लेखांक ३५०
श्री १६१३ भाद्रपद शुध्द २
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक १८ प्रजापतिनाम संवत्सरे भाद्रपद शुध्द द्वितीया मदवासर क्षत्रियकुलावतंस श्रीराजाराम छत्रपिति याणी येसजी मालुसरा यासि आज्ञा केली ऐसी जे रा। सर्जाराऊ जेधे देसमुख रोहिडखोरे याकडील लोकाचे माणसे त्या प्रांते होती त्यावरी तू स्वारी करून कितेकाची वस्तभाव लुटून नेली व बापूजी खडकीया अफराद याची बाईल धरून नेली आहे मनास येसी धामधुम करितोस ह्मणोन हे वर्तमान हुजूर कलो आले तरी ऐसे कराया तुजला काय गरज काये काही समध नसता लोकाची घरे लुटावी बाइला धरून न्याव्या हे ढंग तुजला का आठवले आहेत यावरून वरजोर नतीजा पाठवावा परंतु एक वेळ स्वामीने क्षमा करून हे आज्ञापत्र सादर केले असे तरी याउपरी तर्ही ऐसी बदरावा वर्तणुक करीत नव जाणे सर्जाराऊ जेधियाकडील लोकांची वस्तभाव जे नेली असेल ते सारी परतोन देणे बापूजी खडकीयाकडील वस्तभाव व त्याची बाईल तू नेली आहेस ते त्याची त्यास देणे फिरोन ये गोस्टीचा बोभाट येऊ न देणे पुढे ऐसी बदरावा वर्तणूक करून बदनाम न होणे ताकीद असे जाणिजे निदेश समक्ष
रुजू
सुरु सुद बार