[ २ ] ।। श्री ।।
अखंडित लक्ष्मी प्रसन्न परोपकारमूर्ती राजमान्य राजश्री निळोपंत गोसावी यांसीः-
सेवके दियानतराऊ नमस्कार विनति उपरी मौजे उझार्डे किल्ले वंदन हा गाव पूर्वीपासून किल्लेचे माहाताजीच चालत असे. सांप्रत, गोसावियांचे लोकांनी कबज केलें आहे. जे चंद्ररायाचे ईस्तमत जाउलीखालील गांव ह्यणोन. तरी मौजे मजकूर चंद्रराये दिलें नाहीं व जाउलीखालें नव्हतें हे आह्यांस पूर्ण कळलें. तरी गोसावी यानीं राजे अजमास सांगोन तो गांव सोडवून किल्ले खाले ब ।। साबीका बेकुसूर चाले ऐसे केलें पाहिजे. हरएक विषयीं मजकूरास मदत करीत जाणें व रा । विनाजी कोनेरीपंत हेजीबराऊ ++ पाठविले असेती. देहाय माहाताज किल्लेमजकूर याचेविषयीं आहे. ती अंत:करणीं धरुन पारपत्य केलें पाहिजे. किल्ले मजकुरीं ( चा अंमल ) सोडून देवीजे. विशेष लिहिणें नलगे.
( मोर्तब )
( सूद )
( षाह नूरगादअल्ली )
( दीयानतराव )