Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १३५
श्री.
१६९६ अधिक वैशाख शुद्ध ८
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नरसिंगराव स्वामीचे सेवेसीः-
पोष्य सखाराम भगवंत कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. आपण पत्र पाठविलें ते पावलें. लिहिला मजकूर सविस्तर कळला. श्रीमंतांकडील लोकांचा मजकूर लिहिला ते कळला, सरंजामी वगैरे यांचे घरीं निकड करावी ह्मणोन लिहिले. त्यास निकडच झाली आहे. याउपरे बोभाट लवकरीच होतील. रा छ ७ सफर. बहुत काय लिहिणे ? लोभ असों दिजे हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३५५
श्री १६१६ श्रावण शुध्द १३
राजश्री विनाजीराम हवलदार व कारकून ता।
रोहिडखोरे गोसावी यासि
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक मल्हार येसाजी सुभेदार व कारकून सुभा मावळे प्रा। राजगड नमस्कार सु॥ खमस तिसैन अलफ बदल देणे इनाम सेत मा। बाजी सर्जाराव जेधे देशमुख ता। भोर बा। सनद राजश्री पंतसचिव छ १० रबिलाखर सन अर्बा पौ। छ ११ जिल्हेज तेथे आज्ञा की देसमुख मा। याणी विदित केले की आपणास पुर्वीपासून इनाम मोजे वेनवडी ता। मजकूर येथे जमीन कास टके ६ साहा पुर्वीपासून चालिला आहे तेणेप्रमाणे चालवणे ह्मणौन विदित केले मौजे मजकुरी पुर्वीपासून याचा इनाम चालिले असेल त्याचा भोगवटा मनास आणून हाली चालवणे ह्मणौन आज्ञापत्र सादर आहे त्यावरून तुह्मास सनद सादर केली असे तरी मौजेमजकुरी भोगवटा मनास आणून सदरहू इनाम चालवणे साल दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे तालिक लेहोन घेऊन असल सनद फिराऊन देणे छ ११ जिल्हेद मोर्तब सुद सदरहू इनाम सेत कीर्दी करितील त्यासी मलिकराचे कारकिर्दीचा भोगवटा दाखवितील तो मनास आणून सेत इनामती दुमाले करणे प्रस्तुत सदरहू गावीचे इनाम याचे दुमाले केला आहे किर्दी करू देणे जाणिजे मोर्तब सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १३४
पौ अधिक वा ४ शुक्रवार
श्री.
१६९६ अधिक वैशाख शुद्ध८
अपत्यें तात्यानें चरणांवर मस्तक ठेऊन सां नमस्कार विनंती येथील क्षेम ता. अधिक शुा ८ इंदुवासर मुकाम चिखलठाण, नजीक औरंगाबाद, वर्तमान यथास्थित असे. विशेष. श्रीमंत ब-हाणपुरच्या रोखें फर्दापुरच्या घांटास गेले. आज घांट उतरील. हे मुक्काम मजकुरीं शुक्रवारीं आले, अविंधाचे शहरास येणें बहुतां दिवशीं जाहालें, याजकरितां दोन मुकाम जाहाले. आज कूच जाहालें, मजलदरमजल त्यांचे पाठीवर जात आहेत. त्यांस यांस चाळीस कोसांची तफावत पडली आहे ! पुढें कैसें होतें ते पहावें. बहुत काय लिहिणे ? लोभ करावा. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १३३.
श्री.
पौ अधिक वा ४ शुक्रवार
१६९६ अधिक वैशाख शुद्ध ८
आशिर्वाद उपरी येथील क्षेम ता अधिक शुा ८ इंदुवासर मुा चिखलठाण वर्तमान यथास्थित असे. विशेष. बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी ऐसें नसावें. सदैव आपणाकडील कुशलार्थ लिहीत जाणें. विशेष. राजश्री नानांचें पत्र अमावास्येचें आले होतें. त्यांत लिहिलें होतें कीं, रावजी प्रतापगडास गेले, मातुश्रीस समाधान वाटत नाही, त्यावरून चिंता लागली आहे, त्यास, आरोग्य जाहलीयाचें वर्तमान लिहिलें पाहिजे. राजकी वर्तमान तरीः श्रीमंत फर्दापूरच्या घांटास गेले. आज घांट उतरले असतील, ब-हाणपुरच्या रोखें जातात. नबाबाकरितां दोन मुकाम हे फौजेचे येथें जाहाले. आज कूच जाहालें, मजलदरमजल त्यांचे पाठीवर जात आहेत. यांस त्यांस चाळीस कोसांची तफावत पडली आहे. पुढें काय होईल तें पहावें. प्रस्तुत मसलत लांबणीवर पडली, ऐसें दिसतें. ब्राह्मण मंडळी तर नित्य उठोन तिकडून येतच आहे. परंतु, मराठे मंडळींत अद्यापि कोणी येत नाही. मराठे फुटल्याविना ठीक पडतां दिसत नाहीं. सेनासाहेबसुभा यांचें वर्तमान तरीः नित्य उठोन धरणींपारणींच आहेत. सवा लक्ष देतात, त्याणें त्यांचे कांहीं होत नाहीं ऐसा प्रकार पडला आहे. राजश्री हरिपंत तात्या काल येथें आले होते. बोलणें चालणें जाहालें. परंतु, तात्पयार्थ, जिसे प्रों देऊं; अधिक मिळत नाहीं, यांस तरी तितक्यानें होत नाहीं. तात्यांचे कूच होऊन मजलीस जातात. यांचे कूच होणे कठीण पडतें. तेव्हां हिकडून तिकडून करून कूच करितात. कधी मध्यरात्रीस कधीं प्रहर रात्रीस मुक्कामास जातात ! याप्रमाणें प्रकार पडला आहे. परिणाम ईश्वर लावील, तरच लावूं. एरव्हीं ठीक दिसत नाहीं. विस्तारें काय लिहावें ! लोभ किज. हे आशिर्वाद.
राजश्री नाना स्वामीस सां नमस्कार विनंती उपरी. आपली रवानगी होणार, सत्वरच येतों म्हणोन लिहिलें, त्यावरून संतोष जाहाला. आपलें येणें होईल तरी उत्तम आहे. यादव वगैरे मराठे यांचे विचारें जातीनें कारभार करावा, ऐसें आहे. त्यामुळें हीं तिडणीं पडतात. पुढें काय होईल तें पहावें हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १३२
श्री.
पौ अधिक शुद्ध.
१६९६ अधिक वैशाख शुद्ध १
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री बाबूरावजी वैद्य यांसीः-
प्रति लक्ष्मण बल्लाळ आशिर्वाद उपरी येथील क्षेम ता अधिक शुद्ध १ मुा लष्कर नजीक किल्ले नगर वर्तमान यथास्थित असे. विशेष. हरिभक्तपरायण राजश्री मार्तंडबाबा वास्तव्य जेजुरी हे राजश्री सेनासाहेब सुभा यांचे गुरु आहेत. त्यास प्रस्तुत गडबड आहे. यांचे मुलांमनुष्यांचे संरक्षण जाहालें पाहिजे. याकरितां राजश्री नानासाहेब यांनीं राजश्री नाना फडणीस यांस व तुह्मांस पत्र लिहिलें आहे कीं, किल्ले पुरंधर येथें घराची सोय करून देऊन सांभाळ करावा. त्यास, हे आपणाकडे येतील, तरी, यांची भेट करून देऊन, यांस स्थळ देऊन, संरक्षण होय तें करावें. व करडेरांजणगांव येथील फडणीसी यांचे जामातास करून द्यावी. येविशीं यजमानांनी लिहिलें आहे. त्यास, आपण साहित्य करून, सनद फडणीशीची करून देवावी. हे थोर तपस्वी आहेत. जेजूलिंगही यांस प्रत्यक्ष आहे. यांनी राजश्री नाना फडणीस यांच्या कल्याणाविशीं व संतानाविशीं सांगितले आहे. त्यास, तुमची भेट जाहल्यास पुसावें म्हणजे सांगतील, त्याप्रों त्यांच्या कानांवर घालून, त्यांसी यांसी गांठ घालावी. ह्मणजे यथास्थित होईल. हे निस्प्रह आहेत. कांहीं आशा धरून सांगतात, ऐसें नाहीं. आणि जें सांगतील त्याप्रो घडेल, यांत अंतर नाहीं. आह्मांवरही कृपा करितात. आपली भेट जाहालियावर आपल्याहि प्रत्ययास येईल बहुत काय लिहिणें ? लोभ किजे, हे आसिर्वाद.
राजश्री नाना स्वामीस सा नमस्कार, विनंती. लिा प्रों अगत्य साहित्य करावे, हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १३१.
श्री.
१६९६ वैशाख अधिक शा ३.
सेवेसीं नारो आपाजी सां नमस्कार विज्ञापना. आजी गुरुवारीं प्रातःकाळीं राजश्री कृष्णराउ बल्लाळ घरास आले. मध्यरात्रीं राजश्री भवानराउ प्रतिनिधी आले, सडे लांब लांब मजली करून आले. तेथें त्यांचे राऊत दादाजवळ होते ते व पालख्या दोन पुढें कोरेगांव पावेतों गेले होते. विदित जालें पाहिजे. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १३०
श्रीरामजयती १६९६ अधिक वैशाख शुद्ध १
वडिलांचे सेवेसीं साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील क्षेम तागायत वैशाख शुा १ पर्यंत मुा लष्कर येथें श्रीमंत मातुश्री बाईसाहेब असों. यानंतर वडिलांकडून सांप्रत आशीर्वादपत्रें येऊन वर्तमान कळत नव्हतें त्यास हालीं मानाजी कलमे यांजबराबर आशीर्वादपत्रें पा तीं पावलीं. पावोन लिहिला मजकूर सर्व ध्यानात आला. कित्तेक प्रकारें सावधपणें लिहिलें. त्याप्रमाणेच माझी चालीची रीत आहे. चिंता न करावी. इकडील वर्तमान तरः राजश्री त्रिंबकराव मामांनीं सड्या फौजा करून राजश्री आनंदराव रास्ते व राजश्री वामनरावजी आपले फौजेसुद्धां श्रीमंतांजवळून निघोन बुणगें बागलकोटास टाकून मामाजवळ वडगांव जयरामस्वामींचें या मुक्कामीं येऊन पोंहचले. राजश्री विठल शिवदेव व नारो शंकर वगैरे पथकें मिळोन चवदा-पंधरा हजार फौज व श्रीमंत राजश्री नानासाहेब यांची फौज व नबाबाकडील जाबितजंग व श्रीमंत सेनासाहेबांची चार पांच हजार फौज, याप्रमाणें एकत्र होऊन, सडे होऊन, श्रीमंतांवर पाठीमागें गेले. श्रीमंतांनी मिरजेहून कुच केलें. ते विसां कोसांच्या मजली करून श्रीपंढरीवर गेले. मामांनी पाठीवर जाऊन कासेगांवास मुकामास वीस बावीस कोस चालून आले. धौशा व श्रीमंत नानासाहेब मागेंच होते. तों मामास चिठी आपलेकडील यजमानाची आली कीं, आज तुह्मीं माघारे सरून राहणें. याप्रमाणे जालें. तों मामांनी विचार केला कीं, फौजेंत फितूर आहे, या वेळेस लाग करावा. ह्मणोन अंदेशा न करितां तयार होऊन पुढें जावें तों श्रीमंत खासा सात आठ अंबा-या वीसपंचवीस हजार फौजेनें तोफखाना पुढें घालून, गाडदी वगैरे चालून आले. तों दोन सरबत्या तोफांच्या जाल्या. इकडून मामांनी उजवे बाजूस रास्ते, विठल शिवदेव व डावे. बाजूस राजश्री वामनराव उठले, तों बाजू मोडून श्रीमंत दादांचे लोक मार्गे सारिले. तो हुजुरांत पांच सात हजार मामांवर तुटोन पाटणकर, निंबाळकर आले. तों निशाणाचा हत्ती नेला. हत्ती पोट घालून मामावर मिठी पडली. तो फौज उधळली, मामाजवळ राजश्री निळकंठराव थोरात व फकीरजी खडतरे उड्या टाकून उभे राहिले. मामावर जखमा डोईस वार तरवारेचा, एक खांद्यावर, एक कुशीस, एकूण तीन वार होते. पाडाव त्रिवर्ग गेले. फौजा झाडून निघाल्या. तो पांचा सा कोसांवर श्रीमंत नानासाहेब मार्गी भेटले. श्रीमंत मुकामास गेले. मामांनीं उतावळी केली. सा-या फौजा एकत्र झाल्या असत्या तर चिंता नव्हती. परंतु होणारापुढें उपाय नाहीं. आमची थोडीबहुत फौज. बुनगियांत नबावाचे पिछाडीस श्रीमंत मातुश्री व सेनासाहेब होते. याप्रमाणें घडलियावर, राजश्री हरीपंत तात्या निभाऊन बुग्यांत आलें. सर्वांचें समाधान राखून गाहा फौजेचा राखला. श्रीमंत कूच करून मजल-दर-मजल परांड्यावरून, नगरावरून टोंक्यास गंगातीरास गेले. सा-या फौजा पाठीमागें. नबाबसुद्धां नगरच्या मुकामास आज आलों. राजश्री त्रिंबकराव मामा श्रीमंतांबराबर अटकेंत होते. ते जखमांनी हैराण होऊन मार्गांत खडकतच्या मुकामीं देवआज्ञा चैत्र वा ८ रविवारीं जाली ! ईश्वरसत्तेपुढें उपाय नाहीं ! आतां नबाबसुद्धां पाठीमागें जात आहेत. सर्व कामांत तात्या आहेत. पुढें होईल वर्तमान तें वरचेवर लिहून पाठवीन. राजश्री अंताजीपंतास वडिलीं पत्रामागेंच पाठवितों म्हणून लिा. परंतु पंतमारक्ल्हे आले नाहींत. तर, सत्वर पाठविले पाहिजेत. घरी गडबडीमुळें एक सर्रास निघोन जाणें जालें. ऐशीयास, प्रस्तुत वडिलीं स्वस्थ असावें. गडबड तिकडील वारली. घरास यावें. परंतु सावध असावें. काळ कठिण आला आहे. आम्हांविशीं चिंता न करावी. शरीरेंकरून हा काल पावेतों आरोग्यें असों. देशांत दरवडे पडतात ह्मणोन कळलें. ऐशीयास, रात्रींबित्रीं सावध असावें. दुसरें येथें आह्मी वडिलांचे आज्ञेप्रमाणेंच असों. खर्चाची निकड घरीं असेलच. बरें. सर्व चिंता श्री रघुवीर स्वामीस आहे. आजच राजश्री माहादाजीपंत नानास पत्रें येथून रवाना केलीं आहेत. पूर्वी लिहिल्याप्रमाणेच तेथून सत्वरच घडेल. बिडाकडे पागा गेली आहे. तेथे जफ्ती गेली आहे. येथे बोली स्वकीयांचे हातून पंचविसां राऊतांची करितों. एका दों दिवशी बिडास माणूस पाठवून घोंडी आणवितों. वाटेचें संकटच आहे. युक्तीनें आणवितों. चिरंजीव सौ गोपकाबाईचा मजकूरः भुतें गत घेतों म्हणतात, म्हणोन लिहिलें. उत्तम आहे. जें आपलें घरांत नाहीं तेच भगवंत आणितो ! चिंता केलियानें काय होतें ? जे गोष्टनीं विष्टगत घेत तें करावें. वडिलीं लिहिलें की, जें करणें तें युक्तीनेच करीत जावें, ऐशियास, कोणेविशीं चिंता नाहीं. अंताजीपंतास घरास एकंदर जाऊ देऊ नये. आम्हांकडे पाठवावें. त्यां समागमें आमची पालखी पुणियांत आहे ती पाठवावी. तबकडीखेरीज सामान असेल. ऐशीयास, पाठविली पाहिजे. शरीर अशक्त म्हणून चिंता न करावी. प्रसंग दिवस मेहनतीचे पडले आहेत. श्रीमंत मातुश्रीची ममता उत्तम प्रकारें आहे. मर्जीनुरूप सांगतील चाकरी तें करून असों. सर्वांसीं इष्टत्वें रक्षुन असों, राजश्री वामनरावजीची व राजश्री तात्यांची भेट एका दों दिवशी होत असते. श्रीमंतांचे फौजेतून लोक पथके कोणी कोणी आले. राजश्री भवानराव प्रतिनिधी व मलबा पानशे व नसिंगराव धायगुडे निघोन काल आले. तेथील फौजेचा धर सुटला आहे. पोटास एक पैसा नाहीं. पुढें घडेल तें पहावें. राजश्री रामाजीपंत कोंकणांतून आले नाहींत. त्यास बोलावू पाठवावें. परी घोडी सबर नसली तर कवडीस पाठवून काढवून आणावी. भिकूस पाठविला ह्मणजे काढऊन आणील. तर पाठविली पाहिजे. शिंग्यावर खोगीर ठेविलें म्हणून कळलें, उत्तम केलें ! दसरा पावेतों वर बसू नये. मग मर्जीस येईल तें करणे. पुरण दूध मिळत नाही, तर आबाळन ( न ) होईल ते करावें. बाळंभट केळकर यांचे रुा एकशें त्र्येपन आम्ही देणें होते ते वडिलीं दिले असतील, नसले दिल्हे तर द्यावे. आपल्यावर मातुश्रीची ममता आहे. या पत्रामागें आपल्या येण्यविशीं पत्रें येतील त्याप्रों यावयाचें करावें. चिरंजीव बाळाजी दिनकर याचें लग्न करावें. आळसावरे घातलियावर ठीक नाही. मूल तर चांगली आहे. जातें समईं विनंती केली होती. तेणेप्रमाणें भीड घालून करावें, जानोजी शिंदे व लिंबाजी शिंदे आपआपले ठिकाणीं पागासुखां सुखरूप आहेत. वरकड वर्तमान मागाहून लिहून पाठवितों, बहुत काय लिहिणे? हे विज्ञापना. इ०
राजश्री धोंडोपंत दामले स्वामीस सां नमस्कार विनंती उपरी लिा पा. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लोभ करावा हे विनंती. रा यशवंतराव यांस नमस्कार लोभ करावा हे विनंती. वो, नारायणभटजी काका सां नमस्कार विनंती. उपरी लिा पा. पत्र पाठवावयास अनुकूलता न जाली ! असो. परंतु उचित असेल तेच करावें, आम्हांविशीं चिंता न करावी म्हणोन ती मातुश्रीबाईस सांगावे. हे विनंती इ०
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १२९.
श्री
पौ अधिक वैशाख शुा १० गुरुवार.
१६९६ चैत्र वद्य १४.
राजश्री नानाजी कृष्ण जोशी व बाबूराव विश्वनाथ बैद्य गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष, हरीभक्तपरायण राजश्री मार्तंड बाबा, वास्तव्य श्री जेजूरी, हे आह्मांस पूज्यमान आहेत. सांप्रत गडबडीच्या प्रसंगाकरितां मुलेंमाणसें सुस्थळी असावीं म्हणोन यांचा मानस. त्यास विज्वर प्रसंगच रुबकार जाहलियास किल्ले पुरंधर समीप आहे. आपण राजश्री सखारामपंत बापू व राजश्री बाळाजीपंत नाना यांस सांगोन, निरोपद्वार्थ किल्ले मजकुरीं एक घर यांच्या मुलांमाणसांस देऊन सांभाळ करवावा. व पा करडेरांजणगांव यांच्या प्रघातांत आहे. तेथील फडणिशीची असामी यांचे ज्यामात आनंदराव भैराळ यांसीं करून देवावी. स्वदेशी चरितार्थ होईल, येविशीं आम्ही राजश्री नानांस पत्र लिहिलें आहे. प्रसंगीं येविशीं त्यांस सांगोन सदरहू कामें करून देविलीं पाहिजेत. बावाचें अवश्यक आम्हांस आहे. त्याप्रमाणें तुम्हीं अगत्य'वाद धरून उभयतांकरवीं ममता करवावी. येविशीं अनमान सहसा न करावा. रा छ २७ माहे मोहरम. बहुत काय लिहिणे ? हे विनंती. मोर्तब सुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १२८
श्री.
पौ चैत्र वा ११ गुरुवार
१६९६ चैत्र वद्य
सेवेसी विनंती ऐसीजे. पालखी तयार करविली आहे, तयार जाहाली, पाठवितों ह्मणून लिा त्यास, सरंजामसुद्धां आपली पांबडी येईल त्याबरोबर पा. येथे दुसरी करीत नाहीं. बेदाणा, मनोका, एक रुपयाच्या जासुदा समागमें पा. एक घोडा सिद्धच आहे, परंतु दुसरा मेळवून पाठवणें, ऐसें यांचें मानस, त्यास, दुसरा चांगला मिळत नाहीं. कारवानी आले होते. त्यांत पाहिले; परंतु आमचेच पसंतीस न ये. तेव्हां उपयोगी कैसा पडावा? यजमान तों पेंचामुळें संकोच्यांत पडतात. त्याशीं एकच पाठवावा. ऐसेंच वडिलांच्या विचारें जाहालें तरी लिहावें. तिकडील स्वार कोणी येतील त्यांस सांगावें. त्यां समागमें पाठवितील. गुंता नाहीं. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १२७
श्री.
पौ चैत्र वा १२ शुक्रवार
१६९६ चैत्र वद्य ९
राजश्रियाविराजित राजमान्य राजेश्री नाना व तथा राजश्री बाबूरावजी स्वामीचे सेवेसी:-
पोष्य हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल तो छ २३ मोहरम मुा नजीक परांडा जाणून स्वकीय कुशल लिहित जावें, विशेष, तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर सविस्तर कळला. उभयतांनीं राजश्री साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा यांस पत्रें पाठविलीं, तीं त्यांणीं मला दाखविलीं. आह्मी सर्व मंडळी एकरूप असों. कोणेविशीं गुंता पडूं देत नाहीं. . ईश्वर उत्तमच करील. इकडील सविस्तर राजश्री तात्यांचे लिहिल्यावरून कळेल. श्रीमंत वीस कोस पुढें आहेत. आह्मी मोंगलांकरितां गुंतलों. याउपरी सडे होऊन पाठलाग करतों. त्यांणीं पळावयाची शकल काढली आहे. आह्मी पाठीस लागलों असतां कोठें जातात ! तात्या सुखरूप आहेत, चिंता न करावी. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंती.