Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ११०

श्री
पौ छ ११ मोहरम
१६९६ चैत्र शुद्ध ९,

आपत्यें तात्यांनीं दोन्ही कर जोडून चरणावर मस्तक ठेवून सां नमस्कार विनंती येथील क्षेम तो चैत्र शुद्ध नवमी रविवार मुा नजीक मासवड वडिलांचे आसिर्वादेंकरून सुखरूप असों. विशेष. शुद्ध प्रतिपदेचीं पत्रें आलीं तीं काल मंदवारीं पावलीं. अक्षरशा अवलोकनीं साकल्य लेखनाभिप्राय कळों आला. मातुश्रीच्या पत्राची नकल पाठविली. उत्तम आहे. अस्सल ठेऊन घेतले. पूर्वी यादी व पुरवणीपत्रें दस्ताऐवजीं आहेत, ती जतन असावी, या पत्रांत उभयतांचे लेख आहेत, यास्तव ठेविली. त्यास, त्यांची भाषणें पक्केपणाचीं दस्तऐवजीं. तेव्हां पत्राचे अगाध नाहीं. यजमानाची अस्ता शब्दगौरवी हस्ताक्षर अलंकृतांतच. ऐसीयास, तें पत्र पाठविल्यास फारच संतोष आहे. वारंवार पुसतात. नकल दाखविल्यानें एक प्रकार भासतें. ऐसें आहे. वरकड कित्तेक प्रकार सुचविले. ते यथार्थच, प्रसंगोपात आज्ञेप्रमाणे घड़वीत असों. पोतदारांची सरंजामाची बंदोबस्त येईल. हत्ती-विषयीं आज्ञा. त्यासी, येथें मोठे खासे तीन आहेत. वरकड तैसेच आणीक आणविले आहेत. आल्यानंतर चांगला पाहोन घेतों, पदें येथे नाहींत. दारव्यास आहेत. रहवळ तुर्कीविषयीं लिा। त्यासीं एकदोन रोजी मागाहून पाठवितात. एकच पाठविल्यानें विपर्यास दिसेल. यास्तव दोन पाठविणार. याशिवाय आपला सत्वरच पोहोंचेल. त्याच्या खर्चाचा प्रकार वारंवार लिहित गेलों. त्याचा भार आभार सर्व रा हरीपंत तात्याकडेच घालून लिा, त्याजकडील साधन रक्षावें, रा मामाकडील तिडन पडों देणार नाहीं. त्यास यजमानाचें त्यांचें पूर्ण संधान होतेंच. हालीं पत्रपत्रीं वळख पुर्ती पुरली. कित्येक ममतेचीं भाषणें परस्परें जाहली. तीं आमचें विद्यमानेच घडलीं. मामासही त्यांणीं याजविसीं तेथील लक्ष उमजाविलें, तात्याचें पूर्वी सत्तरपर्यंत ऐवज यांस दिला होता. हे आल्यानंतर पाऊण दिल्हा. यांस तो दरमहा साडेतीन पर्यंत लागतात. रोज धरणीं, कटकटी, रुसवे मारनिल्हेनींही येऊन पाहिलें. आणिकही कांहीं कर्जदाखल तजवीज करून महिन्याची समजूती करावी, ऐसें होतें. तों त्यांस मामांनीं दोन हजार फौज समागमें देऊन साता-यासीं रवाना केलें. त्याच दिवशीं मामा, व दकार नामक, घवसे यांच्या गोटास जाऊन त्यास भाषण केलें जें, लक्ष ते आह्मांकडे असावे, नबाबाच्या आमच्या विचारें होईल तें करावें. त्याणें उत्तर केले की, सारी नजर मसलतीवर, त्यांत दर्याबाईची फौज आपली करून ठेविली, तें उपयोगास येणार नाहीं. त्याची सल्ला काय ? याणीं उत्तर केलें उभयतांचें समाधान करून द्यावें, वडीलपण तिचें रक्षावें, मुलाचें लेंकुरपण चालवावें, दोन्ही फौजा एकदम कामावर सादर असाव्या. याप्रा घाट घालून डे-यास आले. दुसरे दिवशी धंवसे सेनासाहेब सुभे यांच्या डे-यांत कूच समयीं आलीं. दकार नामक तिराईत ऐसे आले. भाषणांत त्याप्रा आणिलें. याणीं मान्य केलें, मामाच्या व नबाबाच्या विचारास आलें तें आह्मांस मान्यच आहे. जातीनीं शपथ वाहिली, मी दुस-याची सेवा करणार नाहीं. सारांश, हें सौष्ठाई आपसांत करून योशीतेस सांगावें. याणीं हातीं धरून जाऊन आणावी. ऐसें बोलोन गेले. परवां शुक्रवारीं कूच जाहलें. तों बाई यवनाचे पिछाडीस फौजसह राहिली. आतां तुळस आपले दरम्यान मामा. त्या गोष्टीची वार्ता नाहीं. वृद्ध व दकार नामक जिवाजी रघुनाथ यांसीं भाषण केले जें, तुह्मी आमचे, ऐसीयासी यवनास सांगावें, एक लक्ष आमशींच असावें, तिकडील लक्षासीं गरज नाहीं, त्यांणी दातृत्व मान्य केले असेल त्याची सवाई दिढी आह्मांस मान्य, भोंसले यांजकडीलही पक्ष न करावा. कृतकार्य सिद्धीस गेलियानंतर जसें विचारास येईल तैसें करूं. जिवाजी पंतांनीं उत्तर केलें कीं, आह्मीं आपलेच, परंतु या जाबसालांत आजच पेंच पडतो. त्याचें प्रत्योत्तर सांगितले, होईल तैसें करीतच आहों. दिवसें दिवस मसलत जवळ येत चालली. मामांचा विचार उमजांत येत नाहीं. यवनाचें लक्ष तेथें परिछिन्न दिसते. मामासी चित्त शुद्धता नाहीं. येविसीं यवनांची पत्रें तेथें, गेलींच आहेत. ध्यानांत येईल. श्रीमंत दादासाहेबांकडून संधान आले होते. सेनाखासकीली तिसा लक्षांची जहागीर द्यावी, आपले लक्ष असावे. पाणी ठिकाण लोगों ने दिल्हें. त्याजवर प्रस्तुत हस्ताक्षरी पुर्जा कोणा ग्रहस्थाजवळ आला. पद, जागा किल्ला देतों. तेंही उपेक्षिलें.. आणिकही सूत्र आहेच, सेवट एकले तुह्माजवळ येऊं, निखालसपणाचें उत्तर यावें, आपलीकडील खातरजमा जशी पाहिजे तैसी देतों, मुधोजीस कैदहि ह्मणाल तर करितों, एक माझे वेचन गुंतलें ह्मणोन असें केलें होतें, पद किल्ले जागा ह्मणाल ते देतों. ऐसे जाबसाल आहेत. यांचा खंबीर कायम इस्तकबील बाहाल आहे. लक्ष मातुश्री आणि उभयतां पाशीच आहे. यवनही तेथील संधानावरून आणि याणीं सिल-सिला ठेविल्यावरून त्यांचेच लक्षीं त्यांचे मसलतीवर दृढतर दिसतो. मामांचे मर्जीस मात्र बेभार, कोणीही प्रकार कुच-मुकाम सल्ली मसलत येक विचारें असावीं. श्रद्धाच तरी आपलेंच करणे जरूर, ऐसें आहे. दर्याबाईची दिवाणगिरी व फडणनिसी आपलीकडे करून घेतली. वार्तक कामकाज करितात. मल्हारपंत वगैरे पांच चार असामी त्यांचे होते. त्याजवर आरोप आणून आपले गोटांत आणून ठेवणें, ऐसेंहि आहे. घडेल तें खरें, जितकें जाहलें वर्तमान ते लिहिलें असे. हल्लीं येथून चिठ्या रा जोत्याजी घाटगे रुा ७॥ हजार व रा चिमणाजी घाटगे रुा पांच हजार एकूण साडेबारा हजार रुपयांच्या चिठ्या केल्या आहेत. कित्ता रा बाळाजी गणेश यांचा * चिठी रुा पांच हजार साडे अठराशाच्या चिठ्या गेल्या आहेत. ऐवज दिक्कत न पडतां द्यावा. वरकड वर्तमान मागाहून लिहून पाठवितों. कळावें. बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विज्ञापना.

सेवेसी सदाशिव सोनदेव कृतानेक सां नमस्कार विनंति लिा परिसोन कृपालोभ करावा, भेट होईल तो सुदीन. हे विनंति.

                                                                             लेखांक ३५०

                                                                                                श्री                                                        १६१३ भाद्रपद शुध्द २


                                                        349 1                       

स्वस्ति श्री राज्याभिषेक शक १८ प्रजापतिनाम संवत्सरे भाद्रपद शुध्द द्वितीया मदवासर क्षत्रियकुलावतंस श्रीराजाराम छत्रपिति याणी येसजी मालुसरा यासि आज्ञा केली ऐसी जे रा। सर्जाराऊ जेधे देसमुख रोहिडखोरे याकडील लोकाचे माणसे त्या प्रांते होती त्यावरी तू स्वारी करून कितेकाची वस्तभाव लुटून नेली व बापूजी खडकीया अफराद याची बाईल धरून नेली आहे मनास येसी धामधुम करितोस ह्मणोन हे वर्तमान हुजूर कलो आले तरी ऐसे कराया तुजला काय गरज काये काही समध नसता लोकाची घरे लुटावी बाइला धरून न्याव्या हे ढंग तुजला का आठवले आहेत यावरून वरजोर नतीजा पाठवावा परंतु एक वेळ स्वामीने क्षमा करून हे आज्ञापत्र सादर केले असे तरी याउपरी तर्‍ही ऐसी बदरावा वर्तणुक करीत नव जाणे सर्जाराऊ जेधियाकडील लोकांची वस्तभाव जे नेली असेल ते सारी परतोन देणे बापूजी खडकीयाकडील वस्तभाव व त्याची बाईल तू नेली आहेस ते त्याची त्यास देणे फिरोन ये गोस्टीचा बोभाट येऊ न देणे पुढे ऐसी बदरावा वर्तणूक करून बदनाम न होणे ताकीद असे जाणिजे निदेश समक्ष

                                                                                                                                                                  189 1

 

रुजू
सुरु सुद बार

पत्रांक १०९

श्री.
पौ छ ११ मोहरम
१६९६ चैत्र शुद्ध ८.

आशिर्वाद उपरी येथील क्षेम ता चैत्र शुध ८ रविवार मुा नजीक ह्मसवड वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्रें शुध प्रतीपदेचीं पाठविलीं तीं आजच पावलीं. लिहिलें वर्तमान कळलें व सरकारचे पत्राची नकल पाठविली ती पावली. इकडील वर्तमान तरी: नबाबसुद्धां च्यारी फौजा मुा मारीं आज आल्या. नबाबाचा मुकाम मौजे दिघी, पा अडफली, येथें जाहला. त्यास, तो गांव मातबर. माने यांची पाटिलकी. तेथें. चौ फौजेच रखवालीस राऊत होते. त्यास, तो गांव मोंगलाचें फौजेने लुटला. नाश बहुत जाहला. मराठे व ब्राह्मण बाइकांची अब्रू घेतली. याजकरिता नागोजी यादव वगैरे सरदार मामाकडे गेले होते. त्यांनी सांगितलें कीं, देशांत हा प्रकार जाहलियावर पुढें गत काय, त्यास विचारें करोन सांगेन पुन्हां कोणे गांवीं उपद्रव ' न होय तें करावें. त्यावरून मामांनी, अविंधाकडील वकील मामांच्या लष्करांत ज्ञानराव होते त्यास बोलाऊन आणून, मनमानें तैशी भाषणें केलीं. त्यास लष्करांतून काढोन दिल्हे. हे गोष्ट उचित न केली ? त्यावरून नबाब अजुर्दा आहेत. आधीच त्यांचे यांचे चित्त मिळत नव्हतें. त्यांत दिवसें दिवस विक्षेप पडत जालिले. मामांनीं आज कूच करून पुढें गेले. राजश्री साबाजी बावा यास काल चिठी आली की, तुह्मीं मुकाम करणें. आज चिठी आली की " दोन प्रहरी उपरांत कूच करणे.'' त्यास, कुच कैसें होते ? नबाबानें आज कूच करून येथें यावें ऐसा करार होता. त्यास, कूच करून आले. आमचे पुढें तीन कोसावर आहेत. दर्याबाई फौजसुद्धां अविंधाचे डावे बाजूस कालपासून राहतात. मामानीं यास काल बोलाऊन नेलें होतें. त्यास, भाशन ममतापूर्वक नोकेनेंच केलें. समय आहे, हा समय तुह्मी पुढें असावें. यांनीं उत्तर केलें कीं, आम्हांस आज्ञा कराल त्याप्रमाणे करूं, आह्मी चुकणार नाहीं, परंतु फौजेस पोटास पाहिजे यामुळें गवगवा होतो, चाकरीचे दिवस आहेत, या दिवसांत आम्हीं चाकरी करून दाखऊं. तेव्हां मामांनी समाधान केलें कीं, फाल्गुनपैकीं सवालक्ष देतों, व या महिनेया पैकीं सवालक्ष देऊ. एकूण आडीचलक्ष दों महिनेयाचे होतात. त्यांत तुम्हांस पावलें तें वजा करून बाकी राहिलें तें दोन च्यार वेळ करून देतों, ऐसा करार केला आहे. आजपर्यंत एकलक्ष दाहापंधरा हजारपर्यंत पावले आहेत. बाकी एकलक्ष तीस चाळीस राहिले. ते एक वेळ देतील तरी त्याचा गवगवा महिना पंधरा दिवस राहतां निर्वेध होतो. तें होईल तेव्हां होऊ. सारांश, मामांचे भाषण रुक्ष, यामुळें पेंच पडतात. कामाचे दिवस. या दिवसांत राजश्री बापूंनी व राजश्री नानानी फौजेंत असावें. ते असलियाने सर्वांवर दाब बसोन, मुलुखाचा नाश न होतां, मसलत सिद्धीस निर्वेधपणे जाईल. उभयतां येत नाहीं तर विक्षेप वाढतील, ऐसें दिसतें. श्रीमंत राजश्री दादासाहेब यांजकडून सर्वांकडे अनुसंधानें येतात. त्यास, या दिवसांत कोणाची अजुर्दगी नसावी. याजकरितां उभयतांनी यावें. राजश्री हरीपंततात्या येथें आले होते. त्यांस सातारेयास मामांनीं रवाना केलें. ते गेले. ते जरी असते तरी उत्तमच होतें. कित्येक कळ संभाळिते. तेहि नाहींत. श्रीमंतांचा मुकाम कुरंडवाडावर आहे. यांस त्यांस पंचवीस कोसांची तफावत आहे. गांठ सत्वरच पडावी ऐसें आहे. बहुत काय लिहिणे ? लोभ किजे, हे आशिर्वाद.

पत्रांक. १०८

श्री
पौ छा ७ मोहरम
१६९६ चैत्र शुद्ध ८

सेवेसी सदाशिव सोनदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. सांकल्य राजश्री तात्या व दादांनीं लिावरून कळों येईल. लक्ष दुसरें नाहींच. श्रीसत्तेनें गांठ थोडियाच दिवसांत पडावी ऐसें आहे. तिडण म्हणावयासीं यासीं भक्षावयाची. वरकड काया-वांग-मनसा आपले लक्षीं आहेत. कळावें. सदैव पत्रद्वारा सेवकाचा * सांभाळास विस्मरण नसावें. राजश्री तात्यांनीं हजार रुा येथे सरकारांत आह्मांकडून घेऊन दिल्हे. त्याची चिट्ठी तेथें आपणाकडे दिली आहे. हा ऐवज चिरंजीव राजश्री सदाशिव विश्वनाथ याजपाशीं द्यावें म्हणजे प्रविष्ट होईल. लोभ करावा हे विनंती.

पत्रांक १०७

श्री.
१६९६ चैत्रशुद्ध ५

अपत्यें तात्यानें दोनीकर जोडून सां नमस्कार विज्ञापना ता चैत्र शुद्ध पंचमी मुा नजीक सांगोलें क्षेम असों विशेंष, वडिलीं राणोजी खोपडे व जासूद व कासीद यांजबरोबर तीन पत्रें पाठविलीं ती पावलीं. लिहिलें वर्तमान कळलें. इकडील वर्तमान तरीः सर्व यथास्थित आहे. राजश्री हरीपंततात्याची भेट जाहाली. सविस्तर त्यांस सांगितलें व त्यांनींही दृष्टीनें येथील अडचणीचा प्रकार पाहिलाच आहे. पुढें कांहीं बंदोबस्त करून देतात की नाहीं, तें पाहावें. सविस्तर राजश्री लक्ष्मणपंत यांच्या पत्रावरून कळेल. श्रीमंत दादासाहेब फौजसुद्धां , सत्पऋषीच्या रोखें जात आहेत. आईनापुरावर होते. त्यास हेही आडवे जातच आहेत, एक दों रोजां गांठही पडेल. सातारेयाकडील वर्तमान कळावें याजकरितां जासूद जोडी पाठविली आहे. राजश्री नानासाहेब यांसीं एक पालखी बसावयास पाहिजे. त्यास, दांडी उत्तम, फार चांगली, परिक्षेनें घेऊन, पालखी पडदेसुद्धां तयार, खासेयास बसावयास तयार करून लिहून पाठवावें. येथें आह्मांजवळ भोईयांची पांबडी आहे, ती ठीक नाहीं, याजकरितां एक पांबडी, भाई तेथें आहेत, दोदु नाईक याची, ते पालखी देऊन पाठवावे. येथें पांबडी आहे ही पाठऊन देऊ. राजश्री चिमणाजीपंत लेले यांजपासून पांचशे रुा घेतले आहेत, व राजश्री दिनकरपंत राजवाडकर यांजपासून हजार रुा घेतले आहेत, एकूण दीड हजार रुा घेऊन सरकारांत किरकोळ खर्चास दिले आहेत. व राजश्री सदाशीव सोनदेव यांजपासून हजार रु। घेऊन सरकारचे मुदबक दिले आहेत. एकूण अडीच हजारांच्या चिठ्या केल्या आहेत. चिठ्यांप्रमाणें रु। पावते करून उत्तरें घेऊन पाठवावीं, राजश्री सदोबादादा यांजबद्दल हजार रुा घेऊन जमा करावे. सातारियास गंजीकोट प्रतीचे रुा त्याचे कागद ब जिन्नस पा आहेत, त्याप्रों पोंचते करून जाबसाल पा द्यावा. तुरकी घोडा किंवा घोडी राजश्री नानास पा द्यावी म्हणून आज्ञा. त्यास, तुरकी घोडे, सौदागर आले आहेत, त्यांजपाशीं आहेत. ते घेतले म्हणजे पाठवून देवियों. घोडी गरीव, चालणार, खूप-सूरत पा द्यावी. ऐसी, तूर्त यांजवळ राहिली नाहीं. कोठे घेऊन तेहि पाठवून देवितों. तेथून याजकारणें कांहीं पोशाख एकादा किंवा कांहीं पैसे पाठवुन द्यावें. येणेंकरून ममता विशेषशी वाटेल. तूर्त गणोबास पा नाहीं. त्या फौजेचा मोकाबला समीप राहिला. ऐवज राजश्री मामा देतील तोच घेऊ. आणखी कोठें कर्ज-वाम मिळाल्यास पाहतच आहेत. अडचण मोठी ! उपाय नाहीं ! आणखीही येथून वीस पंचवीसपर्यंत चिट्या करितों. लाख रुा यांस द्यावयाचा करार. त्याशिवाय ऐवज जास्त होईल तो त्यांजकडे. कर्ज सरकारचें जाहालें, यांस कर्ज, कांहीं ऐवज पाहिजे. येविशीं पेशजीं दोन चार पत्रें लिहिलीं असतां उत्तर आलें नाहीं. यांसी लाख रुा अधिक ऐवज देऊच नये. कशी मर्जी आहे तो शोध घ्यावा. बिना कर्ज कांहीं मिळाल्याखेरीज चरितार्थ होतच नाहीं. पुढें कर्जाचे ऐवजास एक दोन महाल लावून देतील. वसूल करून ऐवज घ्यावा. पत्राचें उत्तर सत्वर पा द्यावें. त्याप्रमाणें करूं. नबाब व रुकनुद्दौला यांनीं पत्रें राजश्री बापूंस व राजश्री नानांस लिा आहेत. तेही लाखोटे पाठविले आहेत. त्यांस पावते करावे. तेथून पत्रें उभयतांचीं व श्रीमंत बाईचीं वरचेवर येत जावीं. विशेष वारंवार काय लिहूं ? दृष्टीस येतें तें लिहितों. बहुत काय लिहिणे ? हे विज्ञापना, पाणक्या ब्राह्मण चांगला, पंगतीस जेवी असा ठेऊन पा द्यावा. हे विज्ञापना.
सेवेसी गणेस नारायण सा नमस्कार विनंती.

पत्रांक १०६

श्री.
१६९६ चैत्र शुद्ध ५.

आशीर्वाद, उपरी, येथील क्षेम ता चैत्र शुध पंचमी मुा नजीक सांगोलें लष्करांत सुखरूप असों. विशेष. आपण राणू खोपडा याजबराबर पत्रें पाठविलीं ती सुरक्षित पावलीं. सविस्तर कळलें. वे अलिकडे जासुदबरोबर पत्रें पाठविलीं तींही पावलीं. वर्तमान कळलें. राजश्री हरीपंत तात्या फाल्गुन वद्य चतुर्दशीस लष्करांत आले. भेटी जाहाल्या. सविस्तर वृत येथील त्यांस निवेदन केलें. त्यांनींही आपल्या नजरेनें पाहिलें; व राजश्री मामांनीही कित्तेक सांगितलें तोहि भावार्थ कळला. तात्यांची मर्जी बोलण्यांत बरीच आहे. यांस खर्चाची निकड. रोज धरणींपारणीं. कूचास अडथळा. समई कूच होऊं न द्यावें, ऐसे कित्तेक प्रकार पोटाचे रडीमुळें. तो अर्थ तात्यांस आह्मीं उभयतांनीं व राजश्री भवानी शिवराम यांणीं साध्यांत निवेदन केला. व मामांनी आजपर्यंत सत्तर हजारावर दिल्हे, तेंहि सांगितलें. पुढें खर्चाचा बंदोबस्त करून द्यावा, ऐसें बोलिलों. त्यांनीं उत्तर केलें कीं, राजश्री मामासीं बोलतों आणि देवितों. त्यांचें मामांचें भाषण देवाजीपंताचे विद्यमानें होणे तें जाहालें. तेव्हां निश्चयांत आलें कीं, फालगुन मासपैकीं तीस हजार रुपये बाकी राहिली ते व चैत्र मासाचे ऐवजीं पंचवीस हजार एकूण पंचावन हजार द्यावे, तितकेयांत यांनीं आपला बंदोबस्त करून चालावें. ऐसें भवानी शिवराम यांस म्हणों लागले. तेव्हा यांनी उत्तर केलें कीं, सर्व अर्थ आपणास उमजले आहेत, मसलतीचे दिवसांत आम्हीं अडोन पोटास मागतों ऐसा अर्थ नाहीं, आमच्या लष्करांत कोणी सावकार नाहीं, पतपातेज राहिला नाहीं, मुलुखाचा पैसा यावा ऐसाहि आमचा प्रांत राहिला नाहीं, लाचारीस्तव आपणास विनंती करीतों, आम्हांस कर्ज द्यावें, एक मासाची पोटाची बेगमी पुर्तेच द्यावें, अधिकोत्तर न द्यावें,. एक मास आह्मांस निर्वेद लोकांपासून करावें, प्रसंगोपात आम्हीं उपयोगीं कैसे पडतों हें पाहावें. तेव्हां तात्यांनी रदबदल केली. त्यास, आणखी वीस हजार रुपये द्यावे, एकूण पाऊण लक्ष द्यावे, ऐसें जाहालें. मामांनीं रुक्ष भाषणेहि केलीं. उपाय काय ? त्यास, पाऊण लक्षानें यांचा परिणाम कैसा लागतो? यांस निदानीं दोन तरी कृताकृत पाहिजेत, तात्या आले. हे बंदोबस्त करतील. याअर्थी काल लोकांचा गवगवा भारी जाहाला. मामांचें कूच जाहालें, यांचें कूच न होई. डेरा पड़ों न देत. लोकांस पदर पसरून मिनत केली. कांहीं समजविलें; काहीं समजणें राहिलें. तों मामांस व तात्यांस वर्तमान कळलें कीं, लोक अडले आहेत. तेव्हां तात्या आले. त्यांनींहि लोकांस च्यार गोष्टी. सांगितल्या. त्रितीय प्रहर जाहला. तेव्हां कूच करावें ऐसें जाहालें ! त्यास मामांचा मुकाम सांगोलेयापलीकडे दोन तीन कोस. अविंधाचा मुकाम दोन तीन कोस अलीकडे. मामांजवळ जावें. परंतु दिवस थोडका राहिला. पोंहचणें कैसे होते ? तेव्हां तात्यांजवळ करार केला कीं, आज कूच करून अविंधाजवळ राहतों, उदईक लांब मजल करून तुम्हांजवळ येतों. ऐसा निश्चय करून, तात्या आपल्या मुकामास गेले. तात्यांच्या बोलण्याचा अर्थ पाहतां मामांची मर्जी राखावी. ते देतील तेच घ्यावे. त्याणे तर त्यांचा अर्थ सरत नाहीं. यजमानांनी तात्यांस म्हटलें जे, आम्हांजवळ कांहीं जवाहीर आहे व चार पांच हत्ती नामी आहेत, हे गाहाण ठेऊन तूर्त दोन लक्ष रुा आम्हांस द्यावे, म्हणजे एक महिन्याचा बंदोबस्त होतो, एका महिनेयांत मसलतहि सिद्धीस जाते, चिंता नाहीं. त्याचें उत्तर तात्यांनी केलें कीं, हें बोलणे ऐइकोन संकोच वाटतो. परंतु देतों, न देतों, हे बोलले नाहीत. निदानीं यांचा मनोदय होता की, या महिन्याचे लाख रुपये व बाकी मागील तीस हजार, एकूण एक लक्ष तीस हजारांनी पाऊण महिनेयाचा तरी बंदोबस्त होईल, तोहि प्रकार दिसत नाहीं ! त्यास, लोक फुटतात ऐसा प्रकार नाहीं; वे लढाईस कमी करतील ऐसेंहि नाही. परंतु पोटाची रड यामुळे हटकून काम घेणें, हुकमत करणें हें कमी पडेल. आपणास दोन चार वेळां लिहिलें कीं, लाख रुा महिना द्यावा ऐसा करार जाहाला आहे, तो देतीलच, परंतु आणखी कांहीं कर्जवाम देतील कीं न देतील, काय मर्जी आहे ? त्याचा अर्थ किमपि लिहिलाच नाहीं ! त्यास, मर्जी मनास आणून लिहून पाठवावें. सरकारच्या पत्रांचा मार लिहिला. त्यास, यांचे मानस जें, आह्मीं कार्यावर पड होऊन मसलत सिद्धीस नेली तर सर्व गोष्टी आमच्या नीटच आहेत, सेनासाहेब सुभा हे पद आमचें कोण नेतो, चाकरी करून दाखविणें हेंच मनोमानसीं आहे, दुसरा अर्थ नाहीं. अविंधाकडील मजकूर तरीः यांचे ठाई ममता फार आहे. तोहि मसलतीवर कायम आहे. ज्याबितजंग यास हरोल केलें आहे. दोन तीन कोस पुढें चालतो. आपण मागें चालतों. लांब मजली करितो. त्याचा मनोदय कीं, ज्याबीतजंग मामाचेहि पुढें हरोळीस असावा, त्याचे मागें ही फौज असावी. त्याचे मागें मामांनी व त्याचे मागें आपण असावें. परंतु, मामा एक, मजल लांब करितात. एक मुक्काम करितात. त्यामुळे त्यांच्या चालण्याची सोय बनत नाहीं. परंतु, लेढाईचे समई कवातीनें चालावें, हा भाव त्यांचा आहे. मामांची मर्जी पाऊणलक्ष खेरीज न द्यावें, ऐसी पाहिली, तेव्हां, कांहीं बोलिलों नाहीं. तात्यास मात्र पुसिलें कीं, याणें ठीक पडत नाहीं, पुरंधरास कांहीं चिठ्या करून देऊन समजावास पाडितों. त्यांनीं उत्तर केलें कीं, पंचवीसपर्यंत करा, आह्मीं लिहून पाठवितों. त्यास, घाटगे यांची वगैरे पंचवीसपर्यंत चिठ्या होतील, सूचना असावी. बहुत काय लिहिणे ? लोभ कीजे हे आशिर्वाद.

पत्रांक १०५

श्री.
पौ छ २ मोहरम
१६९६ चैत्रशुद्ध ३

विनंती उपरी. राजश्री मोरोबादादा यांस पत्रें यांनी ल्याहावीं किंवा न ल्याहावें हे कळावें याजकरितां पेशजीं आपणांस लिहिलें होतें. तेहि वृतबंधास गेले होते. त्यास, हल्लीं आलेच असतील, त्यांस पत्रें ल्याहार्वी किंवा न ल्याहावीं हे लिहिलें पाहिजे, यजमानाची मर्जी त्यांस पत्रें ल्याहावीं. परंतु ते नव्हते याजकरितां लिहिलीं नाहींत. त्यास, आले न आले, हें कळले नाहीं. तर स्याहावें हे विनंती.

पत्रांक १०४

श्री.
पैा छ २ मोहरम
१६९६ चैत्र शुद्ध ३

वडिलांचे सेवेसीं साष्टांग नमस्कार विनंती.

राजश्री मोरोबादादास पत्र ल्याहावयाविसीं यजमानांही दोन च्यार वेळां आक्षेप केला. त्यासी, त्याजकडून पत्र आलें नाहीं, आणि तेथेंहि नव्हतें, यामुळें न लिहिलीं. आतां वडिलांची आज्ञा येईल त्याप्रो घडेल, पेंच न पडे, ऐसें असावें. पत्राचें उत्तर त्वरेनें द्यावें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

पत्रांक १०३

श्री.
१६९६ चैत्र शु। २.

विनंती उपरी. इकडील वर्तमान व रा मामांची मर्जीचा प्रकार एकदां पत्रीं लिहिला आहे. आह्मी लेहूंच नये. परंतु तुह्मांस कसा कळावा ? आणि प्रसंगी कामास उणें तरी पडलियास घात. ह्मणोन लिा आहे. प्रविष्ट जाहाला असेल. तुह्मीं मुरबियांसी दाखविला असेल. त्यांच्या चित्तांत संकल्पविकरूप काय येतील, हें मात्र आह्मांस साशंकता. त्यास, हे प्रकार असोत. तुह्मीं प्रसंगी आहां. तुम्हांस वाकफ आहेच कीं, आम्हांस गती दुसरी नाहीं. व सूक्तअसूक्त कोणी अर्थ आपले मुरबीयांसीं निवेदावे, आणि आपली वेधना दूर होणे, मनोरथ पूर्ण करणें, हे जागा आमची एक, दुसरी नाहीं, हेच निश्चय प्रांजल आहेत. तेथे चिंता काय ? त्यांत आमच्या अर्थाच्या दोन गोष्टी. एक गोष्ट ऐसीजे, आमचे पदरीं रुपया नाहीं. आणि पोटावांचून तरी अर्थ सरेना. चार लोक एकचित्त जूट राहिना. यांसी द्रव्य पाहिजे. दुसरी गोष्ट. हे मसलत जाहालिवर अलंकारयुक्त आम्हीं निर्वेधपणें लौकिक बरा करून सौख्यानें भाकर खावी. लक्ष निजध्यास आपले मुरबियांजकडे ठेवावें; देव स्मरोन राहावें; दूवा देत जावी; अहिर्निशीं परस्परें स्मरण राहावें. जर आम्हांस कांटा मोडला तरीं वेधना मुरबियांसी राहावी. "देवा "! "देवा" ! मात्र म्हणणें हा प्रकार आम्हांकडे. ऐशा प्रकारें दोन गोष्टी. त्यांत मसोदा रा मामांनीं लेहून देऊन आमचें पत्र लेहून घेऊन पाठविलें. त्याजवरून अर्थ सारे कळले असतील. या निमित्य आम्हीं तपशीलवार नालिशी सारखें वर्तमान लिा. सारांश हे दोन्ही मतलब आमचे गळित करून दिल्हे. त्यास, या अलिकडे क्षणक्षणां क्षुल्लक गोष्टी काय ल्याहाव्या ? याची पैरवी काय केलीत हें कळावें. रा तात्यासमागमें याद पाठविलीत, त्यांत हेच दोनी मुद्दे आहेत. मग चिंता काय ? ऐसेंच उत्तर अन्वय आपल्या चित्तांत येईल. त्यास, लाख रु। मुद्दा लेहून घेतला. तेव्हां मजुरी मात्र जाहली. मेहनत सारा दिवस करावी आणि सायंकाळीं आपली मजुरी घ्यावी! हा कांहीं प्रकार आम्हांस बरा दिसत नाहीं. लोभ करून करोडों रुा देतील ते आम्हांस थोडें. परंतु हे गोष्ट कांहींच नाहीं. आमचा काळ चालिला पा. याजनिमित्त पांच चार लाख रुशा आम्हांस कर्ज सरकारांतून अगर कोणी सावकार करून द्यावा. आणि हे दुर्बलता आमची दूर करून सबळ करावे, हा मजकूर एक. मात्र होऊन मनोरथ पूर्ण व्हावे. त्या अर्थांत आमचे अर्थ, बंदोबस्त, सौख्य, सा-या गोष्टी आहेत. हा पूर्ण भरंवसा आह्मांस आहे या अर्थीं येथे तोरा कोणी यावा. येविसीं लांबण होऊं नये. हे दोन्ही अर्थ चित्तांत येऊन जें करणें तें करावें. एक कामांत लाख कामें होणार. कित्येक जन सौख्य पावून आशिर्वाद देतील. तें काम जलदी देवानें करावें आणि तुह्मी साधन राखावें. निव्वळ मुद्दा घालून लाख रुपये दरमहा घ्यावा. अथवा कार्यावर दृष्टी घालनें ती न घालून अधिक करून घ्यावेत. हें मानस किमपि नाही. ज्या विचारें आमचें बरेंच होणें, आनी आपना वेगलें वतनेंच नाहीं, त्याअर्थी हा करार करून घेऊन पुढें एकनिष्टपन्नास लागल कीं रायाच्या पक्षीं एकनिष्ठताहि केली कीं लाख रुपये दरमहा करून घेतील. हा दुरारोप हरगीज नसावा. याच्या पोटीं कल्पनेस येईल कीं, पाय पसराया विद्या करितात. तर हे भाव चित्तांत आमुच न येत. जेथें जीवच समर्पिला तेथें दौलत काय चीज? हे मनोभाव. निस्छेयास गुंतलेत ++ हे खरें नाही. ही निशा पुर्तेपनें आपनास आहे. चवथे, आनिक रीतीचे भाव आह्मांविसी निघतील. त्याची खातरजमा आपनच करतील. दरमहा न घेतील. काळ तरी कैसा चालल ? याविसीं चितेंत राहील तर न राहावें. आखर दरमहा देनेंच निस्छयांत नेमिलें तेव्हां द्यालच. आलबते ! जेथें ऊनें पडलें त्याविसीं सल्लाहांत तुह्मांसच घालनें प्राप्त होईल. याअर्थी सासातां लाखांचें कार्य एक येळच बर, कोन्हांस सांगून करून देवावें. परभारें कर्ज घेतले ऐसें मामासही दिसेल. आह्यांसही सब्द परिनामीं लागनार नाहीं. बरेंच देनें, त्या पोटीं हा ऐवज राहील. ऐसें घढनार नाहीं. आह्मीं सारोधानें कल्पनेस आलें तें वारंवार आपनास लिहितों. याचें कारन कीं, या दौलतींत सेनासाहेबांजवळ वडिलपन आपलें. माझी गोष्टी तर कायावाचामने मी आपनास तात्याप्रमाने मानितों. ऐसे लिहिलें यात्रेहि ( म ) नन करावे. श्रीकृपें हें मी स्थापित आपला यास्थलीं आहे. तेव्हां निभलच निभल, कांहीं येक वर्तमान आपनास लिहीन. त्यास, वसवास तर नाहींच. मसलतीच्या पोटी जे जाहिरात सांगणें तेच मुरबियांस सांगतील, मामाचे व आमचे मुरब्री यांची ऐकतांच असल. त्यासीं, हरे गोष्टीचा सब्द आम्हांकडे लागू नये, पत्तें आमचीं अपनाजवळ ते घरीच आहेत. अस्तावेस्त राहतील. याजकरतां पाठवून द्यावी; किंवा फाडित जावी. येथून राजश्री सदोबा दादास व गनोबास श्रीमंतांनीं आपनाकडेस पाठविलें आहे. हें सर्व निवेदन करतील. त्याप्रमाणें घढऊन त्यांसीं लवकर बिदा करावें. बहुत काय लिहिणे? हे विनंती.

पत्रांक १०२

श्री.
१६९६ चैत्र शुद्ध ३

विशेष. इकडिल वर्तमान वारंवार दिनचयेंचें वारंवार लिहित गेलों, त्याजवरून कळलेंच असेल. दरपत्रीं मजकूर कीं, पंढरपुराच्या सुमारें लौकर यावें. त्यास, गंगातिरींहून लांब मजलींनी दर मजल बारा गांव चढोन आलों. त्यास मसलत लहान नव्हे. तोरा असावा, तो प्रकार नाहीं. जर या कामास रा नाना अगर रा बापू असते तरी तोरा होय. ते प्रसंगीं नाहींत. रा मामाचा फडदा उघडं नव्हे. विश्वास कोणास पडतो, कोणास पडत नाहीं. भोंसले यांच्या घराचा प्रकार विज्वर, या प्रकरणीं मोंगल तरी असावा. मोंगलांकडील राजकारण येथें. आह्मांकडील ममता पुर्तेपणीं पाहिलीच आहे. आणि तिकडेहि खचीत. मित्राचा मित्र म्हणजे आपला मित्र सहजेंच होतो. या प्रकारें सोयरेपण होतें. पत्रीं दोरा अनुसंधान लागलेलेंच होते. त्या अर्थी ज्याबितजंग, धौशे यांसी आणावे या अर्थी खंदारापासोन रा दिवाकरपंत त्यास आणावयासी पा. आणि मोंगलांकडील ज्ञानराव गिरधर मोंगलाकडे पाठविला. त्यास मोंगलास पत्रें जातांच दरमजल कलबुर्गेयाच्या सुमारे दर कूच पांच सात मजलींनीं आला. आपण व ते एक जालियासीं निमें काम जाहलें. ऐसें जाणून या अर्थी तुळजापुरापासोन सदरहू कलबुर्गीयाचा रोंख धरिला. रा मामाच्या बाणेकारीनें काम जाहलें पाहिजे. याजकरितां त्याजकडील चिमणाजीपंत नि। रा शिवाजी विठ्ठल बापू हे समागमें घेऊन तांब्राच्या सैन्यांत गेलों, आपले लष्कर साहा कोसांच्या अंतरयानें आणिलें. रकनुद्दौला व शर्फुद्दौला दोन तीन कोस इकडून नेले. तिकडून मामास व आपले यजमानास आणिलें. आणि छ १७ जिल्हेजीं दीड प्रहर रात्रीस भेटी केल्या. भिकणखान मेवाती व राजाराम गोविंद श्रीमंत दादासाहेबीं मोंगलांकडे पा होते. त्यांचे राजकारण विध्वंस जाहलें. त्यांचा होश गेला. मोंगलासहि आशंका कीं, दर मजल दादासाहेब आले तरी आपण काय करावें ? कोणी नमूद होत नाहींत, भिकणखानासीं उत्तर काय करावें. हे आशंका त्याची उडाली. प्रांजल जाहलें. हे अर्थ बातमीच्या पत्रीं गेलेच आहेत. अलिकडे छ २० जिल्हेजी शुक्रवारी कोसाच्या अंतरानें लाकर मोंगलासंन्निध करवून, छ:२१ रोज शनीवारी दोन प्रहरां नबाब बंदगानअल्ली यांच्या भेटी जाहल्या. यापुढें आतां निमे मसलत राहिली. ज्याबितजंग, बारा तोफा, तीन गरनाळा समागमें घेऊन येऊन चौकोसांवर दिवाकरपंत आले. आज भेटतील. सवासें तोफ मोंगलाजवळ आहे. या उपरी योजिली मसलत सिद्धीस नेऊन बंदोबस्त करावा, इतका अर्थ राहिला. त्यास मुख्यार्थ कीं, लांबण पडों नये, मामी प्रसंगीं आहेत. त्यांचा मानस होसला, उत्तम आहे. श्रीमंत दर्याबाई व रघोजी भोंसले पांच हजार फौजेनिसी बगलेंत बाळगावे. आह्मांस तरी वडिलच आहेत. मोंगलानें त्याचे आज्ञेंत चालावें. तुह्मांकडील सर्वांनी त्यांच्या धोरण आज्ञेंत असावें. याप्रमाणें आवरणशक्त त्यांची आहे ! चिंता नाही. परंतु जागां जागां प्रस्तें ! आणि समय या प्रकारचा ! याविसी कित्तेक व्यतिरेक गोष्टी पडतात. त्या अर्थी येथे रा बापू व नाना व तात्या उभयतांहीं यावें. अगर तात्या तरी असावेच. उभयतांतून एकजण तरी असावे. हा सिद्धांत पहिला असेलच. लौकर घडला पाहिजे. वरकड एक दोन मजकूर अलाहिदा पत्री आहेत. त्याजवरून कळणार. श्रीमंतास पुर्तेपनें उमजलें. आतां बाकीस राहिलेंच नाहीं. त्यांनी विचार करून मसलत ठैरविली. खर्चास नाहीं. त्याची तजविज, सीरें, बालापूर व गुरंकुडा इत्यादी तालुका हैदरनाईक याजकडे देऊन त्याजपासून कांहीं खर्चास घ्यावें. सनदा करून अपाजीराम यांसी बिदा केलें असे. तेवा नित्यांनी ऐवज द्यावा हा तह. त्यासीं वांजिरे याचा बंदोबस्ती तर असेलच. दुसरी मसलत तोफखाना रा भिऊराऊ पानसे याज कडोन काहाडोन समेरसिंग व मा ईसब याजकडे द्यावा. बेंडा भोंवती गार. द तोफा देऊन मुस्तकीमी करावी. हैदर नाईकांसी जेमियतीविसी लिहिलें होतें कीं, दाहा हजार स्वार व वीस तोफा, चार हजार फौज, ऐसी कुमक द्यावी. त्याचें उत्तर आलें कीं, कृष्णे पलीकडे येणार नाहीं, ऐल तिरीं काम असालिया सरंजाम येईल. तिकडोन निश्चंतीच आहे. श्रीमंत सेनाधुरंधर आव भरनार, त्यासी, त्याची नड अटकली. याजमुळें . कांहीं सौशयास कारन जालेंच असेलच. सेनाधुरंधर रात्रौ एक दिवस पादचाली होऊन, रा वामन राऊजिचे घरीं गेले. बहुत ममता युक्त भासनें केलीं. खुलासा, सरलपन दाखवून, करावा हें मानस ! ते दिवसीं रायानीं समाधानपूर्वक गोष्टी घालून बिदा केला. आतां नित्यानित्ये त्या छंदीं पडल. चित्त मेळवून घेईल. कालबोलीया आहे. चित्त मेळलियास हरएक संधी पाहून घात करील. येवीसी तिकडोन रायास सूचना व्हावी कीं, त्यासी भासन देखील न करीत. ऐसें घडावें. सुचलें आणि कळलें इतकें आपनास आह्मीं ल्याहावेंच, दर्याबाईचा मुधोजीचा विचार, त्यास, त्यांत अंतर नाहीं. परंतु या प्रसंगी आह्मी, तेव्हां निवळ मुधोजी भों याचा गिल्लाही करितां येत नाहीं. तिनें दोन मसलती ठहराविल्या. हरएक मामाचें अर्थ व ममतापूर्वक निखालस सरळपन दाखवून करावें. ये गोष्ट कोठेंही दिसों नये.XXX गल्लीत, गरिबी भासनें, मरयादयुक्त करून कृपेस पात्र व्हावें, आनी जालेच आहेत.त्याचे पोर्टी अर्थलाभ आपा सा नाना सा यासीं बिफिकिरपनें पूर्ववत स्थळें आहेत तेथें ठेवून, आपण जातीनें मुलास नमूद करून करावें, येविसीं वचेन प्रमाण मामाचें घेतलें. बळकटपणें घ्यावें. दुसरी चाल. आपासासीं सुसंधान पकेंपने केलें. आन सपतक्रिया त्यांची आली की, वडिलासी आमरयादा आतां करीत नाहीं, चित्तास येईल तैसे करावें, ताबेदार राहीन. रा दादा-सास संकट पडलें. हें आपले अभिमानी, हे इमानी माझे, तुमचे पद्रीं पडतील. त्यासी, तेथें हरयुक्त करून ममता वाढवून विश्वास दाखवून अविश्वास कांहीं घडलिया बहुत उपयोगी, दादा सा ही समाधान पावतील, पुढेंहि दिवसांदिवस आपली ब्रीद होईल. ऐसेंही भाव आहे. संकलित लिहिलें आहे. परंतु याचे पोटीं महत् अर्थ आहे. कळल्यास अपनास सूचना असावी. मामास विनंती केल्यानें पथें पडत नाहीं. कारण कीं आमचें त्याचें सत्रुत्व मोजतात. आमचे भान सत्रुत्वावर किंवा मसलतीवर हें ध्यानास आनावें. आमचा साहकारी राव. मसलतींत अनुसरून मारिलें. घात केला, कृपेस पात्र. त्याअर्थी कांहीं देऊन पदाधिकारी चिरंजीवास केलें. परभू शाहाना किती ? त्याचा हिसाब काय ? परंतु घातक. मसलतींत वाकफ. या अर्थी कांहीं देऊन आह्मीं आपली कार्यसिद्धी केली. ऐसी वार्ता पाठविली. आह्मी रायासी एकनिष्ट. प्रानही गेला तरी दुसरी गोष्ट होऊंच नये. मृत्येच अंगिकारिला. नाहीं तर दादासाहेबासीं अनुसरितां कृपा करते. अस्तु! ऐसें असतां श्रीनें आमच्या पक्षे उभा केला. त्यापक्षीं याचा उतक्रशें पाहावा, हें घडूंच नये, यांसीं पुढें काय करतव्यें ! भारी सेत्रूपासून सूड घेन, या लक्षावर द्रीष्टी यजमानाची होऊन, तींत कांहीं अभिमान अंगिकारिला. सर्वांनी कृपा पूर्ववत करून, मागती पदयुक्त तें लिहितात. मामा प्रियकर मानितात. आह्यांस मसलतीवर सांगतात, अस्तु! ती चित्तांत आह्मी तिलभर आनीत नाहीं एक निष्ठता घडावी. हा देहे रायाचे कार्यावर लागलिया उपयोग चांगला श्रीनें लक्षिल्यास सर्वांच्या ममतेंत आहोंच. दुसरीयाचा संचार किती !आमचें पद सेत्रुत्वानें नेलियास त्याचें कैसें घढल ? आमचे भाव या रितीचे. तेथें आमचे कामावर काय द्रीस्टी ! याजकरितां सर्व आंगेजून मसलतीवर असो. एक या काळीं हालत नाहींत किंवा ते आपले जागीं मोजतात कीं, आह्मीं आहोंच. असो. आह्मीं वर्तमान सांगितल्या मग खरें कैसें वाटेल ? या अर्थी ऐकिलें तितका इतला आपनास असावाच, ह्मणोन लिहिलेंच लिहितों. त्रास न मानावा. हे विनंती.

पो छ २ मोहरम.