पत्रांक २९
श्री.
१६८७ भाद्रप्रदं वद्य ९
राजश्री खंडेराव जाधव यांसीः-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो माधवराव बल्लाळ प्रधान आशिर्वाद सु। सितैन मया व मया व अलफ. बद्दल देणें राजश्री सदाशिव दिक्षित व पुत्र नारायण दिक्षित ठकार आश्रित हुजुरात सन ईदिदेसितैनले वेतन प्रमाणें बाकी राहिली. तेव्हां ३९०० तीन हजार नऊशें रुपये देविचे असते. तरी तुह्मांकडे पो गाडापूर वगैरे महाल येथील बाबतीचा ऐवज सालमजकूरचा येणें त्या मैा सदरहू एकूणचाळीस रुो पावते करून पावलि त्यांचे कबज घेणें. सदरहू ऐवज माघ-मासीं पावती करणें. जाणिजे छ २१ रबिलावल, बहुत काय लिहिणे ?
