Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४४२
१५८० पौष शुध्द ४
मशहुरल हजरती राजश्री गोजो बापूजी हुदेदार व मोकदम मौजे कल्हेट पा। चाकण सु॥ समान खमसैन अलफ कृष्णभट ब्रह्मे का। चाकण ठाण एउनु मालूम केले जे आपले जोतीस मौजेमजकुरीचे मिरासी ऐसीयास आपण खंडोबा ब्राह्मण मौजे माहाळुंगे पा। मा। त्याचे सांभाळी केले होते त्याने बानुभट सेरखुंडीकर याचे हवाला केले ऐसीयास त्याने जोतीस व कुलकर्ण हि केले साल मजकुराकारणे आपण चालवीन या कारणे गावास जाउनु बाबाजी नारायण गावी ठेऊन आलो त्यास बानुभट हरकती करितो ह्मणौनु तपसीलवार मालूम केले तरी कृस्णभट आपली मिरास आहे जो ब्राह्मण ठेवितील त्यापासुनु कुलकर्ण व जोतीस घेणे बानुभट हरकती करीकरील तरी ठाणेयास पाठविजे छ २ रबिलाखर व याचे घरवाव आहे पहिले ब्राह्मणी यास दिधला आहे तो यास दुमाले कीजे मोर्तब सुद ता। घेउनु असेली फिराउनु दीजे मोर्तब
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४४१
१५८० कार्तिक वद्य ११
अज दिवाण ठाणे पा। चाकण ता। मोकदमानि का। चाकण पा। मजकूर सु॥ तिसा खमसैन अलफ बो। कृस्णभट बिन मुरारिभट ब्रह्मे सो। का। मजकूर ठाणा एउनु मालूम केले जे आपणास इनाम दर सवाद का। मजकूर रोजमुरा व तेल बिनाम मुरारभट जमीन चावर १वा। थल नाणेकर खंडी ९
पैकी खंडी ३
ए॥ चावर १
सदरहू देखील नख्तयाती व मा। व सेलबैल व पायपोसी व खर्चपटी व बाजे तुटपटी व हुजराती व गैबतीहून पटिया होतील त्यापैकी या थलावरी एईल त्यासि खंडियासि तकसीम एईल ते व वेठबेगारी कुलबाब देखील विहीर हुडा आला वरी वाटून ती खंडियास एईल ते देणे व इनामतीचे चावरामधे आबे व चिचा व झाडझाडोरा आपण प्रजेकरू लाउन त्याचा राजभाग हाली व पेस्तर देणे
अंबराई दर बनास जकाती व जराइबू
पेंडी १ पैकी
जकाती का। जराइबूपैकी
मा। पैकी सदका तेल
रोजमुरा सेर १
दरोज रुके
.l.
एणेप्रमाणे आपणास इनाम भोगवटे व तसरुफाती ता। साल गु॥ चालत आले आहे + + + + + + साल मा। सादर आहे तेथे रजा जे सदर्हू प्रमाणे ई॥ मजकुरास इनाम आहे त्यासि साल गु॥ भोगवटा व तसरुफाती चालिले असेली तेणेप्रमाणे साल मा। हि इ॥ अवल सालापासुनु इनामदारमजकुराचे दुमाले करणे यास हाली ताज्या खुर्द खताचा उजूर करिताती दरी बाब खु॥ होए मालूम जाले तरी बो। मुरारभट बिन कृस्णभट ब्रह्मे सो। का। मजकूर यासि इनाम
अंबराई दर बनास जकाती व जिराइबू
पेंडी १ पैकी --------
जकाती का। जराइबूपैकी
मा। पैकी सदका तेल
रोजमुरादरोज सेर १.
रुक .l.
एणेप्रमाणे इनाम आहे यासि ता। साल गु॥ जेणे प्रमाणे भोगवटा व तसरुफाती चालिले असेली तेणे प्रमाणे साल मा। इ॥ मा।चे दुमाले इ॥ अवल सालापासुनु करणे तालिक लिहून घेउनु असेली खु॥ इ॥ मा। पासि फिराउनु देणे साल गु॥ सन समानामध्ये मोगलाचे फितरतीकरिता सारे आदा जाला नाही त्यावरी नव जाणे ता। सन सबा भोगवटा व ता। चालिले असेली तेणे प्रमाणे साल मा हि दुमाले करणे मोर्तब सूद
तेरीख २४ माहे सफर
सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४४०
१५७८
अज रख्तखाने राजश्री सीवाजी राजे साहेबु दामदौलतहू बजानेबु कारकुनानि पा। चाकण बिदानद सु॥ सबा खमसैन अलफ कृस्णभट बिन मुरारीभट ब्रह्मे इनामदार सो। चाकण पा। मजकूर हुजूर एउनु मालूम केले जे आपणास इनाम व रोजमुरा व तेल दरोज सतका चालत आहे ऐसियासि ता। मजकूरचा मोहसबा हुजूर होता सुरनिसीहून निजा याणि बदीकलम काहाडिले आहे की भटमजकुरसा बा। तेल वजन ॥ एकूण रुके
२ प्रमाणे खर्च घातला आहे पैकी मजुरा
१॥ देउनु निजा दरोज अडका
.॥. अडका प्रमाणे बेतीज काहाडिली आहे ह्मणउनु माहालीचे कारकुन निज्याचे पैके आपणास मागताति व इनामास हि ताजे खुर्द खताचा उजूर करिताति तरी माहाराज धर्मपरायण पुण्यउदधि आहेती (पुढें गहाळ)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४३९
१५७५ आश्विन शुध्द २
तालीक
अज रख्तखाने राजश्री सीवाजी राजे साहेबु दामदौलतहू बजानेबु कारकुनानि पा। चाकण बिदानद सु॥ अर्बा खमसैन अलफु बाबदेभट ब्रह्मे व त्रिंबकभट राजगुर का। मा। यास आच्यार्याचे व्रतीचे भाडण होते त्याबदल हरदोजण हुजूर आले त्रिंबकभट राजगुर एणे दिव्य केले तो खोटा जाला त्याचा भाऊ भोजभट राजगुर तो एथे होता तो एथून पळाला आहे तरी भोजभटास दस्त करुनु हुजूर पाठवणे व त्रिंबकभटाची व भोजभटाची माणेस का। मजकुरी आहेती त्यास मोकळ देणे त्यांची कुल वस्तभाव जे असेली ते कैद करुनु जाबिता हुजूर पाठवणे या कामाबदल राणू कमा माहालदार पाठविला असे यास मसाला टके ७॥ साडे सात रास आदा करणे
तेरीख ३० सौवाल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ २१ ] १६७१ \ १६७२
( प्रतिपच्चंद्र )
( लेखेव वर्धिष्णु र्वि- )
( श्ववदिता ।। शाहसू- )
( नो. शिवस्येषा मुद्रा )
( भद्राय राजते )
जाबिता तह सन इसन्ने कारणें राजश्री साहेब, तह केला कीं - जो आपला वतन मुलूक आहे त्यापैकीं माहालोमाहालीहून खजाना करावयास पैके आणावे त्याचा खजानाच करुन ठेवावा जे वख्तीं मोगलाशी झगडा सुरू होईल आणि मोगल येऊन गडास वेढा घालतील त्याचे मदतीस जरुर. आणिकी करुन ऐवज जुडेना तरीच खजानाचे पैके खर्च करावे नाहीं तरी ए-हवीं राज्यभागास सर्वही खर्च न करावा ऐसा सागो तह केला असे आणि खजाना करावयाची मोईन केली होनु-
१,२५००० मा । एक लाख पचवीस हजार होन रास
२०००० | कुडाळ. |
२००० | राजापूर |
२०००० | कोळें |
१५००० | दाभोळ |
१३००० | पुणे |
१०००० | नागोजी गोविंद |
५००० | जाउली |
५००० | कल्याण |
५००० | भिवंडी |
५००० | इंदापूर |
२००० | सुपें |
५००० | कृष्णाजी भास्कर |
१२५००० |
येणे प्रमाणें एक लाख पंचवीस हजार होनु खजाना करावयाचा तह केला असे मोर्तब सूद. *
( मर्यादेयं )
( विराजते )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४३८
१५७५ श्रावण वद्य ३
अज रख्तखाने राजश्री सीवाजी राजे साहेब दामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। चाकण बिदानद सु॥ अर्बा खमसैन बै॥ क्रुस्णभट बिन मुरारीभट ब्रह्मे सो। कसबे चाकण पा। मजकूर हुजूर एउनु मालूम केले जे आपणासि इनाम व रोजमुरा व तेल
बितपसील
दर सवाद का। चाकण बिनाम मुरारीभट जमीन चावर १ बा। थल नाणेकर खडी ९ नव पैकी खंडी ३ ए॥ चावर सदर्हू देखील नख्तयाति व महसूल व सेलबैल व पायपोसी व खर्चपटीया व बाजे तुलपटी व हुजराती व गैबतीहून पटिया होतील त्या पैकी या थला वरी एईल त्यासि ती खडियासि ता। एईल ते व वेठीबेगारी कुलबाब कुलकानू देखील विहीर हुडा आला वरी वाठून ती खंडीयासि एईल ते देणे व इनामतीचे चावरामध्ये आबे व चिचा व झाडझाडौरा आपण व प्रजे करुनु लाउनु त्याचा राजभाग हाली व पेस्तर देणे
अंबराई दर बनास पेडी जकाती व जराईब पैकी
१ जकाती का। मा। जिराईब पैकी सदखा
पैकी रोजमुरा तेल दरोज वजन
धर्मादाऊ दरोज १ दो। वरताला
रुके बारा रास अडका प्रमाणे सेर
एक रास
दर सवाद का। इंदोरी इनाम मुरारीभट चावर थल मील नाक ए॥ खंडी ३ ए॥ चावर १ एक देखील नख्तयाति व महसूल व पटिया कुलबाब कुळकानु देखी उटपटी व वेठीबेगारी व वेठिया हुजराती व गैबती
एणेप्रमाणे भोगवटे व तसरुफाती ता। साल गु॥ चालत आले आहे हाली साल मजकुराकारणे माहाली कारकून ताजे खुर्द खताचा उजूर करिताति दरी बाब सरंजाम होए मालूम जाले तरी क्रुस्णभट बिन मुरारीभट ब्रह्मे सो। चाकण पा। मा। यासि इनाम व रोजमुरा व तेल व अबराई दर बनास पेडी १ एक सदरहूप्रमाणे देवविले असे ता। सन सलास भोगवटा व तसरुफाती जेणेप्रमाणे चालिले असेल तेणेप्रमाणे मनास आणौनु चालवणे दर हर साल ताजे खुर्द खताचा उजूर न करणे तालीक लेहुनु घेउनु खुर्द खत इनामदार मजकुरापासि फिराउनु देणे
रजू सुरु
निवीस
माहे रमजान
सुरुसूद
तेरीख १६
रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ २० ] १६७० - १६७१.
अज् रख्तखाने राजश्री जिजाआऊसाहेब दाइमदौलतह ता । मा । नारो त्रिमळ हुद्देदार व मोकद्दमानी व रयानी मौजे ( सेवका ) तर्फ खेडबरें मालूम दानद सु ।। इहिदे सबैन अलफ. हरी गोविंद याचा इनाम मौजे मजकुरीं. चावर १ एक आहे कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटाबद्दल फर्मान चालत आलें आहे आपलेंहि कारकीर्दीस चालिलें आहे. चिरंजीवाचा कागद आहे. तरी तुह्मीं भोगवटा मनास आणून, राजश्री निळो सोनदेऊ याचे बाप सोनाजी नारायण येहीं इनाम कीर्दी करुन भोगवटा चालिला आहे. हें तुह्मी देशमुख व मोकदाम यांस लिहोन सालाबाद चाललेंत आलें आहे तैसें चालवणें. दरम्यान कितेक दिवस फितवतीकरितां भोगवटा जाला नसेल, त्याचा उजूर न करणें. सालाबाद भोगवटें प्रो। मनास आणून, राजश्री निळो सोनदेऊ यांचे दुमाले इनाम शेत चावर एक करुन चालवीत जाणें. उजूर न करणें. तुह्मीं तालीक लेहुनु घेऊनु अस्सली खुर्द खत मा । इलेपासीं फिरावून देणें पा । हूजूर चावर सदरहूचें थळ नायगावीचे शिवेचा पाणलोट नजीक पिंपरी शेतांत देही आंबे ठेवताती. आंबे आहे ते यांचे दुमाल करणें, आणि चालवीत जाणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १९ ] ६ डिसेंबर १६७०
तह. छ १५ जिल्काद, सुहुरसन इहिदे सबैन अलफ बाबाजी सावंत याणे तरतूद करुन, चिंतामणीस दिवाळ व कुणबीणस दिवाळ या करुन, कोट पारखा करवून, कोटास दिवाळा करुन, पारखा करवून, देववा ( वा ) येणेंप्रमाणें पारखा कोट करुन आपणास कोट घेऊन द्या ह्मणजे सरंजामी करुन येणेप्रमाणें चालवावेंः-
बाबाजी सावत यास चितामणीस दिवाळ व कुणमणीस
पाचाशा घोडियाचे जितरब घ्यावे दिवाळ यास खजाना आरधा कोटातील
द्यावा व पाच गाव चालवावे.
येणेंप्रमाणें चालवावे. ऐसा तह केला असे. मोर्तब सूद. ( मर्यादेयं )
( विराजते )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १८ ] ४ ऑगस्ट १६७०.
मशहूरल हजरत राजश्री विठ्ठल दत्तो सुभेदार व कारकून ता ।। जाउली प्रती शिवाजी राजे दंडवत. सुहुरसन इसन्ने सबैन अलफ राजश्री प्रतापराऊ सरनोबताकडे हुजरुन दहा हजार रुपये ऐवज पाठविला आहे. तरी सदरहूस वोझील इतबारी नफर १० दहा देणे. मजुरास मजुरी रास देऊन सीताब वरच्यावरी रवाना करणें छ २७ रबिलावल. मोर्तब सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १७ ] अलीफ . २४ फेब्रुवारी १६७०.
आपले बराबरीचे राजांत श्रेष्ठ, सर्व उमरावांत थोर, श्रेह व विश्वास यांस योग्य, महत्कृपेस पात्र, पूर्ण लोभांत घेतलेले, राजे शिवाजी याणीं जाणावें की :- आमचा बहुत लोभ तुह्मांवर आहे. याजकरितां तुमचा सर्व मजकूर हुजूर लिहिल्यावरुन तुह्मांस राजेपणाचा किताब दिल्हा असे. या गोष्टीचा सत्कार मानून, पेशजीपेक्षां अधिक काम करुन दाखवावें. ह्मणजे सर्व मनोरथ पूर्ण होतील तुमचे कार्याविशीं विनंति लिहिली आहे तोही बंदोबस्त यथास्थित घडोन येईन खातरजमा ठेवावी आणि बादशाही लोभ आपणावरी आहे असे समजावें. छ ५ माहे सवाल सन ११ जुलूस, मु ।। सन १०८० हिजरी.