Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४१.
श्री
१६८८ भाद्रपद शुद्ध ५
सेवेसी गोविंद शिवराम सां नमस्कार विज्ञापना. आज्ञा घेऊन आलों. श्रीमंतांचें दर्शन जाहलें. बोलणें बहुत जाहलें. गुरुवारचा मुहूर्त वाईट आहे. दादासाहेबांचें घातनक्षत्र आहे. यास्तव बुधवारींच भेटी व्हाव्या, हा निश्चय ठरला. गंगा उतरून शें दोनशें राउतांनिशी येणार. वरकड कांहीं गुंता नाहीं. बेवसवास यावें. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४०.
श्री
१६८८ भाद्रपद शुद्ध ५
सेवेसी गोविंद शिवराम व चिंतो अनंत कृतानेक सा नमस्कार विज्ञापना.
स्वामीची आज्ञा घेऊन निघालों तो मंगळवारीं संध्याकाळीं श्रीमंतांजवळ आलों. सर्व वर्तमान निवेदन केलें. त्यास, गुरुवारीं भेटावयाचा मुहूर्त पाहिला होता तो निवेदन केला. त्यास, येथील मर्जी कीं बुधवारी संध्याकाळींच भेट जाहली पाहिजे. येथील पंच्यांगीं गुरुवारीं दिनक्षय आहे. रेवती नक्षत्र श्रीमंतांचे घात नक्षत्र आहे. यास्तव बुधवारींच भेटावें हाच निश्चय केला पाहिजे. संध्याकाळपर्यंत सुमारें सत्वर यावें. फौज बराबरील सारीच आणावी, अशी येथील मर्जी आहे. जर फौज मागें ठेविली, तरी फौजेची वाट न पाहतां बुधवारीं संध्याकाळींच यावें. हत्ती अंबारिया आणाव्या. से. वेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३९.
श्री सांब.
१६८४ भाद्रपद.
आशीर्वाद उपरी. आपणासी करार केल्यावरी त्यांत तफावत करावयाची नसतां, आपणांस विश्वास नसे. असो ! अतःपर तन्ही खातरजमा जाहली असेल. लाखोटीयावर मोर्तबें करून देववितों. दोन प्रहरीं रवाना करावे.* *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३८.
श्री.
१६८८ श्रावण शुद्ध ५
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूराव कोनेर गोसावी यासीः-
पो माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणे. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ठ जाहालें. व-हाडांतून येतां स्वामीचें दर्शन करून घरास यावें. त्यास मोंगलाचें सैन्य मध्यें होतें. यास्तव अनुकूल न पडलें-याचा अर्थ लिहिला तो सविस्तर कळला. घरीं गेली, उत्तम केलें ! तूर्त कांहीं नवीन प्रकार नाहीं. पुढे जसा प्रकार दृष्टीस पडेल तदनुरूप तुह्मांस लिहिले जाईल. जाणिजे, छ. ३ रबिलावल, सुा सबा सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३७
श्री.
१६८८ आषाढ वा ३
राजश्री आनंदराव धुळप गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माधव बल्लाळ प्रधान अशिर्वाद. सुरसन सबासितैन मया व अलफ. विठ्ठलराम कुळकर्णी मौजे केळवली ता सौंदळ यांणीं विदित केलें कीं, मौजे मजकूरची खोती कृष्णप्रभु देसाई, ता मजकूर यांजकडे आहे. त्यांणी गांवचीं भुतें आह्मांवर घातलीं. त्यामुळें आपला नाश बहुत जाहाला तेव्हां आनंदराव धुळप यांणीं त्याचें व आमचें वर्तमान मनास आणून, गांवकरी यांचे गुजारतीनें भुतें आपणावरी देसाई यांनी घातलीं हें खरें जाहालें ! त्याप्रमाणें भुतें वारा ( वया) विसीं देसाई यांणीं कतबा दिल्हा. परंतु मुदतीस वारलीं नाहीं ! आणि बाळाजी कृष्ण माईणकर यास देसाई यांणीं खोती सांगितली. त्याजवर मागती पडधळे बाळानें, भुतें देसाई यांचे शद्वें पडलीं. ऐसें निवडलें ! त्याप्रमाणें वारितों ह्मणून बाळाजी कृष्ण माईणकर यानें कबूल केलें. परंतु वारिलीं नाहीं ! आह्मांस भुतें उपद्रव करितात ! त्यास येविसींची आज्ञा करावी. ह्मणोन, त्याजवरून, तुह्मांस पत्र सादर केलें असे. तरी कृष्ण-प्रभु देसाई, बाळाजी कृष्ण यांस व त्याचे कजाचे कागद तुह्मांपाशीं असतील ते हुजूर पाठविणें हरदु वादियांचे वर्तमान मनास आणून ज्याकडे अपराध लागेल त्याचें पारिपत्य केलें जाईल. जाणिजे. छ १६ सफर, बहुत काय लिहिणें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३६.
श्री
१६८८ आषाढ शुद्ध ९
पो आषाढ वा १ शके १६८८ व्ययनाम संवत्सरे. श्रीमंत राजश्री बाबूराव साहेबांचे सेवेसीं:-
सेवक बयाजी बागडे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणीन स्वकीय लेखन आज्ञा करीत असावें. विशेष. तुमचे रु। आह्मांकडे आहेत. त्यांपैकीं रा विसाजीपंत गोळवलकर यांजवर चिठी रुा ७०० अक्षरीं सातशें, गंजी कोट-आरकोट, यांची चिठी राजश्री रामाजी गोविंद वल्हेकर यांणीं दिली आहे. सदर्हु चिठीचे रुा घेऊन पावलियाचें उत्तर पाठऊन दिल्हें पाहिजे. मिति शके १६८८ व्ययनाम संवत्सरे आषाढ शा ९. सदर्हु ऐवज आपण येथें अंताजीपंतनाना यांजजवळ देत होतां. एक महिना जाहाला. परंतु ते न घेत. याजकरितां तुह्मांकडे ऐवज पाठविला असे. तुमची बाकी राहिली तेहि पंधरा दिवसां घेऊन येतों. बहुत काय लिहिणें ? कृपा करीत असावें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३५.
श्री.
१६८८ वैशाख वद्य ७
तीर्थस्वरूप राजश्री गणेशभट दादा वडिलांचे सेवेशीं:-
अपत्यें दामोदरानें चरणांवर मस्तक ठेऊन सां नमस्कार विनंति येथील क्षेम ता. वैशाख वा ७ मंदवार, मुक्काम पुणें, सुखरूप असों, विशेष. आपणांकडून बहुत दिवस पत्र येऊन सविस्तर वर्तमान कळों येत नाहीं. तरी ऐसें न करावें. 'सदैव पत्र पाठवून सांभाळ करीत जावें. यानंतरीं येथून हुंडी साडे तेरा रुपयांची मुंजावर केली आहे. त्यास मुंजाकडून साडे तेरा रुपये घेऊन वो बाळोपाध्ये हर्डीकर खिणगिणी यांस पावते करावे. पूर्वी माणसाबरोबर पत्र पाठविलें तें पावलें. शरीरास समाधान नाहीं ह्मणोन माणसानें सांगितले. त्यास, औषधीउपाय करून शरीरास आरोग्य होय तें करावें. इकडील वर्तमान तरी, श्रीमंत राजश्री दादा हिंदुस्तानांत नर्मदा उतरोन गेले. बळवंतराव थोरले श्रीमंतांसमागमें पुण्यास आले, श्रीमंत राजश्री तात्या वडील माणसें सर्व सुखरूप आहेत. कळावें ह्मणोन लिहिलें आहे. येजमानाविशीं देवास प्रार्थना करीत जावी. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा, है विनति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३४
श्री
१६८८
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री संक्राजपिंत पराडकर स्वामीचे सेवेसां:-
पो राघो केशव भट सा नमस्कार विनंति उपरी येथील कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस तुझांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी सदैव पत्र पाठऊन परामर्ष करीत असावा (इकडील वर्त-) मान तरी राजश्री अंताजीपंत जादा हिंदुस्तानांत श्रीमंत दादाबराबर सुखरूप आहेत. हमेशा पत्रें येत असतात. मी लष्करांतून आलों ते समयीं मजला भेटले होते. त्यांस पत्र पाठविणें तरी आह्मांकडे पाठवीत जावें. पोहचतील. राजश्री संक्राजीपंत दाजीस गुलाबी चंदनाविशी लिहिलें आहे. ते चंदन देतील तो घेऊन आह्मांकडे पाठऊन द्यावा. पैका पडेल तो तुह्मीं देऊन आह्मांस लिहून पाठ. वावें. रुपया पाठऊन देऊ. इ.इ.इ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३३
श्रीरामचंद्र.
१६८७ कार्तिक वचे ७
राजश्री कृष्णाजी नाईक.........कापडकरी साहुकार वगैरे नि पंतप्रथान गोसावी यांसीः-
अखंडित लक्ष्मीअलंकृतराजमान्य ला दमाजी गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादुर, सुहुरसन सित सितैन मया व अलफ. तुमच्या......जकातदार यांजवर सादर.........स वरातांपैकी निमे ऐवजपौष अखेर घेणें. बाकी राहिला ऐवज निम्मे तो फाल्गुन अखेर घेणें. कराराशिवाय जासती उपद्रव मेदत मजकूरास न देणे. खर्चवेंच जो घ्याल तो वरातेपैंकी मजंरा असे. जाणिजे. छ २० माहे जमादिलावल. मोर्तवसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक. ३२.
श्री. ( असल बमोजिब नकल.)
१६८७ कार्तिक वद्य. ६
( शिक्का थोरले माधवराव साहेबांचा )
यादी. पथक व पागा निा राजश्री विसाजी कृष्ण. सुा सीत सितैन मया व अलफ, सरंजाम बि तपशीलः-
किता पा वगैरे.
१ पा आलद.
१ पा गुंजोटी.
१ पा शाहापूर.
१ पा माचनूर,
१ पता मौजे पुलंज पा माहोल.
१ पा आलमेल.
----
६
निंबाळकराकडील रांजणगांव व गैरे देशचेमाबदले याचे सुटतील ते दरोबस्त सरकारचा अमल मारिनिल्हेकडे करार करून द्यावा. येणेंप्रमाणे निंबाळकराचा करार जालियावर सनदा देणें.
पांच परगणे, एक गांव, येणें पा बीड येथील दिगरजाहागि-
प्रो मारनिल्हेकडे फौजेचे बेगमीस रीचे गांव रामचंद्र गणेश यांचा
ऐकरार करून देऊन सनदा देणें. पो वज व दुमाले वजा करून, बाकी
सागोलें द्यावयाचा करार केला आहे. दरोबस्त सरकाच्या अमलाची सनद
त्यास, राजश्री दादासाहेबांची भेट जा- देणे. पो शाहापुरची सनद सालम-
लियावर तिकडून सोडून मारनिल्हे. जकुरीं दिल्ही परंतु रा गोपाळराव
कडे देविला जाईल. येणेप्रमाणें करार. गोविंद यांची भेट जाहलीयावर त्यां-
कदाचित् न सुटल्यास, त्याचे मोब- ची सोय करून, परगणा तुह्मांकडे
दला याच प्रा. दुसरा माहाल नेमून सोडून देविली जाईल. तूर्त तुह्मी
देविला जाईल, येणेप्रा करार. अमलास पो मजकूरीं खलेल करूं
त्यांनीं क्षेप निक्षेप पावावे. येणें नये. येणेप्रा करार. बिनी रखवा
प्रा करार. लीचा ऐवज आकारेल तो सालमज
विठल कृष्ण यांस पालखी साल- कुरी पथकाकडे पंधरा हजार द्यावे. बा
मारीं देऊन तैनात पालखीस बार- की सरकारांत जमा करावे. येणेंप्रा
माही १००० एक हजार रुा करार.
नेमला ऐवज याशिवाय हरएक ऐव- निंबाळकराकडील गांव न सुटले
जी पावते करावें. येणेप्रेा करार. तरी त्यांचे मोबदला दुसरे परगणे
नेमून द्यावे येणेंप्रेा स्वदेशी नेमून
द्यावे. येणें प्रेा करार.
छ १५ जमादिलावल, सीत, कर्तिकमास, सनदा लिहिणें, असल दप्तरीं असे. छ २५ जोवल.