पत्रांक ३४७
श्री लक्ष्मीकांत १७११ ज्येष्ठ वद्य ११
वेदमूर्ती राजश्री नाना दीक्षित यांसीः-
प्रति रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंति. उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. खासा स्वारी पैठणास गंगा उतरत आहे. त्यास, कायगांवीं ज्या नावा असतील त्या पैठणास जलदी पाठऊन द्यावे. छ २४ माहे रमजान, बहुत काय लिहिणे ? हे विनंति.
पौ शके १७११, सौम्य संवत्सरे, आषाढ शुद्ध मंगळवार,