[ ५१७ ]
श्री.
राजश्री देशमुख व मोकदम का। सासवड गोसावी यासीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। अंबाजीं त्रिंबक देशपांडे कसबे मजकुर आशीर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाले. त्यावरून राजश्री पंत प्रधान यांस पत्र पाठविलें आहे; तें वाचून, लाखोटा करून पुणियास पाठवून देणें. नाना रोखा देतील. यानंतर, चिरंजीव राजश्री माहादेवास व धोंड्यास पूर्वीच आह्मी पत्र लेहून पाठविलें की, तुह्मी दिवाणांत न जावें. कोण जातील ते मुखरूप जाऊत. दिवाण आपले कोण्ही ह्मणावेसे नाहीं. पहिलें आपल्यास टक्कल पडलें तें अझूण वारले नाही. कोण जातील ते सुखरूप जाऊत. तुह्मी आह्मांस बोलाविलें तरी राजश्री स्वामी आह्मांस निरोप देत नाहींत. याकरितां यावयास अनकूल पडत नाहीं. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.