Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४३७
१५६१ आश्विन शुध्द ८
अज रख्तखाने राजश्री सीवाजी राजे दामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व हस्तकबाल व देसमुखानि प्रा। चाकण बिदानंद सु॥ अरबैन अलफ बो। कृष्णभट बिन मुरारीभट ब्रह्मे सो। कसबे चाकण हुजूर एउनु मालूम केले जे आपणास इनाम व रोजमुरा व तेल बितपसील
→पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
सदरहू प्रमाणे सालाबाद चालिले आहे हाली पा मजकूर साहेबा अर्जानी जाला आहे त्यास हाली कारकून ताजे खुर्द खताचा उजूर करिताहेती दरी बाब खुर्द खत होए ह्मणौन मालूम केले तरी बर्हाय मालुमाती खातिरेसि आणौन कृस्णभट बिन मुरारीभट ब्रह्मे सो। चाकण पा। मा। यास इनाम व रोजमुरा व तेल अंबराई बनास पेडी सदरहू प्रमाणे देविले असे ता। सन तिसा तश्रफाती व भोगवटा चालिले असेल तेणेप्रमाणे चालवणे दिधले असे दुमाला कीजे तजकरा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असल खु॥ इनामदार मजकुरास देणे मोर्तब सूद
तेरीख ६
जमादिलाखर
रुजू सुरु
निवीस
माहे जमादिलाखर
सुरु सूद *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १६ ] अलीफ . ५ मार्च १६६८.
आपले बराबरीचे राजात श्रेष्ठ, सर्व उमरावात श्रेष्ठ, महत्कृपेस पात्र, मुसुलमानी धर्मरक्षक, शिवाजी याणे बादशाही कृपेचें उमेदवार होऊन जाणावे कींः- तुमचे पत्र मिर्जा राजे जैसिंग याणीं ठरविल्याप्रमाणे इकडील प्राती रवाना जालें ते पावून बहुत सतोष जाला.ऐशीयास, इकडील लोभ तुह्मावर पूर्ण आहे ह्मणोन अवकार न करितां खातरजमेनें मजलदरमजल निघोन यावें. ह्मणजे भेटींअतीं बहुत सत्कार पावून माघारे जाण्याविशींचा निरोप दिल्हा जाईल सांप्रत तुह्मांकरितां पोषाख पाठविला आहे तो घ्यावा रा । छ १० माहे सवाल, सन ९ जुलूस, सन १०७८ हिजरी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४३६
१५५९ चैत्र शुध्द १
रवा शुद
अज रख्तखाने खुदायवंद खाने अजम दिलावरखान खलीदयामदौलतहू बजानेबु कारकुनानि पा। चाकण बिदानद सु॥ सन सबा सलासीन अलफ कृस्णभट बिन मुरारिभट ब्रह्मे प्रा। चाकण हुजूर एउनु मालूम केले जे आपणास बदल धर्मादाऊ सालीन्या टके २५ पंचवीस बा। पत्र देसमुख व देसकुलकर्णी व सेटे व माहाजन व मेहतरिया माळी कसबे मजकूर सके १५४६ रगताक्षी संवसर बा। कागद आहे ते सालाबद कारकीर्दी बडेखानसाहेबु व कारकीर्दी अमानत व वजिरानि ता। सु॥ सीत सलासीन अलफु चालत आले आहे हाली सालमजकुराकारणे माहाल साहेबास मुकासा अर्जानी जाला माहाली कारकुनु खुर्द खताचा उजूर करिताती खुर्द खत होए मालूम जाले तरी कृस्णभट बिन मुरारिभट सो। कसबे मा। यासि बदल धर्मादाऊ सालीन्या टके २५ देसमुख व बाजे रयती का। मा।र इही निसबती रयती कागद करुनु दिधला आहे तेणे प्रमाणे ता। सु॥ सीत भोगवटे तसरुफाती चालत आले असेल तेणेप्रमाणे सालाबाद चालवणे दर हर साल ताज्या खुर्द खता उजूर न करणे तालीक घेउनु असेली इनामदारमजकुरापासी फिराउनु दीजे मोर्तब सुद
तेरीख २९ माहे सौवालु
सवाल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४३५
श्री १५५१ चैत्र शुध्द ३
श्री सके १५५१ सुक्ल सवछरे चैत्र सुध त्रीतीया मंगळवार ते दीनी राजश्री मुर्हारीभट व वासुदेवभट गोसावी ब्रह्मे सा। कसबे चाकण यासि तिमाजी पुरुषोत्तमे आत्मसुखे लेहोन दिधले ऐसे जे पुराणिकाच्या वाडियाच्या निमोन्याच्या उत्तर भागे दो। कोपरा ते भूमी समस्त ब्रह्मियाचि ह्मणौन पूर्वि राजश्री गदाधरभट व राजश्री बाबदेभट व गंगाधरभट ब्रह्मे इही भूमी आह्मास राहावेयास दिधली ते भूमीवरी घर करून वरुसे पाचपन्नास नांदतो हाली कृस्णाजी नीळकंठराऊ ब्रह्मे तिही आह्मास हटकिले जे ब्रह्मियाची भूमी ते आपली आपणास द्या त्यावरी ते भूमी आह्मी त्यास दिधली ए विसी त्यास लेहोन दिधले आहे त्यावरून तुह्मी अर्धाविभागी ह्मणौन आह्मास + + + ची घालेतीने त्यास लेहोन दिधले आहे तैसे च आपणास द्या आपण अर्धविभागी आहो जरी नेदा तरी वेव्हार सांगा यावरी आह्मी म्हटले जे गोसावी आपली अर्ध भूमी घेणे भूमीस आह्मास समंधु नाही
गोही
पत्रप्रमाणे साक्षि अंतपंत पत्रप्रमाणे साक्षी कृष्णभट
राजगुर धर्माधिकारणि पुंडले
चांदो विस्वनाथ देसकुलकर्णी नारायणभट ब्रह्मे पत्र-
पा। चाकण प्रमाणे साक्ष
दुळत पतापरा (व) माना गोपाळ तुळो सोलापुरी
भानावा षुताड साषा पत्रप्रमाण साक्षी
गोविंद पाठक देवकुळे आपण पत्रप्रमन साक्षी अंतोबा
त्याच्ये व तुमच्या पत्रावरि साक्षि खुताड माहाजन का। चाकन
केले ते तरि तुमचि त्यांचि
भुमि कळल नाहि तीमाजी
पुरुषोत्तमाच्या साक्षि केले
पत्र प्रमाणे
पत्रप्रमाणे साक्षी नारायण-
भट पुराणिक का। चाकण
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १५ ] अलीफ . २८ आगष्ट १६६६.
आपले बराबरीचे राजांत श्रेष्ठ, सर्व उमरावांत थोर, महत्कृपेस पात्र, मुसुलमानी धर्मरक्षक, शिवाजी याणें बादशाही कृपेंत आपला सत्कार जाणोन समजावे कीः- तुह्मीं फौजसुद्धां बादशाही लष्करांत आहांत, आणि ताथवडा, फलटण हे किल्ले विजापूरकराकडील होते, ते घेऊन त्यांची फौज तळकोकण प्रांतीं होती तेथे रात्रीं पोहोचविली, ह्मणोन राजे जैसिंग याणे लिहिल्यावरुन तुमचे शाबासकीस कारण जालें सबब तुह्माकरितां उत्तम पोषाख व जडावाची कट्यार पाठविली आहे या लाभाचा संतोष मानून इत पर या स्वारींत जितके कोशीस कराल तितके पहिल्यापेक्षा अधिक लोभास कारण होईल छ ७ रबिलोवल, मु ।। सन १०७७ हिजरी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४३४
श्री १५४६ आश्विन शुध्द ७
नकल
श्री सके १५४६ रक्ताश्री नाम संवछरे आश्विन शुध्द सप्तमी बुधवार ते दिवसी राजश्री मुरारभट बिन गंगाधरभट ब्रह्मे कसबे चाकण गोसावियासि सेवक
शाहाजी व सूर्याजी देसमुख बापूजी अनंत व चादोजी
(निशाणी नांगर) विश्वनाथ देशकुलकर्णी
दुलसेटी सेटिया व मेंगसेटी दससेटी सेटिया व
चौधरी व बहिर सेटी माहाजन दादसेटी केकण माहाजन
बकाल तांबोली
(निशाणी तराजू) (निशाणी चाक)
चांग मेहतरी मेहतरा देऊ माली मेहतरा व
हर माली चौधरा व
बाबाजी तेली चौधरी बापू काडिंगा माली
(नि. पाहार) (निशाणी खुर्पे)
समस्त का। चाकण प्रा। मा। आत्मसंतोषे पत्र करून दिल्हे एसे जे सदर्हू संवत्सराकारणे पाऊस मुलखा गेला लोक परागंदा होऊ लागलेयावरी सदर्हू अवघे मिळून तुह्मापासी बोलिले जे रोजा १०।१२ मध्ये पाऊस पडेल की न पडेल हे सांगितले पाहिजे यावरी मुरारभट गोसावी उत्तर दिधले जे दिवसा दाहा मध्ये पर्जन्य पडेल मग रोजा दाहा मध्ये पर्जन्य उदंड पडिला मग आह्मी समस्त संतोषी होऊन तुह्मासी नमस्कार व आ। पाया पडून तुह्मावर सासन धर्मादाव लेकुराचे लेकुरी टके २५ पंचवीस करून दिधले असेती यास जो कोणी आनसारिखे करील त्यासी गाईची आण माहादेवाची आण असे सदर्हू धर्मादावकाच पटीस घालून देणे हे लिहिले सही
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १४ ] अलीफ . २६ आगष्ट १६६६.
आपले बराबरीचे राजात श्रेष्ठ, सर्व उमरावात थोर, काबील कुल महत्कृपेचें पात्र, मुसलमानी धर्मरक्षक, शिवाजी राजे यांणीं बादशाही कृपेचे उमेदवार होऊन जाणावें कीं - सांप्रत तुमचें पत्र बहुत नरमाईचें राजे जैसिंग यांचे भेटीबद्दल कळलें. कृत्य माफ व्हावें ह्मणोन घेतलेयाचें पाहून गोड ध्यानास आला. यापूर्वी तुमचे मनांतील हाशील सरकार कामगारांनी समजाविलें होतें की, तुह्मीं आपले कृत्यांचा पश्चाताप करुन, या दौलतीचे आश्रयास येऊन, तीस किल्ले आपणाकडील इकडील कामगाराचे स्वाधीन करुन, बारा किल्ले व त्यांजखालील मुलूक एक लक्ष होनांचा निजामशाहीचे किल्ले व मुलूक पैकीं, त्याचप्रकरें आणखी चार लक्ष होनांचा मुलूक तळकोंकणांतील विजापूरकरांचे इलाख्याचा जो हालीं तुह्माकडे चालूं आहे, व पाच लक्ष होनाचा मुलूक बालेघाटपैकीं, विजापूरचे इलाख्यापैकी, येणेप्रमाणें एकदराचा फर्मान बादशाही मागता व चाळीस लक्ष होन दरसाल तीन लक्षप्रमाणे पेशकसीबद्दल देऊ ह्मणता ऐशीयास, तुमच्या गोष्टी ज्या तुह्मीं तूट अंदेशा न पाहतां केल्या त्या माफीजोग्या नाहीत तथापि राजे जैसिग यांणी लिहिल्यावरुन ते सर्व माफ करुन तुमच्या मनोरथाप्रमाणे बारा केले ( देतो ) त्याचा त्यांचा तपशील खालीं लिहिला आहे व त्यांच्या खालचा मुलूक देऊन आणखी हुकूम केला आहे कीं, जो मुलूक नऊ लक्ष होनाचा त्यापैकी चार लक्ष होनाचा तळकोकणपैकी विजापूरकराचे इलाख्यापैकी हालीं तुह्मांकडे चालत आहे तो बदोबस्ताकरिता इकडील सरकारात आला. सबब, बालेघाटीं पांच लक्षाचा मुलूक, विजापूर आमचे हाती येईल त्या आधीं तुह्मी त्याजकडून घेतल्यास व चांगले फौजेसुद्धा राजे जैसिंग यास मिळोन बादशाही कामांत याचे मर्जीप्रमाणें कोशीस केल्यास, विजापूर फत्ते जाल्यानंतर तुह्मीं पेशकसीचे ऐवजाचा भरणा केल्यास, तुह्माकडे बहाल ठेवू. हाली आमचे चिरंजीवास पांच हजारी मनसब व पांच हजार स्वार - कीं एकएकाचीं दोन दोन तीन घोडीं असावी- याप्रमाणें देऊन, तुह्माकरितां पोषाख पाठवून, हा फरमान आपले पंज्याच्या चिन्हासुद्धां पाठविला आहे तरी तुह्मीं इकडील लक्षात वागोन, बादशाही काम लहान मोठेसुद्धां करुन, हें सर्व आपले ऊजिताचीच गोष्ट असें समजत जावें. छ ५ रबिलावल, सन ८ जुलूस, मु ।। सन १०७७ हिजरी.
किल्ल्यांचा तपशील राजे जैसिंग याचें लिहिल्याप्रमाणें :-
१ | राजगड | १ | तोरणा | १ | लिंगणगड |
१ | भोरप | १ | तळेगड | १ | महाडगड |
१ | घोसाळा | १ | अलवारी | १ | पाल |
१ | उधेदुर्ग | १ | रायरी | १ | कुंवारी |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४३३
श्री १५४२ भाद्रपद शुध्द ११
नकल
शके १५४२ रौद्र संवत्सरे भाद्रपद शुध्द ११ सोमे तंदिनी चाकणस्थळी ब्रह्मसभे विद्यमान मुर्हारभट ब्रंह्मे यास वासुदेवभट ब्रंह्मे ईहि आत्मसुखे लिहुन दिले ऐसे जे तुंह्मा अंह्मा मध्ये पुस्तकाचा कळहो होता तो निवडला ऐसा जे तुमचि व आमचि पुस्तके पहिलि तुमचि होति ते तुह्मि घेतलि व आमचि होति ते आह्मि घेतलि आता तुह्मा आह्मा मध्ये आर्थाअर्थि समंधु नाहिं खंडलेयास अन्यथा करु तैं ब्रंह्मसभे अन्याई बाबाजीपंत राजगुरु हस्ताक्षर
गोहि
विठल जोसि ब्रह्म वजेरि
गोविंद पाठक वासुदेवभट ब्रंह्मे
कृष्णराव निळकंठ कृष्णभट पुंडले
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १३ ]
अखडित लक्ष्मी अलकृत राजमान्य राजश्री जगन्नाथपत व त्रिंबक वेकटेश गोसावी यांसी मोरो त्रिमळ व निळो सोनदेऊ नमस्कार. उपरि. राजेसाहेब शिवापट्टणी मुक्काम किती दिवस करणार, व लोहगडतर्फेनें इमारती पाहावयास जाणार, तिकडे जातील किंवा न च जात, रोहेडियाकडन पांडवगड पाहोनु येणार होते ते तिकडे जातील किंवा न च जात, रोहेडियाकडन पांडवगड पाहोनु येणार होते ते तिकडे जातील किंवा न च जातील, हें कांहीं वर्तमान लिहिले नाहीं. तरी सविस्तर वर्तमान लेहून पाठवणे. स. पृ ११५ व चिरंजीव राजश्री राजारामाचे ++++ राजश्री साहेबास खबर लिहिली आहे ते श्रुत करुन खबर सत्वर पाठवून देणे. बहुत लिहिणें न लगे. छ ३ माहे रजब. झुंडीचें वर्तमान लिहिणें पा । हुजूर.
मोर्तब
सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १२ ] श्री. २ एप्रिल १६६३.
मसुरल हजरती राजमान्य राजश्री मोरो त्रिमळ पेशवे व राजश्री निळो सोनदेऊ मजमूदार प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत- उपरि. साहेबीं कोंकणांत नामदार खानावरी जाण्याचा तह केला होता. ऐसीयासी, हालीं किल्ले सिंहगडाहून समाचार आला आहे कीं गडावरीं कांहीं फितवा जाला आहे. याबद्दल तूर्त कोंकणांत जाण्याचा तह राहिला. तरी तुह्मीं लष्करी लोकांनसी व खासखेली हशमानसीं कागद देखतांच स्वार होऊन किल्ले सिंहगडास जाणें आणि किल्लियावरच हुशार खबरदार असणें. फितवा कोण कोण लोकीं केला होता हे खबर घेऊनु हुजूर लेहून पाठवणें. मा । तान्हाजी नाईक व कोंडाची नाईक व ++++ हडे व कमळोजी नाईक व दरेकर व रुमाजी अहिरा व गोंदजी पांढरा हे बराबरी घेऊन सिंहगडास जाऊन सिंहगडी अलगो अलगानीं बहुत खबरदार असणें. जे लोक किल्लियावरी मेदांत असतील ते हे आपल्या बरावरील लोक अलगेस ठेवणें. छ ४, माहे रमजान, सन सल्लास सितैन. पा । हुजूर. *
( मर्यादेयं )
( विराजते )