पत्रांक ३०
श्री.
१६८७ आश्विन शुा ६
अखंडित-लक्ष्मी-आलंकृत राजमान्य स्त्रौ माधवराव बल्लाळ प्रधान आसीर्वाद व नमस्कार. सु। सीतैन मया व अलफ. वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दिक्षित ठकार यांनीं विदित केलें कीं किल्ले मजकुरीं सभासदीची असामी आपल्याकडे च्यारशें रुपयाची चाळीस वर्षें चालली. अलीकडे दोनशें रुपये करार करून दिल्हे. त्याप्रमाणें चालत असतां, वर्षासन रुपये १२ बारा किल्याकडोन पाक्त असोन, किल्ला राजश्री बाबूराव सदाशिव याजकडे जालियापासून सदरहू असामीचे रुपये व वर्षासन पावत नाहीं. ह्मणून ऐशास दरसाल दोनशे रुा पावत असतां हालीं न पावयास कारण काये ? तरी, याजउपरी सदरहू दोनसे रुपये सालाबाद पावत आलिया प्रो पाववीत जाणें व चाळीस वर्षें बारा रुपये वर्षासन पावत आल्याब मोजीब पाववीत जाणें, जाणिजे, छ ४ राखर, आज्ञाप्रमाण.
लेखन सीमा
