Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४४८
१६१५ ज्येष्ठ शुध्द १
सके १६१५ श्रीमुख नाम संवत्सरे जेस्ट सुध प्रतिपदा तदिनी खत लिखिते धनको नाम केसोभट ब्रह्मे रिणको नाम मल्हारि नाणेकर का। चाकण आत्मसुखे तुह्मापासून कर्ज घेतले रु॥ १०. दाहा रुपये यास कलांतर दर माहे दर रुपयास रुके
६ प्रमाणे देऊन यास मुदती जोंधळियाचे रासी माथा देऊन हे लिहिले सही
(नि॥ नांगर)
गोही
बापूजी त्रिंबक देसपांडे पा। मा।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ २४ ] ८ सप्तंबर १६७१.
मशहुरल हजरत राजश्री तुकोराम सुबेदार व कारकून सुभे मामले प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे दडवत शहुरसन इसन्ने सबैन व अलफ उपरि सबनीस सुबे मजकूर यावरी बाद ++++ तगारा नाईकवाडी ++ बापूजी नलवडा याणे कल्हावती करुन तरवारेचा हात टाकिला आणि अखेर आपलेच पोटांत सुरी मारुन घेऊन जीव दिल्हा. हें वर्तमान होऊन गेलें तुह्मीं कांहीं हुजूर लिहिलें नाहीं मराठा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली, याचा नतीजा तोच पावला. हालीं बापूजी नलवडा व कोंडाजी चांदरा व संताजी जामदार हरबकसा करुन सबनिसास दटावितात की +++++ होतें तेच तुमचे उपरि उचलो +++++ - वर्तमान कळों आलें. तरी ब्राह्मणास ++++ तील त्याची खबर घेणें जरुर आहे. तुह्मी ++++ घेत नाहींत. इतकियाउपरि त्यास ताकीद करुन हालखुद ठेवणे कीं सबनिसाचे वाटे न च जात. जरी काही सबनिसासी कथळा करायावरी ख ++++ ल हालखुद माकुलपणे असतील तरी हुजूर लिहिणें ह्मणजे तहकीक आहे की सबनीस मारायावरी आले होते याबद्दल साहेब त्यांस दस्त करुन हुजूर आणवितील आणि खबर घेतील. तुह्मी ऐसे बेकैद लोकांस होऊं न देणें हालखुद ठेवूनु खेशवार चाकरी घेत जाणे की कोण्ही बेढंग न वर्ते मुलाहिजा न धरणें छ १४ जमादिलावल
मोर्तब सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४४८
१६१५ ज्येष्ठ शुध्द १
सके १६१५ श्रीमुख नाम संवत्सरे जेस्ट सुध प्रतिपदा तदिनी खत लिखिते धनको नाम केसोभट ब्रह्मे रिणको नाम मल्हारि नाणेकर का। चाकण आत्मसुखे तुह्मापासून कर्ज घेतले रु॥ १०. दाहा रुपये यास कलांतर दर माहे दर रुपयास रुके
६ प्रमाणे देऊन यास मुदती जोंधळियाचे रासी माथा देऊन हे लिहिले सही
(नि॥ नांगर)
गोही
बापूजी त्रिंबक देसपांडे पा। मा।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४४७
१६१४ मार्गशीर्ष शुध्द १४
राजश्री दामाजी नारायण सुभेदार
व कारकून प्रा। जुनर गोसावियासि
अखंडितलक्षमीअलंकृतराजमान्य
सेवक शंकराजी नारायण सचिव नमस्कार सु॥ सलास तिसैन अलफ बेदमूर्ति कृष्णभट बिन केशवभट ब्रह्मे वास्तव्य कसबे चाकण याणी हुजूर एउनु विदित केले की आपणास पूर्वीपासून इनाम व रोजमरा कसबे चाकण व कसबे इंदोरी चालिले आहे बिता। कसबे चाकण जमीन चावर १ एक बा। थल नाणेकर खडी ९ पैकी खंडी ३ एकूण चावर सदरहू देखील नख्तयाती व महसूल सेलबैल व पायपोसी व खर्चपटी बाजे तुटपटी हुजराती व गैबतीहून पटिया देखील त्यापैकी त्याथलावरी एईल त्याणी खंडियाची तकसीम एईल ते व वेठीबेगारी कुलबाब कुलकानू देखील विहीर हुडा थलावरी वाटून ती खडियावरी एईल ते घेणे इनामतीच्या चावरामध्ये आंबे व चिंचा झाडझाडोरा आपण प्रजेकरून करुनु त्याचा राजभाग हाली व पेस्तर द्यावा
आंबराई बनास पेडी जकायती व जराईब पैकी
१ जकायती का। जराईब
मा। पैकी रोजमुरा पैकी सदका
व धर्मादाऊ दरोज तेल दरोज
रुके .।. १
कसबे इंदोरी इनाम चावर थल मीलनाक खंडी ३ एकूण चावर १ एक देखील नख्तयाती व महसूल व पटिया कुलबाब कुलकानू देखील तुटपटी व वेठीबेगारी
एणेप्रमाणे आपल्या वडिलवडिलापासून ता। सालगु॥ चालिले आहे याची पत्रे राजश्री स्वामी व कैलासवासी स्वामी याची आहेती तरी आपले इनाम चालविले पाहिजे ह्मणउनु विदित केले त्यावरून भटगोसावियापासून राजश्री माहाराज स्वामी व राजश्री कैलासवासी स्वामी यांची पत्रे होती ते रुजू पाहोनु तुह्मास आज्ञा केली आहे तरी याचे राजश्री कैलासवासी स्वामीचे कारकीर्दीपासून ता। सालगुदस्त चालिले असेल तेणेप्रमाणे पेस्तर हि साल दर साल चालवणे ताजे सनदेचा उजूर करीत नव जाणे पत्राची तालीक लिहून घेउनु असल पत्र परतोन देणे छ १२ रबिलाखर पा। हुजूर
बार सुरू सूद बार
पौ। छ १९ जमादिलोवल
सन सलास
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ २३ ] १६७१ \ १६७२
बर्क सनद बकषीस रक्षखाना राजश्री शिवाजी राजे साहेब दामदौलतहू शहुरसन इसन्ने सबैन व अलफ साहेब अगराहून निघालेयाउपरि चिरंजीव राजश्री सभाजी राजे यांस राजश्री कृष्णाजी विश्वासराऊ यांचे साभाळी केलें मानइले चिरंजीवास क्षेमरुप किल्ले राजगडास घेऊनु आले मा। नइलेची मातु श्री आईजी + व बधु मा । काशी त्रिमळ हेहि बराबरी आलियाबद्दल मेहेरबानीनें बकषीस द्यावयाचा तह केला रुपये
५०००० मो। पन्नास हजार रुपये रास
मातु श्री आईजी मा। काशी त्रिमळ
२५००० २५०००
येणेप्रमाणें पाववीत पाववावे.
मोर्तब सूद*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४४६
१६१४ आश्विन शुध्द ७
राजश्री माहाराज
साहेब राजश्री
छत्रपती स्वामी
कैलासवासी
अज सुभा राजश्री दामाजी नारायण सुभेदार व कारकून सा। जुनर ता। मोकदमानि कसबे इदोरी प्रा। चाकर सु॥ सलास तिसैन अलफ वेदमूर्ति केशवभट बिन कृष्णभट ब्रह्मे सेकीन कसबे चाकण इ इ इ. छ ५* सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४४५
१६०७ ज्येष्ठ शुध्द ६
रोखा मोकदमानि का। इंदोरी पा। चाकण सु॥ सीत सन १०९५ यासि देसमुख व देसपांडिए पा। मजकूर लेहावया कारण ऐसे जे रा। वेदमूर्ति केसवभट ब्रह्मे याचे सेत का। मा। इनाम आहे ते याचे सांभाळी करणे याचा बोभाट एऊ नेदीजे छ माहे रजबू
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४४४
१६०० ज्येष्ठ वद्य ९
दा। बो। मोकदमानि व रयांनि मौजे सावरदरी पा। चाकण सु॥ तिसा सन १०८८ साहेबाचे बांदगीस कतबा लेहौनु दिधला ऐसा जे साहेबी आपणास हजूर बोलाउनु रजा फर्माविली जे मौजेमजकुरीची महामुरी कारणे जमाबंदी मुशकश करणे यावरी देसमुख व देसपांडे पा। मा। अर्ज करुनु जमाबंदी मुशकश केली कुलबाब कुलकानु साल तमाम बिल मख्ता मुशकश केला तो आपण कबूल असो उगवणी करुनु सीवाय सायर खु॥ शाही टके १०१
मा। एकसे एक टका रास
गोही सताजी व विठोजी देसमुख
पा। मजकूर
गोही नारोजी चंदस व बाळाजी
बापूजी देसपाडिए पा। मा।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ २२ ] १६७१ \ १६७२
( प्रतिपच्चंद्र )
( लेखेव वर्धिष्णु र्वि- )
( श्ववंदिता ।। शाहसू- )
( नो. शिवस्येषा मुद्रा )
( भद्राय राजते )
जाबिता तह इमारती करणें. सन इसन्नेकारणें इमारती करावयाचा तह केला असे कीं गबाळ हुन्नरवंद लावून पैका पावत नाहीं, हुन्नरवंद गवगवा करितां काम करीत नाहीत, याबद्दल तह केला कीं नेमस्तच इमारती करावी - होनुः
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४४३
१५८० पौष शुध्द ४
वेदमूर्ति राजमानी राजश्री
बाबनभट का। इंदोरी
गोसावियासि
केरोजी पोवार विश्वासराव दंडवत विनति उपर लिहावया कारण ऐसा जे का। मा।री तुमचे इनाम आजीतागाईत चालिला नाही आणि आता कुनबियाची सेते सरकारचा महसूल खात असाल तर देणे लागेल जर इनाम खाणे असेल तर मोगलाईमधून तनखियात पैके वजा करून एणे तेव्हा इनाम खाणे नाही तर हरगीज कुणबियाची आणोन खाणे जर खाल तर दुगुणीने पैके देणे लागितील कळले पाहिजे हे विनति अखेर साली पैसे देणे लागतील मग कस्टी व्हाल हे विनति