Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७ ] अलीफ १४ जुलै १६५९.
आपले बराबरीचे राजांत श्रेष्ठ, सर्व उमरावांत थोर, महत्कृपेस पात्र, मुसलमान धर्मरक्षक शिवाजी यांणीं पादशाही कृपेचे उमेदवार होऊन जाणावें कीं :- ईश्वरें धर्मवृद्धि व न्याय यथास्थित होण्याबद्दल व जुलूम पृथ्वींतून नष्ट होण्याबद्दल आह्यांस जय होऊन, जे शत्रू धर्म व दौलत याविषयीं उदासीन होते त्यांस पादाक्रांत करुन, छ २४ रमजान रोज रविवार या दिवशीं आह्मांस सिंहासनाधीश्वर केलें. त्या प्रभूचा बहुत उपकार मानितों. तुमची अर्जदास्त अशा संतोष समयांत पावून मजकूर ध्यानांत आला. ऐशियांस तुह्मीं इकडील लक्षांत वागतच आहां, त्याअन्वयें वागून खैरखाही करीत जाणें. हालीं दक्षिणेकडील सुभ्याचे कामावर उमदेतुलमुलूक अमीरुलउमराव ह्मणोन जावयाची योजना करुन तेथील सर्व लोकांचा बंदोबस्त त्यांजकडे सांगितला आहे. तरी तुह्मींही त्याचे सलेंत वागून, वारंवार कोशीस करुन जसें पूर्वींचे बोलणे त्याप्रमाणें अमलांत आणावें. या काळीं ईश्वरकृपेनें जे मनोरथ होते ते मुलूक व दौलत येविषयीचे सिद्ध होऊन कोणतीही इच्छा राहिली नाहीं. जे जे शत्रू इकडील अपकर्षणाची वासना धरीत होते, ते ते आपले केलेले कर्मांचें शासन पावून शेवटीं मुलाबाळासुद्धां बाहेकाराचे सरहद्दीत हस्तगत जाले. ते लवकरच शिक्षाही पावतील. तुह्मीं इकडील लोभ आपणावर पूर्ण आहे असें जाणून लक्षांत वागोन कृपेचें इच्छीत असावें. तुह्मांकरितां येथून पोषाख पाठविला आहे हा घ्यावा. छ. ४ जिल्काद, सन १ जुलूस, सन १०६९ हिजरी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ६ ] अलीफ २४ फेब्रुवारी १६५८
आपले बराबरीचे मंडळींत श्रेष्ठ, सर्व उमराव लोकांत श्रेष्ठ, महत्कृपेस पात्र, बादशाही कृपेस योग्य, शिवाजी भोसले बादशाही कृपेस आपला सत्कार मनांत आणून समजोत कीं - तुमची अर्जदास्त कृष्णाजी भास्कर पंडित यांच पत्रांसुद्धां रघुनाथपंत वकील यांबरोबर पाठवून ( दिलेली पाहून ) मजकूर ध्यानास आला. यद्यपि तुमच्या पेशजीच्या गोष्टी विसरावयाजोग्या नाहींत, तथापि तुह्मी आपले कृतकृत्यांचा पश्चात्ताप केला आणि हा दरबार उपेक्षेचा नाही जाणोन, वडिलांचें लक्ष निभ्रांत इकडे आहे असें समजोन, तुमचें पूर्वकृत्य मनांत आणीत नाहीं. येविषयींचा संतोष मानून, इकडील दौलतीविषयीं कोशीस करीत जावी. आपले " वतनी माहाल, किल्ले व कोकण देशसुद्धां नगरवाले खेरीज विजापूरकर आदिलखानाचे इलाख्यांत जे आहेत ते त्यांजकडून मुलूक हस्तगत जाल्यानंतर बंदोबस्त होण्याविषयी वचन असावें, ह्यणजे लोनोपंत यांस हुजूर पाठवितों आणि इकडील लक्षांत वागून सरकारी मुलुकाची सरहद्द रक्षण करुन कामदाराशीं परीक होतो कीं ज्यायोगें बंड वगैरे बखेडे न होवोत, ह्यणोन लिहिलें. त्यास, तुह्यीं लिहिल्याअन्वयें वर्तून हा फर्मान पाहातांच आपले मजकुराची अर्जी लेहून सोनोपंताबरोबर पाठवून देणें. ह्यणजे त्याप्रमाणें केलें जाईल. जाणोन लक्षांत वागोन आमचे लोभाची पूर्णता समजावी. छ १ माहे जमादिलाखर, सन १०६८ हिजरी.
ताजा कलम - महाराज जसवंतसिंग व कासमखान हे उभयता इकडील फौज आलीशी समजोन उज्जनीहून सहा कोस पुढे लढाईचें इराद्यानें आले होते. परंतु ईश्वरकृपेनें इकडील शूर अस्सल, लौकिकी सहा सात हजार स्वार त्यांजकडील कामास येऊन शेवटीं पळूं लागले. त्यांजकडीस खजीना व तोफखाना व हत्ती वगैरे बहुत कारखाने लुटले गेले. ईश्वरें अशा त-हेनें आमची फत्ते करविली. पुढें आणखी नाना प्रकारचें जें सर्वास संतोषदायक व शत्रूस पादाक्रांति देणार असें सत्वरच होईल. तुह्मीं याविषयींचा संतोष मानून इकडील लक्षांत राहून कल्याणाचे उमेदवार असावें. रा । छ मजकूर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४२७
श्रीशंकरप्रसन्न
राजमान्य राजश्री नारोपंत स्वामीचे सेवेसी
सेवक गुडाजी नाईक नमस्कार विनंति उपरि तुह्मी सारवोरोजी बराबरी पत्र पाठविले ते पावले लिहिले की सालगुदस्ता बा। ११॥. यास रा। गोविंदराऊ याकडे ५॥ व अह्माकडे ६ चावर ह्मणौऊन लिहिता तरी आबाघरी बाइका जाऊन बसले आहे त्यास तुह्मी जाउनी वाटू (न) घेऊन टाकणे व तुह्माकडे जे लागल ते धान चोख व दाविले धारण जो पैका होईल तो व त्याजकडे जो होईल तो लिगाड निर्गमून टाकणे वशगती बा। व्याज कोलगे ५०
० त्याचा पैका व षेपेजरीच धान १८॥२ बाकमी राहिले आहे ते त्याचा लिगाड तुह्मी गोविंदरायापावेतो अपाजी बराबरी जाऊनि वाटूण घेण व धानाचे विशई लिहिले तरी आधी आह्मास देऊन मग कोनास तरी देण आह्मास ने देता आनरवी कोनास द्याल तरी मग तुह्मासी बोलानार नाही धान चोखड व पांढरे जितक असल तितक आह्मास देऊन मग आनी कोनास देण गोविंदरायापावतो जाऊन येऊन हिसब न ठेवणे आलस न करणे हे विनंती आवंदा तुह्मी जाऊन हे लिगाड लावले आलस करून राहाविता तरी तुह्मास आह्मास निस्टूर होईल तुह्माकरिता आह्मास व गोविंदराउयास काही निठूर करणे नाही तुह्मापासून हे लिगाड घेऊन सोडणे ह्मणौऊन गोविंदरायान सागितल याउपरी आलस कराल तरी किचाटास पात्र तुह्मी व स्नेहास अतर तुह्माकटून पडलेस होईल यासत्व१ तुह्मी गोविंदरायापावेतो जाऊन हे लिगाड वारून माहागाचे धारनेने पैका जो होईल त्याच आताचे धारणेने पैका आगर धान जे द्याल ते घेऊन याउपरि आह्मी निठूरतेने लिहिले ह्मणौऊन राग न मानने तुमचे बरियासाठी सागता देशकाल येक प्रकार लिगाडच कामा येऊ नये यासत्व१ लिहिले आहे कृपा असो ढीजे हे विनंती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ५ ] अलीफ २३ एप्रिल १६५७
सर्व उमरावांत श्रेष्ठ, आपले बराबरीचे मंडळींत थोर, नाना प्रकारचे कृपेस पात्र, शिवाजी भोसले, बादशाही कृपेस पात्र, कृतकृत्यता पावून जाणोत कीं तुमची अर्जदास्त इकडील पंज्याचे निशाणाचे फर्मान पोहोचल्यानंतर चिट्टी पावली. हरएकविषयीं जें सांगणें तें तुह्यांकडील वकील सोनाजी यांजपाशी सांगितलें. त्याणीं तुह्यांसी बोलोन खातरजमा केलीच असेल- सांप्रत जे किल्ले व मुलूक विजापूरकरांकडील तुमचे हातीं होते ते पेशजीप्रमाणें होऊन तुमचे मनोगताअन्वयें बंदर दाभोळ व त्याजखालील मुलूख तुह्यांस दिल्हा असे. ऐशीयास, इकडील दौलतीची किफायत मदत जी करणें असेल तिचा समय हाच आहे, जाणोन करण्यांत आणावें, आणि हुजूर भेटीस यावे. याखेरीज जे मतलब तुमचे मनांत असतीलं ते सर्व घडोन येतील. हालीं तुमचे वकील यांस परत जाण्याची जलदी होती, सबब निरोप दिल्हा आहे. त्यांचे जबानीं इकडील लक्ष दिसोन दिवस तुमचा उत्कर्षाचा करण्याचा वगैरे सर्व ध्यानांत येईल. याजकरितां इकडील दौलतीचे लहान मोठे कामाकाजाची तर्तूज आपले ऊर्जिताचें कारण समजून करीत जावी व वारंवार इकडील कृपेचें इच्छित असावें सांप्रत ईश्वरकृपा व आमचें दैवशालित्व व फौजेचे शेरपणा यानीं इकडील वाईट इच्छिणार नाहीसे जाले. दिवसानुदिवस इकडे जय येत चालला. तो असा कीं, किल्ला बेदर हा मोठा मजबूत, आजपावेतों त्यास कोणीच सर केला नव्हता, व कोणाचे मनांत कल्याणदेखील सर करावयाची येत नव्हतीं, तो एकंदर दक्षण व कर्नाटक देशाचा दरवाजा. तो एक दिवसांत हस्तगत जाला. इतरांसी वर्षांचीं वर्षेही वश जाला नाहीं. ईश्वराचें सर्व कृत्य । इकडील प्रतापशूरांचे शौर्यामुळें तुह्मीं येविषयींचा संतोष मानून, वरचेवर जसे आमचे जय होतील तसे त्या संतोषाचे वर्तमानावर कान ठेवीत जाणें, आणि आमचा लोभ पूर्ण आहे असें मानीत जाणें. छ १८ रजब सन ३१ जुलूस, सन १०६७ हिजरी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ४ ] अलीफ ३० नोव्हेंबर १६४९
नानाप्रकारच्या स्नेहकृपेस योग्य, महत्कृपेचें पात्र, उत्तम उमदेपणास लायक, शिवाजी भोसले याणीं बादशाही कृपेची इच्छा करुन जाणावें कीं तुमचें पत्र राघोपंत याजबराबर पाठविलें, तें पावलें, आणि बादशाही कृपेस कारण जालें. जुन्नर व अमदानगर येथील देशमुखीविषयीं लिहिलें, त्यास, आह्मी हुजूर गेल्यानंतर हा मजकूर घडोन येईल. खातरजमा ठेवावी. परंतु आपणाकडील एक वकील पाठवून द्यावा. ह्यणजे मजकूर समजून घेऊन अमलांत येईल. व वकीलास जो मजकूर विचांरू त्याचें उत्तर द्यावें, ह्यणजे काम होण्यास दिरंग लागणार नाहीं. जाणोन उद्योग करावा आणि लोभ पूर्ण जाणावा. छ ५ जिल्हेज, सन ५३ जुलूस, सन १०५९ हिजरी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ३ ] अलीफ ३० नोव्हेंबर १६४९
उमरावी सरदारीच्या योग्यतेचे, शूर पराक्रमी, दौलतीचे उत्तम अभीष्टचिंतक, राजनिष्ठशिरोमणी, महत्कृपेस पात्र शाहाजी भोसले यांणीं बादशाही कृपेस आपला सत्कार जाणोन समजावें कीं तुमचे पुत्र शिवाजी यांणीं अर्जदास्त हुजूर येण्याविशीं पाठविली. ती पावून कृपेस कारण जालें. पेशजीच्या गोष्टी मनांत न आणितां तुमची मोकळीक करण्याविषयीं लिहिलें आहे. त्यास हालीं आम्हीं दिल्लीकडे जात आहों. परंतु तुम्हांस खुषखबर देतों कीं तुम्ही सर्व प्रकारें खातरजमा ठेवावी. जे आम्हीं हुजूर पावलियावरी तुमचे मजकुराविषयीं अर्ज करुन बंदोबस्त करुन देऊ परंतु तुम्हीं आपला एक वकील इतबारी पाठवून द्यावा. म्हणजे त्यासमागमें फर्मान कौलाचे पंज्याचे निशाणसुद्धां पाठविण्यांत येईल. आणि तुमचे चिरंजीव संभाजी वगैरे सरकारकृपेस पात्र होऊन पेशजीप्रमाणें मनसबा व नूतन सरफराज पावतील. इकडील स्नेहांत व इकडील लक्षांत वागणें हें सर्व आपले मनोरथ पूर्ण करुन घेण्यास कारण आहे. ह्यणोन तसें वागोन खातरजमा ठेवावी. आणि तुह्याकरितां पोषाख पाठविला हा घेऊन आपणावर पूर्ण लोभ आहे असें मनांत आणावें. छ ५ माहे जिल्हेज, सन २३ जुलूस, सन १०५९ हिजरी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४२६
श्रीभवानीप्रसन्न १६११ मार्गशीर्ष शुध्द ५
तालीक
स्वस्तिश्री राज्याभिषेकशके ५१ क्रोधी नाम संवछरे श्रावण बहुल पंचमी सौम्यवासरे क्षत्रियकुलवतंस श्रीराजा शंभु छत्रपति स्वामी याणी वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण असामी १६ सोळा वास्तव्य-क्षेत्र करवीर यासि दिल्हे इनामपत्र ऐसें जे तुमचे विशई राजश्री हरीराज पंडितराज व राजश्री रामचंद्र नाईक मंत्री याणी स्वामिसनिध विनंति केली की सदरहू सोळा ब्राह्मण बहुत थोर विद्यासंपन्न श्रौतस्मार्तकर्मानुष्टानषट्कर्मनिरत आहेत या ब्राह्मणास कर्हाडप्रांते श्रीकृष्णातीरी एक गांव इनाम सर्वमान्य करून दिधलियाने तेथे उत्पन्न होईल ते अन्न भक्षून स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण चितून राहातील ह्मणोन विदित केले त्यावरून मनास आणिता तुह्मी करवीरक्षेत्री राहाता तुमचे योगक्षेमाचे अनकूलतेस गाव इनाम दिधलियाने स्वामीस बहुत श्रेयस्कर यास्तव तुह्मास नूतन इनाम कुल बाब कुल कानू हालीपट्टी व पेस्तरपट्टी जलतरुतृणपाषाणनिधिनिक्षेपसहित खेरीज हकदार व इनामदार करून मौजे झुबी ता। हवेली सुभा प्रांत कर्हाड हा गाव देह १ एक रास इनाम सर्वमान्य करून दिल्हा असे तरी तुह्मी मौजे मजकूर पूर्वमर्यादेप्रमाणे आपले स्वाधीन करून घेणे नावनिशी
१ नीलकंठभट वलवडेकर १ बापूभट बिन चिमणभट
गोत्र गार्ग्य गोत्र प्रथमात्री धर्माधिकरणी
१ गोविंदभट बिन आपदेभट १ पांडुरगभट
गोत्र गार्ग्य उपमान
लाटकर
१ त्र्यंबकभट बिन सरस्वतीभट
गोत्र गार्ग्य लाटकर
१ दासभट बिन रायभट १ श्रीधरभट बिन माहादेवभट
घळसासी गोत्र जामदग्न पळूसकर गोत्र हारीत
१ बाळंभट बिन शंकरभट १ विश्वनाथभट गाडगीळ
गोत्र भारद्वाज आपस्तंभ
१ आपदेभट बिन हरभट १ शामभट उपनाम गुळवणी
गोत्र गार्ग्य उपनाम लाटकर गोत्र वशिष्ट
१ माहादेवभट बिन रंगभट १ बाळकृष्णभट बिन पुरुषोत्तम-
गोत्र जामदग्न्य सिंगणापूरकर भट गोत्र जामदग्न्य
१ रामभट बिन मुद्गलभट १ यादवभट बिन नारायणभट
गोत्र वशिष्ठ उंबराणीकर वडणगेकर गोत्र गार्ग्य
एणेप्रमाणे आसामी सोळा तुह्मास मौजे मजकूर इनाम सर्वमान्य करून दिल्हें असे यथाविभागे इनाम तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरेनें इनामगाव अनभऊन सुखरूप राहणें
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४२५
१६११ मार्गशीर्ष शुध्द ५
रवा सूद
शके १६११ शुल्कनाम संवछर मार्गेस्वर शुध पंचमी बुधवार सु॥ तिसैन अलफ तदिनि खतलिखिते धनको नाम राजश्री रामेस्वरभट उपाध्ये आरवीकर रिणको नाम रा। कृष्णाजी गंगाधर राजे भोसले आत्मकार्यपरवतसमध्ये तुह्मापासोन कर्ज घेतले मुदल उलदुरी रु॥ ३०० मोबलग तिनीसे रु॥ रास यासि मलातर दर माहे दर सदे रु॥ ३
तिनी प्रमाणे हिसेबी जे मलातर होईल ते व मुदल ऐसे देऊन यासि आन सारिखे नाहीं हे लिहिले सही छ ३ माहे सफर मोर्तबू सुदु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ २ ] ।। श्री ।।
अखंडित लक्ष्मी प्रसन्न परोपकारमूर्ती राजमान्य राजश्री निळोपंत गोसावी यांसीः-
सेवके दियानतराऊ नमस्कार विनति उपरी मौजे उझार्डे किल्ले वंदन हा गाव पूर्वीपासून किल्लेचे माहाताजीच चालत असे. सांप्रत, गोसावियांचे लोकांनी कबज केलें आहे. जे चंद्ररायाचे ईस्तमत जाउलीखालील गांव ह्यणोन. तरी मौजे मजकूर चंद्रराये दिलें नाहीं व जाउलीखालें नव्हतें हे आह्यांस पूर्ण कळलें. तरी गोसावी यानीं राजे अजमास सांगोन तो गांव सोडवून किल्ले खाले ब ।। साबीका बेकुसूर चाले ऐसे केलें पाहिजे. हरएक विषयीं मजकूरास मदत करीत जाणें व रा । विनाजी कोनेरीपंत हेजीबराऊ ++ पाठविले असेती. देहाय माहाताज किल्लेमजकूर याचेविषयीं आहे. ती अंत:करणीं धरुन पारपत्य केलें पाहिजे. किल्ले मजकुरीं ( चा अंमल ) सोडून देवीजे. विशेष लिहिणें नलगे.
( मोर्तब )
( सूद )
( षाह नूरगादअल्ली )
( दीयानतराव )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
पत्रें, यादी वगैरे
[ १ ] ।। श्री ।।
अखंडित लक्ष्मी प्रसन्न परोपकारमूर्ती राजमान्य राजश्री निळोपंत गोसावी यासीः -
.ll सेवके दियानतराऊ नमस्कार विनंति उपरी. मौजे उझार्डे किल्ले वंदन माहताजी गाव चालत असतां सांप्रत नूरखानास खा जाहाला होता यावरी हुजूर मालूम होऊन माहालीचे देहे माहालास मोकरर केले असे. तरी मौजे मा | किल्लेचे किल्लेस दुंबाला केले पाहिजे. पहिलें, नूरखानाचेविषयीं लिहिलें होतें. त्यावरी नच जातां किल्लेमजकुरास दुंबाला करणें. पुढे, नूरखानाचेविषयीं लिहिलेया त्यास दुंबाला न करणें- माहताजी गावाविषयीं विनाजी कोनेरीपंत सांगतील त्यासारीखें पारपत्य देखील ( केलें ) पाहिजे किल्ले वंदन आमचें वतनस्थळ आहे. त्याचे मदत करायास अंतर पडो न देणें. बहुत लिहिणे नलगे. ( मोर्तबसूद )
( षाहनूरगाद अल्ली )
( दीयानतराव* )