक पुरुषोत्तम महादेव सा। नमस्कार विनंति उपर येथील कुशल जाणोन स्वकुषल लेखन करणें. यानंतर तिलोकचंद मुलतानचंद यांजपासून उजनीत चिरंजीव राजश्री देवराव महादेव यांनी घेतले रुपये १००० अंकी एक हजार रुपये देऊन हे चिठीं तुमचेवर केली असे. तर चिठी पांवलियावर एका महिन्यानीं रुपये देऊन भरपाई करून देणें. शाहजोग रुपये देणें पत्र दर्शनी उत्तर पाठवावें. रुपये हुंडी चलनी देणें. विलंब नकरणें. रा। छ २१ रमजान, सु॥ तिसा सबैन मया व अलफ. * संवत १८३५. शके १७००. हे विनंति. हस्ताक्षर देवराव महादेव मु॥ उजेन.
चिरंजीव राजश्री खंडो शिवराम यासी आशिर्वाद. लि॥ परिसोन, पत्र दर्शनीं साहुकाराची निशा करून, उत्तर पाठवणें. विलंब न करणें. हे आशिर्वाद.
सदरहू हजार रुपयांची चिठी तिलोत्तमचंद याकडोन रुपये घेतले नाहीत. चिठींत मात्र लिहिलें. तेथें पावलियाबा। घ्यावेसा करार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४३२ ]
श्री
शके १६९५.
बारनिशीकारकिर्दीतील:-
१ माधवराव बल्लाळ यांचे बुद्धिकौशल्याची तारीफ शाहाणपणाची त्याविषयीं इतिहास गोष्टी.
१ राजकारणास मुख्यत्वें बातमी प्राधान्य. त्याविषयीं रावसाहेब पेशवे बहुत हुशार. मोठेमोठे व लहान जागा व अधिकारपरत्वें पुण्यांत व देशविदेशी संस्थानिकांजवळ बातमी दिवसरात्रीस जो व्यापार व्यवहार जो करील तो रावसाहेबांस येऊन बातमीदारांनीं श्रुत करावें. विदेशीं वकिलास 'कळवावें. असें असतां, हैदराबादेस मोंगलाजवळ हजारों रु॥ जवळ खिजमतगार जिलबी व मुदबखे वगैरे लहानथोरांस वर्षासनें नेमणूक चालत होती त्यांत मुदबख्यास चवदा रु॥ दरमहा श्रीमंतांकडून चालत होता. तेव्हां एकेसमईं कारभारी यांणी श्रीमंतांस विनंति केली कीं, चोपदार, भालदार, खिदमतगार, कुणाबिणी वगैरे यांस नेमणुकी व आणखी लोकांस आहेत त्या कारणपरत्वें, परंतु, मुदबल्यास नेमणूक व्यर्थ आहे. मुदबख्याचें काम देण्यासारखें नाहीं. ही नेमणूक काढतों. त्यासमई रावसाहेबीं उत्तर केलें कीं, पहिल्यापासून चालत आलें, काम तर नाहीं खरें, परंतु, जो पैसा खाईल आणि चाकरी न करील तो इतबारी. ह्मणून त्याचे धण्यांनी बाळगला. आपण त्यास देणें दिल्हें तें उपयोगावांचून दिसलें. त्यास, तो सुमनुष्य आहे, तरी तो चीज करील ; न करील तरी, हजारों रुपये खर्च होतात, त्यांत त्याचें देणें होतें, ह्मणून त्याचें मना करूं नये. चांगला आहे, तरी एखादे समयीं उपयोग करील. असें बोलल्यावरून नेमणूक चालविली. पुढें एके दिवशीं नवाबसाहेब आणि त्याचे खानगी व कारभारी जेवीत बसले. त्यावेळेस नवाबाचे मुखांतून वाक्यें निघालीं की, राघोबादादा मर्द माणूस होता, त्याजकडे पेशवाई न देतां माधवरायास पेशवाई दिल्ही ; आतां राघोबाचें मन उदास असेल ; अशांत आपण चढाई केली तरी आपले फते होईल, हें जाणून कारभारी यांणीही संमत दिल्हें. तेव्हां सामान सरंजाम तयारी करवा, ह्मणून सांगितलें. त्यांत परकी माणूस बातमी पोंहोचवण्यासारखें याचे बातमीदारांत मुदबख्याशिवाय दुसरें कोण्ही नहुतें. मुदबख्यांनी ऐकून वकिलास जाला मजकूर कळविला. त्या वकिलांनी पुण्यास श्रीमंतांस लिहिलें. श्रीमंतांनी कारभारियास विचारिलें:-- मोंगल चढाई करून येणार, त्यापेक्षां आपणच तयारी करावी, डेरे द्यावेत. ऐसे बोलिले आणि गुलटेंकडीवरी डेरे दिल्हे. लोकांस ताकीद होऊन खाशासुधां डेरेदाखल सुमुहूर्ते जाहाले: हें वर्तमान मोगलास कळलें. तेव्हां त्यांणीं विचार केला की, या समयीं आपण स्वारी केली तरी ते अगोधर हुशार जाले; त्यापेक्षां या समयीं आपली फत्ते नाहीं ; याकरितां सलुख करावा. जाणून वकिलास लेहून पाठवून तहाचें बोलणें घातलें. त्यांत नवीन चवदा लक्ष रुपये दरसाल देत जावे असें ठरविलें, आणि तीन माहाल दीड लाख रुपयेचे श्रीमंतांस दिल्हे. ते घेतल्यावरी कारभारियास रावसाहेबांनी उत्तर दिल्हें की, मुदबख्यास व्यर्थ देहनगी ह्मणत होता; त्यांणीही चाकरी करून देणें दिल्हें; आपला दाम हकनाकचा होता. याकरितां बातमी चीज मोठी आहे; यास दोन रुपये खर्च जाले तरी चिंत्ता नाहीं; यांत सराफी करूं नये. त्यावरून कारभारी उगीच राहिले. ही गोष्ट शके १६८१ सन सितैन मया व अलफचे सालीं जाले.
१ रघुनाथराव सचीव यांची व माधवराव पेशवे यांची दोस्ती फार स्नेहाची होती. त्याजवळ हरवख्ताची बातमी असे. तेव्हां, एके दिवशीं रात्रीस रघुनाथराव सचीव स्त्रीपुरुष उभयतां निजले होते. त्या विलासांत माधराव पेशवे यांचे स्त्रीनीं, गौरीचें हळदकुंकू चैत्रमासीं जालें त्यांत, नथ घातली होती. ती फार चांगली वाटून पंतांसी बोलली कीं, तशी नथ मला करून द्या. पंतांनी कबूल केलें, तशी नथ करून देऊं. ती बातमी प्रातःकाळीं श्रीमंतांस समजली. श्रीमंतांनीं वांकेनिसास बोलावून सांगितले की, सचीवपंतांकडे जाऊन, आतां भोजनास यावें ह्मणून निमंत्रण करून, बोलावणें करून, लवकर समयास बोलवावें; व घरांत त्यांचे स्त्रीसही निमंत्रण करावें. त्याप्रमाणें बांकेनिसांनी आमंत्रण केलें. भोजनास पानें मांडली. पंत, श्रीमंत, सन्निध बसोन जेविले. विडे देतेसमयीं, घरांतील बायकांची जेवणें जालीं ; विडे दिल्हे; अशी बातमी आली. येतांच खासगीवाले यांस बोलावून सांगितले की, घरांतील नथ काल घातली ती व खण, व पैठणी लुगडें, पंताचे स्त्रीस देऊन घरास जातील तेव्हां निरोप देण्यास सांगा. आज्ञा. त्याप्रमाणें खासगीवाले यांणी केलें. गेल्याची बातमी श्रीमंतांस कळविली. श्रीमंतांनीं पंतांस विचारिलें, रात्रीं आपण नथ नवी करून देतों ह्मणून कबूल केलें; ती नथ करून दिल्ही कीं नाहीं ? पंत चकटले. पाहूं लागले. त्यासमयीं खूण सांगतांच पंतांनी श्रीमंतांस विचारिलें, ही बातमी कशी कळली ? तेव्हां श्रीमंतांनी उत्तर दिल्हें-बातमीदार सांगावा, ही रीत नाहीं. मग पंतांनी विचार करितां ध्यानांत आणिलें, विषय जाल्यावरी मशालजी यास हांक मारिली, त्याणी दिवा सारिला तेव्हां त्याणी सांगितलें. मनांत गांठ बांधिली. अशी बातमी श्रीमंत ठेवीत होते !
१ श्रीमंतांचा फार वाखा जाला. मरणोन्मुख. त्यासमयीं रावसाहेबी बातमीचे कागद वगैरे दस्तऐवजी कागद पाहून पुढें कारणीक, उपयोगी, नाश न होण्यासारिखे, ते ठेवून बाकीचे कागद घंगाळांत घालोन, खिजमतगारापासोन अक्षरें पुसवोन, लादा करून, टाकावा. याप्रमाणें करीत असतां, एके दिवशीं भोजनोत्तर दोन घटिका कारभार करून, निजावयास गेले ह्मणजे कचेरी बरखास व्हावी. त्यासमयीं हा कारभार नित्य करीत असावा. असें करितां एके दिवशीं सखारामबापू कारभारी, त्यांजला कांहीं कामाचें विचारावयाचें प्रयोजन लागलें. ह्मणून, श्रीमंतांकडे आले. तों कोण्ही परवानगीशिवाय येऊ नये, अशी बंदी होती. त्यांत हे कारभारी, यास माणसांनी मना कसें करावें ? ह्मणुन न बोलतां येऊं दिल्हें. पुढे खाशाजवळीं जाण्याचे दारावरी पडदा होता तो उचलावयास लागतांच, खिजमतगारांनी सांगितलें, मनाई आहे ; कानावरी घालूंद्या. बोलोन आंत खिजमतगारास कळविलें. श्रीमंतांनी पडदा उचकटतां सखारामबापूस पाहिलें. येऊ द्या बोलले. बापू गेले. बैसले. ते कागद भिजवितात पाहून, ते कागद कांहीं पाहू लागले. दस्तऐवजी कागद असूं द्यावे, बोलले. त्यावरून श्रीमंतांनी सांगितले, जे दौलतीचे उपयोगी ते ठेवितों ; वरकड, मनुष्याचा नाश होण्यासारखे आहेत ते बुडवितों. तेव्हां, सखारामबापू बोलले, असे फितुरिकयाचे दस्तऐवज उपयोगी ते राखावेत. तें ऐकून, सखारामबापूचे कागद विठ्ठल सुंदरास व विठ्ठल सुंदर याचे कागद सखाराम बापूस आले गेले, --- राघोबादादाप्रकर्णी,-- ते कागद सखारामबापूपुढें टाकिले. ते पाहतांच बापू सर्द जाहाले. हें पाहून रावसाहेबांनी उत्तर केलें कीं, बापू ! हें राज्य आहे; तेव्हां मी असे अपराध्यांचे अपराध पोटांत ठेवून काम घेतलें नाहीं, आणि असे गुन्हे कां केले ? ह्मणून विचारिलें नाहीं. मी मरणार ; हे कागद मागें राहून त्या लोकांची घरें बुडणार ; मनुष्य तुटलें मग राज्य कशाचें ? याकरितां मनुष्य ज्या दौलतींत, तें राज्य ; असें समजून, हे कागद सारे बुडवितों, बोलले. सखारामबापू उगेंच राहिले. याप्रों। केलें. अशी बातमी रावसाहेबांची ! आणि दिल माठाची पुरुष होता. पुढें मृत्यु पावल्यावरी, सखाराम, पुरंदरे याचे घरचे शागीर्द, परंतु शहाणपणामुळें दादासाहेबीं मागून घेतले, कारभारी केले. आपणास वाढविले ह्मणून दादासाहेबांची ममता असतां, रमाबाई गरुदर नानास सल्ला देऊन, पुरंदरे यास सांगून, पुरंदर नानाचे स्वाधीन करवून, गर्मी राज्य पुढें चालविलें, असे कामदार नेकदार वागले, ह्मणून राज्य चाललें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४३१ ]
श्री शके १६९१ भाद्रपद शुद्ध ७.
श्री
राजाराम नरपति
हर्षनिधान माधव-
राव बल्लाळ मुख्य
प्रधान
दस्तक सरकार राजश्री पंतप्रधान ता। का।दारान् व चौकीदारान् व रहदारान् व मौकदमान् व नावाडे व ठोकारवाले मा।
सु॥ सबैन मया व अलफ. राजश्री देवराव महादेव यास नवाब सुज्या अतदौला याजकडे पाठविले आहेत. बा। घोडीं, पालक्या, माणसें, उंटें वगैरे सरंजाम आहे. त्यास, मार्गी मुजाहिम न होणें, जेथें राहतील तेथें चौकीपाहरा करून बराबर बदरका देऊन आपली हद्द पार करून देणें. जाणिजे. छ ६ जमादिलावल. आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४३० ]
श्री शके १६९० मार्गशीर्ष वद्य १२
श्रीमंत राजश्री पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः--
विनंति सेवक गिरमाजी मकुंद नि॥ देवराव महादेव हिंगणे सां। नमस्कार विज्ञापना ऐसीजे. पा। रोशणगांव येथील हिशोब दप्तरी विल्हेस लाविला. त्याची सरकारांत जमीदारांचे दसखतानसी कागद तलब केले. बितपासील :-
रु २ जमेचीं पत्रकें रु १ पायमाली जाली दिधला
दिधली दुसाला. त्याची मखलसी शंक-
रु १ वासिलात दिधली राजी केशव यांणी करून
मानून अमिलाची. दिल्ही त्याचा हिशेब.
रु २ जाब रसद भरली २ शिबंदीचीं कबजें
दुसाला. दुसाला.
२ महाल मजकूरची नेम- १ तोफखान्याकडे बैल दिल्हे
णूक दुसाला. त्याचे कबज
१ वरात शंकराजी केशव १ सरकारची सनद
याची रु १०० ------
५
--------
८
-------
१३
सदरहू तेरा कागद आपण अखेर सालीं दप्तरी पावते करूं. हे विज्ञापना. याखेरीज तखेजाबता आणून देऊं. मिति मार्गेश्वर वद्य, १२, सके १६९०, सर्वधारी नाम संवतछरे. बहुत काय लिहिणें. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४२९ ]
श्री नकल शके १६८९ श्रावण शुद्ध ९.
( शिक्का )
राजश्री कमाविसदार, वर्तमान व भावी, पा। हवेली उज्यन
गोसावी यासीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
केदारजी सिंदे दंडवत. सु॥ समान सितैन मया व अलफ. श्री वास्तव्य क्षेत्र उजन येथील पूजेचें साहित्य बेलफुलें वगैरे साहित्याबद्दल बारमाही नेमणुक रु।॥.
१२५० पेशजी करार करून दिल्हे
५५० हाली जाजती
---------
१८००
अठरासे रु॥ सालीना करार करून दिल्हे असेत. तरी, श्रीची पूजा वो। रामभट बिन सुभाभट जाजालसप्त गोदावरीकर यांचे हातून पूजेचें कामकाज घेऊन, सदर नेमणूक पा। मजकूरचे पंचोत्र्याचे ऐवजी दरमाहा दीडसे रु॥ देत जाणें. दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणें. या पत्राची प्रत घेऊन अस्सल पत्र भोगवटियासी परतोन देणे. जाणिजे छ ७ रा।लावल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति
( मोर्तब. )
बार.