लेखांक ३०२
श्रीशंकर
करीणा जेधे देशमुख ता। रोहिडखोरे सु॥ खमस +++ व अलफ करीणा लिहिला जे खेमजी नाईक व भानजी नाईक जेथे आपले वडील बेदरी पातशाहाजवळी घे नाइकी करून होते त्यास खेलोजी नाईक पातशाहाजवळी राहिला आणि भानजी नाईक आपले वडिल बेदरीहून निघोन नेरास आले नेरीहून खिडिनजीक येऊन राहिले त्यास ता। मजकुरी अगदी जगल खराब होता जगल होते याकरिता कन्हेरीचे खिडीतून निघोन भानजी नाईक येऊन उत्रोलीस बाल प्रभु व बाबाजी प्रभु देसपाडे होते त्यास भेटोन राहिले खोपडे पसरणीहून चारणीस पळसोसीस येऊन राहिले होते माहालीची वसाहती जाली माहाली कोण्ही पूर्वीचा वतनदार देसमुख नव्हता त्यास आपले वडिल भानजी नाईक पातशाहाजवळी जाऊन माहालीचा करीना जाहीर केला त्यावरी पातशाहानी मनात आणून वतनदार कोण्ही नव्हता याकरिता भानजी नाइकास देसमुखी देऊन परवाना करून दिल्हा तो परवाना घेऊन सिरवली ठाणे होते तेथे दखल केला तेथून उत्रोलीस येत होते त्यास मार्गी गाडेखिडीस खोपडियानी वाद धरून भानजी नाइकास दगा केला पाचजण मारिले आणि परवाना नेऊन वीगच्या डोहात बुडविला उत्रोलीस गुरढोरे माणस वस्तभाव होती ते खोपडियानी लुटली मुलेमाणसे उत्रोलीहून पळोन मौजे वागणी ता। गुजणमावळ येथे गेली त्यास ते जागा राहावयास अनकुल न पडे याकरिता तेथून निघोन धावडीबदरीस जाऊन राहिले त्यास भानजी नाइकाचे पुत्र कान्होजी नाइक लाहान होते थोर जालियावर बाराजण लोक व कान्होजी जेधे ठेऊन जोगटेभीस आले त्यास खोपडियाचे वर्हाड मौजे करनवडे येथे होत होते तेथे जाऊन मारा केला त्यावरी तेथून निघोन मागती धावडीबदरीस गेले त्यावरी हे वर्तमान दिवाणात दाखल जाहले दिवाणाने व गोताने आपले वडील कान्होजी नाईक यास व खोपडियास जमा केले त्यास सिरवलीच्या वडाखाले दिवाण व गोत बोलिले जे पातशाहानी जेधियास देसमुखी दिल्ही हे गोष्टी परंतु खोपडियानी जेध्याचा मारा केला व जेध्यानी खोपडियाचे वर्हाड मारिले त्यामुळे खून दुतर्फा जाले आहेत याकरिता देसमुखी दो जागा वाटावी ऐसा निर्वाह करून दोनी तर्फाच्या दोनी वाटण्या करून चिठिया लेहून श्री देव
मौजे अंबवडे येथे टाकिल्या त्यास वरले तर्फेची चिठी जेध्याच्या हातास आली उत्रौलि तर्फेची चिठी खोपडियाचे हातास आली वाटणी जालिया त्यापासून कान्होजी नाइकान देसमुखी केली त्याचे पोटी नाइकजी नाईक जाले त्याणे देसमुखी केली त्याचा सर्जाराऊ व चापजी जेधे व नाइकजी जेधे व रायाजी जेधे व संभाजी जेधे ऐसे साजण पुत्र जाले आपले वडील सर्जाराऊ याणी देसमुखी केली आपण हि करीता आहा देसमुखीचा करीणा या जातीचा आहे वतनाचा करीणा राजश्री थोरले कैलासवासी स्वामी याणी पूर्वी च मनास आणून खोपडियाआधी पान आपले आजे कान्होजी जेधे यास दिल्हे आपले बाप सर्जाराऊ जेधे यास हि पाने आधी दिल्ही आहेत खोपडियाआधी पाने आपले वडिली घेतली आहेत ये जातीचा करीणा पानाचा करीणा तरी आपले वडिल आधी पान घेत आले आहेत आपले आजे कान्होजी जेधे स्वारानसी माहाराज साहेबापासी चाकरी करीत होते ते समई राजश्री छपिति कैलासवासी स्वामीस माहाराजानी पुण्यास ठेविले त्याजवळी आपले आले कान्होजी नाइक स्वारानसी राहिले त्यावरि राजश्री दादाजी कोडदेऊ सिवापुरास आले ते समई बारा मावळामधे कृष्णाजी नाइक बादल देसमुख ता। हिरडसमावळ दाईत घेत होते त्यास कर आपले वडिल देत होते त्याणी दाईत दिले नाही दादाजी कोडदेऊ कृष्णाजी बादल यावरी गेले ते समई कृष्णाजी बादलाने स्वारावरी चालोन घेतले स्वार पिटून काढिले घोडियाच्या दाड्या तोडिल्या दादाजी कोडदेऊ नामोहर होऊन सिवापुरास आलियावरी कान्होजी नाइकास बोलिले की तुह्मी कृष्णाजी नाइकास भेटीस घेऊन येणे तुह्मी हे गोष्टी मनावर धरिता तेव्हा कृष्णाजी नाईक हि आणिता आणि बारा मावळेचे देसमुख काही आले आहेत काही राहिले आहेत ते हि भेटीस येतात ह्मणौन कितेक गोष्टी बोलिले त्यावरि कान्होजी नाइक कारीस आले तेथून कृष्णाजी बादल यास च्यार गोष्टी सागोन पाठविल्या त्यावरून कृष्णाजी नाईक भेटीस सिवापुरावरी आले त्यावरी अगदी देसमुख भेटले त्यावरी कुल मावळेलोक जमाव करून तीन हजार लोक खळदबेलसर येथे मैदानास जुझावयास पाठविले ते समई मोगलाने चालोन घेतले मावळच्या लोकानी शर्ति केली मोगल मारून लाविला त्यामधे आपले बाप बाजी नाईक लहान होते त्यानी निशाणाचा भाला घेऊन जमावाबरोबर गेले तरवारेची शर्ती केली राजश्री छत्रपतिस्वामीनी मेहेरबान होऊन आपल्या बापास सर्जाराई दिल्हे ते समई मोगलाकडे बबई खोपडी पहिली च तिकडे गेली होती आपणाकडील लोक रणामधे जमखी होन राहिले होते ते दाखऊन त्याच्या गर्दना मारविल्या त्यावरी अगदी मावळे जमा जाले राज्य वृध्दीते होत चालिले त्यावर अबलजखान वाईस राजश्री छत्रपतिस्वामी कैलासवासीवरी चालोन आले ते समई खडोजी खोपडे पारखे होऊन अबजलखानास भेटले आणि राजश्री स्वामीस धरून देतो ह्मणऊन कबुलाती केली त्यावरी कान्होजी नाईक आपले आजे याणी आपली माणसे पळविली ती तळेगावी नेऊन ठेविली आणि आपण व सर्जाराऊ व चापजी नाईक व नाईकजी नाईक राजश्री स्वामीचे भेटीस गेले त्यास राजश्री स्वामी बोलिले की खंडोजी खोपडे अबजलखानास भेटले
(अपूर्ण)