Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४
श्री.
१६९१ माघ वद्य ६
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्यराजश्री नारो वासुदेव का दार पो गोसावी यांसी:-
सेवक नारायणराव बल्लाळ नमस्कार सुा सबैन मया व अल्लफ, रघोजी आंभो-या मौजे धामणगांव, पो......डि येथें राहत होता. तो मौजे मजकुराहून गैर हजर होऊन मौजे मा र......गांव पो आंबाड येथें जाऊन राहिला आहे. त्याणें धामणगांवकर गा......याचा गाडा मठ पिंपळगांव येथला होता, तो अटकाविला आहे; आणि ह्मणतो की, माझी वस्तभाव धामणगांनी राहिली आहे ते द्यावी, म्हणजे गाडा देईन. त्यावरून पेशजीचे कमाविसदारास पत्र सादर केलें होतें कीं, रघोजी मजकूर यांस व धामणगांवकरांस मौजे गोलटगांव पाहिजे, जालनापूर येथें पंचाईत नेमून दिल्ही, तेथें रघोजी मजकूर यांस पाठवणें, धामणगांवकर यांस दाभाऊ परगणेयाचे कमाविदार पाठवितील. त्यावरून धामणगांवकर गोलटगांवास गेले. रघोजी मार पंचाईतीस गेला नाहीं. त्याजवरून हें पत्र तुह्मांस सादर केलें असे. तरी......... मार याचे वस्तभावेचा धामणगांवकरांकडे लढा असेल तरी, त्यांस...... विपंचाईतांत ताकीद करून पा......लढा नसतां लबाडी करून गाडी दाबून ठेविला असेल तरी बरें वजेनें ताकीद करून गाडा देवणें, येविशीं फिरून बोभाट येऊ न देणें. जाणिजे, छ२९ सवाल. बहुत काय लिहिणें ? मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६३
श्री.
१६९१ भाद्रपद वद्य १
सेवेसी हरी बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना ता छ १५ जमादिलावल पावेतों मुक्काम मौजे तारगव्हासी पा पाथरी. वर्तमाने तर निजामअल्लीची पत्रें आलीं होतीं कीं, हिंदुस्थानची मसलत आहे, तर आपण पुढें बराणपूरपर्यंत जावें, आह्मीं मागाहून येतों. वकिलांचीं पत्रें आलीं जे, निजामअल्ली निश्चयें येतात, मुरादखान आले ह्मणजे येथून निघणार. त्यास, मुरादखान व कृष्णराव बल्लाळ लवकरच जाऊन पोंहचतील. हे तेथें गेलियावर पत्रें येतील ते स्वामीस लेहून पाठऊं. श्रीमंत नांदेड वसमत पर्यंत जाणार असें आहे. सेवेसीं श्रुत होय, हे विज्ञापना. तीर्थरूप राजश्री आबा लष्करांत आले आहेत. त्यांचे कामकाजाचा उलगडा लवकर होय, ते गोष्ट केली पाहिजे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६२.
पो ज्येष्ठ वा १३ शनवार
श्रीशंकर
१६९१ वैशाख.
चिरंजीव राजश्री बाबूराव यांसी प्रति विठ्ठल नरसिंह आशीर्वाद . उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. इकडील वर्तमान तरी मातुश्री अहिल्याबाई साल मजकूरीची रसद मागत आहे. व राजश्री तुकोजी होळकर यांणीं वराता व सरंजाम ह्मणून पंधरा सोळा हजार रुपये घेतले, नजीक वीस कोसांवरी खेचिवाडियांत आहेत. याप्रमाणें वर्तमान मामलेतीचें आहे! जकात तों अगदीं पडली. कारण ज्या मार्गानें वाणी येणार त्या मार्गावरी आजि तीन महिने फौज होळकर याची आहे. दोन वण जारेहि लुटून घेतले! त्यामुळें मार्ग राहिला. गल्ला स्वस्त ! पावणेदोन मण हरभरे व गहून * सवामण प्रमाणें कोण घेत नाहींत! खिचि वाडियांत दोन महिने फौज आहे. त्यामुळें तमाम जागा मारून लुटून फस्त केली. सलूख जाहला नाहीं, रा नारो गणेश फौजेंत आहेत. रा तुकोजी होळकर उदेपुरीं आहेत. शिंदेही उदेपुरीं आहेत. याप्रमाणे येथील वर्तमान आहे. ( यापुढे फाटलें आहे. )...........चिरंजीव राजश्री दिनकरपंत यांसी आशिर्वाद. देशींचे वर्तमान लिहित जाणें. हे आशिर्वाद.
रा विसाजीपंत यांसी नमस्कार. विनंति उपरी सदैव कुशल वर्तमान लिहित जाणें, इकडील वर्तमान उत्तम आहे. बहुत काय लिहिणें हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६१
श्री.
१६९१ चैत्र शुद्ध १० मंदवार
पु॥ वेदमूर्ती राजश्री गणेश भट हरडीकर स्वामीचे सेवेसीः-
विनंती उपरी श्रीमंतांचे लष्करचा मुक्काम वंजिरा ( वाइनगंगा ) तीर येथें आहे. तेथून फाल्गुन शुद्ध ११ चीं पत्रें आलीं. त्यांत मजकूर कीं भोंसले चांद्यांस गेले, सड्या फौजा पाठीवर होत्या. त्यांस तफावत फार पडली. याकरितां श्रीमंतांनीं बोलाऊन आणिल्या. बुनगें मनरथा जवळ ठेविलें होतें. तेंहि वेजिरा संगमीं बोलावून नेलें, तोफखाना उंबरखेडावर होता. तोहि आणविला. सारे सरदार, फाजा एक जागां आल्या. या उपरी मनसबा करून, चांद्यास जाऊन, मोचें लावावे, ऐसा प्रकार आहे. देवाजीपंत, भोसले याकडील दिवाण, श्रीमंतांचे लष्करांत आहेत. त्यांनी सांडणी मोंसल्याकडे पाठविली आहे. सल्याचा प्रकार घडोन आला तरी उत्तम; नाहीं तरी पुढे चांद्यास जावें; ऐसें आहे. याप्रों वर्तमान लिहिलें आलें. पुढें येईल तें लिहून पाठऊं. पिराजी नाईक निंबाळकर बुनगियांत होते. ते पळून भोसल्याकडे गेले. श्रीमंत फौजेसुद्धा एकवेळ चांद्यापावेतों जाऊन, भो निर्मळकडे आले. पुणियास येणार असें जालें, तेव्हां माघारे फिरून पाठीस सडे होऊन लागले. ते बालेघाटास आल, भोंसले भालकीहून बेदराहून मागती झाडींत शिरोन, झाडीच्या वाटेनें चांद्यास गेले. तेव्हां श्रीमंतही भागानगरापासून मेदकाहून माघारे फिरोन प्रस्तुत गंगातीरास आले. दोन्ही फौजा धांवतां थकल्या ! तीन महिने याप्रो झालें. अद्यापि प्रथम दिवस आहे ! मुलकाचा आईत भारी जाला आहे. रुकनत दौले, जाधवराऊ देखील समागमें आहेत. चिरंजीव विसाजीपंत व रामचंद्रपंत, गोपाळराऊ, रास्ते, ऐसे सडी फौज पंचवीस हजार भो मागें होती, त्याचे मागें श्रीमंत होते. थोरले बुणगें पाथरीकडे पा होतें. चिरंजीव बळवंतराऊ श्रीमंताबराबर आहेत. फार हैराण प्रथम जाले. तुह्मीं श्रीस प्रार्थना करून उभयतांचे संरक्षाविशीं आंगारी टाकवणे. लोभ कीजे हे विनंति. ++
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६०.
श्रीगजानन.
१६९१ चैत्र.
पुा तीर्थरूपांचे सेवेसीः-
शिरसां नमस्कार विज्ञापना. आह्मीं वडिलांचे आशीर्वादें चिरंजीव सुद्धा घोडींपिडीं निभाऊन आलों ! कळलें पाहिजे. बुणग्यांत लिंगभट होता. सिवरें व सभरा घोड्या बुनग्यांत होत्या. महतापघोडी व खोसरी दोन्ही सभर आहेत. परंतु कौलीरान आहे. याजकरितां वैरणीची फार ताकीद. वैरण मिळत नाहीं. सालवण लागलें आहे. याजमुळें लोकांच्या घोड्या फार गांजलिडतात. परंतु आपले आशीर्वादें करून सर्व ईश्वर निभाऊन आणील. कळलें पाहिजे. प्रस्तुत देशीं गडबड नाहीं. जें होणें तें ह्याच प्रमाणें होईल. वडिलीं काळजी न करावी. आपणाकडील साकल्य लेहून पाठविले पो. अद्यापि मोगलसुधासारेच एकत्र आहेत. सल्ला होतो अगर काय होईल तें मागाहून लेहून सेवेसीं पाठवितों. यंदा निष्ठुरपणा काय निमित्य ह्मणोन पुण्याहून वडिलांचीं पत्रें एक दोन आलीं ! त्यास ये सालीं स्वारींत आनंद ! ता चाकरी पडिली ती. लिहितां पुरवत नाहीं ! आणि निदानीं भोंसल्यामागें सडी स्वारी सवा मेहिना पडली. त्याणें पाणपतास राहा म्हणविलें ! यलगंधचे झाडींत पंधरा रोज सूर्यदर्शन नाहीं, दाणावैरण नाहीं ! प्राणाशीं गांठी पडल्या ! फार लोक बुडाले. परंतु वडिलांचे आशीर्वादें चिरंजीव सुद्धां क्षेमरूप आला. आपल्या कडील पुणें व वाई व किल्ले व राजकी वृत्त ती लिहिलें प्रो श्रीमंतांसमागमें चाकरी निमित्य नाहीं, यास्तव आपलें पत्र पावोन आमचेंहि उत्तर न गेलें, वरकड वडिलांचे पायाशिवाय आह्मांस जोड काय आहे ? रात्रीदिवस लक्ष वडिलांचे चरणाशी आहे. ईश्वर साक्ष. पौष वद्य ३ पत्र वडिलीं पों तें आजी पावले. सविस्तर कळलें. मौजे चातुस व बोरीचा वसूल बेमुरवत करवावा. सदाशिव नारायण यासीं आणून वसूल घेतला पो. सदैव आशीर्वादपत्र पाठवावें. लोभ असावा. हे विज्ञापना, ती। सौ।। संपन्न वज्रचुडेमंडित मातुश्री वहिनीबाई व उमाबाईस शिरसाष्टांग नमस्कार, चिरंजीव रा तात्या व बाळाजी हरी व अंताजीपंत यांसी आशीर्वाद. लोभ करावा. हे आशीर्वाद. इ. इ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३४७
श्री १६१२ चैत्र वद्य ८
स्वस्ति श्री राज्याभिशेकशके १६ प्रमोद नाम संवत्सरे चैत्र बदल अष्टमी मदवासरे राजमान्य राजश्री बाजी सर्जाराऊ जेधे देसमुख यासि राजा आज्ञा (अभय दिल्हे) ऐसी जे मा। रतनोजी सिंदे व शंकराजी ढागा याजबराबरी कितेक एकनिस्टपणाच्या गोस्टी सांगोन पाठविल्या सांगितलयाप्रमाणे विदित जाला ऐसियासि हे मर्हाट राज्य आहे तुह्मी लोक या राज्याची पोटतिडीक धरिता तरी ते प्रांते कितेक राजकारणे आहे ते चालणा करून ++ ण जमाव करून सावधानपणे राहोन स्वामिकार्य जे दृष्टीस पडेल ते मनास आणून हस्तगत करून ठेवणे हुजूर लेहोन पाठवणे तेणेप्रमाणे हुजरून विल्हे केली जाईल या प्रांतीचे वर्तमान तरी राजश्री छत्रपति स्वामी स्वारी करून कर्नाटकप्राते गेलियावरी तिकडे जमाव लस्कर चाळीस हजार व हशम एक लाख पंचवीस हजारन जमाव जाला आहे पुढे हि आणखी जमाव होत च आहे ते प्राती कुल पुड पाळेकर तमाम एऊन भेटले आहेती जमेती पोख्ती जाली आहे तुर्त पुढे राजश्री केसो त्रिमळ या प्रांते रवाना केले आहेती त्या बा। सगिनात स्वार पंधरा हजार व हशम पचवीस हजार देऊन रवाना केले आहेती ते हि कादळ प्राते तुंगभद्रेच्या तीरास आले आहे खजाना हि एक लाख होनु याबराबरी आहे त्यास आणावयास राजश्री धनाजी जाधव सताजी घोरपडे सेनापंचसहस्त्री पाठविले आहेती ते हि आठा पंधरा दिवसी एतील ते आलियावरी तो जमाव व हुजूरचा जमाव ऐसे करून त्या प्राते स्वारी होईल तरी हे पत्र तुह्मास सादर केले असे तेणेप्रमाणे जमावानसी सावध असणे त्या प्राते आलियावरी तुमची हि सरजामी एथे मा। रतनोजी सिंदे व शंकराजी ढगे एही रदबदल केली त्याप्रमाणे चालऊन बिता।
तैनाती सालीना होनु गाव
५००० खासा ४ इसाती
५०० मताजी जेधे २ वेतनात गाव
--------- ---------
१००० ६
सदरहू प्रमाणे हजार होनु तैनाती व गाव इसाती व मुकासे मिळोन सा गाव कार्यभाग जाली देऊन तरी तुह्मी आपली खातरनिशा राखोन स्वामीच्या पायासी एकनिस्टता धरून स्वामिकार्य साध्य यहोए ते गोस्टी करणे गनीमाचा हिसाब काय आहे तुह्मी लोक जेव्हा मनावरी धरिता तेव्हा गनीम तो काय आहे गनीमसा तुह्मी लोकी केला आहे ते तुह्मी च लोक या राज्याची पोटतिडीक धरिता जेव्हा अवरंगजेबाचा हिसाब धरीत नाही ऐसे बरे समजोन लिहिल्याप्रमाणे वर्तणुक करणे व अवरंगजेबाने मर्हाटे लोक आहेती त्यास मुसलमान करावे ऐसे केले आहे त्यापैकी मुसलमान केले मा। नेतोजी राजे व साबाजी घाटगे व जानोजी राजे व कितेक ब्राह्मण हि ए प्रांतीचे बाटविले पुढे हि तलबा गेला आहेती तिकडून तमाम मर्हाटे लोक होते ते आपला जमावानसी आह्माकडे एताती हाली रा। हणवतराऊ निंबाळकर व सटवोजी निंबाळकर बाजे सरदार आले आहेती पुढे हि कितेक एताती ऐसे गनीमाचे लस्कर उठोन हुजूर जमाव होत आहे ईस्वर करितो तरी फते च आहे लिहिलेप्रमाणे हिमती धरणे जाणिजे छ २० जमादिलाखर सु॥ तिसैन अलफ आज्ञा प्रमाण
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३४६
श्री १६१२
राजश्री माहादाजी सामराज देशलेखक प्रात मावळ गो।
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। रामचंद्र निळकंठ सु॥ इहिदे तिसैन अलफ राजश्री सर्जाराव जेधे देशमुख तपे रोहिडखोरे प्रात मजकूर हे हुजूर आले याणी विनती केली + या देशमुखानी स्वामीच्या पायासी एकनिष्ठा धरिली आहे गडकोट गनिमाने घेतले आहे ते हस्तगत करून घ्यावे स्वामी ++ निश्चय केला आहे तरी कृपाळु होऊन त्याचे इसाफतीचे गाव शाहाचे कारकिर्दीपासून चालत होते तेणेप्रमाणे चालविले पाहिजे नती केली ऐसीयासी तुह्मास प्रात मजकूरीचा देशाधिकार दिला +++ ते समई तुह्मी ही विनती केली होती तेव्हा आज्ञा केली की जो एकनिष्ठा धरून स्वामीसेवेसी येईल गड कोट गनिमाने घेतले ते हस्तगत करून घेईल त्यास इसाफतीचे गाव व वतन असेल त्या ++ स आणून तेणेप्रमाणे चालवणे ह्मणौन आज्ञा केली आहे हाली ++ से तरी जो कोण्ही वतनदार एकनिष्ठा धरून येईल गडकोट + रून देईल या राज्याचे ठाई दृढ निस्टा धरील आणि स्वामीकार्य करून देईल त्यास इसाफती व वतनभाग चालिला असेल तेणेप्रमाणे दुमाला करून लेहोन पाठ ++ सनद सादर होईल तेणेप्रमाणे मजु रा असे छ २२ + पा। हुजूर
बार सुरु सुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३४५
श्री १६१२
राजश्री सर्जाराव जेधे पंचसहस्त्री लस्कर गो।
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। रामचंद्र निलकंठ आसिर्वाद सु॥ इहिदे तिसैन अलफ तुह्मी कामाचे मर्दाने इतबारी एकनिष्ठा धरून + + आलेस यावरून तुह्मावरी संतोशी + + पंचसहस्त्रीचा कार्यभाग सागितला राजश्री धनाजी जाधव याचे तावैन केले असे तरी स्वामीकार्यविशी मशारनिलेचे आज्ञेत राहोन स्वामी कार्य करीत जाणे तुह्मी आपले पंचसहस्त्रीचा जो जमाव कराल तो मशारनिलेसी गुजार करीत जाणे मशारनिले + दंडकप्रमाणे घोडियास रातीब व स्वारास रोजमुरा आणि त्याच्या हाते स्वामी + + ती जाणिजे + + +
सुरु सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३४४
१६१०
पातशा
इजतीअसार बाजी सर्जाराऊ जेधे देसमुख ता। रोहिडखोरे सु॥ सन १०९८ मालूम दानद की तुला हजूर सिवाजीपत पाठविला होता त्याणे हकीकत जाहीर केली त्यावरून तुझे इसापतीचे गाव व हक तुझे दुमाले केले व तुझा गुमस्ता सिरोली चाकरीस देणे तुला हजूर येणे हजूर आलियावरी तुह्मास हजरती जादे याचा कौल आणून मन तुह्माबराबरी भले माणूस देऊन त्याची भेटी करून फर्मान करून देऊ जरी तू हजूर न येस तरी गाव दुमाले नाहीत दिगर बाजी घोलप व बकाजी नावडकर यासि कोल दिधले त्यास बराबरी घेऊन येणे कोणे बाबे शक न धरणे तुह्मी हजूर न या तरी जे सनद दिधली ते मजुर नाही तुह्मानजिक जमाव कितेक होईल ते लेहोनु घेऊन येणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३४३
श्री १६१२ ज्येष्ठ वद्य ८
राजश्री माहादजी सामराज देशाधिकारी
व देशलेखक प्रात मावल गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक रामचंद्र निलकंठ नमस्कार सु॥
इहिदे तिसैन अलफ राजश्री सर्जाराऊ जेधे देशमुख ता। भोर तपे रोहिडखोरे बहुलीकर भेटीस आले याणी विनती केली की इदलशाहाचे वेलेसी इसाफतीचे गाव व इनाम चालत होते बितपसिल
इसाफतीचे गाव मौजे वेन्हवडीस इनाम टके
१ मौजे चिखलगाऊ ६ साहा एकूण टका १
१ मौजे अबवडे
१ मौजे नाटिबी
१ मौजे कारी
-----
४
एणे प्रमाणे इसाफतीचे गाव च्यारी व इनाम ठिकाण (आ) ला आहे याप्रमाणे चालत होते तेणेप्रमाणे च राजश्री कैलासवासी छत्रपतीस्वामीचे वेलेसी चालत होते त्याउपरी आपला भाऊ सिवाजी जेधा यात व आपणात वडील धाकटेपणाचा कथला मौजे कारी निमित्य लागला या निमित्य उभयता राजश्री पावेतो भांडत गेलो त्याकरिता राजश्री कैलासवासी स्वामीने निवडा होये तोवरी आदिकरून देशमुखी अमानत करून देशमुखीस मुतालीक ठेऊन त्याच्या हाते स्वामीकार्य घेत होते ऐसियास साप्रत सिवाजी जेधा मृत्यु पावलियावरी आपले बाप भाऊ व आपण समजलो आपला वडिलपणाचा मान व कारी गाव आपणास दिल्हा आहे तरी कृपाळु होऊन आपले इनामतीचे गाव व ठिकाण पहिले राजश्री कैलासवासी स्वामीचे वेळेसी चालिले होते तेणेप्रमाणे चालविले पाहिजेत ह्मणून तपसिल विदित केले त्यावरून मनास आणून सर्जाराऊ जेधे ह्मणजे कदीम विस्वासू बहुत दिवस फस्ट मशाखती केल्या आहेत व राजश्री कैलासवासीचे वेळेसी हि थोरथोर कामे करून दिल्ही आहेत हाली हि गनिमाने कितेक गड कोट घेतले आहेत ते हस्तगत करून घ्यावे स्वामीकार्ये करावी यास्तव कृपाळु होऊन राजश्री कैलासवासी स्वामीचे वेलेसी पहिले इसाफतीचे गाव व ठिकाण चालिले असतील तेणेप्रमाणे चालवावे ऐसा तह करून हे आज्ञापत्र तुह्मास सादर केले असे तरी राजश्री कैलासवासी स्वामीच्या सनदा असतील त्या मनास आणणे सनदाप्रमाणे भोगवटा जाला आहे की नाही हे मनास आणून सनदा रुजू घालून जेणेप्रमाणे केलासवासी स्वामीचे वेलेसी यास गाव व ठिकाण याचे चालिले असेल तेणेप्रमाणे हिलाकुसूर याच्या दुमाला करणे तालीक घेऊन मुख्य पत्र परतून देणे जाणिजे छ २१ रमजान पा। हुजूर
बार सुरु सुद बार