पत्रांक १०२
श्री.
१६९६ चैत्र शुद्ध ३
विशेष. इकडिल वर्तमान वारंवार दिनचयेंचें वारंवार लिहित गेलों, त्याजवरून कळलेंच असेल. दरपत्रीं मजकूर कीं, पंढरपुराच्या सुमारें लौकर यावें. त्यास, गंगातिरींहून लांब मजलींनी दर मजल बारा गांव चढोन आलों. त्यास मसलत लहान नव्हे. तोरा असावा, तो प्रकार नाहीं. जर या कामास रा नाना अगर रा बापू असते तरी तोरा होय. ते प्रसंगीं नाहींत. रा मामाचा फडदा उघडं नव्हे. विश्वास कोणास पडतो, कोणास पडत नाहीं. भोंसले यांच्या घराचा प्रकार विज्वर, या प्रकरणीं मोंगल तरी असावा. मोंगलांकडील राजकारण येथें. आह्मांकडील ममता पुर्तेपणीं पाहिलीच आहे. आणि तिकडेहि खचीत. मित्राचा मित्र म्हणजे आपला मित्र सहजेंच होतो. या प्रकारें सोयरेपण होतें. पत्रीं दोरा अनुसंधान लागलेलेंच होते. त्या अर्थी ज्याबितजंग, धौशे यांसी आणावे या अर्थी खंदारापासोन रा दिवाकरपंत त्यास आणावयासी पा. आणि मोंगलांकडील ज्ञानराव गिरधर मोंगलाकडे पाठविला. त्यास मोंगलास पत्रें जातांच दरमजल कलबुर्गेयाच्या सुमारे दर कूच पांच सात मजलींनीं आला. आपण व ते एक जालियासीं निमें काम जाहलें. ऐसें जाणून या अर्थी तुळजापुरापासोन सदरहू कलबुर्गीयाचा रोंख धरिला. रा मामाच्या बाणेकारीनें काम जाहलें पाहिजे. याजकरितां त्याजकडील चिमणाजीपंत नि। रा शिवाजी विठ्ठल बापू हे समागमें घेऊन तांब्राच्या सैन्यांत गेलों, आपले लष्कर साहा कोसांच्या अंतरयानें आणिलें. रकनुद्दौला व शर्फुद्दौला दोन तीन कोस इकडून नेले. तिकडून मामास व आपले यजमानास आणिलें. आणि छ १७ जिल्हेजीं दीड प्रहर रात्रीस भेटी केल्या. भिकणखान मेवाती व राजाराम गोविंद श्रीमंत दादासाहेबीं मोंगलांकडे पा होते. त्यांचे राजकारण विध्वंस जाहलें. त्यांचा होश गेला. मोंगलासहि आशंका कीं, दर मजल दादासाहेब आले तरी आपण काय करावें ? कोणी नमूद होत नाहींत, भिकणखानासीं उत्तर काय करावें. हे आशंका त्याची उडाली. प्रांजल जाहलें. हे अर्थ बातमीच्या पत्रीं गेलेच आहेत. अलिकडे छ २० जिल्हेजी शुक्रवारी कोसाच्या अंतरानें लाकर मोंगलासंन्निध करवून, छ:२१ रोज शनीवारी दोन प्रहरां नबाब बंदगानअल्ली यांच्या भेटी जाहल्या. यापुढें आतां निमे मसलत राहिली. ज्याबितजंग, बारा तोफा, तीन गरनाळा समागमें घेऊन येऊन चौकोसांवर दिवाकरपंत आले. आज भेटतील. सवासें तोफ मोंगलाजवळ आहे. या उपरी योजिली मसलत सिद्धीस नेऊन बंदोबस्त करावा, इतका अर्थ राहिला. त्यास मुख्यार्थ कीं, लांबण पडों नये, मामी प्रसंगीं आहेत. त्यांचा मानस होसला, उत्तम आहे. श्रीमंत दर्याबाई व रघोजी भोंसले पांच हजार फौजेनिसी बगलेंत बाळगावे. आह्मांस तरी वडिलच आहेत. मोंगलानें त्याचे आज्ञेंत चालावें. तुह्मांकडील सर्वांनी त्यांच्या धोरण आज्ञेंत असावें. याप्रमाणें आवरणशक्त त्यांची आहे ! चिंता नाही. परंतु जागां जागां प्रस्तें ! आणि समय या प्रकारचा ! याविसी कित्तेक व्यतिरेक गोष्टी पडतात. त्या अर्थी येथे रा बापू व नाना व तात्या उभयतांहीं यावें. अगर तात्या तरी असावेच. उभयतांतून एकजण तरी असावे. हा सिद्धांत पहिला असेलच. लौकर घडला पाहिजे. वरकड एक दोन मजकूर अलाहिदा पत्री आहेत. त्याजवरून कळणार. श्रीमंतास पुर्तेपनें उमजलें. आतां बाकीस राहिलेंच नाहीं. त्यांनी विचार करून मसलत ठैरविली. खर्चास नाहीं. त्याची तजविज, सीरें, बालापूर व गुरंकुडा इत्यादी तालुका हैदरनाईक याजकडे देऊन त्याजपासून कांहीं खर्चास घ्यावें. सनदा करून अपाजीराम यांसी बिदा केलें असे. तेवा नित्यांनी ऐवज द्यावा हा तह. त्यासीं वांजिरे याचा बंदोबस्ती तर असेलच. दुसरी मसलत तोफखाना रा भिऊराऊ पानसे याज कडोन काहाडोन समेरसिंग व मा ईसब याजकडे द्यावा. बेंडा भोंवती गार. द तोफा देऊन मुस्तकीमी करावी. हैदर नाईकांसी जेमियतीविसी लिहिलें होतें कीं, दाहा हजार स्वार व वीस तोफा, चार हजार फौज, ऐसी कुमक द्यावी. त्याचें उत्तर आलें कीं, कृष्णे पलीकडे येणार नाहीं, ऐल तिरीं काम असालिया सरंजाम येईल. तिकडोन निश्चंतीच आहे. श्रीमंत सेनाधुरंधर आव भरनार, त्यासी, त्याची नड अटकली. याजमुळें . कांहीं सौशयास कारन जालेंच असेलच. सेनाधुरंधर रात्रौ एक दिवस पादचाली होऊन, रा वामन राऊजिचे घरीं गेले. बहुत ममता युक्त भासनें केलीं. खुलासा, सरलपन दाखवून, करावा हें मानस ! ते दिवसीं रायानीं समाधानपूर्वक गोष्टी घालून बिदा केला. आतां नित्यानित्ये त्या छंदीं पडल. चित्त मेळवून घेईल. कालबोलीया आहे. चित्त मेळलियास हरएक संधी पाहून घात करील. येवीसी तिकडोन रायास सूचना व्हावी कीं, त्यासी भासन देखील न करीत. ऐसें घडावें. सुचलें आणि कळलें इतकें आपनास आह्मीं ल्याहावेंच, दर्याबाईचा मुधोजीचा विचार, त्यास, त्यांत अंतर नाहीं. परंतु या प्रसंगी आह्मी, तेव्हां निवळ मुधोजी भों याचा गिल्लाही करितां येत नाहीं. तिनें दोन मसलती ठहराविल्या. हरएक मामाचें अर्थ व ममतापूर्वक निखालस सरळपन दाखवून करावें. ये गोष्ट कोठेंही दिसों नये.XXX गल्लीत, गरिबी भासनें, मरयादयुक्त करून कृपेस पात्र व्हावें, आनी जालेच आहेत.त्याचे पोर्टी अर्थलाभ आपा सा नाना सा यासीं बिफिकिरपनें पूर्ववत स्थळें आहेत तेथें ठेवून, आपण जातीनें मुलास नमूद करून करावें, येविसीं वचेन प्रमाण मामाचें घेतलें. बळकटपणें घ्यावें. दुसरी चाल. आपासासीं सुसंधान पकेंपने केलें. आन सपतक्रिया त्यांची आली की, वडिलासी आमरयादा आतां करीत नाहीं, चित्तास येईल तैसे करावें, ताबेदार राहीन. रा दादा-सास संकट पडलें. हें आपले अभिमानी, हे इमानी माझे, तुमचे पद्रीं पडतील. त्यासी, तेथें हरयुक्त करून ममता वाढवून विश्वास दाखवून अविश्वास कांहीं घडलिया बहुत उपयोगी, दादा सा ही समाधान पावतील, पुढेंहि दिवसांदिवस आपली ब्रीद होईल. ऐसेंही भाव आहे. संकलित लिहिलें आहे. परंतु याचे पोटीं महत् अर्थ आहे. कळल्यास अपनास सूचना असावी. मामास विनंती केल्यानें पथें पडत नाहीं. कारण कीं आमचें त्याचें सत्रुत्व मोजतात. आमचे भान सत्रुत्वावर किंवा मसलतीवर हें ध्यानास आनावें. आमचा साहकारी राव. मसलतींत अनुसरून मारिलें. घात केला, कृपेस पात्र. त्याअर्थी कांहीं देऊन पदाधिकारी चिरंजीवास केलें. परभू शाहाना किती ? त्याचा हिसाब काय ? परंतु घातक. मसलतींत वाकफ. या अर्थी कांहीं देऊन आह्मीं आपली कार्यसिद्धी केली. ऐसी वार्ता पाठविली. आह्मी रायासी एकनिष्ट. प्रानही गेला तरी दुसरी गोष्ट होऊंच नये. मृत्येच अंगिकारिला. नाहीं तर दादासाहेबासीं अनुसरितां कृपा करते. अस्तु! ऐसें असतां श्रीनें आमच्या पक्षे उभा केला. त्यापक्षीं याचा उतक्रशें पाहावा, हें घडूंच नये, यांसीं पुढें काय करतव्यें ! भारी सेत्रूपासून सूड घेन, या लक्षावर द्रीष्टी यजमानाची होऊन, तींत कांहीं अभिमान अंगिकारिला. सर्वांनी कृपा पूर्ववत करून, मागती पदयुक्त तें लिहितात. मामा प्रियकर मानितात. आह्यांस मसलतीवर सांगतात, अस्तु! ती चित्तांत आह्मी तिलभर आनीत नाहीं एक निष्ठता घडावी. हा देहे रायाचे कार्यावर लागलिया उपयोग चांगला श्रीनें लक्षिल्यास सर्वांच्या ममतेंत आहोंच. दुसरीयाचा संचार किती !आमचें पद सेत्रुत्वानें नेलियास त्याचें कैसें घढल ? आमचे भाव या रितीचे. तेथें आमचे कामावर काय द्रीस्टी ! याजकरितां सर्व आंगेजून मसलतीवर असो. एक या काळीं हालत नाहींत किंवा ते आपले जागीं मोजतात कीं, आह्मीं आहोंच. असो. आह्मीं वर्तमान सांगितल्या मग खरें कैसें वाटेल ? या अर्थी ऐकिलें तितका इतला आपनास असावाच, ह्मणोन लिहिलेंच लिहितों. त्रास न मानावा. हे विनंती.
पो छ २ मोहरम.