Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४१५
१५५३ आषाढ वद्य २
अज् रख्तखाने राजश्री शाहाजी राजे दाईमदौलतहु बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। पांडियापेडगाऊ व हुदेदारानि हाल व इस्तकबाल व मोकदमानि व रया कसबे चाभारगोंदे पा। मा। बिदानद सु॥ इसन्ने सलासीन अलफ रामेश्वरभट व दामोदरभट बिन नारायणभट सो। आरवी मुदगल हुजूर एऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर एक गज शरायनी दर सवाद का। चांभारगोदे देखील नख्तयाती ता। ठाणें व ता। देहाये व बाजेबाब कुलबाब कुलकानू व वेठीबेगारी बा। भोगवटे पेसजी कारकीदी्र दर कारकीर्दी सालाबाद चालिले आहे हालीं माहाली कारकून साहेबाचे खुर्दखताचा उजूर करिताती दरीं बाब खुर्द खत मर्हामती होए ह्मणौन मालूम केले तरी भट मशारनइले यांस सदरहू इनाम बा। भोगवटे कारकीर्दी दर कारकीर्दी सालाबाद ता। साल गु॥ जैसे तसरुफाती चालिले असेल तेणे प्रमाणे चालविजे दर हर साल खता उजूर न कीजे तालीक घेउन असली खत इनामदार मा। फिराउन दिजे (शिक्का षट्कोनी)
तेरीख १६ माहे जिल्हेज रुजू सुरुनिवीस
जिल्हेज सुरू सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४१४
१५५३ आषाढ शुध्द ७
श्रीसके १५५३ प्रजापती नाम संवस्छरे आसाड सुध सप्तमी वार आदितवार बिहुजूर एमाजी व बाबाजी देसमुख किले फतेमंगाल यां विदमाने सभाजी तानदेऊ यास गोदजी बिन माहादजी मोकदम मौजे निरगुडे किलेमजकूर आपण आपल्या आत्मसतोसे लिहून दिधले ऐसे जे आपण दुकळाकरिता बहुत भोईस पडिलो खावयास काही नाहीं दुकाळ मोठा काहार पडिला याकरितां आपणास कोण्ही वाणी वेव्हारा नव्हे मग आपले दुढीने आपली मोकदिमी मौजे- मजकुरीची निमेपैकी तकिसीम निमे तुह्मास किमती होन २२॥ साडेबाविसास तुह्मास विकत दिधली आहे तुह्मी सदर्हू पैकी दिधले आपण आपली मोकदमी पैकी निमे मोकदमी तुह्मास लेकराचे लेकरी मिरासी करून दिधली आहे तुह्मी सुखे मोकदमी खाणे काळी व पांढरी व हक्कलाजिमा कुल बाब सारा गाव मोकदमी याची चौथी तकसीम तुह्मास मिरासी करून दिधली आहे यास कोन्ही आपला बापभाऊ व दाईज गोत्रज उभा राहील त्यास आपणे निवारावे मोकदमी देखील बाजार व कुल बाब हक्क खाणें हे लिहिले सही नागर व तश्रीफ व बाजे वडिलपणाचा मानमोहर कुल बाब तुह्मास दिधले हे लिहिले सही (निशाणी नांगर)
गोही
बिदस्तुर विसाजी रंगनाथ नाईकवाडी चा किले मजकूर
देसकुलकरणी किलेमजकूर दिनकरराऊ लखाजी नाईक
हमशाही मोकदम गावगन्ना
(नि. नांगर) मौजे निरगुडे
जानोजी मोकदम का। कलस रामाजी बिन राजजी निमे
(नि. नांगर) मोकदम
बहीरजी मोकदम मौजे सेलगांव
किले मजकूर (निशाणी नांगर) हरि सोनेदऊ कुलकर्णी
माउजी व बाबाजी मोकदम
मौजे काझड (निशाणी नांगर)
बहीरजी मोकदम मौजे लाकडी
(नि. नांगर)
बालोजी मोकदम मौजे निंबोड
(नि. नांगर)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४१३
१५५२ आश्विन शुध्द १३
(फारसी मजकूर)
महजर बतारीख ११ माहे रबिलोवल हाजीर मजालसी किले
फतेमंगल
मसरुल अनाम राजश्री अला फतुला सर + बत
दतो बाबाजी हवालदार चा। रा। खास
व कारकून किले मजकूर
एमाजी व बाबाजी बिदस्तूर विसाजी रगनाथ देसकुळ-
देसमुख किले मजकूर करणी किले मजकूर
(शिक्के षटकोनी दोन)
सु॥ इहिदे सलासीन अलफ कारणे महजर जाला ऐसा जे सभाजी तानतेऊ यासि गोदजी मोकदम व रामजी बिन राजजी मोकदम मौजे निरगुडे किले मजकूर लिहून दिधले ऐसे जें आपत व फिरती जाली याकरिता उपवासीं मरो लागलो भोई पडिलो घरबूड हो लागली मग आपण तुह्मास आपली मोकदमी निमे चावर ३१ निमे मोकदमी बिता।
बा। गोदजी मोकदम रामजी बिन राजजी मोकदम
१५ खासा चावर पैकी चावर ६ एकूण किमती
१० एमाजी बा। होन १०
एकून चावर २५
एकून किमती देखील
मान होन ३५
एकून चावर ३१ मौजे मजकुरीची निमे मोकदमी एकून होन ४५ पचेतालीस धारण करून तुह्मी सदर्हू प्रमाणे पैके आपणास दिधले आपण तुह्मास निमे मोकदमी आपले खुसीने दिधली आधी मान तुमचा व नागर निशान तुमचे व हरएक मान आधीं तुमचा व बाजाराचा हक्कलाजिमा व काळीपाढरी व हरएक मान तुह्मास निमे मोकदमी लेकराचे लेकरीं मिरासी करून दिधली आहे ते लेकराचे लेकरी खाऊन सुखे असिजे यास जो कोन्ही बिलाहरकती करील अगर आपला भाईबिरा जर कोन्ही उभा राहील त्यास आपण निवारीन सदरहू प्रमाणे निमे मोकदमी लेकराचे लेकरीं मिरासी करन दिधली आहे ते खाऊन सुखे असिजे हा महजर सही
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४१२
१५५१ माघ वद्य ५
सा
तनाख साहेबू
अज रखतखाने राजश्री रुद्राजी राम बजानेबू हुदेदारानी व मोकदमानी मोजे जलालपूर ता। चाभारगोदे पा। पडियेपेडगौ बिदानद सु॥ सलासैन अलफ बो। दामोधरभट व रामेस्वरभट बिन नारायणभट सो। आरवी मुदगल मा। केले जे आपणास इनाम जमीन चावर एक दर सवाद मौजे जलालपूर ता। मा। देखील ता। ठाणे व ता। देहाये व वेठीबेगारी फर्मासी आवाजेवा कुल बाब कुल कानू बा। खु॥ खाने अजम छ ४ सफर बा। फर्मान बासिके खास छ १७ माहे सन तिसा असर ता। सालगुदसता सन तिसा इसरीन अलफ चालिले आहे हालीं मा। हुदेदार ताजे खुर्द खताचा उजूर करिता खुद्र होय मा। जालें तरी बा। खु॥ खाने अजम सालाबाद चालिले असेली तेणेप्रमाणें त्याचे दमाले कीजे तालीक घेउनु असेली फिराऊनु इनामदारमजकुरापासी दीजे सालाबाद ताजे खुर्द खताचा उजूर न कीजे मोर्तबु
तेरीख १८ जमादिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४११
१५५१ पौष वद्य १०
अज रखतखाने राजश्री साहेबु बजानेबु हुदेदारानी मौजे खानवटे पा। पुणा बिदानद सु॥ सन सलासीन अलफ दा। बा। धर्मादाऊ बो। रामेस्वरभट व चिंतामणभट यासि अजरामर्हामती इनामे जमीन जिराती चावर १ एक दर सवाद मौजे मजकूर दा। नखतयाती ता। ठाणे व तालुक देहाये कुल कुल कानू दिधले असे बाब महसुलेसी दुमाले कीजे अवलाद व अफलाद चालविजे दर हर साल खताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असली इनामदारमजकुरापासी फिराउनु दीजे मोर्तब (शिक्का षटकोनी)
तेरीख २३ जमादिलावल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४१०
१५५१ कार्तिक शुध्द ५
अज दिवाण ठाणे ता। चाभारगोंदे पा। पाड्यापेडिगौऊ ता। हुदेदारानी व मोकदमानी मा। चाभारगोदे ता। मा। सु॥ सन सलासीन अलफ खुद रा। छ ४ सफर पौ छ १ रबिलोवल सादर जाले तेथे रजा जे रामेस्वरभट व दामोदरभट बिन नारयणभट सो। आरवी मुदगल हुजुरु एउनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर एक गज शराइनी दर सवाद का। चाभारगोदे पा। मा। दो। नखतयाती ता। ठाणे ता। देह व बाजे बाबा कुल कानू व वेठी बेगारी बा। खत विठोजी भोसले व बा फर्मान बाबे सिके खास सन तिसा असर अलफ ता। सन तिसा इसरैन अलफ चालिले आहे हालीं ता। मा। साहेबास मुकासा अर्जानी जाला आहे माहाली खुर्द खताचा उजुरु करिताती खुर्द खत होय मालूम जाले तरी दामेधरभट व रामेस्वरभट बिन नारायणभट यासी इनामे सदर्हू जमीने चावर एक सदर्हू प्रमाणे ता। तिसा भोगवटा तसरुफाती चालिले असेली तेणेप्रमाणे दुमाले कीजे ह्मणउनु रजा बा। रजा दामोधरभट व रामेस्वरभट बिन नारायणभट यासी इनामे का। मा। जमीन चावर देखील सदूर्हू बाबा ता। सने तिसा चालिले असेली तेणेप्रमाणे चालविजे दर हर साल खुर्द खताचा उजुरु न कीजे तुह्मी तालीक घेउनु असेली खत इनामदार मा। दीजे (शिक्का षट्कोनी)
तेरीख ३ माहे रबिलोवलु
रबिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४०९
१५५१ कार्तिक शुध्द ४
अज् दिवाण ठाणे ता। चाभारगोदे पा। पाड्या-पेडगौ ता। हुदेदारानि व मोकदमानि मौजे जलालपुर पा। मा। सु॥ सन सलासीन अलफ मु॥ रा। छ ४ सफर पौ। छ १ रबिलोवल तेथे रजा जे दामोधरभट व रामेस्वरभट बिन नारायण सो। आरवी मुदगल हुजूर एउनु मालूम केले जे आपणास इनाम चावर एक दर सवाद मौजे जलालपुर ता। मा। देखील नख्तयाती पा। ठाणे व ता। देहाये व वेठीबेगारी फर्मासी अवाजेवा कुलबाब कुलकानू बा। ता। मालोजी व विठोजी भोसले व बा। फर्माने इ बसिके खास भोगवटा ता। सन तिसा चालिले आहे हाली साहेबास मुकासा अर्जानी जाला आहे माहाली हुदेदार उजूर करिताति खत होळ तरि दामोधरभट व रामेस्वरभट बिन नारायणभट यासी इनाम सदरहू चावर एक दो। सदरहू बाबा ता। सन तिसा चालिले असेली तेणे प्रमाणे दुमाले कीजे ह्मणउनु रजा बा। रजा दामोधरभट व रामेस्वरभट बिन नारायणभट यासी इनाम मौजे मजकुरी जमीन चावर एक देखील सदरहू बाबा ता। सन तिसा तसरुफाती भोगवटे चालिले असे तेणे प्रमाणे चालविजे दर दर साल खुर्द खताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेऊनु असेली खुर्द खत इनामदारमजकुरासी दीजे मोर्तबू (शिक्का षट्कोनी)
तेरीख २ माहे रबिलोवलु
रबिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४०८
१ १५५१ आश्विन वद्य २
२ कानजी भिउजी३ ४
५
अज माहाल तमाकू इजारती
नागोजी कानजी मोहनदास
सिवदेऊ भिउजी तापीदास
खोत कलम रुता खोतानी ता। जुनर व बाजे माहाल बिदानद सु॥ सलासीन अलफ त्रिंबकभट बिन नीळकंठभट सो। त्रिंबक यास बदल धर्मादाऊ गादी कसबे नारायणगौ रुके .।. ता। सन तिसा तसरुफाती चालिली आहे हाली खोत ताजिया खुर्द खताचा उजूर करिताती हाय मालूम जाले ता। सन तिसा तसरुफाती चालिली असेल तेणेप्रमाणे चालविजे दर हर साल खुर्द खताचा उजूर न कीजे तालीक घेउनु असेली फिराउनु दीजे मोर्तबु सुद (शिक्के षट्कोनी दोन)६
तेरीख १५ सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४०७
१५५१ आश्विन शुध्द ६
रवा सूद
अज रख्तखाने खुदायवंद खाने अजम सलाबतखान साहेब तुलीदयामदौलतहू बजानेबू कारकुनानि व देसमुखानि ता। चांभारगोदे पा। पाडियापेडगौऊ बिदानद सु। सलासीन अलफ दामोदरभट व रामेस्वरभट बिन नारायणभट सो। आरवी मुदगल हुजूर एउनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर एक दर सवाद मौजे जलालपुर ता। मा। देखील नख्तयाती ता। ठाणे व ता। देहाये व वेठबेगारी फर्मासी आवाजेवा कुलबाब कुलकानू बा। तु॥ मालोजी व विठोजी भोसले बा। बा। फर्मान बसिके खास छ १७ माहे सन तिसा असर ता। सालगुदस्ता सन तिसा इसरीन अलफ चालिले आहे हाली ता। मा। साहेबास मुकासा अर्जानी जाला ता। मजकुरीचे कारकून खुर्द खताचा उजूर करिताति खैर आहे नजर ऐनाती करुनु खत होए मालूम जाले तरी दामोदरभट व रामेस्वरभट बिन नारायणभट यांस इनाम सदरहू जमीन चावर एक दर सवाद मौजे जलालपुर पा। मा। देखील सदरहू बाबा ता। सालगुदस्ता सन तिसा चालिले असेल भोगवटा दुमाला रुजू पाहौनु दुमाला करणे औलाद अफलाद चालवणे दर हर साल खुर्द खताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असली इनामदारमजकुरापासी देणे मोर्तबु (शिक्का षटकोनी)
रुजूसूद
तेरीख ४ माहे सफर
सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४०६
१५५१ आश्विन शुध्द ६
रवा सूद
अज रखतखाने खुदायवद खाने अजम सलाबतखान साहेबु तुलीदयामदौलतहू बजानेबु कारकुनानी व देसमसुखानी व मौकदमानी पा। पाडियापेडगौऊ बिदानद सु॥ सलासीन अलफ बो। रामेस्वरभट व दामोदरभट बिन नारायणभट सो। आरवी मुदगल हुजूर एउनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर एक १ गज सरयनी दर सवाद कसबे चाभारगौंदे पा। पाडियापेडगौऊ देखील नखतयाती ता। ठाणे व ता। देहाये व बाजे बाबा कुल बाब कुल कानू व वेठी बेगारी बा। खुर्द खत विठोजी भोसले बा। फर्मान बसिके खास सन तिसा असर अलफ ता। सालगुदस्ता सन तिसा इसरीन अलफ चालिले आहे हाली ता। मजकूर साहेबास मुकास अर्जानी जाला कारकून खुर्द खताचा उजूर करिताती खैर आहे नजर अनायती करून खुर्द खत होय मालूम जाले तरी रामेस्वरभट व दामोदरभट बिन नारायणभट यासि इनाम सदरहू जमीन चावर एक दर सवाद कसबे चाभारगोंदे दो। सदरहू बाबा ता। साल गु॥ सन तिसा इसरीन अलफ भोगवटा रुजू पाहोनु दुमाला करणे औलाद अफलाद चालवणे दर हर साल खुर्द खताचा उजूर न करणे तुह्मी तालीक घेउनु असेली इनामदार मजकुरापासी देणे मोर्तब (शिक्का षट्कोनी)
रुजु सुद
तेरीख ४ माहे सफर
सफर