[ ४४ ] श्री. २६ मे १६९३.
मा। अनाम यादो शिवदेऊ नाडगौडे ता। खानापूर यासी रामचंद्र नीळकंठ अमात्य सु।। आर्बा तिसैन अलफ. नाडगौडकी ता। मजकूर बा। सेरणी होन पा। पांचशे पैकीं बद्दल देणें ऐवज सुभा राजश्री सताजी घोरपडे सेनापती यांकडे होन पा। ३०० तीनशें तसर देविलें असेत आदा करणें सदर्हू ऐवज कर्नाटकाचे रवानगीस देविला असे. बिलाकुसूर पावणें उजूर न करणें जाणिजे. छ १० शौवल निदेश
समक्ष.
लेखनसीमा
समुल्लसति.