Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ३१

श्री.
१६८७ कार्तिक वद्य १

रोखा राजश्री येशवंतराव दामोदर हवालदार तो सोंदळ ता कमावीस दार व मौजे कल्या......ती मार सुासीत सितैन मया व अलफ. भिकाजीराम कुळकर्णी मौजे मार यांनी माहालीं येऊन विनंति केली कीं, मौजे मारचें कुळकर्ण आपणाकडे चालत आहे त्यास, खेतीचा गांव खो बाजेगांव खोतीचे शिरस्तेप्रमाणे दुसाला कुळकर्ण मु। शिरोळी खंडी अज शेत पिकास एक कुडव व वजनी जिन्नस दर मणें अज पिकास एक शेरप्रमाणे पावत आलें असतां गुदस्तां सन खमसांत मौजे मारेच का दार यांणी आरमाराकडेस सुभां जाऊन गैरवांका समजाऊन ऐन जिन्नस दूर करून नक्त मुशाहिरा घेणें ह्मणोन सनद आणिली; त्याजवरून भिकाजीराम हुजूर जाऊन आपली पूर्व हकीकत सांगितल्यावरून बाजेगांवचें खोतीचे शिरस्त्याप्रमाणें शिरोळी दर खंडीस एक कुडव व वजनी जिनसास एक शेरप्रमाणें ऐन जिन्नस मुशाहिरा देत जाणें. अशी सुभा सनद सादर जाहाली. त्याजवरून [ व ] सुभांची माहाली जाहाल्यावरून हे रोखा सादर केला असे. तरी भोंवरगांव खोतीचे आहेत. त्यास शिरस्त्याप्रमाणें मार निल्हेचा मा ऐन जिन्नस देवणें, कजिया अंसल्यास माहालीं येणें जाणिजे. छ. १३ माहे जावल. मोर्तब सुद. बार.

पत्रांक ३०

श्री.
१६८७ आश्विन शुा ६

अखंडित-लक्ष्मी-आलंकृत राजमान्य स्त्रौ माधवराव बल्लाळ प्रधान आसीर्वाद व नमस्कार. सु। सीतैन मया व अलफ. वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दिक्षित ठकार यांनीं विदित केलें कीं किल्ले मजकुरीं सभासदीची असामी आपल्याकडे च्यारशें रुपयाची चाळीस वर्षें चालली. अलीकडे दोनशें रुपये करार करून दिल्हे. त्याप्रमाणें चालत असतां, वर्षासन रुपये १२ बारा किल्याकडोन पाक्त असोन, किल्ला राजश्री बाबूराव सदाशिव याजकडे जालियापासून सदरहू असामीचे रुपये व वर्षासन पावत नाहीं. ह्मणून ऐशास दरसाल दोनशे रुा पावत असतां हालीं न पावयास कारण काये ? तरी, याजउपरी सदरहू दोनसे रुपये सालाबाद पावत आलिया प्रो पाववीत जाणें व चाळीस वर्षें बारा रुपये वर्षासन पावत आल्याब मोजीब पाववीत जाणें, जाणिजे, छ ४ राखर, आज्ञाप्रमाण.
लेखन सीमा

पत्रांक २९

श्री.
१६८७ भाद्रप्रदं वद्य ९

राजश्री खंडेराव जाधव यांसीः-

अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो माधवराव बल्लाळ प्रधान आशिर्वाद सु। सितैन मया व मया व अलफ. बद्दल देणें राजश्री सदाशिव दिक्षित व पुत्र नारायण दिक्षित ठकार आश्रित हुजुरात सन ईदिदेसितैनले वेतन प्रमाणें बाकी राहिली. तेव्हां ३९०० तीन हजार नऊशें रुपये देविचे असते. तरी तुह्मांकडे पो गाडापूर वगैरे महाल येथील बाबतीचा ऐवज सालमजकूरचा येणें त्या मैा सदरहू एकूणचाळीस रुो पावते करून पावलि त्यांचे कबज घेणें. सदरहू ऐवज माघ-मासीं पावती करणें. जाणिजे छ २१ रबिलावल, बहुत काय लिहिणे ?

पत्रांक २८

श्री.
१६८७ आषाढ वद्य ३०

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन गोसावी यांसीः-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार, सुा सित सितैन मया व अलफ. तुमचे सरंजामांत महालः--
१ प्रो गुंजोटी.
१ प्रो सारबाड
१ प्रो घाट-नांदूर.
----

तीन महाल सरंजामांत आहेत. परंतु अमल बसला नाहीं. नबाब निजाम अल्लीखान याजकडील अमिलांनीं महाल दाबिले आहेत, याजकरितां नबाबास लिहिलें होतें. त्यावरून त्यांनी सदर्हू तीन महालचे अमिलांस तीन पत्रें व जमीदारांस तीन पत्रें, एकूण सहा पत्रें, पाठविलीं आहेत कीं, अमल सुरळीत देणें. ती तुह्मांकडे पाठविलीं आहेत. सनदा महालीं रवाना करून, ठाणीं आपले हवालीं करून घेऊन, महालचा बंदोबस्त करणें. सनदा पावल्याचा जाब पाठऊन देणें, जाणिजे. छ २८ मोहरम. बहुत काय लिहिणें ?

                                                                             लेखांक ३४०

                                                                                                                                                       शक १६००    

                                                                                             340


राजश्री अनाजी दतो ता। मा। देशमुख व देशकुळकर्णी व मोकदम पाटेल व रयानि ता। रोहिडखोरे सुभा मावळ सु॥ तिसा सबैन अलफ बादे कौलनामा तुह्मी हुजूर मो। लाखेवाडीस एउनु अ + + + की मुलुक वतनी साहेबाचा आ + त्यासि एक तह करून रयतचा दिलासा जमीनीस धारा देउनु कौल मरहमत केलि + + + + + उमेदवार होउनु सुख असौनु + + + कितेक वजा इलतिमास केली त्यावरून मनास आणूनु जमिनीस तह ऐसा दिल्हा असे सन समान पासून बटाई अर्धल + + + आहे त्यास साल गुदस्ता सन समानामधे विघावणी जमीन मोजून निमताना बर रकम तह करविला परत जमिनीची पो + + + एका साला जे जागा पाहाणी पुरवल्या ते जागा निमतान उतरले व एक जागा अवल जमीन असोन कस्टहीन जाहाले त्यास + + तर आले ऐसा एक तह रयतीची समजावीस होउनु आली नाही याकरिता तुमी धार्‍याविसी अर्ज केला की एक तह मुशकस करुनु + + + दिला पाहिजे ह्मणउनु त्यावरून तुमच + + ते एक तह केला आहे की साल मजकुरी तरी + + + होउनु आले एक महिना अखेर उरला + + + पेस्तर सन सबैना कारणे तह धारियाचा + + + + बैसउनु आकार करावा ऐसा तह केला अखेर कामास एक ब्राह्मण अगर परभु कारकून ठेवावा तर तो गैरआरामीब आणि त्याण काय करावे जमीनीचे पोट फोडी गावी पीक काय पिकले व काय धारा घ्यावा हे त्या गरिबास + + + + + या बदल तुमचे महालीचे मख्तीदार तुह्मी + + + टाकिला आहे तरी तुह्मी आजीपासून + + + आपले माहालीचा आकार करणे या बदल खासा देसमुख व देशकुलकर्णी व मोकदम व मोख्तसर + + + ४ च्यार रयता ऐस्या मेळउन एक विचाराने गावाचा गाव फिरोन ऐसे करणे की अमका गाव त्यासि रकम अमकी त्याची जमीम + अमकी त्यासि अवल दुम सीमच्या + + + ऐसी जाती निवडून त्यास पिकाचा अजमास करौनु कस्त केलियाने काय पिकल ते चौकस करुनु ते रकम त्या सेताचा सिरी बैसउनु त्यास + + न हि साक्षे पाहून आकार करणे ऐसे की एक ठिकाण मलिकअबरी रकम अमकी जाहाली त्यासि अवल दुम सीम च्याहरम त्या मध्ये खरीफ एक पीक अमकी रबी दुपीक अमकी ऐसी जात निवडून त्यामध्ये अमके बिघे अमका गला ऐसा पिकाचा आकार करून ठिकणचे ठिकाणात सात पाच कुळे असिली तरी + + असोत त्या सेता बरहुकुम गावखडणी + + + सारा तपा आकार करण त्यासि सारा तपा आकार तुह्मास करावयासि आजीपासून फुरसत पुढील साल पावेतो दिली आहे इतक्यामध्यै कुल तपा फिरौन गावाचे गाव व सेताचे सेत आकार करणे आणि आकार चौकसीने आह्मास लिहिणे आह्मी एउनु तुमचे तपामध्य तीन गाव ती प्रतीचे पाहुन एक + + डोगर एक खाचर तळे जमीन एक काळी + + तीचे सरदेस असले ऐसा गाव चौकस कारकुनीचा हुनरे पाहोन आणि चौघाच + + + समजाउनु खरे करून आणि ते हे + + तुमची बेरीज जो काय एकी गावीचा आकार + + असाल त्यावरी रुजू घालून जरी तु + + बजिनस सवाई दिडी दुणी बेरीज जाहाली तेणे प्रमाणे + + दिडी सवाई दुणी + + खरी जाली तरी तुह्मी त्याप्रमाणे उ + + करणे जरी + + कराल त्यास + रीस बराबरी जाली तरी बरी च गोस्ट + णे तह + नु तह करावया + तह करा + केला आहे एणे प्रमाणे + आह्मी कबूल + + करून कीर्दी माहाली + देणे कौल असे रा। + + + + पा। हुजूर

 

                                                                 340 1

पत्रांक २७

श्री.
१६८७ आषाढ वद्य ५

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन गोसावी यांसीः-

सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार सु। सित सितैन मया व अलफ. खासा स्वारी श्रावण वद्यांत बाहेर निघणार, तर तुह्मीं आपली एव्हां पासून तयारी करून भाद्रपद शुद्धांत येणें, जाणिजे, छ १८ मोहरम बहुत काय लिहिणें ?

पत्रांक २६

श्री.
१६८७ आषाढ वद्य २

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे गोसावी यासीः-

सेवक रघुनाथ बाजीरावे नमस्कार, सा सित सितैन मया व अलफ, खासा स्वारी श्रावण वद्य पक्षीं बाहेर निघणार. तर तुह्मीं आपले पथकाचे लोकांची तयारी ऐव्हांपासून करून, भाद्रपद शुद्धांत हुजूर येणें. विलंब न लावणें. जाणिजे. छ १५ मोहरम. बहुत काय लिहिणें ?

पत्रांक २५

( नकल )
१६८६ फाल्गुन वद्य ९

पो। चैत्र शुद्ध ९ रवीवारीं पावणेदोन प्रहरा
पत्र आलें, काशिदास अर्ध रुपया दिल्हा असे,
श्रीराम,
श्री वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसीं:-

चरणरज खंडोजी अरगडे दंडवत विनंति उपरी येथील क्षेम ता फाल्गुन वद्य ९ पावेतों श्रीमंत साहेबांचे सैन्यांत सुखरूप असों. आपली आज्ञा घेऊन स्वार जालों तों सैन्यांत पावलों. आपलीं पत्रें श्रीमंतास प्रविष्ट केलीं. परंतु कोणी आपले जीबसालांत कारभारी मन घालीनात! आपण नित्य घरोघर फिरोन राहिलों, लक्ष्मणपंती रा गुरुजी, माहादाजीपंत मुरबी केलेत. त्यांनी श्रीमंतांस समजाविलें कीं:-उभयतां राजश्री दीक्षित स्वामी आपले आपल्यांत कळा काढितात. गांव सुधा नांदूं देईनात. ह्मणोन सालमजकूरीं यांजकडून कमावीस दूर करून नारो बाबूजी भिडे यांजकडे कमावीस सांगितली आहे. ऐवज मौजे मजकूरचा वेदमूर्ती स्वामीकडे जमला आहे. पैकीं देवविला आहे, सांप्रत हें पत्र त्याचें आलें. उत्तर दिल्हें पाहिजे. याजवरून, उत्तर दिल्हें कीं, यांस पत्र लिहितों जे, हालीं नवा कमावीसदार केला आहे, तो उत्तमच आहे, ऐवज तुह्मांस पावतां करील. हे उत्तर रा रामाजी बाबा चिटणीस यांणी लिहिलें. तेथें सदाशीवपंत वैजनापुरकर कार्यामुळें आले होते. त्यांणीं पत्र पाहून आह्मांस ह्मणालें कीं, हें उत्तर काय कामाचें आहे ? अग, त्यांनीं राभाजीबाबास लक्ष्मणपंताचा स्तुतिवाद सविस्तर केला, तो पत्रीं लिहितां विस्तार आहे. त्याजवरून रामाजीवावांनीं एकान्तीं सविस्तर वर्तमान श्री राजश्री रावसाहेबांस विदित केलें. त्याजवरून आज्ञा जाली कीं, पाहिले प्रमाणें सनद करून देणें. हे परवानगी फडणिसांकडे पोंचविली. परंतु गुरुजीबावांनीं न मानितां टाळा दिल्हा! उपरांत रा सदाशिवपंत वैजनाथपुरकर व आपण रामाजीबावांस सांगून, दुसरी परवानगी मोरोबा फडणीस यांजला पावती केली. निदान गुरुजीनी रा मोरोबादादास सांगून रा नारो बाबाजी सुभेदार यांचे नांवें सनद देवविली. ते सनद तयार जाली. आपण घेऊन येत होतो. तों त्यास रा सदाशिवपंत पाळंदे यांनी बोलावून वर्तमान पुसलें. जालें वर्तमान यांस विदित केलें. ते ह्मणालेत कीं, मजलाहि याविषयीं पत्र आलें आहे, च्योर रोज राहतां नव्या सनदा भेंडाळियाच्या व नळकियाच्या करून देतों. याजकरितां गुंता जाला आहे. राजश्री बाबूजी नाईकहि आले आहेत. हैदरनाईकाचा जाबसाल लागला आहे. यामुळें गुंता दिसतो. सविस्तर वर्तमान सदाशिवपंत वैजनाथपुरकर यांनीं लिहिलें आहे. विदित होईल. आपले आशीर्वादेंकरून बोलबाला आहे. श्रुत होय हे विनंती.

                                                                             लेखांक ३३९

                                                                                                                                                       १५८४ आश्विन वद्य ११     

                                                                                                       274

                                                                                                                           

मसुरल अनाम बाजी सर्जाराऊ देसमुख ता। भोर ता। रोहिडखोरे प्रति राजश्री सिवाजी राजे सु॥ सलास सितैन अलफ अर्दास छ १५ सफर रा। छ १८ मि॥ पहुचोर हकीकत मालूम जाली लिहिले की साहेबाची रजा सादर जाली की दोघे भाऊ चाकरीस हुजूर येणे यावरी दोघे भाऊ स्वार होउनु येत होतो यावरी घरामध्ये दुखापती जाली आहे याबदल खोळवेला असो ह्मणौन लिहिले तरी वेथा हाली बरी जाली असेल याउपरी स्वार होउनु येणे बहुत दिवस राहिलीयावरी सबनीस जागा धरितील येणेकरून तुमचा काय सरफा आहे याउपरी सत्वर स्वार होउनु येणे व लिहिले की आपलीया माणसास जाबली राहावयासी जागा देणे ह्मणौन लिहिले तरी तुमचे हि राहाण्याचा जागा बरा च आहे जाबलीस माणसे न पाठवणे तुमचे च तरफेस कुबल जागा असेल तेथे ठेवणे व लिहिले की बालाजी गुजर गोविंदराऊ आटगावकर याकडे होता हाली साहेबाची चाकरी करावयाची उमेद धरितो ह्मणौन लि॥ तरी त्याची आह्मास चाकरीची गरज नाही मोर्तब सुद

मर्या
देय विरा
जते

रुजू सुरुनिवास
तेरीख २३ माहे सफर
सफर सुरु सुद

 

→शिवकालीन पत्रव्यवहार - लेखांक ३३९ - मूळ प्रत पाहण्यासाठी इथे क्लीक करा

पत्रांक २४

श्री.
१६८६ माघ वद्य १३ सह १४

वेदमूर्ती शास्त्रसंपन्न राजश्री दीक्षितबावा स्वामी महाराजांचे सेवेसी-

चरणरज खंडोजी अरगडे, मुा लष्कर तुंगभद्रा, नजीक हरहरेश्वर, साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल ता माघ वा १४ चतुर्दशी सोमवार पावेतों तुमचे आशिर्वादें करून सुखरूप असो. यानंतर तुह्मांपासून स्वार जालों. त्यास, तुह्मीं माणूस बराबर दिल्हें होतें तें फलटणपर्यंत आलें. तेथून न पुसतां माघारा गेला. तुह्मीं बाबूजीनाईकास व कृष्णराव बल्लाळ यांस पत्रे दिल्हीं होतीं. त्यास, बाबूजी नाईक बारामतीस गेले. त्याजपाशीं बारामतीस मीहि पत्रें घेऊन गेलों. त्यांस पत्र प्रविष्ट केलें. त्यांनीं उत्तर दिल्हें कीं, तुह्मीं पुढे चला, मीहि मागाऊन येतों. त्याजवरून, लष्करांत आलों. कृष्णा रावजीसही पत्र प्रविष्ट केलें व श्रीमंत साहेबांसही पत्र प्रविष्ट केलें. श्रीमंतांनीं चटणिसांस ताकीद केली कीं, दीक्षितांच्या नांवाच्या सनदा करून देणें. त्याजवरून सनदा करून आणिल्या. तारीख, विनंति, करावी इतकाचे गुंता होता. तों मोरोबा फडणवीस बोलिले कीं,
महाराज ! दिक्षितांत दोहीं चुलत्या पुतण्यांचें पटत नाहीं. त्यास, देणें तर विचारून द्यावें. बाबादीक्षितांचें तालुकियांत गांव यावा, ऐसाहि अर्थ नाहीं. यांजवरून, तारखा व विनंति पत्रावर जाहली नाहीं ! आबाजी माहादेव यांनीहि साहित्य केले. परंतु सखारामबापू व कृष्णराव बल्लाळ व फडणवीस वगैरे, लक्ष्मण अनंत यांच्या पल्यांत आहेत. त्यांचा पक्ष बहुत करितात. याजमुळें कामास अडथळा पडला आहे. इतकियावर स्वामीचे आशिर्वादेकरून प्रयत्नास चुकत नाहीं. पुढें जे वर्तमान होईल तें लिहून पाठवूं. कळावें. इकडील वर्तमान तरः श्रीमंत दादासाहेब आलियावर, हरपनाळीची व चित्रदुर्गची खंडणी घेऊन, हरिहर किल्ला घेतला. येथून हैदरनाईकाकडे चालिलें. पुढें हरवळीस निळकंठराव आठ दहा इजार फौज घेऊन व तोफखाना घेऊन पाठविले. हेहि मागाऊन जातात. हैदरनाईकाचे वकील आले आहेत कीं, खंडणी तीस लाख रुा घ्यावे आणि सल्ला करावा. त्यास, हे ऐकत नाहींत. जुंज करून आपला मुलूख घ्यावा आणि त्यानें आपल्या देशास जावें. याप्रमाणें वर्तमान आहे. बहुत काय लिहिणें? लोभ किजे, हे विज्ञापना. खर्चाची बहुत आबळ आहे. माहागाई बहुत आहे. सो माहादाजीनाचा द्वारें यांचा साष्टांग नमस्कार, विनंती की, लि। परिसोन माया असो द्यावी, व घरीं मुलांलेकरांचा समाचार घेत जावा. तुमच्या छायेखालीं आहेत. हे विनंती.

हें पत्र पहिलें लिहिलें होतें, परंतु कोण्ही माणूस वळखीचें तिकडें न आलें, ह्मणून आतां पाठविलें असे.