Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

                                                                             लेखांक ३५४

                                                                                                श्री                                                          १६१३ भाद्रपद वद्य १३

स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १८ प्रजापतिनाम संवत्सरे भाद्रपद बहुत त्रयोदशी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति याणी समस्त राजकार्य धुरंधर विश्वासनिधी राजमान्यराजश्री शंकराजी पंडित सचिव यासि आज्ञा केली ऐसि जे प्रयागजी दिनकरराऊ हतनोलीकर याचा कबला तुह्मी दस्त करून आणिला त्याउपरि तो हि कौल घेऊन तुह्माकडे आला त्यास तुह्मी चालीस हजार रुपये दंड बाधिला कबिला अटकेमध्ये ठेविला हे वर्तमान पाहिले विदित जाले आहे ऐशास सांप्रत मा। सर्जाराऊ जेधे देसमुख ता। रोहिडखोरे हुजूर आले त्याणी त्याविशी विनंती केली की मिरासदार आहे त्याचे हाते स्वामीकार्य विशेश होणार तरी त्यास जमान घेऊन मोकले करावे आणि कार्यभाग सांगावा ह्मणौनु तरी दिनकरराऊ मिरासदार व कार्याचा आहे त्यास जमान मख्तसर मर्‍हाठे लोक व देसमुख घेऊन त्याचा कबिला आपले कबजाबत हरएक जागा ठेऊन त्यास सोडणे आणि त्याचे हाते स्वामीकार्य घेत जाणे जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा

                                                                                                                                                                  190

 

सुरु सुद

पत्रांक १२६

श्री.
१६९६

यादी पथक दिा राजश्री माधवराव निळकंठ पुरंदरे. सुा अब सबैन मया व अफल.
कर्जपट्टीचा ऐवज रुा १४०००० याचा तपशील. मागील पांच साल महालांत आयाचा तपशील.
७०००० पौष अखेर
७०००० जेष्ठ अखेरी
-------------------
१४००००
एक लक्ष चाळीस हजार सदर्हू प्रमाणें द्यावे.

कर्ज सरदारीवर फार जालें. याजकरितां सालमजकुरीं बाराशें राऊत ठेवावयास सांगितले. त्यास कर्ज वारे तोंपावेतों बाराशा फौजेनशीं चाकरी करावी. पुढें दोन हजार फौजेनिशी चाकरी करावी.
मागील पांच सालां महालात आफती आली व कर्नाटकांत दोन हजार फौजेचे चाकरी जाली. सदर्हू छावणी तीन वर्षे जाली. माहागाई फार. सबब साहा लक्ष देणें जालें. त्यास सालमजकुरापासून मनास आणावयास चिरंजीव महिपतराव त्र्यंबक यांस सांगितलें. त्यास तुह्मी कच्चापक्का माहालचा व पथकाचा हिशेब मागील पाहावा. याजमुळें महालकरी याजकडे वगैरे ज्यांकडे ऐवज निघेल तो फाजीलांत घ्यावा. सरदारीचा कुल अखत्यार तुह्मांवर. जें उपयोगीं तें तुह्मी करावें.

पत्रांक १२५.

श्री.
पौ छ २३ मोहरम, चैत्र
१६९६ चैत्र वद्य ८.

राजमान्य राजश्री मोरो शामराज दिा
चिरंजीव राजश्री महिपतराव त्रिंबक यांसीः-

प्रति मातुश्री गंगाबाई आशिर्वाद. सुा अब सबैन मया व अलफ. तुमचें प्रयोजन असे. तरी पत्नदर्शनीं हुजूर पुणियास जलद येणें, दिरंग न लावणें. जाणिजे, छ २२ मोहरम, आज्ञा प्रमाण.

पत्रांक १२४

श्री.
पौ. अधिक वैशाख शुद्ध ५ शुक्रवार,
१६९६ चैत्र वद्य ८

अपत्यें तात्यानें दोनी कर जोडून सां नमस्कार विनंती. राजश्री त्रिंबकराव मामा यांस जखमा लागल्या होत्या. फुटून चैत्र वा ७ सप्तमीस देवआज्ञा जाहाली. मोठें वाईट जाहालें. राजश्री सेनासाहेब सुभा यांनी राजश्री बापूंस व नानांस पत्रें पाठविली आहेत. राजश्री दादांस पत्र लिहिण्याविषयी विनंती लिहिली होती. त्यावरून आज्ञा झाली कीं, पत्रें लिहिणें. चिंता नाही. त्यावरून त्यांसही पत्र यजमानांनीं लिा आहे. द्यावे. राजश्री बापूंनी रा दिनकरपंतांस पत्र तेथून लिहिलें होतें. त्यावरून त्यांस बहुत उत्कर्ष वाटला आहे. याचा प्रकार काय आहे हा शोध घ्यावा. मातुश्री दर्याबाई यांसही पत्रें तेथून आलीं आहेत, ह्मणून वर्तमान आइकिलें. त्यावरून सेवेसीं लिहिलें आहे. कळावें. येथें राजश्री हरीपंततात्यांनी दर्याबाईचे प्रकार तीन चार शकला काहाडल्या होत्या कीं, एक प्रकार कीं, कोणही प्रकारें राजश्री नानांस व बाईस एक करून द्यावें; दुसरें, बाईनीं फौज आपली आह्मी सांगूं तिकडे तैनात करून द्यावी आणि आपण तीनशें चारशें राऊतांनिशी आपले गोटांत येऊन रहावे; तिसरा प्रकार बाईनीं तिनशें स्वारांनिशी आपण पुरंधरास जावें, फौज येथें ठेवावी, अगर फोडून फाडून सांगों त्याप्रमाणें तैनातीस द्यावी. त्यास या तिहीं गोष्टींतून एकही प्रकार त्यांजकडून घडत नाहीं. एक होणें, तेव्हां टिक्का चिरंजीवाचे नांवें असावा ह्मणतात. लोक तैनातीस देऊन आह्मीं तिनशें स्वारांनिशीं कैसे राहावे ? लोक तैनातीस कैसे जातील ? ऐसें ह्मणतात. पुरंधरास जाणें उचित. परंतु तीनशें स्वारांनिशीं जाणें कैसे घडेल ? घाटगे, निंबाळकर, घोरपडे, मान्ये, जाधव वगैरे हे आमचे मानपुरुष. हे तर समागमें घेतले पाहिजेत. दोन अडीच तीन हजार निदानीं समागमें येतील, ते घेऊन जा ह्मणाल तरी जातों व-हाडचीं पथकें आहेत. ती येथें ठेवितों. ऐसें उत्तर जाहालें. त्यास, तीनीं उत्तरें कठीणच. पुरंधरास तीन हजारानिशीं रवाना करणें सला नाहीं. व जातील हा भरंवसा नाहीं. मार्गातून गच्छ केल्यास काय करावे ? समागमें आपली फौज द्यावी तरी निवडक फौज तीन हजारास, यांची साहा हजार असेल तेव्हां उपयोगी. नाहीं तर ठीक नाहीं. ऐसें आहे. त्यास अद्यापि निश्चय बाईचा होत नाहीं. यामुळें आपले फौजें (तील) लोकांची खातरजमा पुरवत नाहीं. फितुरी फौज समागमें घेऊन लढाईस जाणें उत्तम नाहीं ऐसे सर्वी सर्वत्र ह्मणतात. राजश्री तात्याही कोणे प्रकारें दर्याबाईचा बंदोबस्त करून, सडे होऊन, पाठलाग करणार, त्या सैन्यांतील वर्तमान तर रा नरसिंगराव धायगुडे आपले ध्यारशें राऊतांनिशीं नगरास येऊन दाखल जाहाले. रा कुशाबा पानशे, दरोगे तोफखान्याचे, आज येथें येऊन दाखल जाहाले. पाऊणशें राऊत समागमें आहेत.

दावल माहोत व बाळा माहोत पागेसुद्धां त्या सैन्यांतून निघाले म्हणून वर्तमान आहे. येथें येऊन दाखल होतील तेव्हां खरें. श्रीमंतांकडे दोन पथकें नवीं येऊन सामील जाहालीं. एक ताकपीर, दोन हजार फौज गायकवाडाकडील व लांबहाते शिंद्याकडील दीड हजार फौज. एकूण तीन साडे तीन ( हजार ) फौज नवी सामील जाहाली. ह्मणून वर्तमान आईकिलें, राजश्री भवानराव प्रतिनिधी यांची रुकनुद्दौला यांची भेट जाहाली. उदयिक बंदेगानअल्लीचीही भेट होणार आहे. प्रतिनिधीजवळ तीनशें राऊत आहेत. कळावें. वरकड वर्तमान वरचेवर होईल तें मागाहून लिा पाठवीन. शेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.

पत्रांक १२३.

श्री.
पौ अधिक वैशाख शुा. ५ शुक्रवार,
१६९६ चैत्र वद्य ८.

राजश्री नानाजी कृष्ण व राजश्री बाबूराव विश्वनाथ गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोंसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. सांडणीस्वाराबराबर छ १७ मोहरमचें पत्र पाठविलें तें छ २० मोहरमीं पावलें. लेखनार्थ कळला. राजश्री सखारामपंत बापू व राजश्री बाळाजीपंत नाना यांची पत्रें पाठविलीं ते पावलीं. ऐशीयासी, राजश्री रघुनाथरावदादा यांणी मामास हस्तगत करून सीनेच्या पाण्यानें लांब मजली करून जात आहेत. काल त्यांचा आमचा सोळा कोसांचा तफावत होता. भारी कारखाना परांडेयांत ठेवावयाबद्दल आमचा मुक्काम नबाबांनीं करविला. याउपरी नवाबांनी जरीदे दाहा बारा कोसांच्या मजला करून मागें यावें आणि आह्मीं व राजश्री हरीपंत व राजश्री वामनराव व रास्ते वगैरे सरदार जाऊन गांठ घालावी; अटकून पाडावे; तोफा टाकून झुंजास आले तरी झुंजावें; ऐसा निश्चय ठरविला आहे. राजश्री भवानीराव प्रतिनिधी काल येऊन दाखल जाहाले. हें सविस्तर वर्तमान राजश्री हरिपंत व राजश्री कृष्णराव यांण लिा आहे. त्याजवरून कळेल, राजश्री बापू व नाना यांस लिा आहे. तिकडूनही कित्तेकविशीं साधन प्रकार घडावा. राजश्री मोरोपंतदादा यांसीं इकइन पत्र बहुत दिवस जात नव्हतें, आणि त्याजकडूनही पत्र येत नाहीं, येविशींचा मजकूर तुह्मांस लिहिला होता. त्याचें उत्तर आलें. त्यास, हल्लीं पत्र लिा। आहे. प्रविष्ट करून उत्तर पाठवावें. वरकड तुह्मांस ल्याहावें ऐसें नाहीं, वरचेवर पत्रें येत जावीं. रा छ २२ माहे मोहरम. कित्येक तेथील ममतेचा वगैरे मजकुर राजश्री तात्यांचे पत्रीं लिा त्यांणीं उमजाविलें. तुह्मीं उभयतां प्रसंगी आहां. तेथें आह्मींच असो. इकडिल संशय किमपिनसावा. लक्ष दुसरें होणारच नाहीं. तेथील हे निशा आपली येऊन, त्यांची करावी. बहूत काय लिहिणें हे विनंती. मोर्तबसुद.

पत्रांक १२२

श्री.
पौ चैत्र वद्य ११ गुरुवार,
१६९६ चैत्र वद्य ६

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूरावजी स्वामीचे सेवेसीं:-

पोष्य कृष्णराव नारायण सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता चैत्र वद्य षष्ठी जाणोन मुा लष्कर नजीक मोहळ जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष आपणाकडून शुद्ध एकादसी व पौर्णिमेची पत्रें आलीं ती पावोन सविस्तर मजकूर कळला. इकडील मजकूर तर तपसीलवार तीर्थरूपांचे पत्रावरून व राजश्री लक्ष्मणपंत यांणीं लिायावरून लिहून कळेल. एका दोहों दिवसांनी सड्या फौजा होणार, मागाहून तपसिलवार लिहून पाठवूं. त्या सैन्यांतून राजश्री सदाशिव हरी आले आहेत. कांहीं सूत्रही आंतून आहे. कसें काय आहे, पुर्तेपणीं कळलें ह्मणजे लिहून पाठवूं. कसेंही सूत्र आलें तरी इकडील मिजाज कायम आहे. चिंता नाहीं. राजश्री हरीपंत तात्याकडे आह्मीं व राजश्री दादा जात असतों. बहुत ममता उत्तम प्रकारें करितात. तात्यांचे साधन बरें राखिलें आहे. चिंता न करावी. पत्रें वरचेवर पा असावीं. घोड्याविशीं लिा त्यास, एक घोडा तुरकी, फारच चांगला, गुदस्तां यांनीं अडीच हजार रुपयांस घेतला होता, तो तयार आहे. परंतु एकच घोडा पाठविल्यास राजश्री बापूंसही पा पाहिजे. दुसरा तूर्त पाठविण्यास सोय पडत नाहीं. याजकरितां न पाठविलें. तूर्त विकतही घेईन ह्मटल्यास मिळत नाही. व ऐवजही नक्त द्यावयास नाहीं. याजकरितां पाठवायास आजपावेतों अनमान जाहला. यजमानाचें मानस कीं, पाठवणें. तेव्हां दोन पा. त्यास दुस-याची तरी तूर्त सोय पडत नाहीं. याजकरितां तेथून राऊत कोणी येईसें असल्यास त्याजबराबर एकच पा ह्मणून लिा तरी एकच पा देतों. घोडा आहे हा फार चांगला आहे. हा राजश्री नानांचे मर्जीजोगीच आहे. येमनीपेक्षां अधिक चालणारा आहे. पाहिल्यानंतर कळेल. राणी मल्हार[र] पानशे येथें येणार ह्मणून वर्तमान ऐकितों. त्यांजबरोबर राऊत येऊन माघारे जातील त्यांजबराबर पत्र देतों. बहुत काय लिहिणें? लोभ करावा. हे विनंती.

पत्रांक १२१

श्री. ( नकल )
१६९६ चैत्र वद्य ६

उभयतांचे सेवेसीं. बाळाजी गणेश कृतानेक सां नमस्कार विज्ञापना येथील कुशल चैत्र वद्य ६ जाणून स्वकीय लेखन आज्ञा केली पाहिजे. इकडील सविस्तर श्रीमंत राजश्री तात्यासाहेबांचे पत्रावरून सविस्तर श्रवण होईल. मुख्यांचा एकदा साबित आहे. विलग पडणार नाहीं. खातरजमा असो द्यावी. मेहनतेस अंतर करीत नाहीं. चाकरी मगदुराप्रमाणें करीत आहों. पसंत करणार आपण आहेत. इलजाम येणार नाहीं. सर्व यथास्थित आहे. हरघडी कृपापत्रीं सांभाळ करावा. हे विज्ञापना, राजश्री सदाशिव हरी मकार नामकाचे तर्फेनें आले आहेत. बोलण्यांत आलें कीं, बाईंस व नानासाहेबांस एक करावें. कित्तेक मायेममतेच्या गोष्टी बोलतां, यांचे बोलणें होऊन, राजश्री हरिपंत तात्यांस समजल्याउपरी ,जें होईल तें सेवेसीं लिहून पाठवितों. हे विज्ञापना.

पत्रांक १२०

श्रीशंकर. ( नकल )
१६९६ चैत्र वद्य ६

वडिलांचे सेवेसीं. साष्टांग नमस्कार विनंती येथील क्षेम ता चैत्र वा ६ मंदवासर पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्रें दोन जासुदाबरोबर पाठविली तीं पावलीं. वर्तमान कळलें. पाटणकर वगैरे यांचे विद्यमानें सूत्रें लागलीं आहेत व तेथून सरकारचा कोणी कारकूनही गेला आहे म्हणोन येथें बातमी आली आहे, त्यास शोधांत आसोन जे गोष्टीनें मुस्तकीम राहे तें करावें, म्हणून लिहिलें. त्यास, सूत्रें बहुत येतात. येथून कारकून कोणी गेला नाहीं. सूत्रें येतात. परंतु येथें ती अलक्ष आहेत. चिंता न करावी. उतावळीनें मामांनीं यश त्यास दिल्हें. उपाय नाहीं. ते दिवशीं सबूरी केली असती तर रात्रौ हे मिळाले असते. हे वीस कोसांची मजल सडे स्वारीनशीं नाझरेयानजीक माणेवर तृतीय प्रहरीं आले. जीन हालविले. रात्रौ जीन ठेऊन मामाजवळ जावें, हा इत्यर्थ केला. तों सूर्यास्तीं पळ मामाकडील आला. तेव्हां जीन ठेऊन तयारी करून उभे राहिले, पळ आला, त्यास खातरजमा करून पाठीशीं उतरविलें. प्रातःकाळीं राजश्री हरीपंत तात्या व सर्व सरदार आले. तेथेच मुकाम केला. नबाबही लांब मजल करून तेथेंच आले. सर्व एकत्र होऊन पुढें चाल धरिली. नबाब निजामअल्ली याचा पुतण्या येत होता, त्याजवर श्रीमंत धांवले. त्यास धरून नेलें, हेंहि वाईटच जाहालें. परंतु मिजाज कायम आहे. काल कूच करून येथें आले. आज कूच करून पुढें जात आहेत. श्रीमंतांचा मुकाम काल नलीमचा होता. विसां कोसांची तफावत आहे. लवकरच गांठ पडते. ईश्वरसत्तेनें परिणामही उत्तमच होईल. सर्व सरदारांची मिजाज हा कालपावेतों कायम आहे. पुढें ईश्वर बरेंच करील. चिंता न करावी. बहुत काय लिहिणें ? तीर्थस्वरूप भाऊकडून सांडणीस्वार दोन वेळ आला. वर्तमान लिहिणें म्हणून आज्ञा होती. त्यावरून दोन वेळ पत्रें लिहून संकलित वर्तमान लिहून पाठविलें आहे. कळावे. हे विनंती.
वडिलांचे सेवेसीं आपत्यें गणेश नारायण सां नमस्कार, विज्ञापना, आनेशिवाय किमपि गैरवर्तणूक व्हावयाची नाहीं. हे विज्ञापना.

                                                                             लेखांक ३५३

                                                                                                श्री                                                        १६१३ भाद्रपद वद्य १३

                                              349                                      349 1

स्वस्ति श्री राज्याभिषेकशक १८ प्रजापति नाम संवत्सरे भाद्रपद बहुल त्रयोदसी सौम्यवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति याणी बेरड किले पुरंधर यासी दिल्हे अभयपत्र ऐसे जे रा। सर्जाराव जेधे देशमुख रोहिडखोरे हे हुजूर एऊन विनंति केली की पुरंधरचे बेरड किबलियानसी आपणाजवळ आहेत जरी स्वामी कृपाळु होऊन बेरडास अभयपत्र देतील तरी पुरंधरचे राजकारण करून गड हस्तगत करून देतील ह्मणोन त्यावरून हे अभयपत्र दिल्हे असे तरी तुह्मी पुरंधरची हवी करून गड हस्तगत करून देणे कोण्हेविषी शक न धरणे स्वामी तुमचे चालवितील आपले दिलासे असो देऊन एकनिस्टेने स्वामिकार्य करणे तुमची अनकूलता करून चालवायाविसी राजश्री शंकराजी पंडित सचिव यास लिहिले आहे ते चालवितील कोण्हेविषी चिंता न करणे अभय असे जाणिजे तुह्मी पुरंधर हस्तगत करून दिल्हा ह्मणजे स्वामी तुमचे ऊर्जित करितील अभय असे जाणिजे निदेश समक्ष

                                                                                                                                                                  190

 

रुजू

पत्रांक ११९

श्री
पौ चैत्र वद्य ११ गुरुवार
१६९६ चैत्र वद्य ६

आशिर्वाद. उपरी. राजश्री भवानराव प्रतिनिधी चतुर्थीचे दिवशी रात्रौ श्रीमंताच्या लष्करांतून निघोन इकडे यावयाचे उद्देशें आले. त्यांचेमागें, राजश्री सखाराम हरी धांवले होते. परंतु त्यांची यांची गांठ पडली नाहीं. सखाराम हरी माघारे गेले. प्रतिनिधी अद्यापि या लष्करांत पोहोंचले नाहीं. त्यांचा ब्राह्मण व खिजमतगार काल रात्री लष्करांत आले. तेही आज येतील. राजश्री मामा तिकडे गेल्यावर तात्या वगैरे सर्व सरदार नाझरेयाचे मुकामीं एकत्र जाहले. उपरांतीक पत्रें तात्यांची व येथील देऊन प्रातःकाळीं सांडणीस्वार आपणाकडे रवाना केला. त्याचें उत्तर अद्यापि आलें नाहीं. सांडणीस्वार पोंहचला न पोंहचला हें कळत नाहीं. मामांचे वर्तमान तेथें कळल्यानंतर पुढें मसलत काय जाहली, हें सविस्तर ल्याहावी. येथील प्रकार तरीः मामा गेले ह्मणून कोणी आंव टाकिला नाहीं. मुस्तकीम आहे. चिंता न करावी. या उपरी गांठ पडेल ते दिवशीं काम कैसे होतें हें प्रत्ययास येईल. भगवंतास ऐसें करणें होतें. याजकरितां ते दिवशीं सेना-साहेबसुभा समयास नव्हते. जर करतां असते तरी मामांस उतावळी करूं न देते. इतकेंही असोन गांठ पडती, तर निघाले नसते. ईश्वरसत्तेने होणें तें होतें. ते दिवशीं वीस कोसांची मजल करून नाझरेयावर आले. रात्रौ मामांस मेळवावें. ते सूर्यास्तीं मामाचा पळ येऊं लागला. तेव्हां तयार होऊन उभे राहिले आणि मामाकडील पळ आला त्यास धीर भरंवसा देऊन पाठीसी उतरविलें ते दिवशीं ही फौज तेथें नसती तर मामाकडील पळाचा बहुत नाश होता. ईश्वरें कृपा केली. दुसरे दिवशीं मामाकडील फौज जमली. अविंधही आला त्या दिवसापासून सर्व संनिधच राहतात. एका दों रोजां गांठ पडेल, ऐसें दिसतें. मार्गानें जासूद निभावत नाहीत. याजकरितां पत्रें लिहिणें ती नांवें करून न ल्याहावी. 'विनंती उपरी' म्हणून ल्याहावीं. लखोटयावर मात्र नांव ल्याहावें ह्मणजे ठीक पडेल. बहुत काय लिहिणे ? लोभ किजे. हे आशिर्वाद.

राजश्री नाना स्वामीस सां। नमस्कार विनंती. सविस्तर अर्थ लिहिलाच आहे. त्यावरून कळेल. तिकडील अर्थ इत्तंभूत लिहिला पाहिजे. येथील चिंता न करावी. मुस्तकीम आहे. हे विनंती.