Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ३० ] श्री. १६७४.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनो. शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।.
अज् रख्यखाने राजश्री शिवाजी राजे दामदोलेतहू ता । बकाजी फर्जद- सुहुरसन अर्बा सबैन व अलफ. मौजे नादेडे तर्फ खडकवासलें येथील मोकदमी राजवडियाची होती त्याणे सदोजी पोळ यासी निमे तक्षीम नावनांगराची विकिली निमे तक्षीम कीर्दीची घुलियासी विकिली त्यास सदोजी पोळापासून निमे नावनांगराची तक्षीम साहेबीं पैके देऊन विकत घेतली होती ते हालीं तुह्मांस मेहेरबान होऊन शंभरा होनास विकत दिधली. निमे तक्षिमेचा हक्कलाजिमा व इनामचावर जें उत्पन्न असेल तें खाऊन नावनांगराची निमे पाटिलकीचा कारभार करीत जाणें. पाटिलकीची निमे तक्षीम तुज दिधली असे लेकराचे लेकरीं औलाद अफलाद तुवा खाणें. अर्थाअर्थी कोणास संबध नाहीं. साहेबीं निमे तक्षीम तुज दिधली असे. निमे काळी व पांढरी असे निमे तक्षीम आहे ते तुझे तुज असे मोर्तब सूद.
रुजू सुरनवीस.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४५२
श्री १६४१ फाल्गुन वद्य ६
आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान ता। मोकदम का। इंदुरी प्रा। चाकण सुहुरसन असरीन मया अलफ का। मा।री वेदमूर्ति मुरारभट ब्रह्मे यास इनाम जमीन खंडी तीन आहे त्यापैकी दीड खंडी तुह्मी हिरोन घेतली ह्मणऊन विदित जाले तरी यांचा इनाम यांचे दुमाला करणे फिरोन बोभाट एऊं न देणें जाणिजे छ २२ जमादिलोवल आज्ञाप्रमाण
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ २९ ] शिवाजी महाराज व इंग्रेज कंपनी यांचा तह. १६७४
१. इराणचा पातशाहा व हिंदुस्थानांतील मोगल पादशाहा याचा व इंग्रेजांचा तह जाला त्याचे देशांत इंग्रेजाचा व्यापार चालत आहे.
२. व्यापार माल येईल त्याजवरी जकात घेऊं नये महाराजांचे राज्यांत व्यापार चालावया अडथळा होऊं नये.
३. इंग्रेजाचे शिक्याचे रुपये व मोहोरा व पैसे महाराजाचे राज्यांत चालावे.
४. महाराजाचे मुलकांत दर्याचे काठी इंग्रेजांचीं जाहाजें मोडून फुटून किनारियास लागलीं तर त्यातील माल आमचा आह्मांस द्यावा.
एकूण चार कलमें. पैकी महाराजानी ठराव केला तीं कलमेः-
१. महाराजांचे राज्याच तुह्मी व्यापार करावा.
२. माल येईल जाईल त्याची जकात माफ केली असे.
गैरमजुरा कलमेः-
१. इंग्रेजाचे शिक्क्याचे रुपये व पैसे व मोरा या मुलकात चालणार नाहींत.
१. महाराजाचे मुलकात दर्याचे किनारियास जहाजें मोडून फुटून किनारियास लागल्यास माल देणार नाहीत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ २८ ] श्रीभवानी शंकर. १९ मे १६७३.
मशरुल अनाम राजश्री जुमलेदारानीं व हवालदारानी व कारकुनानीं दिमत पायगो मुक्काम मौजे हलवर्ण ता । चिपळूण मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजी राजे सु ।। अर्बा सबैन व अलफ. कसबे चिपळुणीं साहेबीं लष्कराची बिले केली आणि याउपरि घाटावरी कटक जावे ऐसा मान नाही. ह्मणून एव्हा छावणीस रवाना केले ऐसीयास, चिपळुणी कटकाचा मुक्काम होता याकरिता दाभोळच्या सुबेयांत पावसाळ्याकारणे पागेस सामा व दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होऊन गेला. व चिपळुणाआसपास विलातील लष्कराची तसवीस व गवताची व वरकड हरएक बाब लागली. त्याकरितां हाल कांहीं उरला नाही ऐसे असता वैशाखाचे वीस दिवस, उनाळा, हेही पागेस अधिक बैठी पडली परंतु जरुर जाले त्या करितां कारकुनाकडून व गडोगडीं गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे त्यास, तुह्मीं मनास येसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोंवरी धुदी करुन चाराल, नाहीसे जालें ह्मणजे मग काहीं पडत्या पावसांत मिळणार नाहीं, उपास पडतील, घोडी मरायास लागतील ह्मणजे घोडी तुह्मींच मारिलीं ऐसें होईल, व विलातीस तसवीस देऊं लागाल. ऐशास, लोक जातील, कोण्ही कुणब्याचेथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटें, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसें करु लागलेत ह्मणजे जीं कुणबी घर धरुन जीवमात्र घेऊन राहिले आहेत तेहि जाऊं लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. ह्मणजे त्याला ऐसें होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनहि अधिक तुह्मी । ऐसा तळतळाट होईल । तेव्हां रयतीची व घोडियांची सारी बदनामी तुह्मावरी येईल हें तुह्मी बरें जाणून, सिपाही हो अगर पावखलक हो, बहुत यादी धरुन वर्तणूक करणें. कोण्ही पागेस अगर मुलकात गांवोगावं राहिले असाल त्याणीं रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाहीं. आपल्या राहिला जागाहून बाहीर पाय घालाया गरज नाहीं साहेबीं खजानातून वाटणिया पदरीं घातलिया आहेती ज्याला जें पाहिजे, दाणा हो अगर गुरेढोरें वागवीत असाल त्यांस गवत हो, अगर फाटें, भाजीपाले व वरकड विकावया येईल ते, रास घ्यावे, बाजारास जावे, रास विकत आणावें. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाहीं. व पागेस सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे ऐसे तजविजीने दाणा रातीब कारकून देत जातील तेणेंप्रमाणेंच घेत जाणे, की उपास न पडतां रोजबरोज खायाला सांपडे आणि होत होत घोडी तवाना होत ऐसें करणे नसतीच कारकुनासी धसपस कराया, अगर अमकेंच द्या तमकेच द्या ऐसे ह्मणाया, धुदी करुन खासदारकोठींत, कोठारात शिरून लुटाया गरज नाहीं व हाली उनाळ्याला आहे तइसें खलक पागेचे आहेत, खण धरुन राहिले असतील व राहातील, कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील, कोण्ही तबाकूला आगी घेतील, गवत पडिलें आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनास ना आणिता ह्मणजे अविसाच एखादा दगा होईल. एका खणास आगी लागली ह्मणजे सारे खण जळोन जातील गवताच्या लहळ्यास कोणीकडून तरी विस्तो जाऊन पडला ह्मणजे सारें गवत व लहळ्या आहेत तितक्या एकेएक जाळों जातील. तेव्हां मग कांहीं कुणबियांच्या गर्दना मारल्या अगर कारकुनांस ताकीद करावी तैसी केली त-ही कांहीं खण कराया एक लाकूड मिळणार नाहीं, एक खण होणार नाही हे तो अवघियाला कळतें. या कारणें, बरी ताकीद करुन, खासेखासे असाल ते हमेषा फिरत जाऊन, रधनें करिता, आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो खण, गवत वांचेल तें करणें ह्मणजे पावसाळा घोडीं वाचलीं. नाही तर मग, घोडीं बांधावीं नलगेत, खायास घालावें नलगे, पागाच बुडाली ।। तुह्मीं निसूर जालेत ।।। ऐसें होईल याकारणें तपशिलें तुह्मांस लिहिलें असे जितके खासे खासे जुमलेवार, हवालदार, कारकून आहा तितके हा रोखा तपशिलें ऐकणें, आण हुशार राहाणें. वरचेवरी, रोजाचारोज, खबर घेऊन, ताकीद करुन, येणेप्रमाणें वर्तणूक करितां ज्यापासून अतर पडेल, ज्याचा गुन्हा होईल. बदनामी ज्यावर येईल. त्यास - मराठियाची तो इज्जत वाचणार नाहीं, मग रोजगार कैसा ? - खळक समजों जास्ती केल्यावेगळ सोडणार नाही हें बरें ह्मणून वर्तणूक करणें. छ १२ सफर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ २७ ] ६ डिसेंबर १६७१ श्री. ( श्री )
( सीव चरणीं तत्पर )
( त्रिंबकसुत मोरेश्वर )
मशहुरल हजरत राजश्री नरहरी आनदराऊ सरसुभेदार ता । कुडाळ प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत सुहुरसन इसन्ने सबैन अलफ साहेबी प्रभावळीपासून तहद कल्याण भिवंडीपावेतो मिठाचा जबर निरखाचा तह दिल्हा आहे ऐसीयासी, बारदेशात मीठबदरें आहेत तेथून मीठ खरीद करुन उदमी नेत आहेत ऐसीयासी, हालीं आपणाकडे मिठाचा पाड जबर जाला, हे गोष्टी ऐकोन उदमी खळक कूल बारदेशाकडे जातील. तरी तुह्मी घाटीं जकाती जबर बैसवणें बारदेशात मीठ विकते त्याचा हिशेबें प्रभावळीकडे संगमेश्वराकडे मीठ विकतें, त्याणे कितेक जबर पडतें, तें मनास आणून त्या अजमासें जकाती जबर बैसवण कीं संगमेश्वरीं विकतें आणि घाटपावेतों जे बेरीज पडेल त्या हिशेबें बारदेशीच्या मिठास जकाती घेवणें संगमेश्वराहून बारदेशीचें मीठ माहागच पडे ऐसा जकातीचा तह देणें जरी जबर जकातीचा तह नेदा, मुलाहिजा कराल, ह्मणजे कुल उदमी खळक बारदेशाकडे वोहडेल आपलीं कुल बंदरे पडतील. ऐसी गोष्टी आहे. तरी रोखा पावेल तेच घटिकेस कुल घाटीं जकाती जबर करणें. सगमेश्वराहून बारदेशीच्या मिठास जबर निरख पडे ती गोष्ट करणें. ये गोष्टीचा एक जरा उजूर न करणें. ये गोष्टींत साहेबाना बहुत फायदा आहे. जरी जबर किंमती केली आहे त्या हिशेबें बारदेशीच्या मिठास जबरच पडे ती गोष्ट करणें. व तुह्मांकड लहान मीठ आहे त्याचा तह आहे त्याखेरीज हाली जाजती दर मणें टंकसाळी रुके + बारा रासप्रमाणें तह देणें. मुलाहिजा न करणें. मिठाचा मामला हजराहीबद्दल कर्द लाख रुपये यावयाचा मामला आहे तरी लिहिलेप्रमाणें अंमल करणें. या कामाबद्दल पाठविले असती त्यांसी मसाला होनु नी ।। ४.
रामाजी बांदे हरकारा संताजी गिरजोजी अपातप
रा। होनु नी ।। ३ होनु १
पाठवले असत. यांसी मसाला होन नी ।। ४ होनु. पा । कुडाळपैकी आदा करणें.
रास आदा करणें. छ १४ साबान. पा। हुजूर.
पौ। छ २५ साबान ( मर्यादेयं )
मुद्दे कुडाळ, बराबर रामाजी बार सूद. ( विराजते )
दादो हरकारा. सुरु सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ २६ ] २४ सप्तबर १६७१
मशहुरल हजरत राजश्री तुकोराम सुबेदार व कारकून सुबे मामले प्रभावळी प्रति राजश्री शिवाजीराजे दंडवत. शहुरसन इसन्ने सबैन व अलफ मामले दाभोळ विलायतीस नारेळ दर सद्दे लारी ४ व रोठादेखील जकात दर खंडीस लारी १२५ सवाशेंप्रमाणे विकत आहे आणि नेवरे बाजे तुह्माकडील माहालीं ऐन जिन्नस बटाई दिवाणांत उसूल देताती. व रयत वासा खरीदी करितात. ऐसें असतां, कमनिर्खे नारेळ सुपारी विकते, ऐसी खबर कळों आली आहे. तरी हा अंमल कैसा आहे ? ऐन जिनसांची गीर्दवरी कैसी करता ? आणि कमनिर्खे कोण विकितात ? हे खबर घेणें आणि ताकीद करणें. पेस्तर ऐसे नव्हे ऐन जिनसाची गीर्दवरी बरी व्हो. आणि जो तह तुह्मांकडे आहे ( त्या निर्खे विर्की कर ) णें कम निर्खे विकिलिया इकडे धक्का बसतो आणि अलग नुकसान येऊ पाहातें त्याची बदनामी तुह्मांस, ऐसें जाणून, खरी खबर घेऊन, चौकशी व गीर्दवरी करुन, ऐन जिन्नस तहप्रमाणेंच दिवाणांतून विकीत जाणे. छ ३०, जमादिलावल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४५१
श्रीमार्तंड १६२६ श्रावण शुध्द ४
श्री सके १६२६ तारण संवछरे श्रावन सुद ४ सोमवार तदिवसी मिरासपत्र करून दिधले ऐसे जे वेदमूर्ति जोतिसशास्त्रसंपन्न रामजोसी वलद मंकजोसी व गंगाधरजोसी वलद मकजोसी कसबे च्याकन पा। मजकूर यासि जोसी व कुलकर्नी समस्त प्रा। मा।र बनाम बिता।
राघो विस्वनाथ जोसी रामाजी कासी व जानो
कुलकर्नी कसबे इंदूरी सिवदेव जोसी व कुल-
व जांबेड व नानोली कर्नी मौजे कालोस
देह ३ १
पत्रप्रमाणे सही
राघो त्रिमल जोसी व बाबाजी सिवदेस कुल-
कुलकर्नी मौजे कोइली कर्नी व जोसी मौजे
१ भोसे व सेलगाव देह
पत्रप्रमाने सही ३ पत्रप्रमाने सही
मोरो त्रिमल जोसी व कुसाजी गोविंद जोसी
कुलकर्नी व बयाजी रुद्र कुलकर्नी मौजे आबेठान
मौजे निघोज व मौजे व वराल व भांबोली
मोए देह २ व सेळू असखेड खु॥
पत्रप्रमाने सही व असर्खेड बु॥ देह ६
बाबदेव भट जोसी सखो बनाजी जोसी
मौजे कल्हेट कुलकर्नी मौजे खरपुडी
१ १
अंताजी मल्हार जोसी कमलाजी केशव जोसी
कुलकर्नी मौजे मलकर कुलकर्नी मौजे पीपले
१ १
रामाजी माहादेव व खंडो एसाजी जोसी
बावाजी शामराज कुलकर्नी मौजे करदी
जोसी कुलकर्नी १
देह ४ नानाजी अनंत जोसी
१ गालेगाव कुलकर्नी मौजे दावडी
१ पीपलगाव १
१ धनारे यादव मोरेस्वर जोसी
१ सोळू कुलकर्नी मौजे पीपरी
---------- व सिरोली देह २
४
गोपाल नरसिंह व राघो दतो मोडजोसी
बाबाजी त्रिमल व व कुलकर्नी
वीरेस्वर केशव १ वेलेवाडी
जोसी कुलकर्नी १ खाल उमर
मौजे चऱ्होली व १ सागुर्डी
आलंदी १ कान्होवडी
२ १ सुदलवडी
१ साद
१ सुद उंबर
--------
७
विनायक त्रिंबक जोसी मोरो त्रिंबक व खंडो जोसी
कुलकर्नी व कुलकर्नी मौजे वाकी
१ किवल बु॥ व वासोली व
१ चांदज सावरदरी देह ३
१ कोरेगाऊ खु॥
१ कोरेगाऊ बु॥
------
४
माहादेवभट बिन बाबदेवभट राघो मुरार व माहादाजी
पारखले जोसी कुलकर्नी जोसी कुलकर्णी मौजे
मौजे कोएर व कुरकुंडी तलेगाव व वराळे २
२ खंडो जोसी कुलकर्णी
मौजे आंब व कुंड देह
२
कोणकर रामजोशि बिन् मंकजोशि
व गंगाधर जोशि देह १०
१ माहाळुगे १ सशे
१ कुरळि १ बिरदवाडी
१ चिवळि १ रहकल
१ केळगाव १ गोनवडि
१ वाकि १ पिंपरी
सु॥ सन १११४ मिरासपत्र करून दिधले ऐसे जे वेदशास्त्रसंपन्न जोसी कसबे मजकूर यासि आपले घरी जोतिसवृती मिरास गणेसपुजा व ग्रहघटिकालग्न-मोहुर्तपत्रिका तुह्मास मिरास करून दिधली असे लेकराचे लेकरी वौशपरंपरेने खाने यासि आपले वौशिचा कोन्ही अनेथा करील त्यासि शपत्य पुर्वजाची आन असे व कुलस्वामीची आन असे याखेरीज पा। मा।र धर्मादाऊ दानपूर्वक मिरास रु॥ ५१ गावगना पाटिलानी तुह्मास दिल्हे आहेत व हे आपन हि चालऊन कोन्ही अनेथा करनार नाही तरीख छ ३ माहे जिल्हेज वली सुमार १३
गोही
बावाजीपंत राजगुरु गोपालभट खेडकर
धर्माअधिकारी पत्रप्रमान उपाधे सिरोलीकर
साक्ष पत्रप्रमाने साक्ष
पत्रप्रमाणे
कृस्नभट पुरानीक कोनेर पाठक दकले
पत्रप्रमाने साक्ष मल्हारभट ब्रह्मे
बाबदेवभट व त्रिंबकभट पुरकर
दादमभट सैव मोकदम मौजे कोईली
रघुनाथभट गंधे
मोकदम मौजे कालोस
दाा एसाजी वलद संताजी दा। भागवत नारायण
व सिवाजी वलद विठोजी व अनाजी बालाजी
कडू देसमुख प्रा। मा। देसपांडिए पा। मा।र
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४५०
श्रीमार्तंड १६२२ आषाढ शुध्द १३
नकल
पारसी मोहोर
पारसी काजीचे दस्तक
चकनामा दरवजे मदतमाश बो। केशवभट वलद कृष्णभट ब्रह्मे जुनरकर सेकीन का। चाकण प्रा। मा।र सरकार जुनर सुबे खुदस्तेबुनियाद सु॥ हजार १११० बदल खैराती बमोजिब दरवजे अमीरअल-उमराये मुताबिक दरवजे बमोहर उमदे वजराये रफीशान् उमदे सवनी बुलद मकान् जमदतुलमुलक मदारलमहाम मवजी तीन खंडी ३ मजरू एकएक जिराती दर कसबे चाकण थल नाणेकर पैकी पाटिया ६ दर पाटीस मण .॥. दाहा माा खंडी तीन मोकरर करून चक बरहुकूम हदमहदूद करून दिल्हे असे सालाबाद पुस्त दर पुस्त खाऊन हमेशा हजरत जिलसुभानीयास दुवा करीत जाणे बिता। हाद
पूर्वेस बाग फुलारा पछमेस हाद निघोजे
मार्ग व पाणद असे
उत्तरेस बाग करपा दक्षणेस विहीर घेरू
व बाग गाडपिला व नाणेकरवाडी नजीक
व बाग कुलकर्णी पेडवला बाग फुलारा
सदर्हू हामहदूद व सेतामधे विहिरी २ नजीक नाणेकरवाडी विहीर १ व नजीक पिंपळाचे झाड विहीर १ एकूण विहिरी २ व आंबे दिरख्त ३ तीन आहेती याप्रमाणे खाणे हा चकनामा सही तेरीख ११ माहे मोहरम सके १६२२ विक्रम संवछरे आषाढ सुध १३ त्रयोदसी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४४९
श्रीशंकर १६१७ माघ शुध्द २
अज सरसुभा राजश्री दामाजी नारायण सेनापत्य हजारी व कारकून ता। मोकदमानि व सेटिये माहाजन का। चाकण सु॥ सीत तिसैन अलफ वेदमूर्ति बाबदेभट ब्रह्मे यासि का। मजकुरी इनाम आहे त्यास तह्मी खलखल करिता ह्मणून विदित जाले तरी हुजरून वेदमूर्तीस इनाम दिल्हा असता तुह्मास खलखल करावयासि प्रयोजन काय आहे याउपरि वेदमूर्तीस इनामाचे बाबे खलखल केली होईल ह्मणजे तुमचा मुलाहिजा होणार नाही ऐसे समजोन जरा तोसीस न देणे जाणिजे रा। छ १ रजबु मोर्तब सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ २५ ] १९ सप्तबर १६७१
शहरुल हजरत राजश्री धारराव निंबाळकर सुबेदार यासी राजश्री शिवाजी राजे शहुरसन इसन्ने सबैन व अलफ मा । माहादाजी यंमाजी यासी सु +++ ++++++++++ काम फर्मावून पाठविले +++++ +++++++ दरबार करीत जाणे ++++++++ तिसालीना होन्न पा । १०० एकसे रास पादशाही मोकरर केले असेती. इ प पासून वजा वटाऊ रवेशप्रमाणें करीत जाऊनु बाकी बेरीज माहे दर माहे आदा करीत जाणें यारिदी व कागद बाहे लिहिणियामाफिक व शाही सिरें देत जाणें बारगीर, घोडे व हवालगीर व दिवटीदार निसबत बाजे हजारी सुबाचे मजमदाराचे तहप्रमाणें चालवणें मा । नइले हुजूर चिरंजीव संभाजी राजे याकडे वाकेनिविसीचे मुतालिकीस होते. देणे फाजील काहीं नाहीं मोर्तब सूद
तेरीख छ २५ जमादिलोवल.