[ ५२३ ]
श्री.
राजश्री दुरगाजी शिंदे मु॥ रेवदडे यांसी पत्र कीं, राजश्री मानाजी अंगरे वजारतमाब दर्शनास आले होते. सर्व प्रकारें मशारनिले पदरीं आहेत. यांच्या ठायीं दुसरा विचार नाही. तुह्मीं यांचे तालुकेयांत हरएकविसीं कजिया कथळा, व रयेतीस उपसर्ग एकंदर करित न जाणें. व आगर चेऊळ येथें रयेतीस मानिलेनें कौलपत्र देऊन, इजारा राजश्री कृष्णाजी मोरेश्वर कोलटकर यासी दिल्हा आहे. तेथील आबादानी व वसाहात मशारनिले कोलटकर कौलाप्रो करितात. तेथें रेवदंडीकर
सावकार ज्यास अनकूळ पडेल तो जलमार्गे उदीमव्यापार करावयाची आमदरफ्त करितील. ते सुदामत फिरंगियास मइबात आली होती, त्याप्रों। करूं द्यावी. जलमार्गास अवरोध न करावा. व जंजिरे कुलाबा खांदेरी देखील मानिलेकडील चाकरमाने चेऊलखाडींतून फाटे, लाकूड, शाकार, दाणा गल्ला आणितात. त्यास जकात सुदामतापासून घेतली नाही, आणि सालमजकुरी रेवदंडियांत काजिया करितां, ह्मणून विदित जाहालें. तरी, चेऊलास सावकारी आमदरफ्तीस व चाकरमानेयासी जकातीचा उपद्रव नवीन व्हावा ऐसें नाहीं. हेविशींची हकीकत सविस्तर हुजुर लेहून पाठविणें. मनास आणोन आज्ञा केली जाईल.