Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४३२
१५४१ ज्येष्ठ वद्य ५
श्रीराम प्रां। नकल
.॥ शके १५४१ सिध्दार्थी संवछरी उदयगणे ग्रीष्मर्तौ ज्येष्ठ वद्य ५ पंचमी आदितवार ते दिवसी कडोसस्थळी मुरारिभटी गोसावी ब्रह्मे सेकीन चाकण उपाध्याय गोसावियांसि बरवायि बिन विठ पाठक सेकीन कल्हेट जोसी अष्टाधिकारी लेहोन दिधले जे आपलिया बापाची वृत्ति जोसीपण कल्हेट-निर्गुडेयाची पश्चिमभागी समीप आहे तेथील जोतिषवृत्ति अष्टाधिकार धर्माधिकरणपूर्वक वृत्ति पूर्वी राक्षस संवछरी वैद्यनाथदेवाळी सिवरात्रीदिवसी संकल्पपुर्वक दिधली कागद लेहुण दिधला नवता आता ए स्थळी सकललोका समक्ष लेहुण दिधली ते तुह्मी लेकुराचे लेकुरी उत्तरोत्तर चालविजे हे लिहिले बरवायि तुकोबा नायक दाढे त्याचिये पत्नीचे लिहिले सत्य पुरुषोत्तमभट परीक्षकाणा हस्ताक्षरमिदं
साक्षी
रायाजी मुकुंद का। कडूस सकराव तानवडी
पुरुषोत्तम पारखी माहाजन का। कडूस
बापभट कडे पत्राप्रमाणे साक्ष
माहादेव भट कडे
पत्राप्रमाणे साक्ष धोंडभट नरहरि पाठक उपाध्ये
पारखी का। कडूस नराम पाठक
साक्ष भानभट पारखी पत्राप्रमाणे साक्ष काशीबा तानवडे
हरि कृष्ण कर्ते कुलकर्णी नरहरि तुकदेव कर्ता
का। कडूस पत्राप्रमाणे कुलकर्णी का। कडूस
साक्ष
विठूबा तानवडी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ११ ] १८ डिसेंबर १६६०.
सरंजामी. छ. २४ रबिलाखर, इन इहिदे सितैन अलफ. पुणें, व इंदापूर व चाकण, सुपें, बारामती, ऐसे इनाम हिंदू व मुसलमा यांसी इनाम आहेत. त्यास, पेशजी आपणास मुकासा असतां, अफजलखाना आधीं जेणेंप्रमाणें तसलमती ज्यास जें पावत असेल त्यास तेणेप्रमाणें देणें. ऐसा तह केला असे. मोर्तब सूद. ( मर्यादेयं )
( विराजते )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
कित्ता एक. रदबदल राजश्री निळोपंती केली कीः-
साहेब वतनी कारभारास ठेवीत आहेत. यास, कोण्ही कैसा वर्तेल, कोण्ही कैसा वर्तेल. यास, आपणास जे गोष्टी दाखल होईल ते गोष्टीची वाजीखुसी करुन. जे दखल नव्हे आणि साहेबास कळेल ते ते साहेबीं आपणास सांगावी. आपण वाजीखुसी करुन. परंतु लोक गैरमाकुल आह्मांस नकळत वर्तले तरी त्याची बदलामी आपणावरी न ठेवावी. आपण खुतुत गैरमाकुल सहसा वर्तणार नाही. कारभारमुळें दाहा लोकांसी बरें वाईट बोलावे लागत आहे. एखादियाने लटकेंच कांहीं सांगितलें तरी ते गोष्टीटी बरी चौकशी करावी. सांगितलियावरुनच मनांत गैरमेहेरबानी न धरावी. बाजी खुसी करिता नेमस्त खुतुतु तमा आढळिली तरी मग जे नामेहेरबानी करणें ते करावी. लोक गैरमाकुल वर्तले तरी जो जैसें करील तो तैसा पावेल. त्याची बदलामी आपणावरी नाहीं. येणेंप्रमाणे साहेबीं मान्य केलें असे. मोर्तब सूद.
( मर्यादेयं )
( विराजते )
कित्ता एक. रदबदल कीं वतनीचा कारभारसाहेबीं आपणास सांगितला आहे. यासी, काय गैरमाकुल कारभार होईल त्याची मुनसीफी साहेबीं करावी, किंवा आमची आह्मावरी टाकावी. रा । अनाजीपंताचे सांभाळी न करावी. ऐसे बोलिलियावरी साहेबीं मान्य केलें असे. मोर्तब सूद.
( मर्यादेयं )
( विराजते )
कित्ता एक कलम. पंडित मा । इलेनें अर्ज केला केला कीं :- आपण कारभार करणें तो ऐसा करुन की जैसा आपले घरींचा खुतुत कारभार. ज्यान फाइदा समजोन करीजेत आहे ( त ) तैसा करुन साहेबीं मेहेरबानी मात्र असो द्यावी. मोर्तब सूद.
( मर्यादेयं )
( विराजते )
येणेप्रमाणें सदरहू कलमांचा तह साहेबीं दिधला असे. मोर्तब सूद.
( मर्यादेयं )
( विराजते )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४३१
१५३१ आषाढ शुध्द ७
ता।
अज रख्तखाने खुदायवद मलिक सर्क मलिक अंबर खूलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व हुदेदारानि अजहती मुकासाई व मोकदमानि
कसबे चाकण पा। मजकूर कसबे कडूस समत जुनर बिदानद सु॥ सन असर अलफ मुरारिभट बिन गंगाधरभट ब्रह्मे विद्वांस हुजूर मालूम केले जे आपणास इनाम दर सवाद देहाय मजकूर
कसबे चाकण पा। मजकूर कसबे कडूस समत जुनर
जमीन चावर जकाती व थल डावर सेत देखील बाग
एक गज स- जराईब चावर एक देखील नख्तयाती
रायनी देखील पैकी दरोज ता। देहाय व ता। ठाणे कुल
नख्तयाती कुल रुके बारा बाब कुल कानू न बाजे
बाब प्रज आपाजी .।. पटिया हुजुराती गैबती
नाणेकराचे सेत अंबराई चावर एक
चावर वीर घेरू दर बनास १
विहीर घेरू पेंडी एक
१
बा। हुजती बसिके खास भोगवटे वजिरानि कारकीर्दी दर कारकीर्दी सालाबाद व हुजती खान दिलावरखान तसरुफाती चालत आहे साहेबाचे खुर्द खत होए मालूम जाले बराए मालुमाती खातिरेसि आणौनु मुरारिभट बिन गंगाधरभट यासि इनाम सदरहू बा। हुजती बसिके खास व भोगवटे कारकीर्दी दर कारकीर्दी व हुजती खान दिलावरखान सालाबाद तसरुफाती चालत असैल तेणेप्रमाणे चालवीजे दर हर साल खुर्द खताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असली फिराउनु दीजे औलाद अफलाद चालवीजे मोर्तब सूद
तेरीख ४ माहे रबिलाखर
तेरीख ४ माहे रबिलाखर
रबिलाखर
रुजूसुदु बारसुदु सुरुसुदु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १० ] श्रीवरदमूर्तिर्जयति २५ नोव्हेंबर १६६०.
सरंमाजी. छ रबिलाखर, सु ।। इहिदे सितैन अलफ.
राजश्री निळोपंत मजमूदार यास वतनीचा कारभार करावयास ठेविलें. माहोलीपासून भीमगडपावेतों व इंदपूर, पुणें, चाकण कदीम वतनीचा कारभार करावा. यासी, पंडित मा । इलेनें साहेबासी अर्ज केला की :- आजी कागाचे दिवस आहेत. वतनीचा कारभार आणिक कोण्हास सांगावा. आपण बराबरी येऊन दाहा लोक कामें करितील तैसी करुन देऊन गड घेणें पडिलें तरी घेऊन देऊन. ऐसा अर्ज केला. त्यास साहेबीं उत्तर दिधलें कीं :- वतनी राहाणें हेंहि काम थोर आहे. वतन राहाणें. येथें तुह्मांस बकशीस इमारतीस पैके पावतील त्यास दर सदे होन २ दोनीप्रमाणें पावतील. ऐसे साहेब बोलिलियावरी पंडित मा । इले बोलिले कीं:- जरी वतनीचेंहि काम थोर आहे तरी बहुत बरें. एकानें सिद्ध संरक्षण करावें. एकानें साध्य करावें. दोन्ही कामें साहेब बराबरीनें मानिताती तरी आपण वतनीं राहोन. परंतु इमारतीचे पैके पाववून बकशीस घेणार नाहीं. मोरोपंत त्रिंबक व शिवनेर येथें पाठविले आहेत ते गड घेतील व मुलूक घेतील, कामें करितील. साहेब थोर कामास जाताती तें काम श्रीचे कृपेनें होऊन येईल. त्यास राजश्री मोरोपंतास मेहेरबानीनें पंचवीस फुलें दिधलीं तरी आह्मांसहि वीस फुलें द्यावीं. ऐसा साहेबीं निश्चय केला पाहिजे. त्यावरी साहेबीं ऐसाच तह दिधला कीं :- वतनीं राहोन कारभार करावा. इमारतीचे पैके पाववून बकशीस न घ्यावें. राजश्री मोरोपंत काम करितीली, गड घेतली, पैके मि ( ळ ) वितील, सुरगिरीचा प्रयत्न करुन घेतील. त्यास, मेहेरबान होऊन, पेशवे आहेत याकरितां पंचवीस फुलें दिधलीं तरी, तुह्मांस मजमूच्या काईदियानें, वतनीचें काम तें काम बराबरी ऐसें समजोन, त्यास द्यावीं तेच वख्ती तुह्मांसहि २० वीस फुलें पाठवावीं. या हिसेबा ( नें ) जैसें त्यास पावेल तैसें तुह्मांस देऊन. ऐसा साहेबीं निश्चय करुन पंडित मा । ईलेस वतनीचा कारभार करावयास ठेविलें असे. पंडित मा । ईलेनेहि सदरहूप्रमाणें मान्य केलें असे. मोर्तब सूद.
( मर्यादेयं )
( विराजते )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४३०
१५२३ मार्गशीर्ष शुध्द १३
ता।
महजर श्री सके १५२३ पलव सवछरे मागीस्वर सुध त्रयोदसी सुक्रवार ते दसी चाकण-स्थल-सील-सभे विदमान महजर केला ऐसा जे १५२१ विकारी सवछरी तकरीर केली ऐसी जे मुद्गलभट पुडले समस्त ब्राह्मैनी समापत्र केले जे ब्रह्मियाचे उत्पन इतके बहुताचे पींडदान व नांदीसराद व चक्रेस्वरीची पुजा व आउलीची पुजा व तुलसीची पुजा व आबिठियाचियाची पुजा व पीपलाची पुजा व स्त्री-पुरुसाची दोन अनंतव्रते होतील तेथील हि एक वाण व रोठे व थालीपाक व हिरण्या अष्ठ वर्ग इतुके बहुताचे ह्मणौनु तकरीर केली याउपरी आह्मी ब्रह्मी ह्मटिले ते सदरहू सकल हि आपले याउपरी सभा केली देवाळी मुख सभानायक देसमुख व साल पाटिल व आनाजी कुलकर्णी व देउजी तेली मुतालीक देसमुख व भिकू सुतार हे समस्त बैसोनु गावाती ग्रहस्थ + + + + गोपालबा सराफ व नरसावा खुताड व तिमाजी राम व आनाजी कुळकर्णी व नागोवा गाढवा हे पाचारुनु याचया माथिया वरी देवाचा पाला घालुनु घालू न ये तैस्या आणा घालुनु पूसिलेयाउपरि ते बोलिले जे पीडदानादी सकल कर्मे ब्रह्मियाची ब्रह्मे च खाताती यावरी सकल वादी खोटे जाले ते तकरीर नागोवा गाढवेयाने देउजीस नमस्कार करुनु तकरीर घेउनु फाडिलियावरी आजी तागाईत ब्रह्मियाचे ब्रह्मे खाताती दुसरियास समंधु नाही हा महजर सही
गोही
सीवाजी व सूर्याजी देसमुख सील सेटी सेटिया का। मा।
साल पाटिल खराबी का। मा। दसम सेटी सेटिया तांबोली
बहिरसेटी माहाजन आनाजीराम कुलकर्णी
बकाल
जानभट ढेरे जोगो पाटिल रातांधोली
पदमाजी आउदेऊ नरहरी मनाजी सराफ
जुनारदार
गोविंद पाठक देउकुले
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४२९
यादीदास्त जमीनजुमला का। इंदूरी प्रा। चाकण बमोजिब मवजनामालअराजी जमीनजुमला चावर ३७ मा। बिघे ४४४०
.
जिराती बागाईत
४२४०. २००
.
खालिसा बिघे इनामती बिघे
४०४०. ४००
.
जिराती बागाईत मोकदम ८०.
३८४०. २००
. मसीद ८०
.
मुरारभट १२०.
पाडेवार १२०.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ९ ] राजश्री - साहेब
खबर- राजश्री- सेवेस निळो सोनदेउ व रखमाजी शिवदेऊ सेवेस बखर ++++ माहे जमादिलाखर साहेबाचे कृपादृष्टीकरुन वर्तमान कल्याण असे:-
केसो नारायण सबनीस किल्ले राजगड याची वर्तणूक पहिलेपासूनु पाहतां, कारभार माकूल नाहीं. ऐसीयासी, पहिलेच भलते गोष्टीचे तहकीक करावे तरी कितेक गोष्टीकरितां करितां येत नसे. त्याउपरि, साहेब राजगडीहूनु मिर्जा राजाचे भेटीस गेलियावर राजगडीं हवालदार नाहीं, अगर पद्यावतीस सरनोबत नाहीं. राजगडचा कारभार केसोपंताचे शिरीं आला त्यावरी आह्मीं बारीक नजरेनें पाहतां, राजगडचे तनखापैकीं लारी ३००० तीन हजार अबाजीपंताकडूनु व राघोपंताकडूनु आली. यासी केसोपंतीं तीन हजार लारीपैकीं लारी १४०० चौदाशें गोविंद राउताचे हवाला केली. आणि उरली लारी १६०० सोळाशें आपल्या हवालगिरापाशीं ठेविली. त्यावरी घालमेली करुनु या प्यादियापासून त्यापाशीं, त्यापासुनु आणिका प्यादियापाशीं, ऐसे दोघा चौघाजवळी देती. ऐसे पंधरा रोज घालमेली, करुन सोळाशें लारीपैकीं सोळाशे लारीपैकीं सासे लारी तोडाविली, आणि हजार लाहारी एका नाईकवाडियापाशीं ठेविली. यावरी आह्मांस घुणघुण कळो आली कीं, तीन हजार लारी आगी होती, यापैकीं चौदाशें लारी गोविंद राउताचे माहालीं दिधली आणि सोळाशें लाहारी काय केली तें कळत नाहीं. ऐसी खबर आह्मांस लागतांच, आह्मीं रखमाजीपंतास सांगितले कीं, तहशिलेस कोण गेले होते ते नाईकवाडियासी बोलावूनु आणणें. त्यावरी, रखमाजीपंतीं नाईकवाडियाचा नाईकवाडी बोलवूनु कोण तहशिलेस गेले होते, कोणापाशी काहीं पैके ठेविले आहेत कीं नाहींत, ऐसे मनास आणितां, त्यापासूनु त्यापासीं ऐसें करितां, प्यादे कोण्ही हजीर, कोण्ही मसालियासी गेले. खबर घेतां घेतां दादजी नाईकवाडी, गुंडा नाईकवाडी यापाशीं हजार लारी ठेविली ते आडळली. त्यास खबर घेतां व चौकशी करितां बहुत घालमेली केली. त्यावरी आह्मीं नाईकवाडियासी सांगितलें कीं, हजार लारी तुजपाशीं आहे ते आमचे बगररजा खर्च न करणें. ऐसें केलें तों प्यादियापाशीं तहकिकी केली. हे खबर केसो नारायणास कळली. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८ ] अलीफ
श्री राऊ प्रौढप्रताप दिनकर राजाधिराज महाराज राजश्री शिवाजी राजे महाराज स्वामी गोसावी यांचे शेवेसी :-
किंकरें तापीदासदलाल अज् जाबती कपीतानें फ्रांशेश मो । पेंठ रायबाग रामराम विनंति येथील क्षेम महाराजांचे कृपेस्तव जाणोन महाराज साहेब आपलें क्षेमरोज वैभव लहावया आज्ञा केली पाहिजे. याउपरि- महाराजांनीं सेवकावरी अमृतव्रीष्टी करुन पत्र पाठविलें तें छ १५ माहे रविलोवली उत्तम समयीं पावून बहुत संतोष होऊन शिरसावंदून सनाथ जाहालों. वा । इजत रफअत द्दशागाह: मुशे दुरो साहेबासी सराफराजनामा पाठविले होते तेंहि शीरदीदे ठेवून बहुत संतोष जाहाले. आज्ञा केली होती जे दाभोळ बंदरास तुह्मीं येऊन, सौदागरी करुन सराफराज होणें. ह्मणोनु तरी पहिले आह्मीं बंदर राजापुरीं असतां राजश्री निळो सोमनाथपंतांनीं आह्मांसी किफायतीयाबाबे लिहिलें होतें. त्याचें तालीक लेहून बंदर सुरतासी आपला साहेबापासी पाठविलें होते. त्याचा जबाब अजुनी आला नाहीं. आतांही महाराज साहेबीं लिहिलेवरुन त्यां लिहिलेचें तालीक लिहोनु, तें आपलेतर्फेनें बहुत कांही लिहून, मुद्दाम अदमी करुन त्याबराबरी बंदर सुरतेसी रवाना करितों. तेथून जैसा रजा सादीर होईल त्याप्रमाणें वर्तणून केलें जाईल. विशेष लेहावें तरी महाराज साहेब आरीफ असेती. शेवकावरी निरंतर अमृतव्रीष्टी असो दिल्हे पाहिजे. हे विनंति. खामा वेक तापीदास तवाहीदास.