लेखांक ३३९
१५८४ आश्विन वद्य ११
मसुरल अनाम बाजी सर्जाराऊ देसमुख ता। भोर ता। रोहिडखोरे प्रति राजश्री सिवाजी राजे सु॥ सलास सितैन अलफ अर्दास छ १५ सफर रा। छ १८ मि॥ पहुचोर हकीकत मालूम जाली लिहिले की साहेबाची रजा सादर जाली की दोघे भाऊ चाकरीस हुजूर येणे यावरी दोघे भाऊ स्वार होउनु येत होतो यावरी घरामध्ये दुखापती जाली आहे याबदल खोळवेला असो ह्मणौन लिहिले तरी वेथा हाली बरी जाली असेल याउपरी स्वार होउनु येणे बहुत दिवस राहिलीयावरी सबनीस जागा धरितील येणेकरून तुमचा काय सरफा आहे याउपरी सत्वर स्वार होउनु येणे व लिहिले की आपलीया माणसास जाबली राहावयासी जागा देणे ह्मणौन लिहिले तरी तुमचे हि राहाण्याचा जागा बरा च आहे जाबलीस माणसे न पाठवणे तुमचे च तरफेस कुबल जागा असेल तेथे ठेवणे व लिहिले की बालाजी गुजर गोविंदराऊ आटगावकर याकडे होता हाली साहेबाची चाकरी करावयाची उमेद धरितो ह्मणौन लि॥ तरी त्याची आह्मास चाकरीची गरज नाही मोर्तब सुद
मर्या
देय विरा
जते
रुजू सुरुनिवास
तेरीख २३ माहे सफर
सफर सुरु सुद
→शिवकालीन पत्रव्यवहार - लेखांक ३३९ - मूळ प्रत पाहण्यासाठी इथे क्लीक करा