Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २३
श्री.
१६८६ कार्तिक वद्य ६
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रामचंद्र बसवंत स्वामी गोसावी यांसी-
पो माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. राजश्री दमाजी गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर याजकडे सरकारचा ऐवज येणें. त्याचे वसुलास हुजुरून राजश्री बाळाजी अनंत कारकून यांस पेशजीं पाठविलें होतें. त्याजबराबर गायकवाडाकडील ऐवजाचे वसूलबाकीचा झाडा पाठविला तो सरकारांत दाखल जाहाला. त्यांत सवा लाख रुपयांच्या हुंड्या राजश्री आबाजी नाईक कापरस व कृष्णाजी नाईक लाडू यांचे गुजारतीनें सरकारांत हुजूर भरणा जाला. ह्मणोन झाड्यांत वसुल घातले आहेत. त्यापैकीं परभारें वरातदारांस ऐवज पावला. वराता व कबजें येणें आहेत, रु। ५९२२५. बाकी ऐवज राहिला रुपये ६५७७५, पांसष्ट हजार सातशें पंचाहत्तर रुपये राहिले. हा ऐवज तुह्मांकडे खुद निसवत राहिला. त्यास, सरकारांत ऐवजाची निकड, हें पुर्ते तुह्मांस ठावळें असोन, गायकवाडापासोन ऐवज घेतला असतां, सरकारांत भरणा केला नाहीं, हें अपूर्व आहे ! असो ! हालीं हे पत्र तुह्मांस सादर केलें असे. तरी सदरहू पांसष्ट हजार सातशें पंचाहत्तर रुपये ज्या मित्तीने घेतले असतील, त्या मित्तीपासून व्याजसुद्धां ऐवजाच्या हुंड्या साहुकारी पुण्याच्या पत्रदर्शनीं राजश्री रामचंद्र माहादेव परांजपे व मार्तंड नाईक तासके यांस देऊन, पावल्याचें कबज घेऊन, हुजूर पाठवणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ ४ जमादिलावल, सु। खमस सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें? हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २२
श्री.
१६८६ कार्तिक शुा ५
अखांडतलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री रामचंद्र बसवंत गोसावी यांसीः-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सुा खंमस सितैन मया व अलफ. राजश्री दमाजी गायकवाड सेनाखासखेल-समशेरबहादर यांजवर राजश्री रामचंद्र महादेव परांजपे व मार्तंड नाईक तासके साहुकार यांस राजश्री मल्हारजी होळकर यांचे ऐंवजीं दोन लाख रुपयाची वरात रदकर्जाची पेशजीं दिल्ही आहे. त्यापो कृष्णाजी नाईक लाडू यांजवळ एक लाख रुपयांच्या मात्र वराता कमाविसदारांवर दिल्यात. बाकी लाख रुपये राहिले ते देत नाहीत. सरकारांत इजाफा ऐवज पावला आहे, म्हणोन नाईकमार्निले यांजवळ सांगितलें. त्याजवरून, इा सन सलास ता सन अर्बा दुसालां गाइकवाडाकडौल ऐवजाचे वसूलबाकीचा हिशेब अलाहिदा पाठविला आहे. त्या हिंसेबीं रु। ८७७६।- आठ हजार सातसें सवा शाहात्तर रु। आणा मात्र फाजील आहे. त्यास, सालाचे सालांत मुदतीप्रमाणें ऐवज यावा तो न आला. त्याचें व्याजहि होणें आहे. व सालमजकूरचा ऐवजहि येणें आहे. असें असोन, होळकराचे ऐवजास हिसका द्यावा, यास कारण काय ? हा ऐवज सालगुदस्तांच द्यावा, तो न दिला. होळकराकडील कारकून गंगाधर यशवंत याचे पुत्र व राऊजी माहादेव ऐसे तीर्थरुप राजश्री दादासाहेब यांजवळ आहेत. त्यास, दोन लाख रुपयांचा निर्गम झाल्याशिवाय निरोप होत नाहीं. सरकारांत ऐवजाची निकड. याजकरितां नाईक मारनिलेपासून ऐवज घेऊन वरात दिल्ही, त्यास ऐवज जरूर पावला पाहिजे, याजकरितां हें पत्र तुम्हांस सादर केलें असें. तरी पत्रदर्शनीं लाख रुपयांच्या पुण्याच्या हुंड्या नाईकमारनिलेस देऊन, पावल्याचें कबज घेऊन, हुजूर पाठवणें. फिरोन बोभाट हुजूर येऊं न देणें. जाणिजे, छ ३ जमादिलावल,* *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २१
॥ श्री ।।
१६८६ श्रावण शुद्ध ३
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव-दिक्षित स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. शहरास जावयाकरितां निजामअल्लीखान गंगा राक्षसभुवनांनजीक उतरुं लागले. कांहीं फौज व बाहिरबुणगे पलीकडे गेले. नावपिना व सरदार व विठ्ठलदास दाहापंधरा हजार फौजेनिशिं इकडे होते. त्याचें पारिपत्यास जाऊन, छ २९ मोहरमीं गाठ घातली. मातबर लढाई झाली. विठ्ठलदास व विनायक दास, गोपाळसिंग खंदारकर वगैरे ठार जाले. मुरादखान व रघुपतराव पिंगळे, मालोजि घोरपडे, बाबूराव जंगी वगैरे पाडाव जाले. त्यास, माणूस पाचसास हजार रणास आले. श्रीकृपेनें मोठी फत्ते जाली. तोफा, हत्ती सापडले. निजाम अल्लीखान पडतीरास होते. ते मध्यें रात्री कूच करून, तोफा व डेरे टाकून, पळोन गेले. संतोषाचें वर्तमान तुह्यांस कळावें, याजकरितां लिहिलें असे. र॥ छ ३ सफर, * बहुत काय लिहिणे १ हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २०
श्री
१६८६ चैत्र वद्य १४
राजश्री मोरोजी शिंदे नामजाद ता रत्नागिरी गोसावी यांसी:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो रघुनाथ बाजीराव आशिर्वाद. मु। आर्बा सितैन मया व अलफ. रा। अंताजी नारायण याजकडून पेठ बंदर ता हरचिरी येथून आंबसोल आणविलें असे. तरी, च्यार बेगारे देऊन, आंबसोल पोहोचाऊन देणें. जाणिजे, छ २८ सवाल, बहुत काय लिहिणें ?
सांब पंकजलीनस्य मुद्रेयमपराजिता ! बाजीरावतन्जस्य । रघुनाथस्य राजता
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९
श्री.
१६८६ चैत्र शुद्ध ३
राजश्री जानोजी भोंसले सेनासाहेबसुभा गोसावी यांसीः-
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माधवराव बल्लाळ प्रधान आशिर्वाद विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिलें पाहिजे, विशेष. प्रगणें सारबाड येथील जाहागिर सरंजाम सालमजकुरीं फौजेचे बेगमीस सरंजाम राजश्री नरसिंगराव जनार्दन यांजकडे दिले आहे. त्यास, त्यांचे ठाणें अद्यापि महालांत बसले नाहीं, ह्मणोन मानिल्हेनीं अवगत केलें. त्याजवरून पत्र लिहिलें असे. तरी, तुमची फौज ते प्रांतीं आली असेल. त्यास सांगून ठाणें सारबाडांत बसतें करावें. रा छ २ सवाल. बहुत काय लिहीणे? लोभ किजे, हे विनती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३३८
श्रीशंकर
.ll श्रीमत सकलगुणअलंकरणअखंडितलक्षमीअलंकृत राजमान्यराजश्री कान्होजी जेधे देशमुख तपे भोर किले रोहिडा प्रति राजश्री सिवाजीराजे जोहार येथील क्षेम जाणौनु स्वकीय कुशल लिहिणे तुह्मी पत्रिका पाठविली त्यावरुनु अभिप्राऊ कलो आला लि॥ की खान अलीशान खान अजम येही लिहिले आहे की जावलीवरी सुरु केले आहे तरी तुह्मी आपले जमेतीसी सीताब येणे ह्मणौनु लिहिले आहे तरी तुमचा व त्याचा पहिलेपासून घरोबा आहे गेले तरी पाहिजे आमा खासा अगर पुत्र पाठवावयाचे जाले तरी त्याचा बोलभाक बरवे रिती घेउनु मग जाणे दगा होये ऐसे न करणे एक भले माणूस दरम्यान देउनु मग जाणे तुमचे नजरेसी पडत असिले की खासा च जावे जरी तुमचे मन बार देत नसिले तरी कौल बोल घेउनु पुत्राबराबरी लोक देउनु पाठविजे हरयेक बाहाणा करुनु तुह्मी राहाणे दोन्ही गोस्टी तुह्मास लिहिल्या आहेती यात तुह्मी स्याहाणे असा बहुत लिहिणे नलगे
पो। छ २४ रजब
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १८
श्री
१६८५ फाल्गुन वद्य १३
राजश्री सर्वोत्तमपंत गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो माधराव शिंदे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. राजश्री नारायणजीनाइक सरपाटील, प्रांत साष्टी, यांस रुपये ५००० पांच हजार द्यावे, ह्मणोन छ ५ रंजबचें पत्र पाठविलें. त्यावरून पुणेंकर सावकाराचें कर्ज घेऊन दिल्हें. त्यास, हालीं गा चिंतो माहारुद्र पाठविले आहेत. यांसमागमें सदरहू रुो। पाठवावे, ह्मणेन लिहिलें. ऐशियास, आठंपधरा रोजीं नालबंदीचे काम चालीस लागलें म्हणजे ऐवजाची तर्तूद करून पाठवून देऊं. वरकड वर्वमान रा चितो माहारुद्र सांगतां कळेल. रा छ २६ रमजान, सुा अर्बा सितैन. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३३७
श्री
सकलगुणसौजेनीसीधु अखडितलक्षमीप्रसन राजमानी राजश्री कान्होजी नाईक देसाई ता। भोर ता। रोहिडा गोसावी यासि वेदाजी अनत विनति एथील क्षेम जाणौनु तुह्मी आपले क्षेम लिहिणे विशेखु तुह्मी एउनु आमची भेटी घेतली हजरती खानसाहेबासी एख्तरी धरिला आजीपासुनु तुमची आमची एखलासी जाली तुह्मी हरएकविसी आमचे कामास अतर पडो नेदणे आह्मापासुन हि कोणेविसी हरएक तुमचे कार्यास अंतर न पडे हा पूर्ण भरवसा असे पुढे जे कार्य प्रयोजन ते आह्मास लिहीत जाणे लिहिले सारिखे सरजाम होत जाईल कोणेविसी अनमान न धरणे तुमचा आमचा कौल इमान असे छ १३ माहे सफर सु॥ सलासीन अलफ फारसी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १७
श्रीशंकर.
१६८५ फाल्गुन वद्य ११.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री
बाळकृष्ण दीक्षित स्वामीचे सेवेसीः--
विद्यार्थी नारो कृष्ण जोशी कृतानेक नमस्कार विनंति येथील कुशल ता फाल्गुन वा ११ मुक्काम लष्कर नजीक मनोली जाणोन स्वकीय कुशल लि. हित जावें. विशेष. आपलीं एकदान पत्रें आलीं कीं, ऐवज घेऊन जावा.
आणि राजश्री धोंड जोशी यांसीं भाषण केलें. त्यांनी आझांस लिहिलें. त्यांत मजकूर त्यांनीं सुचविला कीं, तीर्थरूप राजश्री भाऊचें पत्र पाठविणें कीं, ऐवज देणें. ह्मणोन, त्यावरून, तीर्थरुपाचें पत्र पाठविलें आहे. पावेल. ऐवजाचा मजकुर तरी. श्रींत देविला असतां तरीं उतरून घेतों. हा मजकूर राजश्री जोशी यांनीं आपणांसी केला. आपण उत्तर केलें कीं, येते समयीं बरोबर आणिला. बरें ! उत्तम ! हालीं मशारानिल्हेचे आपलें भाषण जाहालें आहे, त्याप्रमाणें ऐवज पुणियांत उतरून द्यावा, सोनें व रुपें याचे दागीने आणिले असतील ते दागीने यादी बरहुकूम द्यावे, नख्तऐवज पुणीयांत उतरे तें करावें याजखेरीज चौकडा व आणखीं कांहीं मोतेंयाचे दागीने असल्यास, तेहीं त्यांचेच हवालीं करावें. राजकी वर्तमान तरी: हैदरनाइक बिदनूरची झाडी धरून बसला आहे. बाहेर निघत नाहीं. श्रीमंत मनोलीस लागले होते. आठ रोज ठाणे मांडले. हस्तगत करून धारवाडास जाणार. तो कांहीं यांसी सन्मुख येऊन भांडतां दिसत नाहीं. फौज यांजबराबर वीसपंचवीस हजार जमा जाहाली. मागाहून आणखी येत आहे. पुढें होईल तें लिहून पाठवूं. बहुत काय लिहिणे ? लोभ किजे. हे विनंति,
पौ. चैत्र वद्य ६ शनवार शके १६८६
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १६
श्री.
१६८५ पौष शु। १
राजमान्य राजश्री गणेश व अंताजी मल्हार दिा रामजी पवार गोसावी यांसीः-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सु। अर्बा सितैन मया व अलफ. राजश्री बाळाजी जनार्दन यांचे इमारतीचे रायवळ लांकडांचे गाडे घांटाखालून पुण्यास येत होते. ते तुह्मीं मौजे वडगांव येथे अटकाविले आहेत, ह्मणोन हुजूर विदित जाहलें. त्यावरोन लिहिलें असे, तरी, तुह्मीं मशारनिलेचे गाडे लांकडाचे अटकावले आहेत. ते व आणिही घांटाखालीं लांकडे तोडिलीं आहेत तीं दस्तकाप्रमाणें पुणियास आणितील. त्यांस आणूं देणे. अडथळा न करणें. जाणिजे. छ २९ जमादिलाखर. आज्ञा प्रमाण. लेखनसीमा.