Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ७३.
श्री.
१६९३ आश्विन शु॥ ५
(असल प्रा नकल.)
राजश्री रामचंद्र नाईक परांजपे व आबाजी नाईक काब्रस, सावकार पुणेकर, गोसावी यांसी:-
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य स्त्रो महादजी शिंदे दंडवत. सुा इसन्ने सबैस मया व अलफ. तुह्मांपासून पुणियांचे मुकामी सन समानांत व सन तिसांत व जवाहीर वगैरे घेतले त्याचा हिशेब छ १ साबान कार्तिक श्रु॥ २ सन मजकूर पो रुो
१००००० रामचंद्र काशी कादार प्रा अंतरवेद याजकडून घेतले. बाकी देणें राहिले ३१०८७ रुा आके (आंख) एकतीस हजार सत्यांशी रुा. यांसी व्याज दरमाहे दरसदे दर १ एकोत्रा प्रमाणें. कार्तिक श्रुा शके १६९३ खरनाम संवत्सरेपासून दिल्हे जाईल. जाणिजे. छ ४. माहे रजब. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ७२
श्री लक्ष्मीकांत.
१६९३ आश्विनशुद्ध ३
राजश्री गोसावी यांसः-
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्त्रो जानोजी भोंसलें सेनासाहेव सुभा सु। इसने सबैन मया व अलफ. पा आंबड हा माहाल राजश्री पंतप्रधान याकडून राजश्री तुकोजी होळकर यांसी आहे. तेथें नजर घांसदाणा घेऊ नये, ऐसा करार असे. मेजवानीचा फडशा राजश्री रामाजी बल्लाळ यांचे विद्यमानें नामपूरचे मुक्कामी हुजूर जाला आहे. तरीं सालमजकुरीं तुह्मीं थाल मजकुरास घांस दाणा वगैरे काडी इतका उपसर्ग न देणें. जाणिजे. छ २ माहे रजब. बहुत काय लिहिणें ? मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ७१
श्री ( नकल.)
१६९२ आश्विन शुद्ध १३.
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे गोसावी यासीः-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सुा इहिदे सबैन मया व अल्लफ, धरमहट्टीस बाबूराव अनंद राहून भवासगरी करितो, सेठाणें वगैरे ठाणीं त्यांणीं बळाविलीं तीं घेतलीं पाहिजेत, ह्मणोन राजश्री नारो बाबाजी याणी हुजूर लिहिलें. ऐसियास, मनोळीचें काम मातबर. तें घ्यावयाची 'आज्ञा तुह्मांकडे आहे. मनोळीस जातां सहजांत धरमहट्टी वगैरे ठाणीं जातां जातां सुटतील तर सोडवून जरीं दोन च्यार दिवस गुंता पडेसा असेल तरी आधीं मनोळीस जाऊन मनोळी घेऊन उपरान्त येतां धरमहट्टी वगैरे नारो बाबाजी सांगतील त्याप्रमाणे ठाणीं घेणे. जाणिजे, छ १२ जमादिलाखरे बहुत काय लिहिणें? लेखन सीमां.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ७०
श्री ( नकल )
१६९२ आश्विन शुद्ध ११
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे गोसावी यांसी:-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार, सुा इहिदे सबैन मया व अल्लफ, राजश्री भिवराव यशवंत तोफखानासुद्धां मनोळीस पाठविलें. तुझी हैदरखानाचे फौजेच्या तोंडातर ५०० पांचशें राऊत बंकापुराजवळ ठेऊन तह्मी व राजश्री शाहाजी भोंसले मनोळीस येऊन, मारनिले व तुह्मी एकत्र होऊन, मनोळी हस्तगत करणें ह्मणोन तुह्मांस पत्रें मुजरत जासुदाबरोबर पाठविलीं तीं पावलींच असतील. तिकडील बंदोबस्त करून, तुह्मीं मनोळीस यावयाचें केलेंच असेल नसेल तर करणें. भिंवराव यशवंत निरोप घेऊन येथून गेले. तुह्मीं जलद येऊन यांस सामील होणें. जाणिजे. छ १० जमादिलाखर. बहुत काय लिहिणें? लेखन सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६९
श्री ( नकल.)
१६९२ भाद्रपद वद्य ३०
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्यराजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे गोसावी यांसीः-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार सुा इहिदे सवैन मयावअल्लफ टिपू चैनगिरीस होता. तो श्रीरंगपट्टणच्या रानांत गेला. कांहीं पांच सातशें राऊत जडे अन्वटीकडे आले ह्मणोन बातमी आली. व जडे अन्वटीचे राऊतांचे तोंडावरी नबाबाचेहि राऊत व हशम गेलेच आहेत. तूर्त तिकडे विशेष गडबड नाहीं. तथापि तुह्मीं पांचशें राऊत त्या शहरावर बंकापूरसमीप ठेवणें, राजश्री भिवराव * यशवंत यांस तोफखान्यासहित मनोळीच्या पारपत्यास जावयाची आज्ञा केली असे. तर तुह्मी पांचशे राऊन बंकापुराकडे पाठवून बाकी जमावानिसी भिंवराव याजपाशीं येऊन, मनोळीचें ठाणें हस्तगत करणें. जाणिजे. छ २८ जमादिलोवल. बहुत काय लिहिणे? लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६८.
श्री ( नकल. )
१६९२ भाद्रपद शुद्ध १४
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे गोसावी यांसीः-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार, सुा इहिदे सवैन मया व अल्लफ. राजश्री जनार्दनराम यांचें हुजूर प्रयोजन आहे, तर मा निल्हे पथक सुद्धां पत्रदर्शनीं हुजूर पाठवून देणें. जाणिजे. छ १३ जमादिलावल. बहुत काय लिहिणे ? लेखन सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६७
श्री नकल
१६९२ भाद्रपद शुद्ध १३
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्यराजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे गोसावी यांसीः-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सुा इहिदे सबैन मया व अलफ. तुह्मी विनंतीपत्र छ ९ रविलारवरचें पाठविलें तें छ ११ जमादिलावलीं प्रविष्ट झालें. हैदरखान पट्टणासच आहे. टिपू हल्लीं होन्नुरावर दक्षणतीरीं आहे. अलीकडे उतरला. ऐशी बातमी सावनूरकरांची आली. त्यावरून आह्मी सर्वांनीं तयारी करून त्यास गांठावें ऐशी तजवीज तयारी केली. तों फिरून सावनूरकरांची बातमी आली कीं, दक्षिणतीरींच आहे. त्यास गांठावें फार सर्वांच्या चित्तांत आहे. गांठ पडिलियावर होणें तें होईल. सोंधे प्रांतीं धामघूम करावी तरी तिकडे पर्जन्य. त्याहिमध्यें धारवाडचे तालुकियाचीं सरकारचीं खेडीं व सोंधेकरांची खेडीं एकास एक लगतीं. एकाचे आश्रयानें एक आहे. तीं मारावीं न मारावीं येविसी आज्ञा असावी, ह्मणोन लिहिलें तें कळलें, ऐसीयास, हैदरखान व टिपूची बातमी लिहिली व टिपूस गांठावयाचा मजकूर, तर तो नंदी उतरून उत्तरतीरों आल्यास, तुह्मी पारपत्य करावें हें उचित. तुह्मीं, राजश्री शाहाजी भोंसले, व जनार्दनराम मातबर सरदार तिकडे असतां, कांहींच काभ न जाहालें तर कसें ? याउपर चांगली बातनी राखून त्यास नतीजा देणें. सोंधें प्रांताचे गांव मारावयाचा मजकूर लिहिला. तर हैदरनाईक पट्टणास आहे. टिपू तुंगभद्रापार चेनागिरीस आहे. तुह्मीं तिघे सरदार तीन चार हजार फौज आहे. सोंध्यांत त्यांची फौज नाहीं, असें असतां सोंध्याचे गांव मारावयाचा तुह्मांस विचार पडला. अपूर्व आहे ! आपले गांव राखून त्याचे गांव मारावे तर तारीफ, अत:पर तुह्मी लिहिलेप्रमाणेंच कराल. करावें. जाणिजे, छ, १२ जमादिलावल. वहुत काय लिहिणें? लेखनसीमा.

पत्रांक ६६.
श्री.
१६९२ श्रावण वद्य १४
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन गोसावी यांसी.
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार सुा इहिदे सबैन मया व अल्लफ, तुह्यीं विनंतीपत्र पाठविलें तें प्रविष्ट झालें. हैदरनाईकाकडे लोक चाकरीस व पुढें जाणार त्यांची चौकशी करीतच आहों, येविशीं तालुकदारांसहि आज्ञा करावी, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, तालुकदारांस पत्रें पाठविलीं आहेत. ते व तुह्मी मिळून चौकशी करणें. गेले असतील त्यांची घरे, कबिले, जप्त करणें. तिकडील वर्तमान वरचेवर लिहित जाणे. जाणिजे, छ २८ रबिलासर बहुत काय लिहिणें. लेखन सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६५.
श्री.
१६९२
सेवेसीं विज्ञापना. कोंकणचें वर्तमान तरी तुळाजी आंग-याचे लेक दोघाजण परांगदा होऊन सिहीगडास गेले होते. ते हालीं विजेदुर्गावर येणार ऐशी बातमी विजेदुर्गाहून आली आहे. विजेदुर्गाचे आरमाराशीं लढाई जाहली, ऐसेंहि बोलतात. त्याजपाशीं आरमारहि फार आहे. दाहा हजार फौज आहे. इंग्रज सामील आहे. व समागमें हैदरअल्लीचीहि फौज आहे. राजश्री विसाजीपंत सुभेदार काल एकादशीस रात्रीस मुहुर्तानें पुणेंयास गेले. राजश्री बाबुराव राजवाडे गांवाची फारच चौकशी करीत आहे ज्या गांवाची एकदां पाहाणी जाहली व चौकशी जाहली. त्या गांवची आतां चौकशी होत आहे. सेवेसी कळावें ह्मणोन लिहिलें आहे. राजश्री विसाजीपंत सुभेदार यांजपाशीं येथें हरएक कामकाज पुसिलें तरी ह्मणत कीं त्रिंबकपंतांस दूर करावें. मग पूर्ववत प्रों आबाचा आमचा घरोबा आहे त्याप्रों चालों. सेवेसी कळावें ह्मणोन लिा आहे. श्रुत होय हे विज्ञापना.