पत्रांक ३१
श्री.
१६८७ कार्तिक वद्य १
रोखा राजश्री येशवंतराव दामोदर हवालदार तो सोंदळ ता कमावीस दार व मौजे कल्या......ती मार सुासीत सितैन मया व अलफ. भिकाजीराम कुळकर्णी मौजे मार यांनी माहालीं येऊन विनंति केली कीं, मौजे मारचें कुळकर्ण आपणाकडे चालत आहे त्यास, खेतीचा गांव खो बाजेगांव खोतीचे शिरस्तेप्रमाणे दुसाला कुळकर्ण मु। शिरोळी खंडी अज शेत पिकास एक कुडव व वजनी जिन्नस दर मणें अज पिकास एक शेरप्रमाणे पावत आलें असतां गुदस्तां सन खमसांत मौजे मारेच का दार यांणी आरमाराकडेस सुभां जाऊन गैरवांका समजाऊन ऐन जिन्नस दूर करून नक्त मुशाहिरा घेणें ह्मणोन सनद आणिली; त्याजवरून भिकाजीराम हुजूर जाऊन आपली पूर्व हकीकत सांगितल्यावरून बाजेगांवचें खोतीचे शिरस्त्याप्रमाणें शिरोळी दर खंडीस एक कुडव व वजनी जिनसास एक शेरप्रमाणें ऐन जिन्नस मुशाहिरा देत जाणें. अशी सुभा सनद सादर जाहाली. त्याजवरून [ व ] सुभांची माहाली जाहाल्यावरून हे रोखा सादर केला असे. तरी भोंवरगांव खोतीचे आहेत. त्यास शिरस्त्याप्रमाणें मार निल्हेचा मा ऐन जिन्नस देवणें, कजिया अंसल्यास माहालीं येणें जाणिजे. छ. १३ माहे जावल. मोर्तब सुद. बार.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)