पत्रांक ३४९
श्री १७१२ कार्तिक मार्गशीर्ष
मेहेरबान हरीपंत हमषान मित मुस्तफिद असतां आपण पंत मवासुफ यांस रोबरो जबान मबारकेनें फर्माविलें कीं, तुह्मीं मार्गे पुइतगर्मीवर राहून फौजेस इंग्रेजांकडे रवाना व मामुर करावें. ये विसींचा तपशील त्यांणी इकडे निगारीष केला. त्यावरून मुफसाल दर्याफ्त जालें. चुनाचे, आपण सलाह फर्माविली ते मसलहतीस बहुत मुनासीब. आइंदा कोणासही सरेमाय वेगळेपण दिसत नाही. दोन्ही उमद्या दवलतीच्या तकवीयतेस नेक व मुफीद आहे. लेकिन, मिस्तर मालिट यांचा सवाल आग्रहानें कीं, जनराल जातीनें कलकत्त्याहून मुकावल्यावर आले. सरकारांतून हरीपंत सरंजामसुद्धां मोहिमेवर रुखसत व रवाना झाले. हे खबर त्यांस कलमी कर्ण्यात आली. जनराल यांची दिलापासून खाहीष कीं, पंत मोईन यांणींच फौजफेरोजीसहित पुढें यावें. खुलस, मिस्तर मालिट यांच्या मुबालग्यावरून कियासांत आलें कीं, खुद्द हरीपंत सरंजामसुद्धा गेल्यावांचून फकद फौज गेल्यानें जनरलाची खुषी नाहीं. सबब, हुजुरांतून येविसीं पंतमोईन यांस लिहून पुढें जाणें होय तें करावें. ह्मणोन निजामद्दौला बाहादूर यांस फारसी पत्र नानाकडून.